आज शेवटचां दिवस, हो नाही करता करता रात्री अकराला ठरवले, कसही करुन उद्या जायचच.
सकाळी सातला रिव्हरव्ह्यू पार्कला पोहोचले. अपेक्षेप्रमाणे तिकडे मेळा जमला होता. लांबूनच दिसणारे उंचावलेले भगवे, साड्या, पंजाबी ड्रेस, पांढरे-भगवे कुडते आदी पारंपरिक पोषाखातील बायामाणसे, झांजांची किणकिण, आसमंतात पसरलेला उत्साह लगेच तुम्हाला आपल्यात सामावून घेत होता. त्यातच स्वागताला लावलेल्या चंदनाच्या टिक्याने पुढील ३-४ तासांची नांदीच मिळाली.
ही सगळी मंडळी निघाली तरी कुठे? अहो वारीला. तीनेक मैलाचा रस्ता. बालाजी मंदिरात सांगता.
ह्या वर्षी प्रथमच बे एरियामध्ये जुन महिन्यातल्या चारही शनिवारी आणि रविवारी सकाळी बरोबर सातला ह्या मार्गावर वारी आयोजित केली होती. FB/ Whatsapp वर इतके सारे फोटो बघून कधी एकदा आपणही हा अनुभव घेतोय असे झालेले कारण फोटो आणि व्हिडिओ बघून खरी अनुभूती काही मिळत नाही.
------
वयस्कर मंडळी, त्यांना सावकाश घेऊन जाणारी त्यांची मुल सुना, जावई, stroller मध्ये किंवा पाठुंगळी लेकरांना घेऊन पायी निघालेले लेकुरवाळे आईबाप, जोशात मार्गक्रमण करणारी तरुणाई, आणि सगळ्यांना जोडणारा एकच धागा त्या पांडुरंगाच्या भक्तीचा.
सुरवातीला कोणीच ओळखीचं नाही म्हणून वाटणार अवघडलेपण, विठू नामाचा गाजर करत सहकाऱ्यांबरोबर काही पाऊले चालताच कुठच्या कुठे पळून गेले. आणि सकाळच्या गारव्यात, झांजांच्या गजरात, विठूमाऊलीच्या, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात, बालाजी मंदिर हा हा म्हणता आले सुद्धा.
अंगणातल्या तुळशीवृंदावनासमोर रख्माई विठोबाच्या साजिऱ्या मूर्तींची पूजा करून त्याभोवती रिंगण केले. आज आमच्या वारीला पंढरपूरची वारी केलेले एक वारकरी आजोबा होते. त्यांनी रिंगणाच्या वेळी म्हणायची खास ढंगातली भजनं सांगून भक्ती रसात न्हाऊन टाकले. मग फुगड्या झाल्या. आणि अर्थातच नवीन युगाच्या रीतीप्रमाणे खूप सारे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग!
-----
त्यानंतर गाभाऱ्यात अनेक सुंदर भजन म्हटली. विशेष उल्लेख करायचा तर, इथेच लहानच मोठ झालेल्या म्हणजे खरतर अजूनही elementary शाळेतच जाणाऱ्या दहा वर्षाच्या शार्दुलने इतकं गोड, सुस्पष्ट, आणि अस्खलित भजन म्हणून आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. त्यावर कडी म्हणून एका तीनेक वर्षाच्या बाळाने "जय हरी विठ्ठल" म्हणत इतका सुंदर ठेका धरला की त्याच्या रूपाने जणू बाल विठ्ठलाचेच दर्शन झाले. “आता विश्वात्मके च्या” सामूहिक पठणाने अवघा आसमंत पवित्र झाला. त्यानंतर मग यथासांग आरत्या झाल्या. अगदी “येई हो विठ्ठले” मधल्या निढळावरी कर चा “ररर” हवा तेवढा लांबवताना सगळा गाभारा अगदी दुमदुमत होता.
तिथंपर्यंत बहुदा अकरा वाजून गेलेले, अगदी पाय काढवत नसताना प्रसाद घेऊन निघाले, ते आषाढी एकादशीला परत विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ घेऊनच.
बोला, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !”
