“ युनिव्हरसीटी अॅडमिशन अफर्मेटिव्ह अॅक्शन" वर अमेरिकन सुप्रिम कोर्टाचा टाळा! योग्य निर्णय!
आज अमेरिकन सुप्रिम कोर्टाने अमेरिकन युनिव्हर्सीटीज मधे प्रचलित असलेला "अफर्मेटिव्ह अॅक्शन“ चा कायदा मोडीत काढला.
माझ्या मते सुप्रिम कोर्टाने हा एकदम योग्य निर्णय घेतला आहे.
या निर्णयाने सर्व हुशार चायनिज व भारतिय विद्यार्थ्यांना आता युनिव्हर्सीटी अॅडमिशन मधे योग्य न्याय मिळेल , खासकरुन हार्व्हर्ड, स्टॅनफर्ड व येल सारख्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीमधली रेस बेस्ड कोटा सिस्टीम एकदाची निकालात निघेल( अशी आशा करतो!)
नाहीतर या अफर्मेटिव्ह अॅक्शन नियमामुळे बरीचशी हुशार भारतिय मुले/मुली ज्यांचा SAT or ACT मधे पर्फेक्ट स्कोर असुनही व GPA 4.8 वगैरे असुनही,अश्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीजकडुन डावलली जात होती! कारण काय तर कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ काळ्या, पांढर्या व हिस्पॅनिक मुला/मुलींना युमिव्हर्सीटीमधे प्रवेश मिळावा म्हणुन( केवळ डिव्हर्सीटीच्या नावाखाली!) . व्हॉट अ अट्टर नॉनसेन्स!
अमेरिकन सुप्रिम कोर्टाचे या योग्य निर्णयाबद्दल अभिनंदन! अमेरिकेतल्या भारतिय विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला दिवस म्हणावा लागेल.
आम्ही टॅक्स भरतो आणि आमच्या
आम्ही टॅक्स भरतो आणि आमच्या पैशातून खिरापत वाटली जाते हे तत्त्वज्ञान अनाठायी आणि आक्रस्ताळे आहे. टॅक्स म्हणजे तिकीट किंवा एखाद्या शो ची फी नाही. तुम्हाला या देशात रहायचे आहे, तो देश चालवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात, अजस्त्र यंत्रणा चालवाव्या लागतात, तुम्हाला निर्भयपणे नोकरी करता यावी, लोकशाही हक्क जपले जावेत, उद्योग धंदा करता यावा, तुम्हाला आरोग्य सेवा मिळाव्यात, मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी जे जे काही करावे लागते त्यासाठी तुम्ही कर्तव्य म्हणून कर भरत असता.
जो जास्तीत जास्त कर भरतो, तो तितक्याच जास्त सुविधा सुद्धा घेत असतो. कर भरून उपकार करतो , त्यातून खैरात वाटली जाते असे वाटत असेल तर नका भरू कर. मग सार्वजनिक रस्ते, पाणीपुरवठा, हवाई वाहतूक, विमानतळ, पोलीस, प्रशासन हे सगळं स्वतःच्या पैशाने उभे करा. कोण नाही म्हणतं ?
<<<झाडून सर्व भारतीय
<<<झाडून सर्व भारतीय देशाबाहेर काढले जातील>>>
इतके सोपे नाहीये हे अमेरिकेत. इथे कायदे असतात, हक्क असतात.
>>>>>>इतके सोपे नाहीये हे
>>>>>>इतके सोपे नाहीये हे अमेरिकेत. इथे कायदे असतात, हक्क असतात.
राहू द्या हो. त्यांनाही मनातले मांडे रचायचा हक्क आहे
इथे अंडर्प्रिविलेज्ड मुलांना
इथे अंडर्प्रिविलेज्ड मुलांना आय्वि-लीगमधे लो एसएटि/जिआरइ स्कोर असुनहि प्रवेश मिळावा का, यावर चर्चा सुरु आहे. अॅफर्मेटिव अॅक्शन मधुन प्रवेश मिळालेल्यांचा या कॉलेजेस मधे सक्सेस रेट काय हा डेटापॉइंट इथे महत्वाचा आहे. मला सापडला नाहि, कुणाला सापडल्यास इथे टाका. कारण या कॉलेजेसचा अभ्यास्क्रम इतर कॉलेजेसच्या तुलनेत कठिण असतो. बेसिक फंडाज स्ट्राँग नसले तर वांदे होतात...
रघू+१
रघू+१
मुद्द्यांची गल्लत होते आहे का
मुद्द्यांची गल्लत होते आहे का?
अमेरिकेचा विकास कुणी केला किंवा कुणामुळे झाला हा मुद्दा च नाही. विकसित अमेरिकेत वांशिक कारणांमुळे काही विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे हा आहे.
अमेरिकेत युनिव्हर्सिटीत प्रवेश अनेक कसोट्यांवर खरे उतरुन स्वतःला सिद्ध करणार्या मुलां/मुलींनाच मिळतो. ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुलांना (अर्ज करताना चा निबंध, अभ्यासेतर छंद आणि तत्सम ऍक्टिविटिज साठी हायस्कूल मध्ये घेतलेले कष्ट, योग्य कोर्सेस ची निवड) संदर्भात मार्गदर्शन लागते. वर उल्लेख केलेल्या आरक्षित विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे गरीबीतुन आलेले नसून ज्यांचे आई वडील ह्या प्रवेश प्रक्रियेशी परिचीत आहेत आणि त्या अनुषंगाने येणारा आर्थिक भार उचलु शकतात अशा सुस्थितीतुन आलेले असतात.
वॅलेडिक्टोरिअन म्हणजे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी. थोडक्यात पुर्वीच्या हिंदी चित्रपटात हिरो जसे अभ्यासात पहिला नंबर, खेळात गोल्ड मेडल, गाण्यात पहिला नंबर शिवाय सहपाठी आणि गरिबांना मदत करण्यात तत्पर असायचे ना, तसे विद्यार्थी ज्यांना त्यांचे सहाध्यायी एकमताने वॅलेडिक्टोरिअन म्हणून निवडून देतात. ह्यांचे आई वडील (बहुतांश प्रमाणात) फर्स्ट जनरेशन अमेरिकेन असुन त्यांची एकगठ्ठा अशी वोट बँक नाही (आतापर्यंत नव्हती) त्यांच्या तुलनेत ज्यांना वंशामुळे आरक्षण आहे त्यांच्या समाजाच्या वोट बॅंक निवडणुकीवर प्रभाव टाकू शकण्याइतक्या शक्तीशाली आहेत म्हणुन त्यांना आरक्षण आहे.
थोडक्यात भारतीय आणि आशियाई विद्यार्थी हे अन्याय करणारे नसुन अन्याय ग्रस्त आहेत ह्या मुद्द्यावर ती जनहितार्थ याचिका दाखल केली होती. जी कोर्टाने दखलपात्र ठरवली आणि हा निकाल दिला. ह्यावर आपण चर्चा करतोय.
मुळात ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याच्याशी संबंधित नसलेल्या ढीगभर गोष्टी प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घ्यायच्या का ? आणि त्या पायी विद्यार्थ्यांना चार वर्षे जबरदस्त मेहनत आणि मानसिक ताण देणे कितपत योग्य आहे? हा पण एक चर्चेचा मुद्दा असु शकतो.
ह्या कसोट्यांवर प्रवेश घेण्यासाठी काही विद्यार्थी जास्त सक्षम असु शकतात. उदा. भारतीय पालक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जास्त जागरूक आणि प्रेरित असतात. काळे, हिस्पॅनिक पालक तेवढे जागरूक किंवा कष्ट घेणारे नसतील तर त्यांच्या मुलांवर प्रवेश घेताना अन्याय होईल हे नक्की. पण त्याच उत्तर सरसकट वंशाच्या आधारे ५०% आरक्षण हे नसुन हा अन्याय होणार नाही अशी प्रवेश प्रक्रिया तयार करणं हे आहे. नाही तर अन्याय लंबक असाच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरत राहिल.
>> कोण नाही म्हणतं ?<<
>> कोण नाही म्हणतं ?<<
आचार्य - अमेरिकेत सरकार तुम्हि भरलेल्या टॅक्सचा गैरवापर करत असेल तर जाब विचारायची सोय आहे. लोकाग्रहाखातर टॅक्सेस मागे घेतल्याची उदाहरणं आहेत.. बाकि, चालू द्या...
<<<<<अमेरिका च विकास खूप झाला
<<<<<अमेरिका च विकास खूप झाला आहे .
