“ युनिव्हरसीटी अ‍ॅडमिशन अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन" वर अमेरिकन सुप्रिम कोर्टाचा टाळा! योग्य निर्णय!

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

आज अमेरिकन सुप्रिम कोर्टाने अमेरिकन युनिव्हर्सीटीज मधे प्रचलित असलेला "अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन“ चा कायदा मोडीत काढला.

माझ्या मते सुप्रिम कोर्टाने हा एकदम योग्य निर्णय घेतला आहे.

या निर्णयाने सर्व हुशार चायनिज व भारतिय विद्यार्थ्यांना आता युनिव्हर्सीटी अ‍ॅडमिशन मधे योग्य न्याय मिळेल , खासकरुन हार्व्हर्ड, स्टॅनफर्ड व येल सारख्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीमधली रेस बेस्ड कोटा सिस्टीम एकदाची निकालात निघेल( अशी आशा करतो!)

नाहीतर या अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन नियमामुळे बरीचशी हुशार भारतिय मुले/मुली ज्यांचा SAT or ACT मधे पर्फेक्ट स्कोर असुनही व GPA 4.8 वगैरे असुनही,अश्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीजकडुन डावलली जात होती! कारण काय तर कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ काळ्या, पांढर्‍या व हिस्पॅनिक मुला/मुलींना युमिव्हर्सीटीमधे प्रवेश मिळावा म्हणुन( केवळ डिव्हर्सीटीच्या नावाखाली!) . व्हॉट अ अट्टर नॉनसेन्स!

अमेरिकन सुप्रिम कोर्टाचे या योग्य निर्णयाबद्दल अभिनंदन! अमेरिकेतल्या भारतिय विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला दिवस म्हणावा लागेल.

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद. तुझा - एक अवयव विकलांग असेल तर संपूर्ण सोसायटी क्रिपल होण्याचा मुद्दा खूप वजनदार आहे हे खरे.

मुद्दे मांडावेत ही विनंती. कृपया संवेदनशीलता, घृणा असे शब्द वापरून काही लोक घूणास्पद आहे असे सुचवू नये ही विनंती. धाग्याची मांडणी जशी असेल आणि त्याला अनुमोदक जसे असतील तसे प्रतिसाद पण येणार. आपण काय मुद्दा मांडायचा तो मांडावा. त्याला प्रतिवाद काय येणार हे आपणच लिहून तो आधीच रद्दबातल करणे याला संवेदनशीलता म्हणायला नव्याने सुरूवात झाली असेल तर सर्वांना कळवावे.

घृणा हा शब्द काढून टाकलेला आहे.
मला दोन्ही बाजूंपैकी एकाही बाजूची - कड घेता येत नाही. प्रचंड अनिर्णयक्षमता आहे. मी गप्पच बसते.

माबोवार यायचे नाही ठरवले होते, पण ताण हलका व्हावा म्हणून आलो तर हा धागा वर. इथे चर्चा व्हावी असे काहीही नाही हे माझे मत आहे. अशा विषयांवर आता सोशल मीडीयात उत्तम चर्चा होऊ शकता नाहीत. प्रघांच्या धाग्यावर त्याच अर्थाचे म्हणणे आहे. अशात जर असे विषय आले तर काय होते याचे हा धागा उदाहरण आहे. खरे म्हणजे असे मुद्दे हजारो वेळा मांडून झाल्यावरही ना इकडच्या बाजूचे मत बदलते , ना तिकडच्या.

अमेरिकाच नाही, ज्या ज्या देशात सिव्हिल वॉर झालेले आहेत, यादवी अनुभवलेली आहे, महायुद्धाची झळ पोहोचलेली आहे, त्यांनी एक किंमत चुकवलेली आहे. त्या किंमतीतून सहजीवनाचे महत्व समजलेले आहे. अगदी नेपोलियनच्या आधीपासून, फ्रेंच राज्यक्रांतीपासून, ते चर्चच्या विरोधातल्या सामाजिक क्रांतीतून त्यांची विचारसरणी घडत गेली आहे. अजूनही ती परफेक्ट नाहीच.