तळटीप- भारतात इतके वर्ष राहून हा वारीचा माहोल कधीच अनुभवला नव्हता. पण लहानपणी tv वर पंढरपूरच्या वारीतील भक्तीचा महापूर बघून खूप कुतूहल होत. ह्या वर्षी बे एरियातील ह्या वारी निमित्ताने एक छोटीशी चुणूक अनुभवायला मिळाली. त्यासाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल महाराष्ट्र मंडळ बे एरियाचे मनापासून आभार!
अरे वा! मस्त!
अरे वा! मस्त!
।।पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ।।
मस्त! फेसबुकवर इतर लोकांकडून
मस्त! फेसबुकवर इतर लोकांकडून याचे फोटो पाहिले. कधीपासून (बे एरियात) ही प्रथा चालू केली माहीत नाही. आधी कधी पाहिल्याचे आठवत नाही.
मंजूताई , फारएण्ड धन्यवाद!
मंजूताई , फारएण्ड धन्यवाद!
कधीपासून (बे एरियात) ही प्रथा चालू केली माहीत नाही. >>> ह्या वर्षी प्रथमच बे एरियामध्ये जुन महिन्यातल्या चारही शनिवारी आणि रविवारी सकाळी बरोबर सातला ह्या मार्गावर वारी आयोजित केली होती.
अरे वा, मस्त. पुंडलिक वरदे,
अरे वा, मस्त. पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव, तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय!
मस्त ! बर्याच मराठी मंडळांनी
मस्त ! बर्याच मराठी मंडळांनी गेल्या काही वर्षांमधे वारी ची प्रथा सुरू केली आहे . एकदम झक्कास प्रकार आहे. वारी चे औचित्य साधून इथे दर दिवशी अमूक सूर्य नमस्कार नि दंडबैठका करण्याचा पण उपक्रम केला जातोय.
निर्देश, असामी प्रतिसादा
निर्देश, असामी प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव, तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय!
मस्त वाटलं वाचून...!
मस्त वाटलं वाचून...!
अमेरिकेत मी हरे राम इस्कॉन
अमेरिकेत मी हरे राम इस्कॉन मंडळी पाहीलेली आहेत.
मला फक्त एक प्रश्न आहे - कोणकोणते धर्म , असा उत्सव रस्त्यावर आणतात? उद्या बकर ईद, अय्यप्पा वगैरेही उत्सव अमेरिकेत सुरु झाले तर आपल्याला आवडेल का? आपण निदान उदासीन ( न्युट्रल) राहू शकू का?
धन्यवाद अस्मिता!
धन्यवाद अस्मिता!
धन्यवाद अस्मिता!
धन्यवाद अस्मिता!
इकडे मी बऱ्याच rallies/
इकडे मी बऱ्याच rallies/ parades बघितल्यात. Lunar year rally, bikers' rallies, Easter parades, street fairs, Halloween parades and many more.
ह्याची city कडून व्यवस्थित परवानगी काढली जाते.
उद्या बकर ईद, अय्यप्पा वगैरेही उत्सव अमेरिकेत सुरु झाले तर आपल्याला आवडेल का? आपण निदान उदासीन ( न्युट्रल) राहू शकू का?>>> जसा समाज बदलत जातो, diversify होतो तसतसे बदल घडत जातात. कायद्याच्या चौकटीत राहून जे काही करण्यासारखे आहे ते करत असताना कोणी neutral राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रश्न उद्भाभवता कामा नये.
>>>>>>>> Lunar year rally,
>>>>>>>> Lunar year rally, Easter parades, street fairs, Halloween parades and many more.
ह्याची city कडून व्यवस्थित परवानगी काढली जाते.
ओके मी पाहीलेल्या नव्हत्या. छानच की मग आपलंही रिप्रेझेन्टेशन असे म्हणू शकतो.
पण तत्वतः विरोध आहे.
बकर ईद, अय्यप्पा वगैरेही
बकर ईद, अय्यप्पा वगैरेही उत्सव अमेरिकेत सुरु झाले तर आपल्याला आवडेल का?>>> आपल्याला आवडण्या नावज्ञाचा प्रश्नच येत नाही.
आणि मला वाटतं जिथे त्या त्या समुहांच वास्तव्य मोठ्या प्रमाणावर असेल तिकडे होतही असतील.
