Submitted by अनन्त्_यात्री on 27 June, 2023 - 08:17
विष्टंभी आरंभ करोनी अवष्टंभ गाठावे
सूर्योदयबिंदू वाटेतील अलगद खुडून घ्यावे
त्या बिंदूंची रेष केशरी लवलवती बनवावी
गगनछताच्या चांदणनक्षीवरुनी हळू फिरवावी
स्पर्शाने अलवार विस्कटून अवघी चांदणनक्षी
विरून जाईल-त्या विरण्याला एक दिवाणा साक्षी
उरेल- तो सूर्यास्तबिंदूना पश्चिम क्षितिजी खुडण्या
आजही जाईल, गळ्यात माळून लखलखत्या चांदण्या
अपार उधळित तेजशलाका आकाशातिल रत्ने
उजळून देतील मावळतीला अनाहूत स्पर्शाने
अनामिक नक्षत्रे त्यातील मावळत्या चांदण्या
तेज शिंपडित जातील क्षितिजाखाली गात विराण्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह!!! खूपसे काही अलवार आणि
वाह!!! खूपसे काही अलवार आणि भव्य - एकाच वेळेस!
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो