नारळी पाव

Submitted by sunilt on 30 April, 2023 - 05:36

दोन महिन्यांपूर्वीच्या बुलेट्प्रूफ कॉफी या माझ्या पाककृतीत म्हटल्याप्रमाणे आहारातून कार्ब्स कमी केले. त्यामुळे वजन कमी झाले ते अद्यापही ६० किलोच आहे.

आता कार्ब्स कमी करायचे तर माझा आवडता पाव हा पदार्थ खाता येत नाही. म्हणून कार्ब्स विरहीत पावाच्या शोध घेत असता नारळी पावाची कृती सापडली आणि त्वरीत अमलातही आणली.

अत्यंत सोपी आणि झटपट होणारी हे आहे नारळी पावाची पाककृती -

साहित्य -

कोकोनट पावडर - १०० ग्रॅम्
अंडी - २
बटर - ४-५ चमचे
बेकींग पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार

वरील सर्व पदार्थ एकत्र करा. ओवन १८० डिग्रीवर गरम करून घ्या. ज्या भांड्यात बेक करणार त्या भांड्याला आतून बटरचा हलका हात फिरवून घ्या. मिश्रण भांड्यात ठेवून १८० तापमानाला ३० मिनिटे बेक करून घ्या.

छायाचित्रे -

https://drive.google.com/drive/folders/1jn7GbXwpPvsYQ_amA34uOIjrv3onHq4u...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

याला पाव म्हणणे बरोबर नाही वाटत. पाव हा पावच असतो.

कार्बस.
तर यातला मैदा हा कार्बस.
पण तो चालत नसेल तर इतर सोपे आणि वजन न वाढवणारे कार्बस खाणे हा पर्याय म्हणजे ज्वारीच्या कण्या ताक घालून खाणे. (ज्वारीचा जाडसर रवा पाणी घालून भातासारखा उकडणे.)

@Srd

तांत्रिकदृष्ट्या तुमचे म्हणणे खरे आहे. यात मैदा किंवा कुठलेही धान्याचे पीठ वापरले नसल्याने हा "पाव" ठरत नाही. मी याला पाव अशासाठी म्हटले कारण मी याचा उपयोग पावासारखा (चिकनच्या रश्यात बुडवण्यासाठी) केला!

फोटो टाका
कृती एकदम इनोव्हेटिव्ह वाटते आहे

@mi_anu

धन्यवाद.

फोटो 2 MB पेक्षा मोठे असल्यामुळे टाकता येत नाहीत. म्हणुन Google Drive ची लिंक दिली आहे.

माझ्याकडे ओव्हन किंवा तत्सम इलेकट्रीक वस्तू नाहीय मी काय करू? तुमची बुलेटप्रूफ कॉफी मी बुलेटप्रूफ टी बनवून प्याली। नॉर्मल टी मध्ये घी टाकून मस्त लागली .

@Ajnabi
तुम्ही मायक्रोवेव मध्ये करू शकता किंवा गॅसवर भांड्याला झाकण लावूनही करू शकता. मात्र या पद्धतीत पाव बनायला किती वेळ लागेल याचा मला अंदाज नाही.
बुलेटप्रूफ़ चहादेखिल मस्तच लागेल याची खात्री होतीच!

@सामो
धन्यवाद!

@Diggi12
अहो, गेल्या १५ वर्षांत ठाण्याच्या खाडीपुलाखालून आणि कलकत्त्याच्या हावडा ब्रिजखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

तरीही एखाद्या दिवशी मूड जमला तर चट्कन लिहून होईलही! बघुया...

@अदिति
धन्यवाद.

अरे झकास पाकृ आहे की ही!
मावे मध्ये कन्व्हेक्शन पण आहे त्यावर करून पाहीन अंडे घालुन.
बायको अंडे खात नाही त्याला काही सब्स्टिट्युट?

@मानव पृथ्वीकर
धन्यवाद.

ह्या पाककृतीत अंडे हा binding agent म्हणून वापलेला आहे. अंडे नको असेल तर त्याऐवजी तांदळाचे वा गव्हाचे पीठ किंवा बेसन वापरू शकता. पण मग हा लो-कार्ब राहणार नाही!