इकडे बरच कॉमन आहे.
इकडे बरच कॉमन आहे.
गणपती व लाऊडस्पीकर व
गणपती व लाऊडस्पीकर व मिरवणुकाही सुरु होतील. हे जरी फियर माँगरिंग असले तरी ..... मला वाटतं उत्सव मूर्ती उत्सवी स्वरुपात, देवळात आणल्या जातात.
मला फक्त एक प्रश्न आहे -
मला फक्त एक प्रश्न आहे - कोणकोणते धर्म , असा उत्सव रस्त्यावर आणतात? उद्या बकर ईद, अय्यप्पा वगैरेही उत्सव अमेरिकेत सुरु झाले तर आपल्याला आवडेल का? >> प्रश्न समजला नाही सामो ? नक्की का आक्षेप आहे ? (तात्विक विरोध असा शब्द वापर्लास पुढे म्हणून अजून गोंधळ आहे. ) आक्षेप रस्त्यावर करण्याबाबत आहे कि अशा प्रकारे अधिक अॅक्टीविटी होण्याबद्द्ल आहे कि अजून काही ?
रस्त्यावरती, सार्वजनिक करुन
रस्त्यावरती, सार्वजनिक करुन आपले वेगळेपण अधोरेखित करण्यास विरोध आहे. न्यू जर्सीला १५ ऑगस्टला स्वतंत्रता दिवस साजरा होतो तेव्हा रस्ते न रस्ते कागद व कचर्याने भरुन जाताना पाहीलेले आहेत. हा ताण अधिकारी-कर्मचार्यां वरती आणण्यास विरोध आहे.
तात्विक म्हणजे कितीही उत्सवप्रिय वाटलं तरी धर्म रस्त्यावर आणायला, बेशिस्तीला व वेगळेपणाने 'सोअर थंब' उठून दिसायला विरोध आहे असामी.
तेव्हा रस्ते न रस्ते कागद व
तेव्हा रस्ते न रस्ते कागद व कचर्याने भरुन जाताना पाहीलेले आहेत. हा ताण अधिकारी-कर्मचार्यां वरती आणण्यास विरोध आहे.>>>>> हे चुकीचच आहे. पण हे त्या समाजाला नैतिक भान नाही ह्याच लक्षण आहे.
छम्दीफंदी होय सिव्हिक सेन्स
छंदीफंदी होय सिव्हिक सेन्स ची कमी.
आपल्याला आपल्या मूर्ती देखण्या वाटतात, आपल्याला आपला जल्लोश, गजर गोड वाटतो पण या इकडच्या लोकांना तोच गोंगाट वाटू शकतो, थोडं प्रिमिटिव्ह, बटबटीतपणा , वाटू शकतो. त्यामुळे माझा थोडा विरोध आहे. म्हणजे आता आलो आहोत तर इथले होउन रहा. त्यांच्या मिसळण्याचा प्रयत्न करा. अर्थात जे की आपण करतोच.
मला हेही मान्य आहे की आपल्याला आपली संस्कॄती जपावीशी वाटणे साहजिक आहे. पण म्हणुन रस्त्यावरच प्रदर्शन मांडलं पाहिजे का? मंदीरात शांतपणे हे सोहळे करावेत.
मला ही सामो च पटतय.
मला ही सामो च पटतय.
महाराष्ट्रतली वारी ही सार्वजनिक गणेशत्सवासारखी झाली आहे असं मला वाटत. तिला ही कन्ट्रोल ची गरज आहे. कल्पना करा ज्या गावात वारी मुक्कामी असते त्या गावच्या सर्वच यंत्रणेवर किती ताण पडत असेल एवढ्या लाख सव्वा लाख लोकांना सामावून घेण्यासाठी ? ना शौचालय ना स्नानगृह .. वारीचा मुक्काम उठला की उकिरडा बरा अशी अवस्था होत असेल. अर्थात ज्यांना वाटत त्यांनी जरूर जावं.
आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा प्रत्येकानेच चार भिंतीच्या आत पाळल्या उत्तम हेमावैम.
