मला आवडणाऱ्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांसाठी हा धागा. सुरुवात किसी तऱ्हासे मुहोब्बतमें चैन पा न सके याने करते. बाकी खाली प्रतिसादामधे लिहीत जाईन, जसे जमेल तसे. तुम्हाला आवडणारी गाणी (पण जुनीच. 1960 पर्यंतचीच) लिहिलीत तर आवडेलच.
बडी माँ हा 1945 चा चित्रपट!
मा. विनायक यांची निर्मिती अन दिग्दर्शन. सुप्रसिद्ध तारका- गायिका नूरजहाँ अन ईश्वरलाल, याकूब, सितारादेवी, मीनाक्षी, दामुअण्णा मालवणकर अशी तेव्हाची तगडी कास्ट असणारा हा चित्रपट. (1974 मधे आलेला बडी माँ हा चित्रपट वेगळा, अनेकदा दोन्हीची गल्लत केली जाते).
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडत जाते. जागतिक राजकारण, जपान, भारताचे देशप्रेम अशा अनेक वळणांनी हा चित्रपट समृद्ध होत जातो.
या गीताचे संगीतकार होते सुप्रसिद्ध के. दत्ता होते. तर गीतकार अंजुम पीलीभीत.
गायिका होती नूरजहाँन. स्वातंत्रपूर्व काळातली महान गायिका- नायिका. तिच्या आवाजातला तलमपणा, तीनही पट्यांमधे लिलया फिरणारा आवाज, गोडवा; तिचं सौंदर्य आणि अभिनय सर्वच लाजवाब!
या गाण्याची जान आहे ती नूरजहाँनच्या "पाऽऽ न सके" या मधे.
सुरुवातीच्या हिंदी चित्रपट सृष्टीमधे कोल्हापूर अन मराठी कलाकारांचा कसा वरचष्मा होता हे या चित्रपटाची कास्ट बघितली की कळतं. निर्माता, दिग्दर्शक(मा. विनायक), संगीतकार ( के. दत्ता म्हणजेच दत्ता कोरेगावकर) , बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स), कथा ( व्ही. एस. खेडेकर) , एक गीतकार(राजा बढे), एक गायिका(लता), चार स्त्री कलाकार ( मीनाक्षी, लता, आशा, बेबी अलका), दोन पुरुष कलाकार (दामुअण्णा मालवणकर, दादा साळवी).
या शिवाय याकूब, सितारादेवी, लिला मिश्रा हेही या चित्रपटात होते.
आज या चित्रपटाची फिल्म, कुठेही उपलब्ध नाही. शक्यता आहे की फिल्म आर्काईव्हजमधे कुठेतरी असेल. पण किमान नूरजहाँच्या या आणि इतर गाण्यांनी (दिया जला कर आप बुझाया: https://youtu.be/gBczUcadYLw)
रसिकांच्या मनात हा चित्रपट जागा राहील.
सध्या इतकच!
---
याच चित्रपटाबद्दल लताची
याच चित्रपटाबद्दल लताची आठवण
https://youtu.be/JrRHj_G4jrY
दिया जलाकर ... ह्या
दिया जलाकर ... ह्या गाण्याच्या आठवणींवर के. दत्तानी पुढलं सगळं आयुष्य काढलं असं वाचलं आहे.
आज नूरजहाँन मनात आहे तर तिची
आज नूरजहाँन मनात आहे तर तिची एक मुलाखत
1926 चा जन्म नूरजहाँनचा. स्वातंत्र्यपूर्व काळात ती हिंदी चित्रपटामधली सर्वात प्रख्यात नायिका- गायिका होती. पण फाळणी नंतर नवऱ्याबरोबर ती पाकिस्तानमधे गेली. तिची पुढची कारकिर्द तिथे झाली. पण तिच्या मनात इथल्या आठवणी जागत्या राहिल्या. पुढे 1983 मधे तिला भारतात आमंत्रण मिळालं, अनेक कार्यक्रम झाले. तेव्हा दिलिप कुमार यांनी घेतलेली ही मुलाखत
https://youtu.be/jrMoN4zg1G
57 वर्षीही ही नूरजहाँन "नूरजहाँन"च दिसली, ऐकू आली कायआदब, काय आवाज, काय दिसणं, सुंदरच.
