नेपाळी गुंद्रुक

Submitted by दिनेशG on 16 June, 2023 - 11:19

गुंद्रुक ही आंबलेली हिरवी भाजी (पाने) आहे. सिक्कीम, नेपाळ या भागात ताटात गुंद्रुक नक्की असते.गुंद्रुक हे मोहरी, मुळा, फुलकोबी इ.चे असू शकते.

ही पाने एक किंवा दोन दिवस सूर्यप्रकाशात कोरडी करून त्याचे तुकडे केले जातात. कधी कधी यात मुळा घालून स्मॅश केले जाते. त्यानंतर ते सर्व लाकडी किंवा काचेच्या भांड्यात अतिशय दाबून गच्च भरले जाते. कंटेनरचे तोंड घट्ट बंद करून ते सूर्यप्रकाशात ठेवले जाते. याचे झाकण वारंवार उघडायचे नसते. साधारणतः तीन दिवसांनी आंबटपण तपासायचा. त्याच्या तीव्र वासावरून ते तयार आहे की नाही हे समजू शकते.
त्यानंतर उन्हात वाळवायाचे. काही दिवसांनी उन्हातून काढल्यावर जर त्याची चव आंबट असेल तर गुंद्रुक तयार आहे. ते कोणत्याही भाजीत मिसळून खाऊ शकतो.

तुम्ही अनेक पदार्थांमध्ये गुंद्रुक घालू शकता, मुख्यतः डाळ (मसूर) ,त्यामुळे डाळ अधिक स्वादिष्ट होते. गुंद्रुक मध्ये हिरवा लसूण, मोहरीचे तेल, मीठ, मिरची पावडर, चिरलेली मिरची घालून मिक्स केले जाते आणि त्यात हवे असल्यास कोणत्याही प्रकारचे भाजलेले बीन्स देखील घालू शकत. त्या नंतर ते कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता (नेपाळमध्ये फेटलेला भात जास्त वापरला जातो).

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इन्टरेस्टिंग!
कोरिअन किम्चीचा नेपाळी भाऊ दिसतोय हा! Happy