पण मोठ्या संघर्षानंतर मुख्यत्वे कृष्णवर्णियांसाठी (तो देश त्यांचाही आहे) त्यांना मुख्य धारेत आणण्यासाठी त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे. या सगळ्यात ज्यांचा समावेश उशिराने झालेला आहे त्यांनी इतिहास जाणून घेऊन, समजून घेऊन आपल्यात बदल करावा हे माझे मत आहे. यात कुणालाच हिणवण्याचा उद्देश नाही. अशाने भारतियांबद्दल एक वेगळा दृष्टीकोण तयार होईल. इथे या धाग्यावर पूर्ण विराम.

>>>>>>>>खरे म्हणजे असे मुद्दे हजारो वेळा मांडून झाल्यावरही ना इकडच्या बाजूचे मत बदलते , ना तिकडच्या.
सत्य आहे.

बरीचशी हुशार भारतिय मुले/मुली ज्यांचा SAT or ACT मधे पर्फेक्ट स्कोर असुनही व GPA 4.8 वगैरे असुनही,>>>

मी सध्या अशा मुलांना आणि पालकांना जवळून बघतेय म्हंटले तर फार चुकीचे नाही.
मला ही मुलं हुशार पेक्षा जास्त focused and prepared वाटत्तात. अर्थात सगळी नाही पण बरीचशी.
त्या तयारीत पूर्ण कुटुंब आणि कुटुंबाची आर्थिक, सामाजिक सगळी ताकद पणाला लागलेली दिसते.

ह्याच्यात फक्त स्वतः च्या बौद्धिक बळावर ( natural intelligence) हे यश संपादित करणारे अगदी हाताच्या बोटावर.

फक्त तेवढे resources नाहीत म्हणून तेव्हढी उंची न गाठणारे ' ढ ' कसे झाले ? ते एक ना उलगडणारे कोड आहे.

भरपूर बोलावे ह्या विचाराने आलो होतो, पण मोरोबांनी आमची हवाच काढून टाकली.

मोरोबा ह्यांच्या प्रतिसादाला +१.

अरे काय हे? एक दिवसात धागा कुठल्या कुठे भरकटवला!

सर्वप्रथम, बरेचसे प्रतिसाद वाचुन अस वाटतय की आता परिक्षा, मेरीट वगैरे गोष्टींना फाट्यावर बसवुन कोणाला वाट्टेल त्याला आर्बिटरी नंबर्स देउन मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्ट, सी. ए. सारख्या वगैरे पदव्या बहाल करुन टाकाव्यात! हाय काय आणी नाय काय!! अभ्यास बिभ्यास करायची भानगडच नको!

सर्वप्रथम एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते. ज्यांनी माझ्या अमेरिकन राजकारणावरच्या पोस्टी वाचल्या असतील त्यांना माहीत आहे की माझी बहुतांशी मते उदारमतवादाकडे झुकणारी आहेत, बी इट अ ईश्यु ऑफ अ‍ॅबॉर्शन ऑर सोशल प्रोग्रॅम्स बाय द गव्हर्मेंट फॉर द नीडी अँड डाउनट्रॉडन. मी शेंडेनक्षत्र व राजशी उदारमतवादाच्या बाजुने एक्स्ट्रिम कन्झर्व्जेटिझम विरुद्ध भरपुर हिटेड वाद घातले आहेत.

या बीबीवरच्या माझ्या मुळच्या पोस्टीचा विपर्यास केला जात आहे.

जर कोणी परत एकदा ते मुळचे पोस्ट वाचायची तसदी घेतली तर त्यांना दिसुन येइल की मी नुसते मेरिटलेस काळ्या व हिस्पॅनिक( मायनॉरीटी) विद्यार्थ्यांबद्दलच लिहीले नाही पण त्याच वाक्यात मी मेरीटलेस “ पांढर्‍या” ( मेजॉरीटी) विद्यार्थ्याचाही समावेश केला आहे. त्यामुळे मी मेरीटच्या संदर्भात फक्त मायनॉरीटी आणी मायनॉरीटीजच्याच हात धूउन मागे लागलो आहे व माझा मायनॉरॉटी बद्दल पुर्वग्रहदुषीत असा काही हिडन अजेंडा आहे हा जो समज बर्‍याच जणांनी आपल्या पोस्टीत मांडला आजे तो दुरापास्त (मिसप्लेस्ड) आहे.