मुलाखत उर्दुमधे आहे, काही शब्द अडू शकतात पण तरीही जरूर बघा
लेख आवडला. नुसत्या
लेख आवडला. नुसत्या शब्दांवरून गाणं आठवत नव्हतं. ऐकायला सुरुवात केली आणि आधी ऐकलं आहे हे लक्षात आलं. आवडतंच.
नूरजहाँ , लता एकाच चित्रपटात आणि गायल्याही आहेत हे माहीत नव्हतं. के दत्ता यां च्याबद्दलही काही वाचल्याचं आठवत नाही.
badi ma असं शोधलं तर नूरजहाँचा चुकीचा संदर्भ देऊन उषा किरण मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट आला. पी एल देशपांडेंच्या कथेवर आधारित. दिग्दर्शक राम गबाले आणि लता , रफीसोबत गायक वसंत देशपांडे. . संगीत मोहम्मद शफी. याची गाणीही चालली नसावीत.
हो म्हणूनच लेखातही उल्लेख
हो म्हणूनच लेखातही दुसऱ्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. नूरजहानचा चित्रपट नाही सध्यातरी कुठे सापडत.
बडी मा मधे लतागायली नाही बहुदा. मला नूरजहान, मिनाक्षी आणि बेबी अलका यांचीच गाणी दिसली.
आशा, लता यांनी छोट्या भूमिका केल्या आहेत चित्रपटात
तेव्हा दिलिप कुमार यांनी
तेव्हा दिलिप कुमार यांनी घेतलेली ही मुलाखत
https://youtu.be/jrMoN4zg1G >>> हा व्हिडीओ उपलब्ध नाही असे दिसते.
https://youtu.be/jrMoN4zg1Gg
क्षमस्व लिंक नीट कॉपी झाली नव्हती. आता बघा दिसतेय?
https://youtu.be/jrMoN4zg1Gg
इंटरेस्टिंग. अशा पिक्चर्सची
इंटरेस्टिंग. अशा पिक्चर्सची नावे अधूनमधून ऐकलेली आहेत पण तितकीच माहिती होती. आईकरता लढणारी मुले वगैरे यात भारतमाता, स्वातंत्र्य वगैरे मेटॅफोर्स आहेत का? गाण्यांच्या ओळी वाचून गाणी लक्षात आली नाहीत. बहुधा माहीत नसावीत. क्लिप्स ऐकून बघतो.
विनायक चे स्पेलिंग डब्ल्यू वापरून केले आहे तसेच "शिवाजी पार्क, कॅडेल रोड" हा पत्ता कसा काय?
>>>57 वर्षीही ही नूरजहाँन
>>>57 वर्षीही ही नूरजहाँन "नूरजहाँन"च दिसली, ऐकू आली Happy कायआदब, काय आवाज, काय दिसणं, सुंदरच.>>>+१०१
कालपरत्वे एक दुर्मिळ आणि तितकीच गोड लिंक... खूप धन्यवाद
धन्यवाद.
धन्यवाद.
या निमित्ताने जुने संगीतकार, गायक आणि सिलोन रेडिओ यांनी आमच्या पिढीला दिलेली देन, पुढच्या पिढीशी शेअर करता येतय.
क्षमस्व लिंक नीट कॉपी झाली
क्षमस्व लिंक नीट कॉपी झाली नव्हती. आता बघा दिसतेय?>>> होय. धन्यवाद.
काय गोड गायलय. वा! छान लेख.
काय गोड गायलय. वा! छान लेख.
“ बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स)”
“ बॅनर ( प्रफुल्ल पिक्चर्स)” - पुढे ह्याच बॅनरचं ‘शालिनी सिनेटोन‘ झालं आणि त्या बॅनरखाली बाबूराव पेंटरांनी ‘सावकारी पाश’ काढला.
https://www.youtube.com/embed
"जिसे तू कबूल कर ले"
https://www.youtube.com/embed/b5J4zk9YqGE
देवदास (1955) चित्रपटातलं हे गीत. एस डी बर्मन संगीतकार. गायिका अर्थात लता.
या गाण्यात खूप चकीत व्हावं असं मिक्सिंग आहे
एकतर वेगवेगळी वाद्यं वापरली आहेत. सरोद,टाळ, ढोलक, तबला, सतार, बुलबुल तरंग, बासरी, बीन, कितीतरी. अगदी एकमेकांबरोबर न जाणारी.
शिवाय यात तालही वेगळे आहेत. एका तमासगिरीच्या तोंडी अन भजनी ताल अन टाळही.
