अजित पवार उपमुख्यमंत्री राजकीय विश्लेषण

Submitted by हस्तर on 2 July, 2023 - 17:57

१) शिंदे गटाला शह ,नुकतेच जाहिरातींवरून राजकीय वातारवरण तापले होते ,श्रीकांत शिंदे डोईजड झाले असे लोकसत्ता वरून वृत्तावरून दिसते खाली लिंक आहे
तसेच एकनाथ शिंदे तब्बल १९ खाती ठेऊन होते ह्याच्या अर्थ मंत्रिमंडळ मध्ये त्यांचे मंत्री येणे अवघड होते

." डोंबिवलीत चव्हाण यांचे कट्टर समर्थक नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करायला हवी होती असे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मात्र ठाणे जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला. हा लोकप्रतिनिधी कोण या प्रश्नाचे उत्तर कांबळे यांनी जाहीरपणे दिले नसले तरी भाजप कार्यकर्त्याचा रोख मात्र मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसून आले."

https://www.loksatta.com/politics/shindesena-bjp-conflict-in-thane-distr...

२) विखे गटाला शह ,विखे ३ पिढ्यांचे हाडवैरी ,त्यांना नवीन मध्ये महसूल मंत्री मिळाले ,विखे ह्यांनी २०१९ मध्ये जुन्या जखमा काढल्या होत्या ,२०२४ मध्ये काही झाले तरी नगर मध्ये निवडणूक चुरशीची होणारच ,पण आत्ताच अजित दादांनी अर्थ आणि उप मुख्यमंत्रीपद घेऊन शह दिला

३) फडणवीस ह्यांना शह ,ह्यावर बरीच चर्चा झाली आहे ,शिंदे फडणवीस जमत नाही ,आता अजितदादा शिंदे बघू जमते का
४) भाजप विरोधी आघाडीत मध्ये भीती ,आत्ता तृणमूल वगैरे ह्याच भीतीत असणार कि त्यांचे आमदार पण फुटतील
५) उद्धव ठाकरे ह्यांचे भजे ,नुकताच न्यायालयाने निकाल दिला होता कि त्यांनी राजीनामा देणे हि मोठी चूक होती,पवार साहेबांनी ज्या जलद गतीने प्रतोद बदलला लोक पुढच्या वेळी त्यांचेच नेतृत्व जास्त मानतील
५) आव्हाड साहेब - आधी शिंदे ह्यांच्याकडून विरोधी पक्षात असून पण त्यानं निधी मिळत नव्हता ,पण आत्ता आव्हाड साहेब फुटले नसताना पण त्यानं निधी नक्की मिळेल ,लिहून घ्या

मुख्य मुद्दा अपात्रतेची आहे ,तर एकाच वर्ष राहिले आहे आणि सरकार तसे पण स्थिर आहे म्हणून शकयतो फक्त १-२ आमदारांवर अपात्र ठरवतील असा माझा अंदाज आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

40 आकडा फिक्स आहे.
सेनेचे पण 40 गेले .
राष्ट्रवादी चे पण 40 गेले .
हा आकडा काय bjp ला lucky आहे का

कोण कोणाचा game करत आहे हे समजत नाही.

आता सरकार बहुमत मध्ये च होते .
अजित पवार ची गरज नव्हती bjp ला तरी अजित पवारां ना का घेतले असावे ?
घेतले की हेच गेले त्यांच्या कडे हा दुसरा प्रश्न आहे.

जागावाटप जेव्हा होईल तेव्हा अजित पवार ना जागा सोडाव्या लागतील.
शिंदे गटाला जागा सोडाव्या लागतील.
४० जागा प्रत्येकी सोडल्या तरी .
२८८ मधील .
८० जागा bjp ला ह्या दोघांसाठी सोडाव्या लागतील.
ह्या जिंकल्या तरी bjp चे लोक कमी होणार.
नाही जिंकल्या तरी bjp च्या च जागा कमी होणार

इतक्या किचकट राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्र मध्ये घडतं आहेत की.
त्याचे वर्णन करताना शब्द जुळवणी करणे पण महा किचकट झाले आहे.
त्या मुळे आचार्य ह्यांना माझा प्रतिसाद समजला नसेल.
ह्या आता ज्या घडामोडी होत आहेत ते बघून भल्या भल्या राजकीय पंडित लोकांचं मेंदू पण चलेनासा झाला आहे.
मी तर सामान्य व्यक्ती आहे.
त्या मुळे विनंती आहे तुम्ही तुमच्या समजदारी ने माझ्या पोस्ट च अर्थ लावावा

