भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
मेहंदी आणि संगीत दोन्ही झालं,
मेहंदी आणि संगीत दोन्ही झालं, आता विवाह लावा/रचा...!
(No subject)
केमिस्ट्री टीचर्सने सांगितले
केमिस्ट्री टीचर्सने सांगितले की, फ्लेवर्ड x ला गरम पाण्यात जास्त वेळ ठेवल्यास फ्लेवर्डमधील केमिकल मॉलिक्युल्स तुटून अल्कोहोलिक कंपाऊंड बनतात. त्याचा वापर काही युवक करतात. हे कंपाउंड तुटल्यानंतर सुगंध आणि धुराचे उत्सर्जन होते. हे पॉलियुरेथीन नामक सिंथेटीक राळेमुळे होते. तो एक मादक फ्रॅगनन्स निर्माण करते. हा पदार्थ कारची पूजा तसेच रबरसारख्या घरेलू वस्तूंमध्ये असतो.
>>
कारची पूजा? काहीही बोध होत नाहीये
काहीही बोध होत नाहीये +१
काहीही बोध होत नाहीये +१
मजकूर दुवा ?
पुर्जाhttps://www.insider.com
पुर्जा
https://www.insider.com/youth-india-have-found-new-way-get-high-flavored...
भरत धन्यवाद.
भरत धन्यवाद.
पूर्जा...बाबो
पूर्जा...बाबो
कधीच guess नसते झाले.
TV9 वाले पण ढापतात म्हणजे..
TV9 वाले पण ढापतात म्हणजे...मी तेथून बोध न झाल्याने इथे टाकला होता...
लिंक:
https://www.tv9marathi.com/health/there-is-information-that-condoms-are-...
खरं आहे, त्यांनी एकदम खतरनाक
खरं आहे, त्यांनी एकदम खतरनाक लिहिलंय...
ढापलेल्या बातमीसाठी बायलाइन
ढापलेल्या बातमीसाठी बायलाइन (वार्ताहराचं नाव) दिलं आहे!
मध्य रेलवे तर्फे part time
मध्य रेलवे तर्फे part time महिला डॉक्टर नेमण्यासाठीच्या एका छापील जाहिरातीत- “अर्धवट” महिला डॉक्टर नेमणे आहे असे लिहिलेले वाचले.
जीव निवला, कलेजे को ठंडक पड गई!
“अर्धवट” महिला डॉक्टर अ रा
“अर्धवट” महिला डॉक्टर >>>> अ रा रा रा......
जीव निवला +१
अर्धवट महिला >> ह ह पु वा
अर्धवट महिला >> ह ह पु वा
दुवा सापडला:
दुवा सापडला:
शेवटून तिसरे पान
https://cr.indianrailways.gov.in/uploads/files/1560859253136-14.06.2019.pdf
ही बघा ती लष्कराची करपलेली
ही बघा ती लष्कराची करपलेली भाकरी उर्फ मध्य रेल्वेची जाहिरात
ज्यांना 'अर्धवट महिला डॉक्टर' वर पुरेसा संताप / हसू आले नसेल ते 'मालढाक्का' वर संतापू / हसू शकतील.
(No subject)
दिव्य ..
दिव्य ..
..
मुंबईत बांगलादेश ??
https://www.marathi.hindusthanpost.com/social/a-town-called-bangladesh-i...
पण ते अधिकृत नामकरण आहे असे तिथे म्हटलंय .
अर्धवट लेडी डॉक्टर फारच महान
अर्धवट लेडी डॉक्टर फारच महान आहे.
अर्थ विभागातले वार्ताहर इतके
अर्थ विभागातले वार्ताहर इतके मूर्ख कसे काय असू शकतात?
50 रुपये ऑनलाईन discount असताना 50 टक्के टंकलय
(5926-50=5876 per gm online price)
https://www.loksatta.com/business/finance/sovereign-gold-bond-scheme-opp...
काल दिवंगत अभिनेत्री रीमा
काल दिवंगत अभिनेत्री रीमा लागू ह्यांचा वाढदिवस (जन्मदिन) होता, पण राजश्री मराठीने स्मृतिदिन लिहिले आहे (खरेतर त्यांचे १८ मे २०१७ ला आकस्मिक निधन झाले होते, त्यामुळे स्मृतिदिन हा मागच्याच महिन्यात होऊन गेला). माझ्यासारख्या अनेक चाहत्यांनी कंमेंट करून ही चूक त्यांच्या नजरेस आणली आहे, पण त्यांनी अद्यापही दुरुस्त केली नाही. मात्र इतर अनेक मराठी youtube चॅनेल्सनी जन्मदिनच लिहिलेले आढळले. राजश्री प्रोडकशनच्या तीन चित्रपटांमध्ये (मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, व हम साथ साथ हैं) रीमा लागू होत्या आणि त्यांचाच भाग असलेल्या राजश्री मराठीने माहिती पडताळून बघण्याचीही तसदी घेतली नाही.
