“ युनिव्हरसीटी अॅडमिशन अफर्मेटिव्ह अॅक्शन" वर अमेरिकन सुप्रिम कोर्टाचा टाळा! योग्य निर्णय!
आज अमेरिकन सुप्रिम कोर्टाने अमेरिकन युनिव्हर्सीटीज मधे प्रचलित असलेला "अफर्मेटिव्ह अॅक्शन“ चा कायदा मोडीत काढला.
माझ्या मते सुप्रिम कोर्टाने हा एकदम योग्य निर्णय घेतला आहे.
या निर्णयाने सर्व हुशार चायनिज व भारतिय विद्यार्थ्यांना आता युनिव्हर्सीटी अॅडमिशन मधे योग्य न्याय मिळेल , खासकरुन हार्व्हर्ड, स्टॅनफर्ड व येल सारख्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीमधली रेस बेस्ड कोटा सिस्टीम एकदाची निकालात निघेल( अशी आशा करतो!)
नाहीतर या अफर्मेटिव्ह अॅक्शन नियमामुळे बरीचशी हुशार भारतिय मुले/मुली ज्यांचा SAT or ACT मधे पर्फेक्ट स्कोर असुनही व GPA 4.8 वगैरे असुनही,अश्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीजकडुन डावलली जात होती! कारण काय तर कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ काळ्या, पांढर्या व हिस्पॅनिक मुला/मुलींना युमिव्हर्सीटीमधे प्रवेश मिळावा म्हणुन( केवळ डिव्हर्सीटीच्या नावाखाली!) . व्हॉट अ अट्टर नॉनसेन्स!
अमेरिकन सुप्रिम कोर्टाचे या योग्य निर्णयाबद्दल अभिनंदन! अमेरिकेतल्या भारतिय विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला दिवस म्हणावा लागेल.
इथे "थेट डिग्र्या वाटा"
इथे "थेट डिग्र्या वाटा" लेव्हल कमेंट येत आहेत. इतक्या डिसओनेस्ट चर्चेत भाग घेण्यात काही पॉइंट वाटत नाही.
कॉमी
कॉमी
कर्तुत्व दाखवा .
हा जयद्रथ आणि हा सूर्य .
अशा कॉमेंट आहेत.
भारतीय लोक जागतिक कंपन्यांचे नोकर आहेत त्या मुळे सीईओ सारख्या पदावर नियुक्त केले आहेत.
कारण त्यांची बाजार पेठ च भारत आहे है मालक लोक ओळखतात.
जगातील सर्वात तज्ञ डॉक्टर्स जे भारतात प्रॅक्टिस करतात .
ह्यांची यादी बघा .
भारतात त्या मधील किती आहेत.
सर्व लोक उपचार करायला विदेशी च जातात.
जे उद्योगपती भारतीय आहेत जे जागतिक स्तरावर नाव कमावत आहेत.
ते मेरिट ची व्याख्या तुम्ही बनवली आहे त्या मध्ये बसत पण नाहीत.
अडाणी नी 99.99% मार्क नव्हते मिळवले कोणत्याच परीक्षेत.
कोणताच शोध भारतात लागत नाही ज्या देशात 99.999% टक्के मिळवणारे लाखो लोक आज पर्यंत होवून गेले तरी
<< उबो - अंडरग्रॅड्/ग्रॅड
<< उबो - अंडरग्रॅड्/ग्रॅड डिग्री युटि ऑस्टिन, युजिए मधुन मिळवावी कि एमाय्टि, स्टॅन्फर्ड मधुन यातला फरक ओळखता येत नसेल तर बोलणंच खुंटलं... >>
तुम्ही समजता तितकी UT Austin कचरा university नाही. आणि मी जे उदाहरण दिले त्यात UT Austin आणि Emory ची तुलना केली आहे, हार्वर्डशी नाही. (कोर्ट केस हार्वर्डशी संबंधित आहे.)
The school's rejection rate that year for the remaining 841 openings was higher than the turn-down rate for students trying to get into Harvard.
कोर्टाने आरक्षण रद्द केले हा चांगलाच निर्णय आहे, हे मी आधीच म्हटले आहे. पण केवळ हार्वर्ड मध्येच जायचा अट्टाहास हे चायनीज आणि भारतीय वंशाचे लोक का करतात आणि तो इतका मानाचा प्रश्न का बनवतात, याच्यावर धागाकर्ते किंवा तुम्ही मत मांडतच नाही. Highly selective university मध्ये एडमिशन मिळाली तरच आयुष्य सार्थकी लागले असे काही आहे का? एक गोष्ट मात्र मान्य आहे की प्रायव्हेट university चे वलय/aura हे पब्लिक university ला नाही. पार्टीमध्ये bragging rights पण कमीच.
जाता जाता: नोबेल पुरस्कार विजेते John Good enough, ज्यांचे नुकतेच निधन झाले, ते पण UT Austin मध्ये प्रोफेसर होते.
Disclosure: शासकीय संस्थेत शिक्षण झाल्यामुळे माझे मत पूर्वग्रहदूषित असू शकेल. I may be biased towards public universities or not in favor of private universities. माझा UT Austin शी व्यक्तिशः काही संबंध नाही.
<< अजूनही बहुसंख्येने ब्लॅक ,
<< अजूनही बहुसंख्येने ब्लॅक , हिस्पॅनिक हे फारसे शिक्षण नसलेले, त्यामुळेच बहुधा लो इनकम गटात येतात. ते त्यांना परवडतील अशाच भागात त्यांना परवडणार्या घरात राहणार. तिथले वातावरण, एकूण (अ)सुरक्षितता, हे तुम्ही व्हाइट कॉलर जॉब्ज असलेल्या देशी आणि एशियन समाजाशी कम्पेअर करूच शकत नाही.
एशियन आणि देशी लोक हे लीगली इथे आलेले, किमान १ पदवी असलेले, चांगले जॉब्ज, शिक्षणाला प्राधान्य देणारे असे असतात. साहजिकच त्यांच्या मुलांना एक हेड स्टार्ट मिळालेला असतो. आर्थिक, कौटुंबिक स्थिती स्टेबल, कॉलेज फी ची चिंता नाही, पालकांचे लक्ष आणि सक्रीय मार्गदर्शन, कित्येकदा नोकरी, इन्टर्नशिप च्या संधी सुद्धा पालकांनी किंवा त्यांच्या वर्तुळातल्या कोणी प्लॅटर मधे देऊ केलेल्या किंवा निर्माण केलेल्या असतात. हे पहाता या प्रिविलेज्ड गटातल्या ९०% मुलांनी 4 GPA , 1500 SAT मिळवणे यात काही फार खास कर्तृत्व नाही असे नाही का वाटत?
याउलट जर कॅम्डन , हार्लेम इ. गरीब वस्तीतल्या एखाद्या कुटुंबात पैसा नसलेले, क्राइम बघत मोठे झालेले, रोल मॉडेल म्हनून नशेत किंवा नशा विकत असलेले पालक अशा स्थितीतले एखादे मूल जर शाळेत जाण्याचे आणि अगदी ३.० GPA , 1000 SAT मिळवण्याइतके मोटिवेशन, डीटरमिनेशन टिकवू शकत असेल तर ते मूल कॉलेज ला जायला नक्कीच जास्त लायक आहे असे समजेन मी. आणि अशा विषम परिस्थितीतून आलेली मुले आयुष्यात वरच्या प्रिविलेज्ड मुलापेक्षा जास्त यशस्वी झालेलीही पाहिलेली आहेत. >>
-------- सर्व प्रतिसाद वाचले. मैत्रेयी यांचा प्रतिसाद विचार करायला लावणारा वाटला.