मी स्वत:ला एज्युकेशन प्युरिस्ट समजतो. मन लावुन नेटाने अभ्यास करुन देन लेट द चिप्स फॉल व्हेअरेव्हर अशी शिकवण माझ्या आईवडिलांनी मला दिली व तेच मी माझ्या मुलाला शिकवतो. पण इथे बरीच मंडळी अभ्यास बिभ्यास व पहिला नंबर येणे हे सगळे थोतांड आहे अश्या विचारांची आहेत अस दिसतय. त्यामुळे शिक्षणाबद्दलची माझी मते त्यांना आवडणार नाहीतच याची खात्री आहे. आणी त्यांना माझी मते आवडावीच असा आग्रह मी करतच नाही. भारत व अमेरिका अजुनतरी व्यक्तीस्वातंत्र्य असणारे देश आहेत.त्यामुळे प्रत्येकाची मते सारखीच असायलाच पाहीजेत असा आग्रह किंवा अश्या भ्रमात माझ्यासकट कोणीच राहु नये.

माझ्या या धाग्यावरुन एवढा गदारोळ उठलेला बघुन एक धागाकर्ता म्हणुन या धाग्याच्या विषयाबद्दल एक महत्वाचा खुलासा मला करावासा वाटत आहे की मी जो आधीच करायला हवा होता. पर्णिकाने त्याबाबतीत थोडा खुलासा कारायचा प्रयत्न केला होता पण तो कोणाच्या लक्षात आलेला दिसत नाही किंवा त्या खुलाश्याकडे या गदारोळात दुर्लक्ष केले गेलेले दिसत आहे.

अमेरिकन सुप्रिम कोर्टाने कॉलेज अ‍ॅडमिशन मधल्या अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन विरुद्ध निर्णय हा जो निर्णय दिला आहे तो खटला एशियन अमेरिकन स्टुडंट ग्रुपने हार्व्हर्ड युनिव्हर्सीटीविरुद्ध दाखल केला होता. त्या ग्रुपचे असे म्हणणे होते की हार्व्हर्ड सारख्या प्रेस्टिजिअस, टॉप व एलिट युनिव्हर्सीटीमधे एशिअन स्टुडंट्सना त्यांचे अ‍ॅप्लिकेशन्स मेरीट बेस वर सगळ्यात चांगले असुनही डावलले जात होते. हार्व्हर्डचा असा बचाव होता की ते अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शनला बांधील आहेत व ते मेरीट बेस्ड अ‍ॅडमिशन त्यामुळे करु शकत नाहीत. पण तोच अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन कायदा जो मायनॉरीटी चे हित बघण्यासाठी तयार केला होता तो आता एशिअन मायनॉरीटीला उलटा फटका देत होता! कारण मी आधी वर एका पोस्टीत सांगीतले होते तसे १०० हार्व्हर्ड अ‍ॅप्लिकंट असतील तर त्यातले जे एशिअन( व ईंडियन) अ‍ॅप्लिकंट्स होते ते नेहमीच मेरीट बेस्ड वर जर बघीतले तर डिसप्रोपोर्शनेटली खुप होते. त्यामुळे हार्व्ह्र्ड त्या सगळ्या हुशार एशियन विद्यार्थ्यांपैकी मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देउ लागले.

हे असे यिअर इन यिअर आउट होत असलेले बघुन हुशार एशियन विद्यार्थ्यांनी मग हार्व्हर्ड विरुद्ध खटला दाखल केला की अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन जी मायनॉरीटिज ना फायद्याची असायला पाहीजे तीच अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन एशिअन मायनॉरीटीसाठी मात्र तोट्याची ठरत आहे!

या सगळ्या गोंधळात एक गोष्ट नमुद कराविशी वाटते की हार्व्हर्ड सारखी युनिव्हर्सीटी अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शनच्या बुरख्याखाली ( व लेगसी ट्रॅडिशन मुळे) गोर्‍या विद्यार्थ्यांनाही ( मेरीट मधे एशियन मुलांच्या मागे असुनही) अ‍ॅडमिशन देउ शकत होती. कारण जर मेरीट बेस्ड क्वालिफिकेशन असले असते तर १०० मधल्या बर्‍याच जागा एशियन( व ईंडियन ) विद्यार्थ्यांनी पटकावल्या असत्या, अलबत! अ‍ॅट द एक्स्पेन्स ऑफ नॉट ओनली हिस्पॅनिक अँड ब्लॅक स्टुडंट्स बट अ‍ॅट द एक्स्पेन्स ऑफ व्हाइट स्टुडंट्स ऑल्सो! त्यामुळे हार्व्हर्डला जर व्हाइट स्टुडंट मेजॉरीटी राखायची असेल तर त्यांना अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन हवीच आहे!