मूडही आर्जव, दु:ख, निराशा, झिडकारलेपणाची भावना, तो परततो तेव्हा थोडा जीव भांड्यात पडतो असा, सगळं पणाला लावणं,पुन्हा आर्जव, प्रेमाची कबुली, समर्पण, त्याच्यावरचं अवलंबित्व अन पुन्हा शेवटी एक दर्दभऱाच पण सुकून.. त्या त्या मुडनुरुप वाद्य अन धून येत रहातात. अन इतकं वैविध्य असूनही गाणं एकसंधच. स्टोरी टेलिंगचं एक उत्तम उदाहरण ठरावं हे गाणं. अन वैजयंतीमालाच सहज नृत्य, तिचा अभिनय- कायिक, चेहऱ्यावरचा. अन दिलिप कुमार "द ट्रॅजेडी किंग"चं "सगळं सगळं सोडून दिलय, अगदी जगणंही! केवळ तुझ्या सुरांमुळे पाय परत फिरलेय. पण तेही फार वरवर काम करताहेत, आतून तर मी पूर्ण कफल्लक झालोय", हे ठसवत रहाणं तेही अतिशय खरं वाटावं असं.
थोड्या संथ वाटतील, भाबड्या वाटतील, शब्दांना त्यातील अलवार भावना भिडतील, नायकनायिकेच्या रुपात स्वत:ला ढालतील; अशा गाण्यांच्या प्रेमात आमची पिढी
नव्या पिढीला अरे काय बावळट आहे का असे वाटू शकतं. पण आमची मनं गलबलतात ही गाणी ऐकता, बघताना. अशी सटल दुखरी गाणी वरवर पहाता दु:खं देतात; पण मनात आतून एक अलवार सुकून देतात. या गाण्यात जसा तिला शेवटी मिळालाय. माहिती आहे, क्षणिक आहे, पण तोही पुरेल आयुष्यभर असा काहीसा
छान धागा....
छान धागा....
छान लेख आणि गाणी अवल जी. बडी
छान लेख आणि गाणी अवल जी. बडी मा मध्ये लता नाही गायली. त्यात तिची भूमिका आहे, तिथे तिला मॅडम पहिल्यांदा भेटल्या, जी आठवण तिने वेगवेगळ्या मुलाखतीत सांगितली आहे. लताचं दिल मेरा तोडा मुझे कही का ना छोडा (गुलाम हैदर) बरेचसे मॅडमना कॉपी करत गायल्या सारखे वाटते. नूरजहाँ वर काहीतरी लिहा, तिने पण अफाट लोकप्रियता मिळवली आणि खूप अवीट गाणी आहेत.
लंपन धन्यवाद
लंपन धन्यवाद
हो लताचं गाणं बहुतेक नाही बडी मा मधे. एकाच ठिकाणी वाचण्यात आलं होतं की मुलाखतीत ऐकलेलं की एक गाणं होतं. पण अजून सापडलेलं नाही गाणं.
दिल मेरा तोडा, की दुसरं कुठलं आठवे ना. पण संगीतकारानी सांगितलं लताला की नूरजहानला आठवून म्हणा. तेही शोधते.
नूरजहानवर लिहेन अजून जमायला
नूरजहानवर लिहेन अजून जमायला हवं पण
अवलजी, तो संगितकार नौशाद आणि
अवलजी, तो संगितकार नौशाद आणि गाणं अंदाजच तोड दिया दिल मेरा.
लताच्या काही गाण्यांची
लताच्या काही गाण्यांची prelude पण सुंदर आहेत खासकरून नौशाद आणि लता जसे की - जो मैं ऐसा जानती (मोहे भूल गये सावरिया), इंसान किसीसे दुनिया मैं (प्यार किया तो डरना क्या), मन साजन ने (जो मैं जानती), ए मेरे मुष्कीलकुशा (बेकस पे करम). इतर संगितकार - खामोश है जमाना (आयेगा आनेवाला), चांदनी रात बडी देर के बाद (ठाडे रहियो). अजूनही आहेत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=_RNkVAFNCCk
लता/ रोशन/ साहिर
साहीर यांचे शब्द जितके सुंदर तितकेच रोशन यांचे संगीत.
ख़ुदा-ए-बरतर (बरतर = सुप्रीम) तेरी ज़मीं पर
ज़मीं की ख़ातिर ये जंग क्यूँ है?