सर्व सुविधा हात जोडून समोर आहेत आणि दुसरीकडे काहीच नाही अशा टोकाच्या परिस्थितीमधे, सर्वांना समान संधी (a level playing field - a situation where everyone has the same chance of succeeding) मिळणार नाही.
<< अगदी ३.० GPA , 1000 SAT
<< अगदी ३.० GPA , 1000 SAT मिळवण्याइतके मोटिवेशन, डीटरमिनेशन टिकवू शकत असेल तर ते मूल कॉलेज ला जायला नक्कीच जास्त लायक आहे असे समजेन मी. >>
त्यांनी अॅडमिशनसाठी मेरीटनुसार सर्वांच्या सोबत रांगेत उभे रहावे. प्रायव्हेट कॉलेजमध्येच जाण्याचा/आय.व्ही.लीगचाच आग्रह धरू नये. जिथे मिळेल तिथे अॅडमिशन घ्यावी, इतर पर्याय बघावेत, नाही तर कम्युनिटी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन मग युनिव्हरसिटी मध्ये जावे. तोच नियम प्रिव्हीलेज्ड एशियन-अमेरिकनना, जिथे मिळेल तिथे अॅडमिशन घ्यावी. हार्वर्ड्/एम.आय.टी./प्रिन्स्टनचाच आग्रह धरू नये.
<< अगदी ३.० GPA , 1000 SAT
<< अगदी ३.० GPA , 1000 SAT मिळवण्याइतके मोटिवेशन, डीटरमिनेशन टिकवू शकत असेल तर ते मूल कॉलेज ला जायला नक्कीच जास्त लायक आहे असे समजेन मी. >>>>
पण वास्तवात असं होतंय का? माझ्या कडे डेटा नाही पण एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. माझा एक परिचित मुलगा गेल्या वर्षी पर्ड्यु ला इंजिनिअरिंग साठी गेला. त्याला सुरुवातीला हवी असलेली शाखा मिळाली नाही. एक सेमीस्टर नंतर मिळाली. त्याच कारण असं कळलं की पर्ड्यु मध्ये ड्राॅप आऊट रेट खुप जास्त आहे. हे ड्रॅप आउट होत ह्या मुलांच्या आयुष्यात किती नकारात्मक परिणाम घडवु शकेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. त्यांची पुरेशी तयारी न करुन घेता त्यांना अशा कंपिटिटिव आणि हाय प्रेशर वातावरणात सोडुन देणे हा त्यांच्या वर अन्याय नाही का? त्याचबरोबर तो ज्यांची ती तयारी झालेली आहे त्यांना
प्रवेश नाकारुन त्यांच्या वर पण अन्याय आहे. नक्की कुणाचे भले होतेय या प्रक्रियेत?
हायस्कूल शिक्षणाचा दर्जा एकसमान करणे. तुम्ही उदाहरणात सांगितले आहे त्याप्रमाणे मुलं सेल्फ मोटिवेटेड असेल तर हायस्कूल आणि युनिव्हर्सिटी मध्ये कम्युनिटी कॉलेज चा टप्पा ठेवून त्यांना युनिव्हर्सिटीतल्या आव्हानांसाठी तयार करणे हे काही उपाय मला सुचले. काही प्रमाणात ते होताहेत पण पुरेसे नाहीत.
शिक्षणाची बंदी असल्याने
शिक्षणाची बंदी असल्याने स्वातंत्र्य मिळाले तरी लोक परंपरागत व्यवसाय करत राहिले. कितीही बुडीत निघाला तरी शेतकरी शेती करत लोकांचे पोट भरत राहिला. पहिल्या हरित आणि श्वेत क्रांतीनंतर शेतकर्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार दिला. पण आमच्यामुळे देश चालतो अशी भावना कुणाचीच नव्हती. ही विकृत आणि नीच भावना ठराविक लोकांची आहे आणि ती ते बोलून दाखवतात. सैन्यात सुद्धा मोठ्या संख्येने शेतकर्यांचीच मुलं भरती होतात. कारण शेतीव्यवसाय बेभरवशी आहे. प्राणांचे मोल तेच देतात. पण बोलून दाखवत नाहीत कारण असा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही. पोट भरण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो हे बहुसंख्य जनतेला इतरांकडे पाहून समजू लागले. १९८० सालापर्यंत पूर्ण वेळ शेती व्यवसाय असलेल्यांची संख्या लक्षणीय होती. टक्केवारी गुगल वर मिळेल. स्वातंत्र्य मिळाले तेव्हां ८०% जनता शेती किंवा शेतीवर आधारीत व्यवसायांवर अवलंबून होती.
तोपर्यंत कसलीच स्पर्धा नव्हती. ज्यांनी मुघलांपासून ते ब्रिटीशांपर्यंत शासन, प्रशासनात नोकर्या केल्या त्यांनाच परदेशी शिक्षणाचे महत्व समजले होते. हे शिक्षण गोर्या लोकांनी फुकटात उपलब्ध करून दिले. त्या वेळी जर त्यांनी तुम्हाला याचा कसलाही अनुभव नाही, तुम्हाला यातले काहीही येत नाही असा क्रायटेरिया लावला असता तर भारतात कुणीच व्यावसायिक उच्च शिक्षण घेतले नसते. ब्रिटीशांनी मेरीटमधे त्यांच्याशी स्पर्धा लावली नाही. त्यांनाही गरज होती. त्यामुळे उच्चशिक्षण ठराविक लोकांना विनासायास उपलब्ध झाले. त्याचा फायदा पुढच्या पिढ्यांना होत गेला. १९८० पर्यंत उच्च शिक्षण घेतलेल्या तिसर्या चौथ्या पिढीतले लोक परदेशात सेटल होऊ लागले.
१९८० पर्यंत आरक्षणात सुद्धा लायक उमेदवार मिळत नव्हते. कारण एक्स्पोजरची वानवा होती. पुढे शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी यांची मुलं उच्चशिक्षण घेऊ लागली. आपण जे केलं ते आपल्या मुलांनी नको करायला हा विचार त्यामागे होता. नेमक्या त्याच वेळेला मेरीटची कल्पना मांडायला सुरूवात केली. जे लोक मेरीटची कल्पना मांडत होते त्यांना हा इतिहास माहिती नाही असे होऊ शकेल का ? पण स्पर्धा नसावी हाच स्वार्थी विचार त्यामागे होता.
आता हीच स्वार्थी वृत्ती परदेशात घेऊन जाऊन तिथल्या सामाजिक न्यायाची हेटाळणी, टिंगल इथून गेलेले लोक करत आहेत. यामुळे देशाचे नाव सर्वत्र खराब होत आहे. ऑस्ट्रेलियात आता भारतातून येणार्या विद्यार्थ्यांवर बॅन लावायच्या हालचाली चालू आहेत. अमेरिकेत सुद्धा भारतियांच्या मानसिकतेची चर्चा आहे. त्यासाठी कायदे बनत आहेत.
या धाग्यामागे हाच विचार दिसला.