त्यामुळे अमेरिकेमधे अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन कॉलेज अ‍ॅडमिशन मधे बंद केल्याचा फायदा एशियन( व ईंडियन) विद्यार्थ्यांना होणार आहे.म्हणुनच तुम्ही जर माझे ओरिजिनल पोस्ट नीट वाचले तर कळेल की मी का म्हटले की आजचा दिवस अमेरिकेतल्या भारतिय विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आहे.

हे सगळे सांगुनही जर कोणाला वाटत असेल की मी मायनॉरीटीच्या मागे त्यांचे नुकसान होण्याच्या हात धूऊन मागे लागलो आहे तर अजुन माझ्याकडे एक्स्प्लनेशन नाही व कोणाला या न्युजला सेलिब्रेट करायच्या मागचा माझा हेतु समजला नसेल तर माझा नाइलाज आहे.

पण इथे हेही नमुद करणे महत्वाचे आहे आणी लक्षात घेण्याचे जरुरीचे आहे की हार्व्हर्ड व अमेरिकेतल्या बर्‍याच युनिव्हर्सॉटीजनी या निर्णयाच्या आधीच अ‍कॅडिमिकली डॉमिनंट असलेल्या एशियन( व ईंडियन) स्टुडंट्सना कसे नेस्तनाबुत करायचे व व्हाइट डॉमिनंस कसा ठेवायचा त्याची तजविज करुन ठेवली आहे! आता बहुतेक अमेरिकेन युनिव्हर्सिटीज मधे अ‍ॅडमिशन इज टेस्ट ऑप्शनल आहे! म्हणजे सगळा आनंदी आनंदच! कोणाला कुठल्या बेसिस वरुन अ‍ॅडमिशन दिली हे कंप्लिटली सब्जेक्टिव्ह! कोणालाही जाब द्यायला नको! म्हणजे ना रहेगा बास.. ना रहेगी बंसुरी!

आता परिक्षा, मेरीट वगैरे गोष्टींना फाट्यावर बसवुन कोणाला वाट्टेल त्याला आर्बिटरी नंबर्स देउन मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्ट, सी. ए. सारख्या वगैरे पदव्या बहाल करुन टाकाव्यात! हाय काय आणी नाय काय!! अभ्यास बिभ्यास करायची भानगडच नको! >>> हे तुमचं मत आहे तर.

धाग्याचा विपर्यास ही कोल्हेकुई आहे. तुम्ही पहिले नाहीत. अशा पद्धतीने अन्य ठिकाणच्या बातम्या या संदर्भासहीत न देता त्याचा टोन लेकी बोले सुने लागे या पद्धतीने ठेवून चर्चा घडवणे हा काहींचा हातखंडा आहे. ही काही पहिली वेळ नाही. ज्या वेळेपर्यंत आनुकूल प्रतिसाद आले, रिव्हर्स रेसिझम वगैरे किंवा अन्य तोपर्यंत खुलासा करावासा वाटला नाही यातच सगळे आले.

अशा विषयावर किमान लिंक जोडावी असे का बरे वाटले नसेल ? जर ही बेफिकीरी असेल तर विपर्यास झाला म्हणून भोकाड पसरण्यात अर्थ नाही. आक्रस्ताळी, हीणकस भाषा वापरली कि त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायचं असतं हे आता २५ वर्षात सगळेच शिकलेत. ज्यांना अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन ने संधी मिळते ते सगळे ढ असतात हे सांगण्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. त्यातून काय ध्वनित होतंय ते ही. तसं होऊ नये याची कोणतीच काळजी धागालेखकाने घेतलेली दिसत नाही. सुरूवातीच्या प्रतिसादात पण शुद्ध आलेली दिसत नाही. विरूद्ध बाजूने जोडे पडल्यावरच शुद्ध आलेली दिसतेय.

