हिंदी चित्रपटांतील जुनी आवडती गाणी: १९६० पर्यंतची

Submitted by अवल on 29 June, 2023 - 22:28

मला आवडणाऱ्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांसाठी हा धागा. सुरुवात किसी तऱ्हासे मुहोब्बतमें चैन पा न सके याने करते. बाकी खाली प्रतिसादामधे लिहीत जाईन, जसे जमेल तसे. तुम्हाला आवडणारी गाणी (पण जुनीच. 1960 पर्यंतचीच) लिहिलीत तर आवडेलच.

बडी माँ हा 1945 चा चित्रपट!
IMG_20230630_075518.jpg
मा. विनायक यांची निर्मिती अन दिग्दर्शन. सुप्रसिद्ध तारका- गायिका नूरजहाँ अन ईश्वरलाल, याकूब, सितारादेवी, मीनाक्षी, दामुअण्णा मालवणकर अशी तेव्हाची तगडी कास्ट असणारा हा चित्रपट. (1974 मधे आलेला बडी माँ हा चित्रपट वेगळा, अनेकदा दोन्हीची गल्लत केली जाते).

दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडत जाते. जागतिक राजकारण, जपान, भारताचे देशप्रेम अशा अनेक वळणांनी हा चित्रपट समृद्ध होत जातो.

या गीताचे संगीतकार होते सुप्रसिद्ध के. दत्ता होते. तर गीतकार अंजुम पीलीभीत.
गायिका होती नूरजहाँन. स्वातंत्रपूर्व काळातली महान गायिका- नायिका. तिच्या आवाजातला तलमपणा, तीनही पट्यांमधे लिलया फिरणारा आवाज, गोडवा; तिचं सौंदर्य आणि अभिनय सर्वच लाजवाब!
या गाण्याची जान आहे ती नूरजहाँनच्या "पाऽऽ न सके" या मधे.

सुरुवातीच्या हिंदी चित्रपट सृष्टीमधे कोल्हापूर अन मराठी कलाकारांचा कसा वरचष्मा होता हे या चित्रपटाची कास्ट बघितली की कळतं. निर्माता, दिग्दर्शक(मा. विनायक), संगीतकार ( के. दत्ता म्हणजेच दत्ता कोरेगावकर) , बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स), कथा ( व्ही. एस. खेडेकर) , एक गीतकार(राजा बढे), एक गायिका(लता), चार स्त्री कलाकार ( मीनाक्षी, लता, आशा, बेबी अलका), दोन पुरुष कलाकार (दामुअण्णा मालवणकर, दादा साळवी).
या शिवाय याकूब, सितारादेवी, लिला मिश्रा हेही या चित्रपटात होते.

आज या चित्रपटाची फिल्म, कुठेही उपलब्ध नाही. शक्यता आहे की फिल्म आर्काईव्हजमधे कुठेतरी असेल. पण किमान नूरजहाँच्या या आणि इतर गाण्यांनी (दिया जला कर आप बुझाया: https://youtu.be/gBczUcadYLw)
रसिकांच्या मनात हा चित्रपट जागा राहील.

सध्या इतकच!
---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता, भरत मी मूळ लेखातच लिहिलय हे Happy
>>>(1974 मधे आलेला बडी माँ हा चित्रपट वेगळा, अनेकदा दोन्हीची गल्लत केली जाते).<<<
वाचत नाही हं सगळं तुम्ही Lol

बेईमान तोरे नैनवा
https://www.youtube.com/embed/UpnT4Cth0pQ

तराना चित्रपटातलं हे गोड, रोमँटिक गाणं. 1951 चा हा चित्रपट. दिलिप कुमार, मधुबाला यांचा हा पहिला चित्रपट. याच काळात दोघांचे जीव एकमेकांत गुंतले.