<<<पण केवळ हार्वर्ड मध्येच
<<<पण केवळ हार्वर्ड मध्येच जायचा अट्टाहास हे चायनीज आणि भारतीय वंशाचे लोक का करतात >>>
याबद्दल अश्या मोठ्या विद्यापिठातून शिकलेल्या बर्याच लोकांकडून मी ऐकले की मोठ्या विद्यापिठांत शिक्षणासोबतच पुढील आयुष्याचा विचार करायचा असेल तर महत्वाचे म्हणजे राजकारणी, उद्योगपती, अश्या लोकांच्या ओळखी असल्या तर पुढे फायदा होतो. अश्या मोठ्या विद्यापिठामधून शिक्षण मिळाल्यावर नोकर्या पण तश्याच चांगल्या ठिकाणी मिळतात, धंद्यासाठीहि त्याचा फायदा होऊ शकतो. मोठमोठ्या कंपन्यांमधे इंटर्नशिप मिळते, त्या इन्टर्नशिपचे पैसे मिळत नाहीत, पण सहसा घरची परिस्थिती बरी असल्याने ते परवडते, नि पुढे आपोआपच अश्या इन्टर्नना नोकरी मिळवण्यात प्राधान्य मिळते.
असे अनेक फायदे असतात चांगल्या विद्यापिठात जाण्याचे.
(It's not what you know, it's whom you know).
अमेरिकेची भानगड म्हणजे २५० वर्षांपूर्वीची घटना अजूनहि उराशी धरून बसले आहेत, त्यात परिस्थीनुसार बदल करण्याची सोय असली तरी इच्छा नाही. सुप्रिम कोर्ट फक्त त्या घटनेत काय आहे नि काय नाही ते सांगतात. त्यामुळे आजकालच्या काळात नुसता गोंधळ, त्यातून राजकारण!!
ती घटना गोर्या ख्रिश्चन पुरुषांनी केली. घटना केली तेंव्हा काळ्या नाणसांना माणूस मानायला सुद्धा लोक तयार नव्हते, बायकांना मतदानाचा हक्क नव्हता!
पुढे हळू हळू काही बदल घटनेत केले,.
आरक्षणाचा मुद्दा वाटतो तितका सोपा नाही, विशेषतः अमेरिकेत वेगळ्या वेगळ्या वंशाचे लोक रहात असल्याने, सगळ्यांना सारखा न्याय करणे अवघड झाले आहे. त्याला अक्कल लागते. पण अक्कल वापरून कायदे करतील ते राजकारणी कसले?
त्यामुळे वकिलांचे फावते! घटनेचा सोयिस्कर अर्थ लावून घाईघाईने निवडून येण्यासाठी काहीतरी कायदे करायचे.
सुप्रिम कोर्ट हे राजकारणापासून वेगळे व स्वतंत्र असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात तसे नसते. ज्या पक्षाचे लोक सुप्रिम कोर्टात जास्त, तसा घटनेचा अर्थ.
वर उच्च विद्यापिठात शिक्षण
वर उच्च विद्यापिठात शिक्षण घेण्याचे व्याहारिक फायदे मी लिहीले आहेत.
पण आयुष्यात यशस्वी (खूप श्रीमंत, नोबेल पारितोषिक मिळवणे, पंतप्रधान्/अध्यक्ष) होणे यासाठी उच्च विद्यापिठात शिक्षण हा एकच उपाय नाही - अंगभूत गुण, प्रयत्न यांच्या जोरावरहि कुठलेहि मोठेपण मिरवता येते.
हार्वर्ड व येल व प्रिन्स्टन मधील सगळेच लोक खूप यशस्वी झाले आहेत असे नाही.
https://www.northjersey.com
https://www.northjersey.com/story/news/columnists/2022/11/03/race-based-...
धनी, तु दिलेल्या लिंकसारखीच ही लिंक पण फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॅरेंट ऑफ अॅन एशियन स्टुडंट.
https://www.northjersey.com
ऊपाशी बोका यांच्या वरील पोस्टीत बरच तथ्य आहे. हार्व्हर्ड/ येल/ एम आय टी/ स्टॅनफर्ड चे प्रस्थ खुपच माजले आहे. त्यावर पर्णिकाने व उपाशी बोका यांनी त्यांच्या पोस्टीत तो प्रश्न आधीपण मांडला/ उद्ध्रुत केला होता व मी म्हटले होते की त्यावर मुद्देसुद चर्चा व्हायला पाहीजे/ केलीच पाहीजे किंवा व्हायलाच हवी!
उपाशी बोका यांनी त्याबद्दलचे त्यांचे विचार थोडक्यात मांडलेच आहेत. पण पर्णिका व त्यांच्याकडुन त्याबद्दल अजुन त्या प्रश्नाचा उहापोह करायला निश्चितच आवडेल.
सामना, तुमचा राग मी समजु शकतो. पण तुम्हाला जर शांत डोक्याने या अमेरिकेतल्या निर्णयाबद्दल चर्चा करायची असेल तर त्याला माझी तयारी आहे. तुम्ही व बर्याच जणांनी माझ्यावर व माझ्या सारख्या अमेरिकेत आलेल्या भारतियांबद्दल बरीच टिका केली आहे( जे अमेरिकेत येन/केन कारणाने मायग्रेट व स्थायिक झालेले आहेत ) त्याबद्दल मला राग आला नाही कारण मला माहीत आहे मी स्वतः अमेरिकेत का आलो. त्याचे कारण व मी इथे काय करतो ते तुम्हाला ठाउक असणे असंभव आहे.त्यामुळे अमेरिकेच्या दयेवर आलो, अमेरिकनांचे बुट पुसायला आलो, त्यांची थुंकी झेलायला आलो, कमी पैशावर काम करायला तयार असलेला एक गुलाम म्हणुन आलो अशी शेलकी विषेशणे वापरल्याचे मी अजिबात वैयक्तिक घेतले नाही.
हे तुम्हाला सांगायचे कारण की तुम्ही तुमच्या पोस्टीत तुम्ही मला जोडे मारले आहेत या भाषे बरोबर अनेक अभ्यासु मुद्देही मांडले आहेत.
ते मुद्दे भारतात जरुर लागु पडत असतील पण आजच वरच्या पोस्टमधे नंद्याजींनी अमेरिकेतले व भारतातल्या घटनेतले व परिस्थितीमधले फरक थोडक्यात पण अचुक सांगीतलेच आहेत त्यामुळे इथे अमेरिकेत ते मुद्दे तसेच्या तसे लागु होउ शकत नाहीत.
पण अजुनही बरेच फरक अमेरिकेतल्या व भारतातल्या परिस्थितीबद्दल आहेत. त्यामुळे इथल्या सर्वोच्च न्यायालयाचा अफर्मेटिएह अॅक्शनचा निर्णय सेलिब्रेट करणे याचा अर्थ भारताशी जोडुन " लेकी बोले सुने लागे" असा तुम्ही काढणे धाडसाचे होइल. आणी तुम्हाला मी हे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे.
विचारांची कंस्ट्रक्टिव्ह देवाण घेवाण करायची असेल तर मी केव्हाही तयार आहे पण नुसतेच टिका करुन इमिग्रंट बॅशींग चालु ठेवायचे असेल तर इंटरनेट हे खुले माध्यम असल्यामुळे तो तुमचा हक्क आहे व ती तुमची मर्जी.
सध्या इथे एकच मोट्ठा फरक भारतिय व अमेरिकेतल्या अफर्मेटिव्ह अॅक्शन मधला उद्ध्रुत करतो( अजुनही बरेच काही आहेत).