मुकुंद, हा धागा काढल्याबद्दल आभार. अमेरिकेतही आरक्षण असते हे माहित नव्हते, आता कळले. तुमची मुळ पोस्ट वाचुन माझाही गैरसमज झाला होता. बावळट व ढ, काळ्या हे शब्द वाचल्यावर तलवारबाज सरसावले, पुढचा पाण्ढरा हा शब्द वाचला नाही Happy

अ‍कॅडिमिकली डॉमिनंट असलेल्या एशियन( व ईंडियन) स्टुडंट्सना कसे नेस्तनाबुत करायचे व व्हाइट डॉमिनंस कसा ठेवायचा त्याची तजविज करुन ठेवली आहे! >>>>>>>

तिथला आशियायी व त्यात भारतीय समुदाय खुप श्रीमंत आहे असे ऐकुन आहे. त्यांनी या आकसयुक्त विद्यापिठांच्या तोडीचे किंवा त्याहीपेक्षा समृद्ध विद्यापिठ वसवावे आणि त्यात फक्त गुणवत्तेवर सर्व जगाला प्रवेश द्यावा. काळे, पांढरे, पिवळे, जांभळे सगळ्यांना एकच फुटपट्टी - गुणवत्ता. वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय याचा अर्थ जगाला कृतीतुन समजावुन द्यावा. Happy

कारण काय तर कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ काळ्या, पांढर्‍या व हिस्पॅनिक मुला/मुलींना युमिव्हर्सीटीमधे प्रवेश मिळावा म्हणुन( केवळ डिव्हर्सीटीच्या नावाखाली!) . व्हॉट अ अट्टर नॉनसेन्स! हे वाक्य

कारण काय तर कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ मुला/मुलींना युमिव्हर्सीटीमधे प्रवेश मिळावा म्हणुन( केवळ डिव्हर्सीटीच्या नावाखाली!) . व्हॉट अ अट्टर नॉनसेन्स! असं लिहीलं असतं तरी ते आक्षेपार्ह नाही का ?

भारतियांचा देश नाही तो लाड करायला. त्यांना काय ठरवायचे ते ठरवू देत हेच लोकांनी सांगितले आहे. ते देतात संधी तीच खूप आहे. मूळ विचार समान संधी मिळण्याबाबतची हीणकस मतं हाच आहे. हा विचार इथूनच तिकडे गेला आहे. तुम्ही असे कोण लागून गेलात, असे काय अमेरिकन स्वातंत्र्यासाठी लढलात बुवा कि भारतियांच्या हक्कांसाठी तिथल्यांनी कण्हत रहावं ? सिंपल आहे.

तिथला आशियायी व त्यात भारतीय समुदाय खुप श्रीमंत आहे असे ऐकुन आहे. त्यांनी या आकसयुक्त विद्यापिठांच्या तोडीचे किंवा त्याहीपेक्षा समृद्ध विद्यापिठ वसवावे आणि त्यात फक्त गुणवत्तेवर सर्व जगाला प्रवेश द्यावा. काळे, पांढरे, पिवळे, जांभळे सगळ्यांना एकच फुटपट्टी - गुणवत्ता. वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय याचा अर्थ जगाला कृतीतुन समजावुन द्यावा >>>> भारतात आरक्षण लागू झाल्या बरोबर त्यावर स्टे आणणार्यांनी का ?

शंबूकापासून सर्वांना शिक्षण नाकारणारी व्यवस्था राबवणारी व्यवस्था म्हणजे वसुधैव कुटुंबकम असेल तर अभिनंदन तुमचे.

आयत्या पिठावर रेगोट्या मारणे सोप असते.
विठ्यापिठ स्वतःचे निर्माण करून.fees च्या नावाखाली लूट न करता.
Management quota च्या नावाखाली करोडो रुपये donation न घेता .
ते कार्य करणारा भारतीय शोधून सापडणार नाही.
त्या मुळे तेथील नामांकित विद्यापीठ मध्ये फुकट हक्क दाखवणे खूप सोप आहे.