संगीत आहे अनिल विश्वास यांचं. फार गोड गाणी दिलीत त्यांनी. 1932 ते 65 एव्हढा मोठ्या काळात त्यांनी सत्तर हून अधिक चित्रपटांमधून अनेक बहारदार गाणी दिली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, बाऊल संगीत आणि भटियाली संगीतांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
या गाण्यावर अजून काही लिहिण्या-वाचण्यापेक्षा ते बघावं ऐकावं Happy

आवडत्या विषयावर धागा काढलास आरती ताई.
सगळ्यात पहिल्यांदा रतन ची गाणी आठवली .
१. अखिया मीलाके जिया भरमाके चले नाही जाना
२. आयी दिवाली, दीपक संग नाचे पतंगा, मै किसके सांग नाचू बताजा
३. रुमझुम बरसे बादरवा, मस्त हवाये आई , पिया घर आजा (अमीरबाई कर्नाटकी)
४. अंगडायी तेरी है बहाना - मंजू दास
५. मिल के बिछड़ गयीं अँखियाँ, हाय रामा मिल के बिछड़ गयीं अँखियाँ (अमीरबाई कर्नाटकी)

आवडत्या इतर माझ्या गाण्याबद्दल लिहीनच वेळ मिळेल तसे.

ChhAn dhAgA. मला आवडणारे गाणे म्हणजे लाहोर चित्रपटातील, हे गाणे इथे ऐकू शकताः

https://youtube.com/watch?v=sEy6B1861K0&feature=sharec

यावर एक लेख लिहिला पण तो काही केल्या पोस्ट होत नाही आहे. कदाचित शब्दमर्यादा ओलांडली असेल. त्यामुळे केवळ लिंक टाकून पाहते.

मला आवडणारे गाणे म्हणजे लाहोर चित्रपटातील, हे गाणे इथे ऐकू शकताः

https://youtube.com/watch?v=sEy6B1861K0&feature=sharec

यावर एक लेख लिहिला पण तो काही केल्या पोस्ट होत नाही आहे. कदाचित शब्दमर्यादा ओलांडली असेल. त्यामुळे केवळ लिंक टाकून पाहते.

झुळूझुळू
वा वा, काय सुंदर गाणं
श्याम सुंदर न संगीतकार?
यातलच बहारें फिर भी आयेगी हे फार आवडतं गाणं :https://youtu.be/3QI07_I-PAM

बाय द वे तुम्ही लिहिलेल्या लेखात काही स्माईली (इमोजी) आहेत का? तर ते काढून मग लेख कॉपी पेस्ट करून बघा.
जरूर टाका लेख

सामी, मस्त गाणी
रतन (1944) नौशाद
काय एक से एक गाणी Happy
आणि लिही नक्की, वाट बघतेय

श्याम सुंदरची आठवण निघालीय तर त्यांचंच एक गाणं आज.

क्या रात सुहानी है

https://www.youtube.com/embed/qWzElSWSWRg

श्याम सुंदर या संगितकाराचं अजून एक गोड गाणं -"क्या रात सुहानी है." चित्रपट अलिफ लैला 1953मधला. साहिर लुधियानवींचे शब्द. महम्मद रफी अन लता. आशा माथूर आणि विजय कुमार वर चित्रित. दोघेही तसे फारसे माहित नसतील. पण जोडी म्हणून फार छान शोभलेत. विजयची जुल्फे देवानंदची जरूर आठवण करून देतील Wink

खरे तर निम्मी ही पण आहे चित्रपटात. पण हे सुंदर गाणं मिळालं आशा माथूरला. आशा माथूर ही हिंदी चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या काही सुक्षिशित नायिकांमधली एक. तिचं अजून एक प्रसिद्ध गाणं " हम सें ना पुछो कोई प्यार क्या है"

आता गाण्याबद्दल. या गाण्यात प्रश्न पडतो की रफी आहे की तलत Happy त्याची "जमाने " मधली मुरकी आहाहा.

लता चे "फुरसत" आपली मान वळवल्याशिवाय रहात नाही.

म्हटलं तर साधी सरळ चाल पण गुंगवून टाकणारी, मधाळ!

दोघांच्या आवाजाचा मुलायम पोत वेगळाच माहौल तयार करतो एव्हढं नक्की!