अमेरिका हा अजुनही इमिग्रंट्स( लिगली आलेले)चा देश समजला जातो. आजही( शेवट्ची ट्रंपच्या काळातली ४-५ वर्षे वगळली तर) अमेरिकेत इमिग्रंट्सना येण्याचा मज्जाव नाही. इन्फॅक्ट हायली एज्युकेटेड व हायर एज्युकेशन साठी आजही अमेरिकन युनिव्हर्सीटीज इमिग्रंट स्टुडंट्सना प्रवेश देण्यासाठी उत्सुक असतात. एकदा तश्या स्टुडंट्सचे एज्युकेशन पुर्ण झाले की बर्याचश्या मोट्ठ्या कंपनीज त्यांना हायर करुन त्यांचा/ व्हिजा/ग्रिन कार्ड / सिटीझनशिप स्पॉन्सरही करतात.
त्यामुळे आज तुम्हाला अमेरिकेत जगभरच्या देशातुन आलेले इमिग्रंट्स इथे स्थायिक झालेले दिसुन येतील. त्यात चायनिज, कोरिअन, फिलिपिनो, क्युबन, मेक्सिकन, भारतिय, पाकिस्तानी, आफ्रिकेतले वेगवेगळे देश( गुलाम म्हणुन फार पुर्वी आलेले आफ्रिकन लोक नव्हे तर कॅमेरुन,नायजेरिया,केनिया वगैरे देशातुन आलेले) लोक तुम्हाला दिसुन येतील
तसे भारत हा इमिग्रंट्सचा देश म्हणता येणार नाही. आजही भारतात असे वेगवेगळ्या देशातुन आलेली माणसे फार कमी आहेत.जे मुसलमान भारतात आहेत ते १२ व्या शतकापासुन भारतात जे मुस्लिम आले होते त्यांचे वंशज आहेत.( करेक्ट मी हिअर इफ आय अॅम राँग). म्हणुन आजही भारतात हिंदुंची मेजॉरीटी आहे. त्या हिंदुंमधे सवर्ण नेहमीच मायनॉरीटी मधे होते व आहेत उलट प्यु रिसर्च सेंटरच्या आकडेवारी नुसार सवर्णांशिवाय(३२ %) बाकीच्यांची संख्या टक्केवारीने खुपच मोठी आहे.(६८%). त्या सवर्णात ब्राम्हण तर फक्त ४% आहेत. त्यामुळे भारतात मुठभर लोकांच्या हातात शिक्षणाचा मक्का देण्यात देशाचे भले नाही. अश्या टक्केवारीने जास्त असलेल्या जनतेला ब्रिटिशांनी ट्रॅडिशनली शिक्षणापासुन वंचित ठेवले गेले होते. त्यातुन स्वातंत्र्यानंतर १९५०च्या दशकात भारतातल्या अफर्मेटिव्ह अॅक्शनचा जन्म झाला. मी फार तरुण वयात अमेरिकेत आलो. त्यामुळे भारतातल्या अफर्मेटिव्ह् अॅक्शनवर काही स्कॉलरली विचार किंवा ठोस अनुभव माझ्याकडे नाहीत. हे इथे मांडलेले विचार थोडेफार जे माहीत आहे त्यावरुन मी लिहीले आहेत.
तसे म्हटले तर अमेरिकेतही सिव्हिल राइट्स मुव्हमेंट नंतर १९६० च्या सुरवातीला ब्लॅक (ज्यांच्यावर अमेरिकेत जवळजवळ २५० वर्षाच्या गुलामगीरीच्या काळात जबरदस्त अन्याय झाला व ज्यांची जबरदस्त पिळवणुक झाली) व मग नंतर हिस्पॅनिक/ ओरिजीनल इंडियन अमेरिकन या मायनॉरीटी ग्रुपसाठी अफर्मेटिव्ह अॅक्शनचा कायदा सुरु झाला. जेव्हा हा कायदा सुरु झाला तेव्हा अमेरिकेत व्हाइट् कॉकेशिअन लोकांची पॉप्युलेशन मेजॉरीटी होती. त्यामुळे सुरुवातीला ब्लॅक्स/ हिस्पॅनिक्स विद्यार्थ्यांना कोटा सिस्टिम मधुन थोड्या जागा देण्यात व्हाइट अमेरिकन्सना काहीच वाटले नाही.आणी त्यात काही गैरही नव्हते.
पण आज अमेरिकेत उलट अशी वेळ आली आहे की व्हाइट अमेरिकन्स मधला लो बर्थ रेट ,इमिग्रेशनचा वाढता रेट व इमिग्रंट पॉप्युलेशनचा वाढता बर्थ रेट या ३ गोष्टींमुळे व्हाइट लोक २०४५ पर्यंत मायनॉरीटी मधे येणार आहेत!( म्हणजे लेस दॅन ५० % ऑफ यु एस पॉप्युल्र्शन!)
आज व्हाइट अमेरिकन्स ५७% आहेत. आजच्या घडीला अमेरिकन युनिव्हर्सीटीज मधे अफर्मेटिव्ह अॅक्शनच्या नावाखाली १०- ते १५ टक्के ( फारतर २० टक्के जागा) मायनॉरीटीजना मिळत आहेत. बाकीच्या ८०% जागा व्हाइट अमेरिकन्स पटकावत आहेत. म्हणजे अमेरिकेतले व्हाइट जे ५७ टक्के आहेत ते ८० टक्के जागा बळकावत आहेत. उरलेल्या २० टक्क्यात ते बाकीचे सगळे मायनॉरीटी ग्रुप बसवत आहेत. त्यात भर म्हणजे त्या उरलेल्या २० टक्य्यामधे एशियन व भारतिय (हायली क्वालिफाइड स्टुडंट्स) संख्येने डिप्रोपोर्शनेटली जास्त आहेत. मग युनिव्हर्सीटीजना ब्लॅक व हिस्पॅनिक डिव्हर्सीटी तर ठेवायची आहे व व्हाइट मेजॉरीटी तर घालवायची नाही! मग काय! करा कापाकापी हायली क्वालीफाइड एशियन व भारतिय विद्यार्थ्यांची! तस जर नाही केल तर २०४५ चे काय घेउन बसलायत? आत्ताच व्हाइट लोकांची संख्या अमेरिकन युनिव्हर्सीटीजमधुन कमी होत जाइल!
त्यामुळे नशिब की अमेरिकन सप्रिम कोर्टाने अफर्मेटिव्ह अॅक्शनला टाळा लावला! नाहीतर हायली डिझरव्हिंग एशियन व इंडियन विद्यार्थ्यांवर असा अन्याय होतच राहीला असता!
पण मी आधीच्या पोस्टमधे सांगीतल्या प्रमाणे अमेरिकन युनिव्हर्सीटीजनी हे ओळखले आहे की २०४५ पर्यंत व्हाइट मेजॉरीटी मायनॉरीटी मधे जाणार आहे व तेव्हा त्यांना अफर्मेटिव्ह अॅक्शन उलट व्हाइट मायनॉरीटीसाठी उपयोगी येणार आहे!त्यामुळे युनिव्हर्सीटिज वेअर व्हिगरसली फायटींग फॉर द अफर्मेटिव्ह अॅक्शन! अफर्मेटिव्ह अॅक्शन जर राहीली असती तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा नजिकच्या २० वर्षानंतर सगळ्यात जास्त व्हाइट अमेरिकन्सनाच होणार होता.
पण त्यांना हेही ठाउक होते की जर का ते ही केस हरले तर बॅक अप म्हणुन काहीतरी उपाय योजना आतापासुनच केली पाहीजे!