शंबूकापासून सर्वांना शिक्षण नाकारणारी व्यवस्था राबवणारी व्यवस्था

तुमचा रोष/ आक्रोश वगैरे मान्य आहे. अन् मला मान्य नसला तरी तुम्हाला विशेष फरक पडू नये. पण शंबुक वगैरे घुसणे तितकेसे पटले नाही. शंबुकवध अख्यान सत्य पातळीवर मानायचे ठरवले तर श्रीराम अस्तित्वात होता हे पण मानावे लागते. तिथे selective होऊन राम हे काल्पनिक पात्र आहे म्हणून शंबुकवधाचे आपण स्वतः witness असल्यासारखे व्यक्त होणे चुकीचेच असेल अन् जे लोक रामाचे नाव घेऊन घटिया राजकारण करतायत त्यांच्या पंगतीत बसल्यासारखे असेल.

आपापली चॉईस अन् आपापल्या श्रद्धा.

शंबूक काल्पनिक असला तरी ते प्रकरण घुसवलेय याचा अर्थ व्यवहारात दिसलेलेच कथेत लिहीले इतकाच त्याचा अर्थ. तशा सत्य घटना हजारो कोट्यवधी आहेत. जी सर्वात फेमस आहे ती इथे लिहीली. जर तुम्हाला म्हणायचे असेल की लेखकाने धाग्यात केलेल्या आक्रोशाला आणि त्याची री ओढणार्‍यांच्या आक्रोशाला, आणि भारतीय कसे उदार आहेत याला खोडून काढणे हा आक्रोश आहे, मुद्दे नाहीत तर तसे सांगा.

नाही माझे असे काही म्हणणे नाही, अन्याय त्यातही सामाजिक अन्याय जेव्हा दिसतो आणि मन अस्वस्थ होते तेव्हा पहिली प्रतिक्रिया ही आक्रोश असते. त्या अर्थाने म्हणणे आहे माझे.

लेखक आकांडतांडव करतायत असे तुम्हाला म्हणायचे असल्यास चपखल बसेल.

शंबुक उदाहरण संबंधित स्पष्टीकरण (तुम्ही मला तसे काही देणे बांधील नसूनही) दिल्याबद्दल आभार, as a principle तुम्ही म्हणता आहात ते मला मान्य आहे व शंबुक उदाहरण वापरण्याचं तुमचं स्वातंत्र्य पण मला मान्य आहे.

शंबुकवध अख्यान सत्य पातळीवर मानायचे ठरवले तर श्रीराम अस्तित्वात होता हे पण मानावे लागते. तिथे selective होऊन राम हे काल्पनिक पात्र आहे म्हणून शंबुकवधाचे आपण स्वतः witness असल्यासारखे व्यक्त होणे चुकीचेच असेल अन् जे लोक रामाचे नाव घेऊन घटिया राजकारण करतायत त्यांच्या पंगतीत बसल्यासारखे असेल>>>>>

हाहा… सही पकडे है….

<<<अरे काय हे? एक दिवसात धागा कुठल्या कुठे भरकटवला!>>>
अहो हीच तर गंमत आहे मायबोलीची!!
धागा भरकटत न्यायचा - विषयाशी काही संबंध नसला तरी.
आता मागे कुणितरी आर्य व मुसलमान आणि भारत हेसुद्धा आणले आहेत.

वास्तविक अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय, अमेरिकेच्या सुप्रिम कोर्टाने घेतला - त्याचा परिणाम फक्त अमेरिकेत रहाणार्‍या किंवा येऊ इच्छिणार्‍या लोकांवर होतो. तिथे भारत, आर्य, मुसलमान कुठून आले?
मी वरच लिहीले होते की खाजगी संस्थांना सरकरने काही सांगू नये, पण शेण खालं नि सांगितले. मग सुप्रिम कोर्टाला सांगावेच लागले की हे घटनाबाह्य आहे. आता याउप्पर कुठल्याहि खाजगी संस्थेने स्वतःहून आरक्षण ठेवले तर तो त्यांचा प्रश्न आहे.

लवकरच मी वर लिहिल्याप्रमाणे ब्राह्मण-अब्राह्मण, भाजप-काँग्रेस, गांधी-आंबेडकर पण येतील!!!
मजाच बघत रहा.

भारतात आरक्षण लागू झाल्या बरोबर त्यावर स्टे आणणार्यांनी का ?>>>>>

ते सगळे आजही जिवंत आहेत आणि मी जे लिहिलेय ते कधी प्रत्यक्षात उतरलेच तर तोवरही जिवंत राहणारआहेत,? बाकी भारतियांनी असे विद्यापिठ उभारलेच तर बरेच आहे की. सगळ्यांनाच प्रवेश द्या असेही मी लिहिलेय. तसे झाले तर तुम्हाला काही त्रास नसावा.