सरासरी सरकार बनवण्यास किंवा सरकार पाडण्यास विरोधी पक्ष फोडला जातो.
आणि सत्ता मिळावी म्हणून आमदार फुटतात.
पण राज्यात विचित्र च घडले.
सत्तेत मंत्रिपद वर असणारे शिंदे आणि त्यांचे साथीदार फुटले .
का?
सत्तेत तर ते होतेच.
चला ते पण पचवू या.
सरकार कडे पूर्ण बहुमत असून पण अजित पवार ची ह्यांना काय गरज लागली.?

शिंदे असतील किंवा अजित पवार bjp sathit पुढील निवडणुकीत जास्त फायद्याचे ठरणार नाहीत.
असाच सर्वांचा अंदाज असून पण.

विरोधकांत एकी नाहीये, विरोधक बिनभरवश्याचे आहेत असा संदेश मतदारांत जायला हवा म्हणून.
आता बिहार मध्ये ही असेच होईल अश्या वावड्या उठवल्या जात आहेत.

तुमच्या सगळ्यांचा असा भोळेपणा आणि क्युटनेस पाहिला की मला माहेरच्या साडीतील अलका कुबल आठवते.>>>> Lol

आता मतदारांनी खरच स्वतःलाच चूना फासुन घ्यावा. Proud

मतदारांनी स्वतःलाच चूना फासुन घ्यावा. हे सगळे कसेही खेळून पूर्ण उघडे नागडे होऊनहि परत एकत्र येतील आणि जनतेला च्यू बनवत राहतील.
सगळे ईडीवाले आता एकदम स्वच्छ झालेत अचानक कारण ते BJP ला येऊन मिळाले.

BJP पार्टी विथ डिफरेन्स असं काही म्हणत होते पण त्यांचे देखील पाय मातीचेच हे सिद्ध झाले परत एकदा Angry Angry Angry

Upright
@GATHOBIAS
·
If ED/IT/CBI visits a leader of a political party in opposition, it may not be for prosecution. It is highly likely that it’s a recruitment drive; they recruit ministers for BJP.
If visit is to a corporate, it is more likely that Adani wants to buy it; visit is to facilitate it.

France मध्ये एक घटना घडली तर पूर्ण देश रस्त्यावर आहे.
इतकी तेथील जनता जागृत आहे.
भारतात इतके काही घडत आहे पण जनतेला त्याचे काहीच गांभीर्य नाही.
त्यांना समज च नाही असे समजा

फ्रान्स मध्ये एक घटना घडली म्हणायचेय का १००० घटना घडल्या म्हणायचंय ?
कारण जाळपोळ च्या हजारोंनी घटना घडल्या आहेत .

मणिपूर मध्ये पण फ्रान्स सारखेच निर्वासित मुस्लिम आहेत का ?
माहित नव्हते आत्ता पर्यंत .
युरोपीय देशांनी माणुसकी ची जाणिव ठेवून निर्वासित मुस्लिमांना प्रवेश दिला , आता ते त्यांना डोईजड ठरले आहेत.

फ्रान्स मणिपूरपेक्षा महाराष्ट्राच्या अधिक जवळ आहे हे माहीत नव्हतं.

तुम्हांला मणिपूरपेक्षा फ्रान्सबद्दल अधिक माहिती आहे असं तुम्हांला वाटतंय.
त्यावर नवा धागा काढून आम्हांला उपकृत करावे

मोरोक्को का कुठलातरी मुस्लिम देश फ्रान्स विरुद्ध फुटबॉल मध्ये हरल्यानंतर ही फ्रान्स मध्ये जाळपोळ झाली होती.

विश्लेषण ? बरं.