त्या मुळे हुशार,होतकरू भारतीय lokana त्यानी बिलकुल प्रवेश देवू नये.
हुशार ,होतकरू भारतीय लोकांना .
बांगलादेश,सोमालिया, पाकिस्तान,अफगाणिस्तान आफ्रिका मधील गरीब देशात पाठवून द्यावे आणि त्या देशांचा विकास करावा.>>>>
मी ह्या संदर्भात लिहिले, पण तो पर्यंत बर्याच पोस्ट आल्यात आणि चर्चा पुढे गेली आहे.
अमेरिकेत सरकार तुम्हि
अमेरिकेत सरकार तुम्हि भरलेल्या टॅक्सचा गैरवापर करत असेल तर जाब विचारायची सोय आहे. लोकाग्रहाखातर टॅक्सेस मागे घेतल्याची उदाहरणं आहेत.. बाकि, चालू द्या... >>> याचा माझ्या प्रतिसादाशी संबंध आहे ? माझा प्रतिसाद मी कर भरतो म्हणून या वृत्तीसाठी आहे. बाकी तुमचेच चालू द्या.
आचार्य - अमेरिकेत सरकार
आचार्य - अमेरिकेत सरकार तुम्हि भरलेल्या टॅक्सचा गैरवापर करत असेल तर जाब विचारायची सोय
आम्ही भारतीय लय टॅक्स भरतो म्हणून अमेरिका आमच्या मालकीची आहे.
आम्ही सांगू तशी अमेरिकेची धोरणे हवीत.
ह्या साठी टॅक्स भरणाऱ्या भारतीय लोकांनी अमेरिकेत मोर्चा काढला आहे का?
नसेल तर काढून बघा.
काय घडते ते.
काय तर कोटा सिस्टिमुळे बावळट
काय तर कोटा सिस्टिमुळे बावळट व ढ काळ्या, पांढर्या व हिस्पॅनिक मुला/मुलींना युमिव्हर्सीटीमधे प्रवेश मिळावा म्हणुन( केवळ डिव्हर्सीटीच्या नावाखाली!) . व्हॉट अ अट्टर नॉनसेन्स!
I thought you were being sarcastic!
इथे अमेरिकन नागरिक किती आहेत?
इथे अमेरिकन नागरिक किती आहेत? त्यांनीच इथल्या अंतर्गत प्रश्नावर मते मांडावी. बाकी उपर्या लोकांनी आपले अमेरिकेबद्दल असलेले( का नसलेले?) ज्ञान ( का अज्ञान?) इथे प्लिज पाजळु नये!
मैत्रेयी, तुझे मुद्दे मान्य! पण तश्या मुला मुलींनी हार्व्हर्ड/ एम आय टी/ येल/ स्टॅनफर्ड मधे अॅट द एक्पेन्स ऑफ वेल डिझर्व्ह्ड स्टुडंट्स अॅडमिशन घ्यायचा अट्टाहास का करावा? अस्मिता म्हणते तसे त्यांनी अंथरुंण पाहुन पाय पसरावेत! मी त्या बाबतीत अस्मिताशी १००% सहमत आहे.
पर्णिका! बिंगो! तुला एकदम बरोब्बर माझा विषय व मुद्दा कळला आहे.तुझे पोस्ट खुप आवडले.
भारतीय विस्थापित हा शब्द
भारतीय विस्थापित हा शब्द योग्य आहे.
(जसे मुंबई मध्ये अनेक राज्यातील विस्थापित पोट भरायला येतात पण आम्हीच खरे मुंबईकर असे समजतात)
अमेरिकन नागरिक हा शब्द साफ चूक.
अमेरिकन मराठी मध्ये लिहीत नाहीत आणि त्यांचा जन्म भारतात होत नाही
<<<आम्ही सांगू तशी अमेरिकेची
<<<आम्ही सांगू तशी अमेरिकेची धोरणे हवीत.
ह्या साठी टॅक्स भरणाऱ्या भारतीय लोकांनी अमेरिकेत मोर्चा काढला आहे का?>>
इथे असे मोर्चे, दंगल काढायची पद्धत नाहीये, इथल्या भारतीयांची.
त्यांच्या संघटना आहेत, नि अनेक भारतीय राजकारणात उतरले आहेत. अनेक भारतीय सरकारात अनेक जागांवर आहेत. निदान सध्या तरी भारताबद्दल अमेरिकेला फार प्रेम आहे. नंतर प्रेम नसले तरी नागरिकत्वाचे हक्क आहेतच.