हर एक फ़त्ह-ओ-ज़फ़र के दामन पे
ख़ून-ए-इंसाँ का रंग क्यूँ है?
ख़ुदा-ए-बरतर...
ज़मीं भी तेरी है, हम भी तेरे
ये मिलकियत (जमिनीवरचा हक्क) का सवाल क्या है?
ये क़त्ल-ओ-ख़ूँ का रिवाज़ क्यूँ है?
ये रस्म-ए-जंग-ओ-जदाल (जदल = fighting, battle, encounter) क्या है?
जिन्हे तलब है जहान भर की
उन्हीं का दिल इतना तंग क्यूँ है?
ख़ुदा-ए-बरतर...
ग़रीब माँओ, शरीफ़ बहनो को
अम्न-ओ-इज़्ज़त की ज़िंदगी दे
जिन्हें अताकी है तू ने ताक़त
उन्हें हिदायत (शिकवण) की रोशनी दे
सरों में किब्र-ओ-ग़ुरूर क्यूँ है?
दिलों के शीशे पे ज़ंग क्यूँ है?
ख़ुदा-ए-बरतर...
क़ज़ा (विनाश) के रस्ते पे जानेवालो
को बच के आने की राह देना
दिलों के गुलशन उजड़ ना जाएँ
मोहब्बतों को पनाह देना
जहाँ में जश्न-ए-वफ़ा के बदले
ये जश्न-ए-तीर-ओ-तफ़ंग (तफंग = रायफल) क्यूँ है?
ख़ुदा-ए-बरतर तेरी ज़मीं पर
ज़मीं की ख़ातिर ये जंग क्यूँ है?
हर एक फ़त्ह-ओ-ज़फ़र के दामन पे
ख़ून-ए-इंसाँ का रंग क्यूँ है?
ख़ुदा-ए-बरतर...
लंपन, वा सुंदर गाणी
लंपन, वा सुंदर गाणी
सामो, छान गाणं. पण
गाण्याचे सगळे शब्द (लिरिक) लिहिण्या ऐवजी गाण्याबद्दल लिहा न
htthttpsps://www.youtube.com
htthttpsps://www.youtube.com/embed/FnVBQW0HMIE
साजन की गलियाँ छोड चले...
श्याम सुंदर - हिंदी चित्रपट संगीताला मिळालेला एक फार गोड संगीतकार! त्यांचच हे गीत "साजन की गलियाँ छोड चले." गायलय लताने. गीतकार क़मर जलालाबादी. चित्रपट होता 1949 चा बाजा़र. दिग्दर्शक होते के. अमरनाथ.
यात नायक आहे श्याम. त्या काळातला एक सुस्वरुप नायक. त्याची एक छान ओळख म्हणजे सादत हसन मंटोंचा तो खास मित्र. पण वयाच्या 31 व्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यात घोड्यावरून पडून त्याचा अकस्मित मृत्यू झाला. अन हिंदी चित्रपट सृष्टी एका नायकाला मुकली.
मुगल ए आझम मधली निहार सुलताना नक्की आठवत असेल तुम्हाला. हो तीच, बहार! राजवाड्यातली मुख्य नर्तकी. ती या चित्रपटातली नायिका. हे गाणं तिच्यावरच चित्रित केलं आहे.
तर आता गाण्याबद्दल. संगीत, त्याचा ठेका, मधेच येणारे शेर - गद्यातले, सुरांमधे भरलेले आर्त दु:ख. सगळं मन भारावून टाकणारे. डोळे मिटून ऐकलं तर नक्की डोळ्यात पाणी यावं... श्याम सुंदरची कमाल!
लताने या गाण्याला पूर्ण न्याय दिलाय. साजनमधल्या सा वर आणि नंतर गलियाँ वरती जी काय कमाल केलीय तिने. जियो! छोड हा शब्द खरं तर अगदी असांगितीक. पण लताने तो पूर्ण सांगितिक केलाय.
अनिल विश्वास, श्यामसुंदर, सज्जाद, सी रामचंद्र यांच्या संगीतात लताचा आवाज विशेष गोड लागलाय. तिच्या आवाजात दर्द असा ठिबकतो, मन पिळवटून टाकतो. गोड आवाजात दु:ख असं काही समोर ठाकतं... तुम्ही आहा पण म्हणू शकत नाही अन आह् पण म्हणू शकत नाही. मग ते झिरपत रहातं मनात, मधातून दिलेल्या औषध जसं जिभेवर दरवळत रहातं. अगदी तसच कानात, मनात घर करून रहातं!