लेखकाने धाग्यात केलेल्या आक्रोशाला आणि त्याची री ओढणार्‍यांच्या आक्रोशाला, आणि भारतीय कसे उदार आहेत याला खोडून काढणे हा आक्रोश आहे,>>>>>>

आक्रोश कुठे? कायदा रद्द झाला याचा आनंद व्यक्त केलाय हो.

भारतियांचा देश नाही तो लाड करायला. त्यांना काय ठरवायचे ते ठरवू देत हेच लोकांनी सांगितले आहे. ते देतात संधी तीच खूप आहे. मूळ विचार समान संधी मिळण्याबाबतची हीणकस मतं हाच आहे. >>>>

तुमच्या चश्म्याने पाहिले तर कायदा रद्द करुन लाडच केले आहेत कि हो. तिथल्या कोर्टाने काय ठरवायचे ते ठरवलेले आहे आणि निर्णय दिला आहे. मी कधीही तिकडे जाणार नाहीये, वय गेले आता पण तुम्ही जाणार असाल किंवा आता तिथेच असाल तर तुमचा फायदाच आहे की. बाकी ‘ते देतात तीच संधी खुप
आहे‘ हे इथल्या व्यवस्थेबद्दल कोणी लिहिले तर तुम्हाला प्रचंड राग येईल असे तुमचे प्रतिसाद बघुन वाटते.

शंबूक काल्पनिक असला तरी ते प्रकरण घुसवलेय याचा अर्थ व्यवहारात दिसलेलेच कथेत लिहीले इतकाच त्याचा अर्थ. तशा सत्य घटना हजारो कोट्यवधी आहेत>>>>

तुमच्या या न्यायाने मुळ रामकथा देखिल व्यवहारात दिसली म्हणुन लिहीली असावी असे मानायला वाव आहे.

असो. माझे प्रतिसाद मनावर घेऊ नका. तुमच्या प्रतिसादांत विसंगती दिसली, मला वेळही होता म्हणुन थोडी गंमत केली. बाकी मला धागा विषयातले काहीही माहिती नाही व माहिती करुन घ्यायची इच्छाही नाही. माझा काहीही संबंध नाही अमेरिकेशी.

अमेरिकी कोर्टाने जो निर्णय घेतला आहे तो अमेरिका च्या भौगोलिक क्षेत्रात च लागू आहे.
सर्व हे जाणतात .
" खासगी विद्यापीठ विषयी कोर्टाने निर्णय देवून क्षेण खाल्ले."

राजसत्ता प्रतेक देशात आहेत.
राजसत्तेचा यंत्रणा आहे त्याचे पूर्ण फायदे प्रतेक व्यक्ती घेतो.
त्या मुळे राजसत्ता अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही भौगोलिक विभागात खासगी संस्था,किंवा खासगी आयुष्य असे काही अस्तित्वात नसते.
असेल तरी ते नियमात बद्ध असते
माझी खासगी शेती आहे म्हणून अफू ची लागवड मी करू शकत नाही.
माझे स्वतःचे खासगी घर आहे म्हणून दारे खिडक्या उघड्या ठेवून नागडा स्वतःच्या घरात फिरू शकत नाही.
शैशिनिक संस्था खासगी असल्या तरी राजसत्तेचा पूर्ण फायदा घेतात.
चलन पासून पाणी,सुरक्षा व्यवस्था पण वापरतात.
त्या खासगी असल्या तरी राज सत्ते नी निर्माण केलेल्या नियमात च त्यांना काम करावे लागते.
कोर्ट राज सत्तेचा भाग आहे तो आदेश davalne इतके सोप नाही.

भारताचा काय संबंध.
कारण अमेरिकेत जो निर्णय झाला त्याचा फायदा उच्च भृ भारतीय लोकांना होणार आहे.
हे अमेरिकन असले तरी (technicaly) तरी भारतीय लोकांचे सर्व अवगुण ह्यांच्यात आहेत.
त्या निकालाचा उपयोग भारतातील आरक्षण विषयी धोरण कसे चुकीचे आहे हे दाखवण्यास हे अमेरिकन भारतीय कमी करणार नाहीत.
शेवटी हे भारतीय च आहेत.