जन्म अमेरिकेत झाला नसला तरी अमेरिकन नागरिकत्व व त्याचे संपूर्ण हक्क मिळवण्याचा कायदेशीर रीत्या अधिकार सर्वांना आहे.
खर म्हणने मी उपाशी बोकांनी एक
खर म्हणने उपाशी बोकांनी एक चांगला प्रश्न त्यांच्या पोस्टीत मांडला होता Is it worth the hassle and trouble getting admitted in universities like Harvard,Yale, Princton, Stanford etc.
तु तुझ्या पोस्टीत तश्या युनिव्हर्सीटीजच्या अॅडमिशन प्रॉसेस/ रिक्वायरमेंट्स बद्दल म्हणालीस.
तुर्त बिझी आहे . बट लेट्स डिसकस अँड ड्वेल मोर ऑन ऑन दोज टु सब्जेक्ट्स लेटर ट्डे ऑर टुमॉरो.
अहो हेमंत सर! तुमचे अज्ञान पाजळायला जरा दुसरा कुठला धागा शोधता का मायबोलिवर? काय असंबद्ध वटवट करुन राहीला आहात? धाग्याचा विषय काय आणी बरळताय काय? जरा जाउन झोपा आता! रात्रीचे १० वाजुन गेले आहेत तिकडे मुंबईत.
<<<आम्ही भारतीय लय टॅक्स भरतो
<<<आम्ही भारतीय लय टॅक्स भरतो म्हणून अमेरिका आमच्या मालकीची आहे.>>>
अहो, टॅक्स भरून का देशाची मालकी मिळते? निदान इथल्या भारतीयांना तरी हे माहित आहे.
इथे त्यासाठी कायदे करणार्यांना निवडणुकीसाठी जे जास्त पैसे देतील, त्यांच्या मालकीचा हा देश होतो.
इथे अमेरिकन नागरिक किती आहेत?
इथे अमेरिकन नागरिक किती आहेत? त्यांनीच इथल्या अंतर्गत प्रश्नावर मते मांडावी. बाकी उपर्या लोकांनी आपले अमेरिकेबद्दल असलेले( का नसलेले?) ज्ञान ( का अज्ञान?) इथे प्लिज पाजळु नये! >>>> तेच तर सगळे सांगताहेत. अमेरिकेचे आश्रित, भारताचे खाऊन पळून गेलेले फुकटे, अमेरिकेच्या दयेवर जगणारे यांनी अमेरिकेने काय करावे हे सांगू नये. भारतातून अमेरिकेत गेलेल्यांनी स्वतःला अमेरिकन म्हणवणे म्हणजे बिहारातून मुंबईला आलेल्यांनी स्वतःला मुंबईकर म्हणण्यासारखेच आहे. उद्या त्यांनी महाराष्ट्रात काय पाहीजे काय नको यावर मल्लिनाथी केली तर ठाकरेंसारखे जागा दाखवून देतातच. अमेरिकेत पण असे ठाकरे आहेत. त्यांनी चायनीज आणि भारतीय उपर्यांनी जॉब पळवले म्हणून मध्यंतरी मोहिमा चालवल्या होत्या.
क्रमांक दोन असलेले सर
क्रमांक दोन असलेले सर
धागा भरकटण्यासाठी एक वेगळा धागा आहे . कृपया
इथे तरी......
<<त्यांनी चायनीज आणि भारतीय
<<त्यांनी चायनीज आणि भारतीय उपर्यांनी जॉब पळवले म्हणून मध्यंतरी मोहिमा चालवल्या होत्या.>>
त्याचा काहीहि उपयोग झाला नाही.
त्या जागा लायकीनुसार मिळतात, मोहिमा काढून मिळत नाहीत. किंमत नि अपेक्षेप्रमाणे कार्य करण्याची लायकी या निकषावर लोकांना नोकरी मिळते. अमेरिकन मुलांनासुद्धा भरपूर नोकर्या मिळतात.