अजित पवार आणि उपमुख्यमंत्रीपद यांच नातं एव्हढं घट्ट आहे कि जर कधी त्यांच्या स्वतःच्या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले तरी ते उपमुख्यमंत्रीच होतील आणि मुख्यमंत्रीपदासाठी कुणाशी तरी युती करतील.
उपमुख्यमंत्रीपद हे कधी कधी अवचित येणार्‍या पावसासारखे आल्हाददायक असते. जसे आत्ता आहे.
तर कधी कधी शुष्क पडलेलुआ जमिनीत बसून रखडलेल्या पावसाची वाट बघत बसावे तसे असते जसे गेले आठ महीने आणि २०१४ ते २०१९ या काळात होते.
या काळात गळा छे खिसा छे छे निनावी बँक खाते शुष्क झाले. खर्चायला दिमडी उरली नाही. साधा फुटपाथवरच्या फळकुटावरचा चहा प्यावा तरीही देवाकडे आशेने पहावे लागे. देव नाही तर नाही देवांचा राजा इंद्र तरी प्रसन्न होईल या आशेवर दिवस काढावे लागत.

अहो, पण हेच मुख्यमंत्रीपद कधी कधी सामिष पंगतीत वाढलेल्या शाकाहारी ताटासारखे वाटले. पक्षाचे बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद दुसर्‍याला देऊन स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद घ्यायची वेळ आली.
पण लवकरच दुसर्‍याला मुख्यमंत्रीपद देऊन बारमाही खाती ताब्यात ठेवून मुख्यमंत्र्यांची गंमत करण्यातली मजा कळून आली.
अजितदादा उपमुख्य असताना मुम झालेल्या अशोक चव्हाण, पृथ्वीराज कपूर यांना ती ठसठस आजही जाणवत असेल. एक तर बिचारे स्वर्गवासी झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
त्यामुळे आता मुख्यमंत्री बनून ती मजा मिळेल काय ?

शिवाय मुख्यमंत्री हे सर्वोच्च पद भूषवल्यावर पुन्हा आघाडीत धाकटे झाल्यावर खालचे मंत्रीपद कसे घ्यावे ? मुम झाल्यावर उपमुम होणे हास्यास्पद तर नाही ना होणार ?
ती छाती फक्त हसणवीसांचीच. मुम होऊन आपले बहुमत येऊनही उपमुम होण्यातले दु:ख ते हसर्‍या चेहर्‍याने गावभर मिरवतात.
जणू काही झालेच नाही.

आताच्या घडामोडी ल असा पण काही अर्थ नाही.
आठ,नऊ महिनेच केंद्र सरकार ला राहिले आहेत.

कोण फुटले ह्याला आता काही अर्थ नाही.
निवडणूक जाहीर होईल आणि आचार संहिता लागू होईल तेव्हा .
Ed,cbi ही प्यादी लावारिस होतील.
तेव्हा कोण काय भूमिका घेईल त्या वर सर्व अवलंबून आहे
शिंदे त्यांच्या पूर्ण साथी दार सहित परत येवू शकतात.
अजित पवार पण येवू शकतात.
कारण मतदान जे होईल ते बीजेपी च्या बाजू नी किंवा विरोधी .
Bjp विरुद्ध लोकमत तीव्र आहे.

आता जे घडत आहे त्याला काही किंमत नाही

पृथ्वीराज कपूर नाही हो, पृथ्वीराज चव्हाण... >> सध्या तरी ते अकबर बादशहा वाटतात आणि अजितदादा सलीम !

मोरोक्को का कुठलातरी मुस्लिम देश फ्रान्स विरुद्ध फुटबॉल मध्ये हरल्यानंतर ही फ्रान्स मध्ये जाळपोळ झाली होती. >>>

खालील तीन वाक्यांतले शेवटचे कन्क्लुजन बरोबर आहे की नाही ते सांगू शकता का?
All roses are flowers.
Some flowers fade quickly.
Therefore some roses fade quickly.

सुंदर Happy

मला वाटते हे शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरे या सर्वांना हाकलून सलमान खान, शाहरुखखान, अक्षयकुमार, दिपीका पदुकोने, प्रियांका चोप्रा, इ. ना आणावे. त्यांचे सरकार पुढील १० वर्षे तरी स्थिर राहील.

<< एक पानी जाहीरात महागात पडली शुरविराला. >>

------ "अशी जाहिरात यावी यासाठी फडणावीस यांच्या विश्वासू व्यक्तीने शिंदे यांची मध्यरात्री नंतर भेट घेतली होती... ", अशी बातमी चार महिन्यानंतर बाहेर आणतील.

जाहिरात केवळ निमीत्त होते, ते मिळाले. कोण मुत्सद्दी आहे यापेक्षाही राज्याचे राजकारण रसातळांला नेले आहे.

Pages