जरा अॅबरप्टली संपलय यात गाणं. पण दुसरी लिंक सापडली नाही

त्यात ओ जाने वाले बालमवा पण ऍड करा सामी, अमिरबाई श्यामकुमारचे.

Submitted by मानव पृथ्वीकर on 3 July, 2023 - 19:25

ओ जाने वाले बालमवा >> याचाही वापर किशोरने पडोसनमध्ये केला आहे Happy

बहुतेक. कुठल्यातरी धाग्यावर ५०-६० चया दशकातली गाणी किशोर कुमारने पुन्हा वापरून कशी धमाल केली आहे असा काहीतरी विषय निघाला होता. फारएंडने एक दोन गाणी सांगितली होती (उदा. तेरी गठरी मे लागा चोर मुसाफिर जाग जरा). आता ती चर्चा सापडत नाहीये. पण ती मूळची गाणी याच दशकातली असल्यामुळे या धाग्यावर हरकत नसावी?

अवल, सूचनेबद्दल आभार. ईमोजी होत्या आणि त्यामुळेच लेख पोस्ट होत नव्हता. हा पोस्ट करत आहे.
होय, श्यामसुंदर संगीतकार. मलाही "बहारे फिर भी आयेगी, मगर हम तुम जुदा होंगे" हे गाणे फार आवडते. पण जेव्हा "बैठी हूं तेरी याद को..." पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्याने वेडच लावले. त्याच आठवणींना उजाळा देत आहे.
----
१९४७-१९६० हा बॉलीवूडमधला काळ आणि त्यातले संगीत: माझ्या जिव्हाळ्याचा विषय आणि अत्यंत आवडीचा काळ.

आवडती गाणी आठवायचे तर मोठी यादी होईल. पण एका गाण्याबद्दल लिहिल्याशिवाय राहवत नाही. ते गाणं म्हणजे “लाहोर” चित्रपटातील लताबाईंनी गायलेलं “टूटे हुए अरमानोंकी इक दुनिया बसाये, बैठी हूं तेरी याद को सीनेसे लगाये”. श्यामसुंदर यांच्या संगीतदिग्दर्शनातून तयार झालेली अतुलनीय कलाकृती.

या गाण्यात अगदी लगेच जाणवणारी गोष्ट म्हणजे लताचा अतिशय कोवळा पण अत्यंत धारदार स्थिर स्वर. काही गाण्यांत शब्द प्रधान असतात आणि चाल त्यांना न्याय देणारी असते, त्या शब्दांचे गायक सोने करतो म्हणून ते गाणे आपल्याला भावते. या गाण्यात पहिल्यांदा जाणवतो तो लताचा आवाज. तो नुसता जाणवत नाही तर येऊन आपल्या काळजात सर्रकन घुसतो आणि रुतून बसतो. आता लताचा आवाज या विषयावर काही लिहिण्याची गरज नाही, आणि कितीही लिहिले तरी अपुरेच होईल. पण तरीही, चाळिशीच्या दशकातला तिचा स्वर, पन्नाशीच्या दशकातला तिचा स्वर आणि साठीच्या दशकातला स्वर ही स्वतंत्र संस्थाने आहेत. तर हा खास लताचा चाळिशीच्या दशकातला स्वर आहे. यात नूरजहाबाईंचा तिच्यावरचा प्रभाव अगदी स्पष्ट जाणवतो पण तरीही या गाण्याला अगदी खास लता टच पण आहे.

गाणे इथे ऐकू शकताः

https://youtube.com/watch?v=sEy6B1861K0&feature=sharec

या गाण्याचे सुरवातीचे संगीतही अतिशय घालमेल करणारे आहे. मला वाटते सतार आणि व्हायोलिन यांचे मिश्रण आणि मग सुरू होणारा तबला. (ऐकणाऱ्या जाणकारांनी कुठला ताल ते सांगितल्यास आणखी ज्ञानात भर पडेल, हा एकताल वाटला पण तालाचे माझे ज्ञान अत्यल्प आहे त्यामुळे चू. भू. द्या. घ्या.). ते संपून जेव्हा गाणे सुरू होते तेव्हा पहिल्यांदा हलका आणि हळवा सूर आणि मग मुखड्याची दुसरी ओळ उंच स्वरातली - इथेच गाणे आपला ताबा घेते. विशेषतः जेव्हा मुखडा संपतो तेव्हा त्या शेवटच्या शब्दात “सीनेसे” वरून “लगाये”वर येताना मारलेला सूर (हा गाण्याचा "सुर" नाही म्हणत मी, हा पोहोण्याचा "सूर"), आणि मग शेवटच्या "सुरा"वर जे आंदोलन आहे (१ः०० व्या मिनिटाला) ते लाजवाब!!