<<<अहो हेमंत सर! तुमचे अज्ञान
<<<अहो हेमंत सर! तुमचे अज्ञान पाजळायला जरा दुसरा कुठला धागा शोधता का मायबोलिवर? काय असंबद्ध वटवट करुन राहीला आहात? >>>
अहो मुकुंद, ही मायबोली आहे, इथे धाग्याचा विषय काय, आपल्याला काय माहिती आहे, असल्या गोष्टींचा विचार अनेक लोक करत नाहीत. केवळ आपल्या मनातली खळबळ बाहेर व्यक्त करण्यासाठी इथे लिहितात.
ठाकरे इथे आलेच आहेत. लवकरच गांधी-सावरकर, ब्राह्मण-अब्राह्मण. भाजप-काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस हेहि विषय इथेच येतील!!!
सुप्रीम कोर्टाची बॅटिंग
सुप्रीम कोर्टाची बॅटिंग जोरदार चालू आहे. बायडनचा स्टुडंट लोन फर्गिवनेसच्या प्लॅनमधली हवाच काढुन टाकली...
Interesting read
Interesting read
https://www.theatlantic.com/ideas/archive/2023/06/affirmative-action-sco...
धनि: एकदम एकतर्फी आर्टिकल.
धनि: एकदम एकतर्फी आर्टिकल.
एका लॅटिनोने त्याला सुट होइल व अफर्मेटिव्ह अॅक्शनने त्याचे कसे भले झाले अश्या नॅरो अँगल मधुन त्याने ते लिहीले आहे.
त्याला कसा अफर्मेटिव्ह अॅक्शनचा फायदा झाला असे लिहीताना १० अजुन वेल डिझर्व्ह्ड स्टुडंट्सच्या स्व्स्प्नांचा त्याच्यामुळे कसा चक्काचुर झाला असेल हे त्याच्या गावीही नाही! मोर ऑफन दॅन नॉट दोज १० अदर स्टुडंट्स हुज ड्रिम्स वेअर शॅटर्ड वेअर इंडिअयन/ चायनिज स्टुडंट्स!
ती पर्फेक्ट स्कोर असलेली मुले व्हॅलिडेक्टोरिअन बनत असताना किती मेहनत घेत असतात ते बघायचे सोडुन ते " प्रिव्हिलेज्ड" व एज्युकेटेड व रिस्पोन्सिबल पेरेंट्सची / स्कुल सिस्टिम मधुन आलेली मुले आहेत म्हणुन त्यांच्या अचिव्हमेंटवर व मेहनतीवर पाणी फिरवायचे व त्यांना सिलेक्शन प्रॉसेसमधुन डावलुन शिक्षा द्यायची का?त्यांची मेहनत व अचिव्हमेंट या लॅटिनोपेक्षा कमी महत्वाची ठरते का?
हा रेसिस्ट प्रश्न नसुन मॉरल प्रश्न आहे. व्हॉट इज जस्ट अँड हु शुड पे द प्राइस ऑफ जस्टिस इन अॅक्सेसींग गुड एज्युकेशन अॅट प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीज?
या लेखामागचा हेतु हा आहे की ज्याने त्याने या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे स्वतः शोधायचे आहे.
प्रत्येकाने आपला मुलगा/ मुलगी जर अश्या युनिव्हर्सीटीजनी डावलला( पर्फेक्ट स्कोर, भरपुर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हीटीज मधे निपुण व व्हॅलिडेक्टोरिअन असुनही) तर त्यांना व त्यांच्या पाल्याला कसे वाटेल असा प्रश्न स्वतःला हॉनेस्टली विचारुन बघावा.
>>..त्यांच्या पाल्याला कसे
>>..त्यांच्या पाल्याला कसे वाटेल असा प्रश्न स्वतःला हॉनेस्टली विचारुन बघावा.<<
नाहि मुकुंद, प्रश्न आपल्यावर वेळ येइल तेंव्हाच विचार करण्याचा नाहि, तर "रॅशनल थिंकिंग अँड डुइंग राइट थिंग रिगार्ड्लेस" हा आहे..
इथे चीफ जस्टीस जॉन रॉबर्ट्स यांची कामेंट महत्वाची आहे - द स्टुडंट आट टु बी ट्रीटेड बेस्ड ऑन हिज एक्स्पिरियंसेस अॅज अॅन इंडिविजुल; नॉट ऑन द बेसिस ऑफ द रेस". आता हा मुद्दा पोलिटिसाय्ज करुन त्यावर वादंग उठवणारे महाभाग आहेत; बट आय वाँट टु टेक ए मोमेंट टु बी थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर ब्रिदिंग इन सच ए जुडिशस एन्वॉर्यमेंट...