मी पण सामोच्या मताशी सहमत आहे
मी पण सामोच्या मताशी सहमत आहे. आपल्याकडे एखादी परंपरा हळू सुरु होऊन त्याला उत्सवी स्वरुप कधी येईल हे सांगता येत नाही. इथे ढणाणा लाऊडस्पीकर वगैरे चालवून घेणार नाहीत नाहीतर ते सुद्धा येईल. आमच्या इथे गेल्या वर्षीपासून दोन दिवस आउटडोअर दांडिया करतात. दांडिया म्हटलं की म्युझिक आलंच. आम्ही गे गेल्या वर्षीच म्हटलं की ह्या ग्राऊंडच्या आसपास रहाणार्या लोकांचं काही खरं नाही दोन दिवस.
>> आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा प्रत्येकानेच चार भिंतीच्या आत पाळल्या उत्तम हेमावैम.>>+१. देवळं वगैरे आहेतच इथे, तिथे जा हवंतर.
आमची ही वारी खूप छान झाली.
आमची ही वारी खूप छान झाली. अगदी organically ... >>>
तात्विक म्हणजे कितीही
तात्विक म्हणजे कितीही उत्सवप्रिय वाटलं तरी धर्म रस्त्यावर आणायला, बेशिस्तीला व वेगळेपणाने 'सोअर थंब' उठून दिसायला विरोध आहे असामी. >> आपण हि सगळी चर्चा मी फक्त अमेरिकेत दिसणार्या वार्यांबद्दल करतो आहेत असे धरून मी पुढे लिहितो. देशात काय होते हा वेगळा मुद्दा आहे. मला स्वतःला माझ्य श्रद्धेचे सार्वजनिक प्रदर्शन करायला आवडत नाही. पण मी इथे ज्या वार्या पाहिल्या आहेत त्या एकदम शिस्तीत , दंगा गोंधळ न होता झालेल्या पाहिल्या आहेत. ह्या मी तरी देवळाच्या आसपासच्या रस्त्यावर / पार्किंग लॉट मधे / इंटर्नल रोड वर झालेल्या पाहिल्या आहेत. त्याच्यात वेगळेपणा नक्की होता पण समूहा मधे जो अमाप उत्साह होता ज्याने वेगवेगळ्या वयाची नि गावांमधली लोक एकत्र बांधलेली दिसत होती ते भारावून टाकणारे होते. रस्त्यावर करण्याआधी टाऊन नि पर्यायाने पोलिस नि फायर स्टेशन इत्यादी परवानगी घेतल्याशिवाय केलेल्या असणॅ मला अशक्य वाटते (हे मी तीन वेगवेगळ्या मराठी मंडळांच्या अनुभवावरून बोलतो आहे) १५ ऑगस्ट किंवा नवीन वर्षानंतर जे होते ते वेगळे आहे. तेंव्हा तुझ्या मताला विरोध नाही फक्त त्याचे सरसकटीकरण केलेले पटले नाही.
ही बे एरियातील वारी सुद्धा
ही बे एरियातील वारी सुद्धा शोअरलाइन पार्क म्हणून एक पार्क आहे व तेथे वॉकिंग ट्रेल्स आहेत तेथे झाली असे इथल्या व इतरत्र पाहिलेल्या फोटोंवरून दिसते. तेथे लोक झुंडीने जात असतील तरी इतरांना उपद्रव नसेल तर कोणी आडकाठी करणार नाही.
रहदारीच्या रस्त्यावर इथे परवानगी घेउनच केले जाते. गावोगावी ख्रिसमस परेड्स असतात. त्या वेळेस रस्त्याचे पॅचेस थोड्या थोड्या वेळाकरता बंद करत परत उघडत जातात. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षाची परंपरा आहे. नाव ख्रिसमस परेड असले तरी धार्मिक पेक्षा "स्थानिक सांस्कृतिक" असे स्वरूप जास्त असते यांचे. सुरूवातीला सगळेच ख्रिश्चन असतील. त्यामुळे कोणाला खटकायचा प्रश्नच नसेल. नंतर ग्लोबलायझेशन मुळे आपण इथे आलो आता तुमच्याच प्रथा घरी ठेवा व सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करू नका अशी आडकाठी घालणे हे मला अजिबात पटत नाही.
आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक
आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा प्रत्येकानेच चार भिंतीच्या आत पाळल्या उत्तम हेमावैम.>> १००
वेगळा विषय आहे, पण.. लग्नाच्या वरातींमुळे पण जो रस्ता अडून रहातो.. जो गोंगाट चालू असतो तो खूपच त्रासदायक असतो.
आपल्या बाबीच्या बाब्याच्या लग्नाचा दुसऱ्यांना का त्रास?
देशातल्या इतर वाऱ्यासुद्धा
प्र का टा
नंतर ग्लोबलायझेशन मुळे आपण
नंतर ग्लोबलायझेशन मुळे आपण इथे आलो आता तुमच्याच प्रथा घरी ठेवा व सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करू नका अशी आडकाठी घालणे हे मला अजिबात पटत नाही.>>> +१ सगळे नियम पाळून होत असेल तर अशा गोष्टी जास्तित जास्त व्हाव्या आणी सान्स्कुतिक सरमिसळ व्हावी...
सामो, प्रत्येक प्रतिसादाशी
सामो, प्रत्येक प्रतिसादाशी सहमत.
मनिमोहोर, अनुमोदन. अगदीच पटलं.
शर्मिलाR, पुण्यात मी SP infocity मधे होते, तेव्हा फुरसुंगी गाव cross करावं लागायचं. तिथे विशिष्ठ सीझन मधे दर दिवसाआड लग्न असायची. कधी कधी तर एका दिवसात दोन वराती रस्ता अडवून नाचत असायच्या. दिवसभर दमलेले लोक, घरी छोटी बाळ असणाऱ्या स्त्रिया, मुलांचे homework /projects च टेन्शन घेऊन घरी पोचायची घाई असलेले आई बाबा...... एव्हढा मनस्ताप व्हायचा. छोटंसं अंतर जायला tas- दीड तास सहज जायचा.
असला नॉन क्रिएटिव्ह मूर्खपणा
असला नॉन क्रिएटिव्ह मूर्खपणा करण्यात भारतीय लोक फार आघाडीवर असतात.
मला असल्या वारी या भयंकर
मला असल्या वारी या भयंकर प्रकाराबद्दल प्रचंड चीड आहे. मी लहान अंतराची स्वतः याकोब्स वेग केलेली आहे. परंतु ती इतकी मस्त होती. लहान लहान ग्रुप्स. अत्यंत सुनियोजित. प्रत्येकाकडे प्रॉपर गिअर्स. स्वच्छतेला प्रचंड प्राधान्य. सगळं स्वतच्या खिशातुन. इतर लोकांना थोडाफार रोजगार पण उगाच लोकांना फुकट खायला घालून जाता जाता पुण्य पदरात पाडून घ्यायची खाज नाही. ( म्हणजे नद्या नाल्यांची, आसमंतातल्या प्रत्येक गोष्टीची वाट लावायची, आणि फुकट वारकऱ्यांना जेवायला घालून पुण्य कमवायचे असला चिवत्या गैरसमज नाही ).
याकोब वारीत काही सत्य वगैरे गवसले नाही, पण एकंदरीत प्रकार अनानंदाचा होता. बहुतेक लोकांना त्या याकोबचे आनि त्या चर्च चे काही ही पडले नव्हते. खूप जुन्या निसर्ग रम्य मार्गांवरून चालत जायचे इतकें हवे होते.
Some traditions without (religious nonsense) are really beautiful.
मी काहीकाळ इंदापूर भागात राहिलो होतो.
इंदापूर ते बावडा हा मार्ग इतका सुंदर होता. आता बहुतेक गाड्यांमधून वाऱ्या करणाऱ्या मूर्खांसाठी हा मार्ग आणि त्यावरील चिंचेची, आंब्याची प्रचंड मोठी झाडे उध्वस्त केली असणार.
शिवाय आपल्या लोकांची लूटमार करायची भावना. वारीला आले तरी हरामखोर सगळं फुकट ओरबाडायलाच बघतात. रस्त्याकडेचे स्वस्त अन्न ओरपून सगळीकडे हागुन ठेवतात. कसलीही व्यवस्था नाही.
वारीवर प्रत्येक गावाने टॅक्स गोळा केला पाहिजे.
Pages