यात आणखी मिसळलेली गोष्ट म्हणजे गाण्यात तिने ओतलेली आर्तता. पहिल्या कडव्यात (वरील लिंकनुसार १ः१० या वेळी) “तू दूर है नजरोंसे….” ही ओळ म्हणताना काय ती सुरांची फेक. यात तो तापलेला आणि पुसट होत जाणारा सूर आणि व्हायोलिनची धून. काळीज कापत जाणारा उद्वेग, आणि परिणाम. आणि हा फेड-आउट होणारा स्वर अचल, स्थिर. तसूभरही इकडे हलत नाही की तिकडे हलत नाही. जरूर ऐकाच. विशेषतः ध्वनिमुद्रणाच्या कुठल्याही आधुनिक सोयी नसताना तो “फेड आऊट” परिणाम, केवळ गळ्यातून गाऊन साधणे, तोही इतका तंतोतंत, म्हणजे यंत्रालाही लाजवेल असा, म्हणजे केवळ असामान्य.

मग यामुळे श्रोते इतके गारद होतात की त्यांना जरा भानावर आणायला म्हणून असेल कदाचित, दुसरे कडवे जरा वेगळे, विलंबित लयीत बांधले आहे. किंवा असेही असेल की पहिल्या कडव्यात दुःखाचा टाहो फोडल्यानंतर दुसऱ्या कडव्याच्या वेळी जरा स्वतःला सावरून भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न, असा काहीसा परिणाम संगीतकाराला अपेक्षित असावा. हेही कडवे सुंदर. म्हणजे सुंदरच. पण ते पहिल्या कडव्याचे गारूड काही उतरत नाही आणि म्हणून कदाचित, तिसऱ्या कडव्यात (२:५५ व्या मिनिटाला) श्यामसुंदर आपल्याला पुन्हा त्या झोक्यावर उंच घेऊन जातो आणि तिथे खूप वर नेऊन पुन्हा एकदा सोडून देतो - आपल्या जिवावर. आणि मग तोच अनुभव आपल्याला परत एकदा मिळतो. पुन्हा एकदा तीच धार, तीच आर्तता आणि तीच गायकी काळीज कापत जाते.

हे गाणे एकदा ऐकून समाधान होत नाही. सुदैवाने आता परत परत ते ऐकण्याची सोय आहे. नाहीतर पूर्वी हे सिलोन रेडियोवर लागायचे तेव्हा संपल्यानंतर मग केवळ पुन्हा कधी ऐकायला मिळेल याची वाट पाहणे असायचे बस्स.

असो. लताच्या गाण्यांमधली विविधता आणि प्रत्येक गाण्यात तिच्या गायकीचा पुढे येणारा एक एक पैलू या विषयावर काय काय लिहू आणि किती. जर सुचले तर नंतरही आणखी गाण्यांबद्दल लिहीन. पण हा धागा असाच सुरू राहो.

अवल, "क्या रात सुहानी है" -- यात रफीच वाटतो. तलतने मुखडा जरा वेगळा म्हटला असता असे वाटते. पण "जमाने" वरची मुरकी जरा तलतचा भास करून देते. विशेषतः "अश्कोने जो पाया हैं" या गाण्यात तलतची अशीच मुरकी आहे.

"बेईमान तोरे नैनवा" हेही गाणे अगदी आवडते. अनिलदा यांच्या गाण्यांवर तर एक प्रबंध लिहिता येईल. तराना चित्रपटाच "वो दिन कहा गये बता जब इस नजर में प्यार था" हेही अतिशय सुंदर गाणे. विशेषतः गाण्याआधीचा शेर "क्या खबर थी .... ".