धन्यवाद मुकुंद
धन्यवाद मुकुंद
सामना, ज्यांचे पुर्वज एखाद्या जागी रहात होते त्यांना त्या कारणामुळे विशेष हक्क मिळायला हवेत हा नववसाहतवाद नाही का? बिहारमधुन आलेले नागरिक जो पर्यंत कर मुंबई महापालिकेचा कर भरतात आणि कायद्याच्या चौकटीत रहातात तो पर्यंत त्यांना मुंबईतील राजकारणाबद्दल बोलण्याचा हक्क का नसावा?
आय आय टी मुंबईत (परिक्षा देशातील सगळ्या विद्यार्थ्यांना खुली आणि एकसारखी असुन) ५०% जागा ह्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना राखीव ठेवल्यात तर तो निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश नाकारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का?
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळण्याचा पुर्ण हक्क आहे पण त्यांनी आय आय टी मध्ये जावे असे वाटत असेल तर आय आय टी च्या प्रवेश प्रक्रियेत निवड होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देणे त्यांना निवड होण्यासाठी आणि तिथे पुढचं शिक्षण घेण्यासाठी कपेबल बनवणं हे जास्त न्याय्य आहे की अशी मेहनत घेण्याची तयारी असलेल्या आणि नसलेल्या सगळ्यांना ५०% आरक्षण देणे योग्य आहे?
याही विषयात राजकारण/ उच्च
याही विषयात राजकारण/ उच्च वर्ण/ कनिष्ट वर्ग घुसवणार्यांना साष्टांग नमस्कार!>>
वर्ण आणि वंशाधारित कोटा या विषयावरच्या धाग्यावर वर्ण आणि वर्गाबद्दल लिहायचं नाही? ओके
सोशल जस्टिस आणि सोशालिझम यातला फरक बऱ्याच जणांना समजावून देण्याची गरज आहे असं दिसतंय. तसंच आपल्या बाब्या/बाबीला लाभलेली पिढ्यन्पिढ्यांची प्रिव्हीलिज आणि मेरिट यातला फरकही.
खिरापत वगैरे शब्द वाचून मजा आली. आता कोणीतरी 'आरक्षणाच्या कुबड्या' वगैरे लिहून टाका पाहू.
अवांतर.
अवांतर.इथे अमेरिकन नागरिक किती आहेत? त्यांनीच इथल्या अंतर्गत प्रश्नावर मते मांडावी. बाकी उपर्या लोकांनी आपले अमेरिकेबद्दल असलेले( का नसलेले?) ज्ञान ( का अज्ञान?) इथे प्लिज पाजळु नये!>>> याच्याशी सहमत आहे. हाच सल्ला अमेरिकन समाजकारण, संस्कृती, इतिहास याबद्दल काडीची माहिती नसताना अमेरिकन राजकारणाच्या धाग्यावर येऊन मल्लिनाथी करणाऱ्यांना पण लागू होतो. You don't really know a country unless you have lived there for years.
अवांतर संपलं.
सामना, ज्यांचे पुर्वज एखाद्या
सामना, ज्यांचे पुर्वज एखाद्या जागी रहात होते त्यांना त्या कारणामुळे विशेष हक्क मिळायला हवेत हा नववसाहतवाद नाही का? >>> जोपर्यंत तीव्र भाषेत टोकाची आणि हीणकस मतं मांडली जात राहतील तोपर्यंत त्याच पद्धतीने उत्तरंही दिली जाणार. अशांशी तात्विक चर्चा करून काहीच फायदा नसतो.
काही काही जणांना सोशॅलिझम माहिती नसतो, एक्स्फोजरचे फायदे याबद्दल बोलायचं नसतं. सोयीचे गांधी हवे असतात, सोयीचे नेहरू हवे असतात. सोयीचेच राज ठाकरे पण हवे असतात. पण तेच अमेरिकेतले ठाकरे हू मूव्हड माय चीज म्हणू लागले की ते नको असतात. काहींना गांधीजींवर टीका करणारे, फाळणीवर मुस्लीमांचे विश्लेषण करणारे आंबेडकर हवे असतात पण त्यांचे आरक्षण, लोकशाहीवरचे विचार मान्य नसतात. असल्यांशी वाद घालून काय उपयोग ?
