मायबोली वर्षाविहार टीशर्ट्स २०२३

Submitted by ववि_संयोजक on 16 June, 2023 - 11:22

नारद: नारायण नारायण...!
प्रभू: या नारदमुनी, कसे काय येणे केलेत?
नारद: नमस्कार देवा, जरा पृथ्वीवर जावून येतो. एक मोठा हॅपनींग सोहळा कव्हर करायचे डोक्यात आहे यंदा, महाराष्ट्र प्रांती.
प्रभू: मायबोली वविला जाताय की काय?
नारद: तुम्हाला कसं कळलं?
प्रभू: अहो, चारेक वर्षाच्या गॅपनंतर होतोय हा सोहळा. चर्चा तर होणारच.
नारद: खरंय, कोविडच्या प्रलयानंतर आत्ता कुठे सगळे स्थिरावताहेत. या वर्षीचा ववि नक्कीच गाजणार..
प्रभू: पण हे काय? तुम्ही असेच जाणार आहात वविला? याच वेशात तुमची वीणा घेवून?
नारद: असं कसं बरं? खास मायबोली टीशर्ट ऑर्डर केलाय ना मी. मागवू काय तुमच्यासाठी सुद्धा? नारायण नारायण...

मंडळी, तुमचं काय? तुम्ही केलेत का बुक टीशर्ट? वाट कसली बघताय? शुभस्य शीघ्रम...

ऐन वर्षाविहाराच्या दिवशी सकाळी सकाळी होणाऱ्या या कुरबुरी टाळायच्या असतील तर आत्ताच मोबाईल उघडा आणि तुमची ऑर्डर बुक करून टाका. आणि आपल्या आवडत्या वविला खास वविसाठी बनवलेले खास मायबोली टीशर्ट परिधान करूनच हजेरी लावा.

सादर आहे मायबोली ववि स्पेशल टीशर्ट.
टीशर्ट खालील प्रकारात उपलब्ध असतील.
1. जेंट्स राउंड नेक
2. लेडीज व्ही नेक
3. किड्स राउंड नेक

टीशर्ट -
VaViTshirts.jpeg

सुलेखनाचा झूम-
VaViTshirtZoom.jpegजेंट्स आणि लेडीज टिशर्टांची मापे पुढिलप्रमाणे:
साईज - रुंदी(२L)-उंची(H)
XXL - 46"-33"
XL - 44"-31.5"
L - 42"-30"
M - 40"-28.5"
S - 38"-27"
XS - 36"-25.5"
XXS - 34"-24"

लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज:
वय वर्षे १-२ साठी - २२
वय ३-४ साठी - २४
वय ५-६ साठी - २६
वर ७-८ साठी - २८
वय ९-१० साठी - ३०
वय ११-१२ साठी - ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)

महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.

यंदाची देणगी आपण कुठल्या संस्थेला देणार त्याबद्दलची सविस्तर माहिती लवकरच मायबोलीवर प्रकाशित करू.

जेंट्स व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३५०/- (३००/- टीशर्ट + ५०/- देणगी)
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. ३००/- (२५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)
XXL पेक्षा मोठा साइज असेल तर देणगीसह किंमत असेल रू. ४००/- (३५०/- टीशर्ट + ५०/- देणगी)

टीशर्ट बुक कसे कराल?
टीशर्ट ऑर्डर्स बंद करीत आहोत

तुम्हाला किती आणि कोणते टीशर्ट्स हवेत हे ठरवून “--” वर पेमेंट करायचं आहे. नंतर खालील गुगल फॉर्म वर ऑर्डरचे तपशील ट्रांसॅक्शन आयडी सह भरुन सबमीट करावे.
कृपया ऑर्डर देण्यापुर्वी वर दिलेल्या किंमतीच्या चार्टप्रमाणे आपल्या सगळ्या ऑर्डरची टोटल रक्कम स्वतः तपासून तितकी रक्कम यूपीआय द्वारे भरावी.
ज्यांना प्रत्यक्ष भेटून टीशर्ट घेणं शक्य नाही ते कुरिअर सेवा (उदा. डन्झो/ स्विगी जिनी) नोंदवून संयोजकांकडून टीशर्ट घेऊ शकतात. अशी सेवा नोंदवण्याची पूर्ण जबाबदारी आणि खर्च हा सदर मायबोलीकराला करावा लागेल. अशी व्यवस्था करून टीशर्ट घेऊ इच्छिणाऱ्या मायबोलीकरांनी संयोजकांशी संपर्क साधावा.

टीशर्ट संयोजक डिटेल्स कन्फर्म करतील आणि काही चूक आढळल्यास त्या आयडीला/ व्यक्तीला संपर्क करुन काही बदल / अडचण असेल तर ती सोडवतील.