म्हणुन गेल्या काही वर्षांपासुन अमेरिकन युनिव्हर्सीटीजनी टेस्ट व अॅकॅडेमिक्स ब्लाइंड अॅडमिशन सिस्टिम सुरु केली आहे (म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट स्कोर व अॅकॅडेमिक अचिव्हमेंट न बघता एकदम सब्जेक्टिव्ह सिलेक्शन व्हेअर दे कॅन स्टिल मेन्टेन व्हाइट मेजॉरीटी ऑन कँपसेस! )त्याचा फटका सगळ्यात जास्त एशियन व भारतिय वंशाच्या विद्यार्थ्यांना जास्तच बसणार आहे बिकॉज दे आर ट्रॅडिशनली अँड कन्सिस्टंटली हाय अचिव्हर्स इन अॅकॅडेमिक्स!
त्यामुळे भारतातल्या अफर्मेटिव्ह अॅक्शनवर स्टे आणणारी केस व इथली सुप्रिम कोर्टाने निर्णय दिलेली अफर्मेटिव्ह अॅक्शनची केस यात तुलना होउच शकत नाही.
आता मेरीट बेसवरच अॅडमिशन होइल( अशी भाबडी आशा बाळगुन) मी त्या बातमीवर आनंद व्यक्त केला.पण जर का आता या निर्णयानंतर अमेरिकन युनिव्हर्सीटीजनी आपला टेस्ट व मेरिट ब्लाइंड अॅडमिशन बेस्ड अजेंडा व्हिगरसली राबवायला सुरु केला तर हा आनंद अल्पकाळच टिकणारा असेल!
अमेरिकेमधे इमिग्रंट होउन नागरिक बनलेल्या लिगल सीटीझन्सना मुळ अमेरिकेच्या घटनेतले सर्व हक्क प्राप्त होतात. अमेरिका हा देश अजुनही इमिग्रेशन बेस्ड असल्यामुळे अश्या लिगली नागरिक बनलेल्या इमिग्रंट्सनी आपला हक्क मागण्यात इथे अमेरिकेत काहीच गैर मानले जात नाही. भारत देश मात्र इमिग्रेशन वर निर्माण व सस्टेन असणारा देश नाही. म्हणुन बाहेरच्या देशातुन आलेल्यांनी हक्क मागायचा प्रसंग भारतात उद्भवतो की नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे अमेरिकन एशियन/भारतिय विद्यार्थांनी आपला हक्क अमेरिकेत मागीतला तर त्याकडे” आमचे लाड पुरवा “ अश्या दृष्टीने इथली न्यायलये बघत नाहीत. तसे या बीबीवर भारतात राहणार्या बर्याच जणांनी बोलुन दाखवले आहे किंवा त्यांचा असा (गैर) समज आहे.
आणी हो कॉमी, तुम्हाला डिग्र्या वाटायच्या मागचा माझा उपरोध कळला नाही याचा खेद वाटला. इथल्या काही पोस्टींमधे असा सुर आढळुन आला की अभ्यासात चांगल्र असणे, पहिला येणे या सगळ्या फाल्तु गोष्टी आहेत. ते वाचुन उपरोधाने मी तसे म्हटले आहे. तुम्हाला माहीत आहे की तुमचे माझे विचार खुप वेळा जुळतात. असो.प्रत्येक बाबतीत तुम्हाला माझे विचार मान्य असावेत असा आग्रह नाही.
सामना , तुम्हाला हे सगळे सांगायचे कारण तुमच्या पोस्टीतुन तुमचा स्कॉलरली अभ्यास व कळकळ दिसुन येतो पण एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कुठे राहता (भारतात का इतर कुठे) हे मला माहीत नाही पण अमेरिकेत राहात नसाल तर नुसत्या अमेरिकेच्या बातम्या वाचुन, अमेरिकन इतिहासाचा दांडगा अभ्यास करुन किंवा गुगल वरुन इथल्या समस्या व समाजाबद्दल बर्याच गोष्टी कळत नाहीत. ज्याला आपण समाजाची पल्स म्हणतो ती पल्स त्या समाजात दिर्घ काळ राहुनच कळते याबाबत दुमत नसावे. मी इथे अमेरिकेत जवळ जवळ ४० वर्षांपासुन राहत आहे. या ४० वर्षात इथले दैनंदिन जिवन जगुन, इथल्या समाजात वावरुन, इथे शिकुन, इथे काम करुन मी बरेच काही शिकलो आहे जे मला नुसते इतिहास वाचुन किंवा गुगल सर्च करुन किंवा नुसत्या ऐकीव गोष्टींवरुन कधीच शिकता किंवा समजले नसते. म्हणुनच तुम्हाला मी भारतिय अफर्मेटिव्ह अॅक्शनच काय पण सध्याचे भारतिय राजकारण किंवा सध्याच्या भारतिय सामजिक समस्यांवर भाष्य केलेले किंवा टिपण्णी केलेली कधीच दिसणार नाही किंवा तश्या बीबींवर मी कधी फिरकलेलोही तुम्हाला दिसणार नाही. पण इथे काही काही मंडळी बिनधास्त नुसती पिंक टाकायला (ज्या समाजाचा, त्या समाजातल्या गोष्टींचा, समस्यांचा गंधही व अभ्यास नसताना)आली आहेत. तुम्ही त्याला अपवाद दिसता कारण निदान भारतिय अफरमेटिव्ह् अॅक्शन बद्दल तुमची अभ्यासु व्रुत्ती व कळकळ आणी तुम्हाला अमेरिकन इतिहास माहीत असल्याचे तरी दिसुन येते. म्हणुन हे पोस्ट लिहायचा प्रपंच!
पण तुम्हाला अस वाटत असेल की कोणी माझ्या पोस्टवर मला लाथा मारल्या म्हणुन मी हे सगळे लिहीले तरी माझी काही हरकत नाही. त्या निमित्ताने अनेक गोष्टी अनेकांना समजतील तरी.
या बीबीला नळावरचे भांडण रुप येउ देउ नये ही इच्छा! काही काही ठराविक लोकांमुळे मायबोलिवरच्या अनेक चांगल्या बीबींची वाट लागलेली मी पाहीली आहे.
म्हणजे अमेरिकेतले व्हाइट जे
म्हणजे अमेरिकेतले व्हाइट जे ५७ टक्के आहेत ते ८० टक्के जागा बळकावत आहेत.>>>
साहिल शहा आणि पर्णिका यांनी क्लेम केले आहे की किमान 50% जागा affirmative action मध्ये भरल्या जातात. हे म्हणतायत 80% जागा गोऱ्यांना जातात. गोरे तर affirmative action मध्ये येत नाहीत असा माझा समज आहे. म्हणजे इथेच 130% झाले. त्यावर 20% एशियन. म्हणजे 150% झाले. हे काय गौडबंगाल आहे? प्लिज समजवा.
आणि गोरे लोक जर 80% जागा 'बळकावत' असतील तर व्हॉट मोर जस्टिफिकेशन डू यू नीड फॉर affirmative action?
हार्वर्ड ने दिलेल्या नंबर्स मध्ये तर asians लोकसंख्येच्या तुलनेत disproportionately जास्त दिसत आहेत. मग ते जागा बळकावत आहेत असं का म्हणू नये?
कोणाकडे खऱ्या फॅक्ट्स अँड फिगर्स असल्या तर कृपया संदर्भासह द्याव्यात.
मोरोबा तुमचा गैरसमझ होतोय.