यात शेवटी येतो तो लताचा फोटोही, लाजवाब!
लंपन> >>तो संगितकार नौशाद आणि
लंपन> >>तो संगितकार नौशाद आणि गाणं अंदाजच तोड दिया दिल मेरा.<<< हा, बरोबर हेच गाणं लताच्या एका मुलाखतीमधे उल्लेख केलेला लताने. त्यात फार गोड बोललीय ती नूरजहाँ बद्दल!
नूरजहांची गायकी चांगली असेलही
नूरजहांची गायकी चांगली असेलही पण तो आवाज कानाला खूप तिखट वाटतो. तो आवाज पेलणारा चेहरा / व्यक्तिमत्व हिंदी सिनेमात अभावानेच दिसतात. त्यामुळे कदाचीत अनमोल घडीच्या पलीकडे तिची गाणी कधी ऐकलीच नाहीत. आणि ती न ऐकल्यामुळे कशाला मुकलोय असं कधीच वाटलं नाही. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर शमशाद बेगमचं देता येईल. तिची खूप गाणी खूप आवडतात. पडद्यावर तिचा आवाज 'तेरी महफिलमे किस्मत आजमा कर' मध्ये निगार सुलतानाला किंवा 'रेशमी शलवार कुरता जाली का' मध्ये बबीताला जितका चपखल शोभून दिसला तसा तो इतर गाण्यात अभावानेच शोभला.
देवदास म्हटला की सर्वात आधी मला आठवतं ते 'ओ कान्हा आन मिलो'. एस डी च्या पोतडीतलं एक सुंदर रत्न. बंगालमधल्या बाउल संगिताचा इतका सुंदर वापर क्वचितच कुणी केला असेल. सगळी वाद्य त्याच परंपरेतील आणि सोबतीला गीता दत्त आणि मन्नादा! कृष्णाला न मानणार्या गेला बाजार हिंदीही न समजणार्या माणसालाही त्या गाण्यातली व्याकुळता जाणवल्याशिवाय रहात नाही.
https://www.youtube.com/watch?v=-0jqeZk_IVc
'आन मिलो आन मिलो शाम सावरे आन
'आन मिलो आन मिलो शाम सावरे आन मिलो' हे गाणे अप्रतिम सुंदर आहे जुन्या देवदास मधले....
MR & MRS 55 मधली काही गाणि सुद्धा खुप गोड आहेत....
याच दरम्यान आलेला 'मधुमती' तर माझा प्रचंड आवडता चित्रपट आहे.... संगित आणि कथा दोन्ही बाबतीत
मधुमति सर्व अल्बम सुंदर आहे.
मधुमति सर्व अल्बम सुंदर आहे.
मी अमिंच्या पोस्ट मधील सर्व गाणी माझी पण फेवरिट. अजून शोधून लिहे न.
नौशेरवाने आदिल सिनेमातील पण सर्व गाणी छान आहे त तारों की जुबां पर हे माझे फेवरिट प्रेमगीत.
मॅडम नूर जहान वर माहिती
मॅडम नूर जहान वर माहिती कलेक्षन चालू आहे तर हा पण विडीओ बघा. स्ट्रीट फूड पीके चे झिया भाई एका घरी त्यांचे वास्तव्य काही काळ होते तिथे पोहोचले. तिथे मुले खेळत होती त्यात एक गायक आहे त्याने एक छान गाणे पण म्हटले आहे. ह्या घराचे म्युझिअम करता येइल असे मला वाटले व झिया भाई पण नंतर तोच विचार बोलून दाख्वतात.
कोका कोला गाणे मजेशीर आहे
https://www.youtube.com/watch?v=oNYUHDY1aaY
जुन्या गाण्यांचे दर्दी
जुन्या गाण्यांचे दर्दी असलेल्या एका काकांना हा लेख वाचायला दिला. त्यांनी ही लिंक दिली आहे पिक्चरची -
https://youtu.be/UMtmK8pBGyA
प्राजक्ता, हा तो नूरजहाँचा
प्राजक्ता, हा तो नूरजहाँचा चित्रपट नाही ; उषा किरणचा आहे. माझ्या आधीच्या प्रतिसादात त्याबद्दल लिहिले आहे.
Pages