ऑर्डर डिटेल्स चा गुगल फॉर्म -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdRexCR5GdrliNhyV3D-Sxv7YL6SBGW...

सद्ध्या तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टची ऑर्डर नोंदवायची, कारण ८ जुलै २०२३, रात्री १२ वाजेपर्यंत ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

महत्त्वाचे-
१. टीशर्ट राऊंड नेक/ व्ही नेक प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
3. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.

टीशर्ट कसे आणि कुठे मिळतील?

टीशर्ट मिळण्याची तारीख आहे २३ जुलै २०२३

मुंबई डिस्ट्रिब्युशन सेंटर्स -
ठाणे - आनंद चव्हाण आणि निलेश वेदक
दादर - कविता नवरे
बोरीवली - विनय भिडे

पुणे डिस्ट्रिब्युशन सेंटर्स - पुण्यातून नोंदवल्या जाणाऱ्या मागणीनुसार टीशर्ट कलेक्शन पॉईंट्स ठरवून जाहीर करू.

लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर vavitshirt2023@gmail.com या इमेल पत्त्यावर मेल करून विचारणा करू शकता किंवा याच धाग्यावर तुमचा प्रश्न विचारा.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे
२. हिमांशु कुलकर्णी

हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा !

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मभादि - हे नाव चुकीचं ठरून त्याचा दोन वर्षापूर्वी मभागौदि झाला आहे. Happy

अर्थात मजेने लिहिलं आहे. ह घ्या.

की वर्ड्स असलेले डिझाईन आवडल्याचे आवर्जुन सांगितलेत त्याबद्दल आभार Happy

संयोजक टीमने मिळून ठरवले आहे डिझाईन.

लवकरात लवकर तुमच्या टीशर्टची ऑर्डर द्यालच पण त्याबरोबर तुमच्या ओळखीच्या इथे कमी ॲक्टीव्ह असणाऱ्या मायबोलीकरांपर्यंतही हा धागा पोहोचवण्यात हातभार लावा हि विनंती

बेस्ट!
ऑर्डर नोंदवणारच.
शिवाय ते ठाणे, दादर, बोरिवली विभाजन केलंत ते पण बेस्ट. Proud

xxl पेक्षा मोठ्या साईझ चे T शर्ट मिळतील का?>>>हो मिळतील. ऑर्डरमधे साईज लिहा. त्या साईजचा टीशर्ट करुन मिळेल

माबोवरचे शॉर्ट फॉर्म्स वापरायची कल्पना आवडली.

रच्याकने - उपक्रम आणि स्पर्धा हे शब्द दिसले आणि कोतबो झालं.
शोनाहो.

नामुबा तुक नको असतील तर हे शब्द वगळा ही लापि

बदली / वाढीव कलाकार हवे असतील तर
विकांत, टच्याआले, प्रकाटाआ (वर जावेद यांनी लिहिले आहेच) हेमाशेपो यांचा जरूर विचार व्हावा.

अगंबाई माझं "सुडोमि" आलं वाटतं टी शर्ट वर!!! आता मी खरंच सुडोमि Proud>> या आनंदात होऊन जाऊदेत मग टीशर्ट खरेदी जोरदार Lol

(हि पोस्ट कविनचीच आहे. मी संयोजक आयडीत लॉगीन करायला विसरुन चुकून चुक्या म्हणू नका. Lol )

मस्त आयडिया!
याचा मात्र लॉंग फॉर्म सांगा कोणीतरी :एतेएठी, शोनाहो, भोआफक, मुशो, सुडोमि,

जोरात आहेत संयोजक!
एवेएठि - एके वेळी एका ठिकाणी = गेट टुगेदर
शोनाहो - शोभत नाही हो
भोआकफ - भोगा आपल्या कर्माची फळं
मुशो - मुद्रितशोधन
सुडोमि - सुखाने डोळे मिटेन

मस्त आहे टी शर्ट!
पैसे कसे पाठवायचे समजलं नाही. ईमेल ट्रान्स्फर आहे का हे? अगदीच बा प्र आहे पण बँक ट्रान्स्फर जमतं हे वरचे करायला कुठलं ॲप लागतं?

अमितव, G-pay/phone pay/ Paytm / Amazon Pay / Bhim हे सगळे ॲप आहेत यातला कुठलाही चालतो पैसे घ्यायला आणि द्यायला

टच्याआले नाहीये.यात.. टच्याआले =टण्याच्या आवडीचे लेखक ( वपु आणि पु ल.
मला नामुबा नाही लक्षात आलं आधी. शेवटी बा वाचल्यावर मला मुसंबा आठवलं होते. नंतर आला लक्षात अर्थ नामुबा चा, पण इथे कधी वापरलेले आठवत नाही.

लाडिक पिपाणी म्हणजे एखाद्याला एखाद्या विषयावर लिहिण्याची लाडिक पणे विनंती करणे.

Pages