मोरोबा तुमचा गैरसमझ होतोय. माझे म्हणणे आहे की approx २०% एशियन लोकाना जातात याचा अर्थ असा नाही की ८०% गोर्याना जातात. ८०% मध्ये गोरे , स्पॅनिश सगळे आले. २०% एशियन हा दर वर्षी थोड्याफार प्रमाणात बदलत असतो.
ह्या वर्षी हार्वर्ड मध्ये २७.९% एशियन होते, १५% अफ्रिकन, १२% स्पॅनिश, ४% मुळ रहिवाशी आणि बाकी गोरे होते. ह्या वर्षी एशियन लोकाना जास्त घेतले आहे . माझे मत असे आहे की affirmative action मध्ये ५०% जागा ठेवल्या तर एशियन च्या संख्या आजुन वाढु शकते. कित्येक एशियन असे आहेत की ज्याची कुवत असुन पण त्याना प्रवेश मिळत नाही. आरक्षण असावे पण ५०% वर नाही.
मोरोबा तुमचा गैरसमझ होतोय.
मोरोबा तुमचा गैरसमझ होतोय. माझे म्हणणे आहे की approx २०% एशियन लोकाना जातात याचा अर्थ असा नाही की ८०% गोर्याना जातात. ८०% मध्ये गोरे , स्पॅनिश सगळे आले. २०% एशियन हा दर वर्षी थोड्याफार प्रमाणात बदलत असतो.
ह्या वर्षी हार्वर्ड मध्ये २७.९% एशियन होते, १५% अफ्रिकन, १२% स्पॅनिश, ४% मुळ रहिवाशी आणि बाकी गोरे होते. ह्या वर्षी एशियन लोकाना जास्त घेतले आहे . माझे मत असे आहे की affirmative action मध्ये ५०% जागा ठेवल्या तर एशियन च्या संख्या आजुन वाढु शकते. कित्येक एशियन असे आहेत की ज्याची कुवत असुन पण त्याना प्रवेश मिळत नाही. आरक्षण असावे पण ५०% वर नाही.
80% गोर्यांना जातात हा मुकुंद
80% गोर्यांना जातात हा मुकुंद यांचा क्लेम आहे, तुमचा नाही.
जेव्हा ५०% पेक्षा जास्त जागा अफर्मेटिव्ह अॅक्शन मध्ये भरल्या जातात तेव्हा कुठेतरी चुकत आहे असे वाटते
Submitted by साहिल शहा on 29 June, 2023 - 22:19>>>
काळे, हिस्पॅनिक पालक तेवढे जागरूक किंवा कष्ट घेणारे नसतील तर त्यांच्या मुलांवर प्रवेश घेताना अन्याय होईल हे नक्की. पण त्याच उत्तर सरसकट वंशाच्या आधारे ५०% आरक्षण हे नसुन हा अन्याय होणार नाही अशी प्रवेश प्रक्रिया तयार करणं हे आहे
Submitted by पर्णीका on 30 June, 2023 - 10:48>>>
आय आय टी मुंबईत (परिक्षा देशातील सगळ्या विद्यार्थ्यांना खुली आणि एकसारखी असुन) ५०% जागा ह्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना राखीव ठेवल्यात तर तो निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश नाकारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का?
Submitted by पर्णीका on 30 June, 2023 - 19:31>>>
अशी मेहनत घेण्याची तयारी असलेल्या आणि नसलेल्या सगळ्यांना ५०% आरक्षण देणे योग्य आहे?
Submitted by पर्णीका on 30 June, 2023 - 19:31>>>
हे पन्नास टक्के कुठून आले बाबांनो?
मला उद्देशून दीर्घ प्रतिसाद
मला उद्देशून दीर्घ प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. मी तो वाचला नाही. वेळ मिळाल्यावर वाचेन. आकलन झाल्यावर त्याच्यावर लिहीन.
या धाग्यावर मी प्रतिसाद का दिले ? ही वेळ का आली ? यावर मी स्पष्टीकरण दिलेले आहे. पण तरीही आढेवेढे घेऊन "ए तुम्ही इथे राहत नाही ना, मग बोलू नका, हा टोन खूप अॅरोगन्ट आहे. कारण या न्यायाने अमेरिकेत राहणार्या कुणीही भारतातल्या आरक्षणावर किंवा कुठल्याच समस्येवर बोललं नाही पाहीजे. असं होतं का ? कित्येक चुकीच्या धारणांसहीत बोललं जातं. असंही नाही कि यांना भारताबद्दल काहीच माहिती नाही. पण चुका उघड व्हायला लागल्या कि "मग काय माहीत, भारतात काय परिस्थिती आहे ते आम्हाला माहिती नाही" अशी पळवाट काढली जाते.
भारतातून परदेशात गेलेले लोक असा पवित्रा घेतात कि त्यांनी भारत कधीही पाहिलेला नाही. खरे तर ज्या मूळच्या (रेड इंडीयन्स नाहीत. ते अमेरिकन्स कधीच नव्हते. त्यांना ईस्ट इंडीयन्स असे ज्यांनी म्हटले ते ) अमेरिकनांना, युरोपियनांना ज्यांनी भारत कधीही पाहिलेला नाही, त्यांनाही भारताबद्दल बरीच माहिती असते. मग इथून गेलेलेच का असा पवित्रा घेत असतील ? हे एक.
कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ
कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ काळ्या, पांढर्या व हिस्पॅनिक मुला/मुलींना युमिव्हर्सीटीमधे प्रवेश मिळावा म्हणुन( केवळ डिव्हर्सीटीच्या नावाखाली!) . व्हॉट अ अट्टर नॉनसेन्स! >>>> इतक्या स्ट्राँग रेशियल कमेण्टवर हा प्रतिसाद आला.
अग्रीड!!! रिव्हर्स रेसिझम जायलाच हवे आहे.
याच कारणासाठी मुकुंदचा टोन मला आउट ऑफ द लाइन वाटला नाहि.
अमेरिका पहिल्या नंबरवर होतकरु, मेहनती नागरीक/इमिग्रंट्स मुळे आलेली आहे, खिरापत वाटुन नाहि.. >>
ज्या प्रतिक्रिया विरोधात आहेत त्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा येऊन पुन्हा तीच तीच भाषा वापरली आहे. पण समर्थनार्थ ज्या प्रतिक्रिया येतात त्यामुळे तुमच्या लेखाबद्दल जे मत तयार होईल त्यावर तुम्ही काही बोलत नाही. जर गोर्यांना पण आरक्षण मिळत असेल तर रिव्हर्स रेसिझम कुठून आला ? ही टर्म तर रिव्हर्स कास्टिझम सारखी कोल्हेकुई आहे. आयआयटी त कुठे ५०% आरक्षण एससी एसटी मिळते ? ते ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ? उदाहरणे देताना तरी ती व्यावहारिक द्यावीत. जे नाहीच ती उदाहरणे देऊन तुम्ही काय सिद्ध करता ?
अमेरिका पहिल्या नंबरवर होतकरु
अमेरिका पहिल्या नंबरवर होतकरु, मेहनती नागरीक/इमिग्रंट्स मुळे आलेली आहे, खिरापत वाटुन नाहि.. >> अमेरिका पहिल्या नंबरवर कधी आली ? त्या वे़ळी भारतियांचे काय योगदान होते ? लेखात भारतियांवर अन्याय होतो असा टोन आहे. तो टोन खटकत नाही असा या प्रतिसादकाचा सूर आहे. मग मेहनती इमिग्रंट्समुळे अमेरिका पहिल्या नंबरवर आली तर ते कोण ? अमेरिका पहिल्या नंबरवर येण्यासाठी भारतियांचे जबरदस्त योगदान होते आणि त्यांच्यावरच अन्याय होतो असे आहे का ?