मेरिट हा प्रकार खरेच अस्तित्वात नाही.
ज्या काही स्किल असतात त्या जन्मजात च असतात.
परीक्षेत मिळणारे मार्क म्हणजे गुणवत्ता नक्कीच नाही.
हार्ट तज्ञ असणारा .
बारावीत 99.99%,0टक्के मिळवणारा विद्यार्थी,
प्रवेश परीक्षेत .
पण देशात पहिला आलेला विद्यार्थी .
अत्यंत कुशल नसतो ,
( कोणाकडे ह्या ९९.९९ टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थी लोकांचे सर्व क्षेत्रातील आज चे स्थान ह्या वर डेटा असेल तर इथे टाका.
माझे मत सिद्ध च होईल)

, बारावी आणि प्रवेश परीक्षेत पण जेमतेम मर्क्क मिळवणारा विद्यार्थी च अत्यंत कुशल हार्ट तज्ञ असतो.
पावलो पावली अशी उदाहरणे मिळतील.
जगातील जे यशस्वी उद्योगपती आहेत त्या लोकांचे शालेय रेकॉर्ड बघा.
म्हणजे खात्री पटेल.
स्किल हे नैसर्गिक असते .
त्या मुळे विविध .
जाती,धर्म, रेस ,ह्या लोकांना संधी देणे हे जगाच्या हिताचे आहे..
( जनुकीय विविवधा महत्वाची असते.जनुक च खास शक्ती प्रधान करत असतात)
दर्जा कोणत्याच परीक्षा ठरवू शकत नाहीत.
आयपीएस पेक्षा काही हवालदार अतिशय योग्य निर्णय योग्य वेळी घेतात.

>>सर्वप्रथम, बरेचसे प्रतिसाद वाचुन अस वाटतय की आता परिक्षा, मेरीट वगैरे गोष्टींना फाट्यावर बसवुन कोणाला वाट्टेल त्याला आर्बिटरी नंबर्स देउन मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्ट, सी. ए. सारख्या वगैरे पदव्या बहाल करुन टाकाव्यात<<

आय्ला मुकुंद, अगदि क्रांतिकारी सूचना. स्कोटसचा हस्तक्षेप हा हाय्ली सिविलाय्ज्ड सोसायटीचा बायप्रॉडक्ट असल्याने परत अश्मयुगात जाउन गुणवत्ता पारखण्याची सगळी प्रोसेस/नियम बासनांत बांधुन ठेवली गेली पाहिजे...

आताच्या कोणत्या च स्पर्धा परीक्षा गुणवत्ता तपासण्यास सक्षम नाहीत .
रिअल सर्व क्षेत्रातील लोकांचा सर्व्हे केला तर अगदी स्पष्ट होईल.
असा सर्व्हे खरेच झाला पाहिजे.
99.99% टक्के वाले आज काय करतात असा प्रश्न खूप लोकांना पडतो.
पदावर असतील तर ते पद सांभाळ न्यास ते लायक आहेत का हा दुसरा उप प्रश्न करोडो लोकांच्या मनात आहे

विविध आनुवंशिक घटकतून आलेल्या प्रतेक व्यक्ती ला संधी.
सामाजिक विषमतेचे बळी असणाऱ्या प्रतेक व्यक्ती ला योग्य संधी.
हा विचार सर्वात योग्य आहे.
मेरिट .
ही सज्ञा
कोणी तरी स्पष्ट करावी म्हणजे त्या वर चर्चा करता येईल

एव्हढ्या हुषार मेरीटच्या लोकांनी भारतातच सगळे शोध का लावले नाहीत ? म्हणजे भारतानेच जगावर राज्यही केलं असतं आणि सगळे व्हाईट, ब्लॅक, यलो लोक भारतात व्हिसासाठी आले असते. मग तिकडच्या मायबोलीवर त्यांनी भारतातल्या अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन वर पोस्टी लिहील्या असत्या. भारतात कसे पूर्वीपासून निकोप वातावरण, कुणीच कुणावर अन्याय केलेला नाही. वसुधैव कुटुंबकम एकदम !

Pages