किमान आपली अशी भंपक मतं मांडताना रेसिझम येणार नाही ही अपेक्षा पाळायला नको असे वाटत असेल तर इतरांनी ती का पाळावी ?
अमूक एका वंशाच्या ढ विद्यार्थ्यांना यातच त्या वंशाबद्दलचे मत आहेच. त्यांना तशी सोय का दिली आहे, त्याबद्दल इथल्या स्थानिकांनी एकमेकांशी संघर्ष केल्यावर त्यांना काय पटले आहे हे भारतात विषमता पाळणार्यांनी तिकडे जाऊन काहीही समजून न घेता त्यावर मांडायचे , हिडीस आनंद साजरा करायचा यामागे मूळची तीच वृत्ती आहे.
नववसाहतवाद हा शब्द इथे कसा
नववसाहतवाद हा शब्द इथे कसा काय लागू होईल ?
वसाहतवाद म्हणजे साम्राज्यवाद्यांनी इतर देशात जाऊन त्यांची साम्राज्ये उभारणे. कॉलनीज बनवणे. ब्रिटीशांनी इतर देशात जाऊन राज्य करणे आणि त्या त्या देशांना आपली कॉलनीज मानणे हा वसाहतवाद आहे. उद्या भारतात ब्रिटीश नागरीक आले , त्यांना इथले टेक्निकल नागरिकत्व मिळाले आणि ते जर काहीच्या काही मतं मांडू लागले, आपले हक्क समजू लागले, इथल्या सामाजिक संघर्षाला फाट्यावर मारून असेच असायला पाहीजे म्हणून लॉबिंग करू लागले तर त्यांचे मूळ कुठे आहे, इतिहास कुठे आहे हे त्यांना सांगणे म्हणजे नववसाहतवाद कसा काय होईल ?
नववसाहतवाद, रिव्हर्स कास्टिझम या अशाच फालतू संज्ञा आहेत. ही कोल्हेकुईच आहे. बाहेरून आलेल्यांनी त्या देशाचा सांस्कृतिक संघर्ष जाणून घेतला पाहीजे, त्याचा आदर केला पाहीजे. तसे न करता आपल्या मूळ देशातली आपली वर्णवर्चस्ववादी मते त्या देशात आणि त्या देशाचा बहाणा करून मूळच्या देशाच्या लोकांनाही हिणवत मांडणे हा वसाहतवाद आहे का ?
का नाही लागु होणार? वसाहतवाद
का नाही लागु होणार? वसाहतवाद म्हणजे आम्ही बाहेरुन आलेल्या व्यक्तीसमुहाने स्थापन केलेली ही वसाहत आहे ह्या वसाहतीत आधीपासून रहाणारे लोक हे आम्हा बाहेरच्यांपेक्षा कमी दर्जाचे आहेत म्हणून त्यांना आमच्या इतके मुलभूत अधिकार नाहीत. ह्याचाच उलट आविष्कार म्हणजे आम्ही पिढ्यान् पिढ्या इथे रहात आलेलो आहोत, काही कारणाने स्थलांतर करुन आलेले लोक हे इथले स्थानिक नाहीत त्यामुळे त्यांना आमच्या इतके अधिकार मिळायला नकोत.
ही विचारधारा आपल्या आणि अमेरिकेच्याही घटनेने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्याचा विरोध करते. पिढ्यान् पिढ्या अमेरिकेत रहाणारे आणि बाहेरच्या देशातून अमेरिकेत स्थलांतर करुन आलेले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले ह्यांच्यात भेदभाव करा हे सांगणारे कुठलेही मार्गदर्शक तत्व अमेरिकन घटनेत नाही.
५ पिढ्या आधी जुलमाने विस्थापित केल्या गेलेल्या लोकांवरच्या अमेरिकेन सरकारने केलेल्या अन्यायाच परिमार्जन हे सध्याच्या पिढीतील स्थलांतरित लोकांची जबाबदारी असुन ते स्थलांतरित असल्याने त्यांना सरकारच्या धोरणाविरोधात न्याय मागण्याचा हक्क नाही. हा विचार मला तर्कदुष्ट वाटतो.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायद्याने संमत प्रक्रियेनुसार न्यायालयात दाद मागण हा लोकशाहीतील मुलभूत हक्क नाही का?
Pages