दुसर्या महायुद्धानंतर अमेरिका जागतिक फौजदार झाली. त्या वेळी अमेरिका घडवण्यात भारतोयांचे योगदान काय ? कृपया दुसर्या महायुद्धाच्या वेळचे काँट्रिब्यूशन सांगावे.
त्यानंतर रशिया व अमेरिका यांच्यात स्पेस वॉर सुरू झाले. यात भारतियांचे योगदान काय होते ?
अमेरिका पहिल्या नंबरवर आल्यानंतर मेहनती भारतिय तिकडे पळाले कि ते आधीपासून तिकडे होते आणि त्यांच्यामुळेच अमेरिका पहिल्या नंबवर आली तरीही त्यांच्यावर अन्याय होतो हा सूर आहे ?
हे सर्व मुद्दे सलग एका प्रतिसादात घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुद्दामून कुणा एकाला कोट केलेले नव्हते. हे कुणी काल्पनिक तर अजिबात नाहीत.
दुसरे म्हणजे आपण काहीही वक्तव्ये करायची आणि त्यावर येणार्या संभाव्य प्रतिवादांना आधीच निकालात काढायचे ही मोडस ऑपरेण्डी इथे पहायला मिळाली.
म्हणजे समाजवाद्यांना हे पटणारच नाही. >> अरे त्यांना म्हणू द्या. शिवाय त्या सर्वांना यच्चयावत समाजवादी हे लेबल लावून जाणूनबुजून वर्गीकरण का ?
अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया नंतरही आल्या आहेत, ज्यातली एक कोट केलेली आहे. जसे की "आमच्यावर हजारो वर्षे अन्याय झाला म्हणून, अरे पण म्हणून तुम्ही किती वर्षे अन्याय करणार ?" हा प्रतिसाद काढून टाकला आहे. म्हणून मी ही काढून टाकला.
मुळात कुणी असा प्रतिसाद कोट करेल हे आधीच गृहीत धरून तो हेटाळणीयुक्त सूरात लिहील्याने आपल्याला विरोधात कुणी मुद्देच मांडू नये ही चर्चेची पद्धत असते का ?
मूळ चर्चा प्रस्तावाचा टोन उर्मट, संदर्भहीन आणि कोणताच डेटा नसताना अशा संवेदनशील विषयाला हात घालणारा आहे. त्यावर अशा पद्धतीचे प्रतिसाद म्हणजे आगीत तेला ओतणारे. अशा वेळी इतरांनी सौम्य भाषेत प्रतिसाद दिले पाहीजेत, संवेदनशील असले पाहीजे नाहीतर ते जातीयवादी हा पण काड्या करणाराच टोन आहे. त्यामुळे प्रतिसाद देणे भाग पडले. अन्यथा अमेरिकेत राहणार्या भारतियांनी तिथल्या निर्णयावर मराठीत मायबोलीवर लिहील्याने ना बायडेनला भोकं पडतात ना ओबालाला ना ट्रंपला.
या निर्णयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जाऊ नये.
मोरोबा मी लिहलेले त्यात ५०%
मोरोबा मी लिहलेले त्यात ५०% आरक्षण अभिप्रेत नसून आरक्षित जागांपैकी ५०% राखीव असे अभिप्रेत होते. हे ५०% एक बाॅल पार्क म्हणून वापरले कारण टाइम मॅगझिन च्या लेखातील उदाहरण म्हणून ते उद्धृत केले आहे. लिंक खाली देतेय. डेटा युनिव्हर्सल आहे असं म्हणणं नाही, तर अशा युनिव्हर्सल डेटा अभावी मुद्दा स्पष्ट करण्यासाठी हा आकडा घेतला.
https://time.com/6291497/affirmative-action-college-admissions-process/
<<<>>> हे मुळ लेखातील वाक्य.
<<<>>>
हे मुळ लेखातील वाक्य.
या विषयावर नेमके प्रतिसाद रॉय
या विषयावर नेमके प्रतिसाद रॉय यांनी दिले आहेत. आपल्याला काय म्हणायचे आहे ते योग्य शब्दात त्यांनी मांडले. त्यात तथ्य आहे कि नाही हे माहिती नाही. पण त्यांचे म्हणणे कुणाहीही हेटाळणी न करता मांडले आहे.
हेमंत ३३३ यांचेही प्रतिसाद का आले हे समजण्यासारखे आहे. अमेरिका वर आली ती आमच्यामुळे असा काहींचा टोन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सांगतात कि बहुराष्ट्रीय कंपन्या वर आल्या त्या ब्राह्मणांमुळे. ब्राह्मणांना सरकारी नोकर्या नाहीत म्हणून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे गेले आणि त्यांच्या मेहनतीने त्या वर आणल्या असे ते म्हणतात. तशाच छापाचे हे म्हणणे आहे.
या बहुराष्ट्रीय कंंपन्या भारतात येण्याआधीपासूनच वर आलेल्या नव्हत्या का ? असाच प्रश्न भारतीय तिकडे जाण्याआधी युरोप अमेरिका वर आलेले नव्हते का ? हेमंत ३३३ यांनी आयत्या पिठावर रेघोट्या असा शब्द प्रयोग वापरला आहे.
आता याचाच व्यत्यास म्हणजे जर तुम्ही एव्हढे ग्रेट आहात तर मायदेशाला का वर आणले नाहीत ? ज्या वेळी भारतात पेशव्यांचे साम्राज्य होते त्या वेळी फ्रान्स मधे राज्यक्रांती झाली. औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाली. वैज्ञानिक शोध लागायला सुरूवात झाली. पेशव्यांचे राज्य असतानाच्या काळातच हे घडत होते. मग जे मेरीटच्या नावाने कोकलतात त्यांनी स्वतःचे राज्य असताना हे साध्य का केले नाही ?
आम्ही त्या देशाच्या उत्पन्नात भर घालतो हा टेंभा का मिरवायला हवा ? कारण शेतकर्यांनी नुकसान सोसून आम्ही तुम्हाला खायला घातले असा टेंभा मिरवलाय का ? उलट सवलती मिळतात, यांना आयकर बसवायला पाहीजे असेही कोकलतात. नुकसान झाले असे शेतकरी ओरडले तर शेतीत नुकसान असताना कोण पिढ्यान पिढ्या शेती करेल असे तारे तोडले जातात. शेतकरी संपाच्या वेळी फेसबुकवर असे तारे तोडणारे कोण आहेत हे अजूनही सर्च दिला तर समजेल.
म्हणजे इतरांचे योगदान शून्य आणि आम्ही जिकडे जाईल तिकडे सुपरमॅन असा डंका वाजवायचा आणि निमूटपणे इतरांनी तो मान्य करायचा. हे सगळं या एकाच धाग्यात आलं बघा.