त्यात ओ जाने वाले बालमवा पण ऍड करा सामी, अमिरबाई श्यामकुमारचे.
Submitted by मानव पृथ्वीकर on 3 July, 2023 - 19:25>

रतन १९४४
संगीतकार: नौशाद
गायक : अमीरबाई कर्नाटकी, श्याम कुमार

ओ जाने वाले बालमवा
लौट के आ लौट के आ
जा मैं ना तेरा बालमवा
बेवफा बेवफा
आ ओ जाने वाले बालमवा
लौट के आ लौट के आ
जा मैं ना तेरा बालमवा
बेवफा बेवफा
तेरे बिन मेरा जिया
लागे ना कही भी पीया
हाय लागे ना
याद नहीं छोड़े तेरी
दुनिया अँधेरी मेरी
अब जाऊं कहाँ
ओ दिल को ले करता है दर्द जिया
लौट के आ लौट के आ
ओ दिल को ले करता है दर्द जिया
लौट के आ लौट के आ
ओ जाने वाले बालमवा
लौट के आ लौट के आ
जा मैं ना तेरा बालमवा
बेवफा बेवफा

हपा, थँक्यु Lol कसं काय विसरलेले हे, किशोर म्हणजे वल्ली आहे अगदी
मानव, सामी आहा

नूर जहाँची फारशी गाणी ऐकली नाहीत पण जी ऐकली आहेत ती आवडली. लताबाईंचा आवाज सात्विक वाटतो तर नूर जहाँचा खमंग.

या गाण्याचे पॉप व्हर्जन बहुतेकांनी ऐकले असेल. पण मला नूरजहाँचे ओरिजिनल 'चांदनी रातें' जास्त आवडते.

नूरजहाँन मलाही कॉलेजपर्यंत माहिती नव्हती फार. एकदा अलुरकरांकडे गेले होते तिथे लावलेली गाणी. मग चौकशी केली अन कॅसेट घेऊन आले ( तो जमाना कॅसेटसचा होता Happy 1980 चा सुमार)
अन मग पुढचा आठवडाभर आईचं डोकं उठवलं Lol पण काय एक से एक गाणी होती. आता ती कॅसेट राहिली नाही, आठवणी फक्त.
जितकी ऐकत गेले तितकी ती गाणी मनात बसत गेली. आज 40 वर्ष झाली पण अजून जशीच्या तशी आठवतात. गंमत म्हणजे इतकी मनात ठसलीत की आजवर नेटवर शोधायची गरजच वाटली नव्हती. या निमित्ताने शोधली, सापडली.

1. नाचो सितारों नाचो : https://youtu.be/vRlk6pZhRYM
2. तू कौन सी बदरी में : https://youtu.be/R-dKElgKGpM
3. किस तरह भुलेगा दिल: https://youtu.be/P8m0j59gyZw
4. तेरी याद आयी सवरियाँ : https://youtu.be/tfcDmtD9w-c
5. बुलबुलो मत रो यहाँ: https://youtu.be/BmxTbuaFX68
6. क्या यहीं तेरा प्यार था :
https://youtu.be/iH_X2D8Tui4
7. आजा आजा, मेरे बरबाद महोब्बत के सहारे: https://youtu.be/uIJQbDtj4pg
8. मेरे लिये जाहाँ में: https://youtu.be/U3Ff44qZneo
9. दिया जला कर आप बुझाया: https://youtu.be/IL5EbdnQm0s
9. कोई प्रेम का दे के संदेसा: https://youtu.be/AYtRfbmczxs
10. बैठी हूँ तेरी यादतले: https://youtu.be/i6gC7UF7uzE
11. आँधिया ग़म की युँ चली : https://youtu.be/ZM0i-cY7KAA
12. हमने तो शाम ए गम: https://youtu.be/MJyXZvARYso

माझे मन Happy
मस्त गाणं. रतनची सगळीच मस्त आहेत न

Pages