सांग ग सखी
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप...
हृदय तर पहिलाच घायाळ झालं होतं
आता डोळ्यांनाही लागलंय तुझच वेड
फुकट मध्ये कसला करून बसलो मी
हा मनस्ताप......
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप.....
चोरून चोरून तुला बघणं
तुझ्या मागे मागे फिरणं
मला बघून तुझं गालातल्या गालात हसणं
तुझ्या हसण्याला बघून
माझ्या आनंदाला राहत नाही माप.....
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप.....
मंदिरात नाही गेलो कधी
नाही देवाची भक्ती केली कधी
तुलाच माझा परमेश्वर मानून
तुझ्याच नावाचा करत राहिलो मी जाप.....
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप....
नशिबाचा फकीर मी
नाही दैवाची साथ मला
जमिनीवरचा दगड मी
तुझ्यासारख्या असमंताच्या चंद्रावर
प्रेम करण्याचं कसं केलं मी हे पाप....
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप
जगातील ऐश्वर्य मिळवण्याची अपेक्षा नाही
नाही स्वर्गाची आशा
मला हवी फक्त तुझीच साथ.....
सांग ग सखी
तुझी आठवण प्रेम की श्राप....
मुस्ताक अली शायर.....
7887481053
छान.
छान.
छान.
छान.