<<<<म्हणुन गेल्या काही
<<<<म्हणुन गेल्या काही वर्षांपासुन अमेरिकन युनिव्हर्सीटीजनी टेस्ट व अॅकॅडेमिक्स ब्लाइंड अॅडमिशन सिस्टिम सुरु केली आहे (म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट स्कोर व अॅकॅडेमिक अचिव्हमेंट न बघता एकदम सब्जेक्टिव्ह सिलेक्शन व्हेअर दे कॅन स्टिल मेन्टेन व्हाइट मेजॉरीटी ऑन कँपसेस! )त्याचा फटका सगळ्यात जास्त एशियन व भारतिय वंशाच्या विद्यार्थ्यांना जास्तच बसणार आहे बिकॉज दे आर ट्रॅडिशनली अँड कन्सिस्टंटली हाय अचिव्हर्स इन अॅकॅडेमिक्स!>>>>
फार दुर्दैवी आहे हे. ह्याने विद्यापीठ प्रवेश आणखीनच अपारदर्शक होत जाईल.
विचारांची कंस्ट्रक्टिव्ह
विचारांची कंस्ट्रक्टिव्ह देवाण घेवाण करायची असेल तर मी केव्हाही तयार आहे >>> म्हणजे बावळट ढ म्हणणे, डिग्य्रा मोफत वाटा, खिरापत वाटा असे का ? आणि त्याला तशाच भाषेत उत्तर दिले तर बॅशिंग, राग आला कशासाठी म्हणावे ? कंस्ट्रक्टिव देवाण घेवाण म्हणजे काय ? मी जोडे मारलेत असा तुमचा समज असेल तर तुम्ही काय सत्कार केलाय का ?
कंस्ट्रक्टिव्ह देवाण घेवाण साठी मी खाली लिंक वर दिलेला लेख आणि मुलाखत विचारात घेईन. अशा पद्धतीने मांडायचे असते.
'Affirmative Action Improves Diversity on US Campuses, Benefits Asian Americans'
Natasha Warikoo, a professor at Tufts University, speaks to The Quint on the affirmative action debate in the US.
https://www.thequint.com/south-asians/natasha-warikoo-tufts-university-i...
सामना - सर्व प्रतिसाद आवडले.
सामना - तुमचे सर्व प्रतिसाद आवडले. छान अभ्यास आहे. सामाजिक न्याय या विषयावर एक धागा काढा, अनेकांचे गैरसमज दूर होतील.
अगदी cricket सारख्या खेळाचे
अगदी cricket सारख्या खेळाचे जरी घेतले तरी लक्षात येईल.
जी खेळाडू ची मुल आहेत.
त्यांना महागडा कोच असतो त्याची फीस महिन्याला लाखो रुपये असते.
त्यांना ग्राउंड उपलब्ध होते.
Cricket चे साहित्य सहज मिळते.
आहार सहज उत्तम दर्जा च मिळतो.
त्याची बरोबरी शेतकऱ्याच्या किंवा एकध्या सामान्य कुटुंबातील मुलांशी कशी करता येईल.
त्यांना कोच नसतो.
महागडे साहित्य नसते.
ग्राउंड नसते.
ह्या सर्वावर मात करून तो मैदानात उतरून शतक नाही पण 50 जरी रण करत असेल तर त्याचे कौशल्य स्टार खेळाडू च्या मुलापेक्षा नक्कीच चांगले आहे असे समजायला काही हरकत नाही.
मी तर म्हणतो अशा मुलांनी ५०
मी तर म्हणतो अशा मुलांनी ५० धावा जरी केल्या तरी १०० पकडायला पाहिजे.
@ मुकुंद.
@ मुकुंद.
<म्हणुन आजही भारतात हिंदुंची मेजॉरीटी आहे. त्या हिंदुंमधे सवर्ण नेहमीच मायनॉरीटी मधे होते व आहेत उलट प्यु रिसर्च सेंटरच्या आकडेवारी नुसार सवर्णांशिवाय(३२ %) बाकीच्यांची संख्या टक्केवारीने खुपच मोठी आहे.(६८%). त्या सवर्णात ब्राम्हण तर फक्त ४% आहेत.">
आकडेवारीमध्ये खूपच मोठी गडबड दिसते आहे. हिंदूंमध्ये सवर्ण म्हणजे त्रैवर्णिक. ( शब्दकोशात पाहाल तर एकाच वर्णाचे असा अर्थ दिसेल. पण वापरामुळे सवर्ण म्हणजे स्पृश्य असा अर्थ रूढ झाला आहे. तसेही वरील अवतरणात एकाच वर्णाचे हा अर्थ लागू पडत नाही ) चार वर्णांपैकी शूद्र सोडून बाकी तीन वर्णांचे लोक म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्यांची मिळून नेहमीच बहुसंख्या होती.
अनुसूचित जाती आणि जमाती ह्या हिंदुधर्मांतर्गत नव्हत्या. ब्राह्मणसुद्धा आता टक्केवारीने साडेतीन चार टक्के उरलेले नाहीत. निदान महाराष्ट्रापुरते तरी खूप पूर्वी ब्राह्मणांकडून अब्राह्मण समजले जाणारे आणि रोटीबेटी व्यवहार होऊ न शकणारे दैवज्ञ, सारस्वत असे लोक आता खानेसुमारीत ब्राह्मण म्हणून स्वतःला नोंदवतात. खास ब्राह्मणांच्या व्हॉट्स अप ग्रूप्सवर त्यांना आवर्जून प्रवेश मिळतो. पूर्वीच्या उत्तरप्रदेशातील काही हलक्या मानल्या गेलेल्या ब्राह्मण जाती आता ' खऱ्या ' ब्राह्मणांनी आपल्याश्या केल्या आहेत.
आणि ब्राह्मण सारे एक व्हा, जय परशुराम ही लढाऊ घोषणा आहे.
<<सामाजिक न्यायाची हेटाळणी,
<<सामाजिक न्यायाची हेटाळणी, टिंगल इथून गेलेले लोक करत आहेत. यामुळे देशाचे नाव सर्वत्र खराब होत आहे. >>
अहो सामना, तुम्ही फार भावनात्मक होउन अतिशयोक्ति करत आहात.
टिंगल, हेटाळणी म्हणत नाहीत इथे त्याला. बोलण्याचे लिहिण्याचे स्वातंत्र्य म्हणतात. त्याचे कारण असे, की इथे रहायचे तर इथल्या परिस्थिती बद्दल चर्चा केली पाहिजे.
नि कुठल्या देशाचे नाव खराब होत आहे? भारताचे? नि इथले भारतीय ते करतात?
अहो राहुल गांधी कुठल्या देशाचा आहे? त्याने इथे येऊन कोणत्या देशाची बदनामी केली? काही माहिती आहे का? नसल्यास गूगल करा. आणि तो तर भारतातला ज्येष्ठ नेता!
<<<ज्या वेळी भारतात
<<<ज्या वेळी भारतात पेशव्यांचे साम्राज्य होते त्या वेळी फ्रान्स मधे राज्यक्रांती झाली. औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाली. वैज्ञानिक शोध लागायला सुरूवात झाली. पेशव्यांचे राज्य असतानाच्या काळातच हे घडत होते. मग जे मेरीटच्या नावाने कोकलतात त्यांनी स्वतःचे राज्य असताना हे साध्य का केले नाही ?>>>
त्यावेळी सध्या अमेरिकेत असणारे भारतीय जन्माला आले नव्हते!! आता आमच्या पूर्वजांना सुद्धा नावे ठेवायची असतील, तर तुमचेहि पूर्वज तिथे होते हे लक्षात घ्या, सगळा दोष इथल्या भारतीयांवर का?
काहीही करून ब्राम्हणांना दोष
काहीही करून ब्राम्हणांना दोष दिला की पुरोगामित्व सिद्ध.
Pages