किंवा जन्मदिनाला स्मृतिदिन म्हणू शकतो का, जाणकारांनी माहिती द्यावी.
१. फक्त अर्थच नाही तर अनेक
१. फक्त अर्थच नाही तर अनेक विभागात तशी परिस्थिती आहे. आजच आरोग्य विभागातील एका लेखात घोडचूक ( वास्तवाच्या बरोबर विरुद्ध मुद्दा ) झालेली आहे. आता ते इथे उद्रृत करायचा कंटाळा येतो.
....
२. स्मृतिदिन
माझ्या माहितीनुसार तरी पुण्यतिथीलाच असे म्हणतात.
जन्मदिन = जयंती
आता जन्माची आठवण काढणे असा अर्थ त्यांना अपेक्षित असेल तर ठीक आहे...
असे आदर्श आता आठवणीत जमा होऊ
असे आदर्श आता आठवणीत जमा होऊ लागलेले आहेत :
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ दिवाकर मोहनी या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा तसाच होता. त्यांचा भाषास्नेह सर्वपरिचित होता. मुद्रण आणि देवनागरी लिपीविषयीचे त्यांचे ममत्वही सर्वज्ञात. ते तज्ज्ञ वा अभ्यासक होतेच, पण त्यांच्यातील कळवळा ‘लाभाविण प्रीतीच्या’ पंथातील होता. ..
.. ‘मोहिनी राज मुद्रा’ हे त्यांचे नागपुरातील मुद्रणालय. दीर्घकाळ मुद्रक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. भाषाशुद्धीच्या कटाक्षाबद्दल त्यांचे नाव आदराने घेतले जायचे. झापडबंद रिवाज अव्हेरून त्यांनी व्याकरणाला बुद्धिवादाचा साज चढविला.
https://maharashtratimes.com/editorial/manasa/senior-linguist-diwakar-mo...
आदरांजली !
नेहमी जाहिरातींचा मजकूर
नेहमी जाहिरातींचा मजकूर हिंदी किंवा इंग्रजीतून मराठीत अनुवादित केलेला असतो आणि त्यात मराठीचा मुडदा पाडलेला असतो. आजच्या वृत्तपत्रांत पहिलं पानभर शिंदे सरकारच्या जाहिराती आहेत.
हे राज्य व्हावे ही जनतेची इच्छा.
The state shall become is the people's will.
इंग्रजी भाषांतर करण्याचं काय
इंग्रजी भाषांतर करण्याचं काय कारण पण?
अच्छा इंग्रजी वर्तमानपत्रात भाषांतर आहे का? पण एवढं वाक्य छापायचं मराठीत.
भा - री - च !!
भा - री - च !!
मला खूप आनंद झाला ते वाचून.
मला खूप आनंद झाला ते वाचून. व्याजासकट परतफेड केल्यासारखं वाटलं.
जाहिरात सरकारी आहे.
मला खूप आनंद झाला ते वाचून.
मला खूप आनंद झाला ते वाचून. व्याजासकट परतफेड केल्यासारखं वाटलं. >> +१
मला खूप आनंद झाला ते वाचून.
मला खूप आनंद झाला ते वाचून. व्याजासकट परतफेड केल्यासारखं वाटलं.
मलाही आसुरी आनंद झाला. 'हरकत', 'अंदाज', सारखे हिंदी शब्द मराठीत घुसवताय काय, आम्हीही काही कमी नाही !
व्याजासकट परतफेड
व्याजासकट परतफेड
कन्नडात लोक बोलताना आपण ज्याला 'कारण' म्हणतो (उदा. मी असं म्हणतेय कारण....) त्याला 'याके अन्द्रे' म्हणतात. याके म्हणजे 'का' आणि अन्द्रे म्हणजे 'म्हणजे'. तर काही लोक इंग्रजीत बोलताना 'व्हाय मीन्स'.. अशी सुरुवात करून पुढे कारण सांगतात!
अजून एक गंमतीशीर उदाहरण म्हणजे कन्नडात 'सुम्ने' म्हणजे 'असंच, सहज, उगाच' वगैरे. बोलताना 'सुम् सुम्ने' असंही म्हणतात. उदा. तो उगाचच बडबड करतो. तर इंग्रजीत सांगताना ' सिम सिंपली' असं म्हणतात काही लोक!
तेलंगण, आंध्र च पब्लिक I can
तेलंगण, आंध्र च पब्लिक I can able पण खूप वापरतं, त्यामागे पण काही भाषांतर आहे का?
Pages