Submitted by mi_anu on 13 June, 2023 - 08:52
वेब सिरीज असुर-सिझन 1 आणि 2 मधल्या आवडलेल्या/न आवडलेल्या/अचाट अतर्क्य/वास्तव वाटलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी धागा.
स्पॉयलर्स असू शकतील, असायलाच हवे असा आग्रह नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला असुर1 मधला कॉफीन वाला सीन
मला असुर1 मधला कॉफीन वाला सीन एकदम भारी वाटला होता.अशी कल्पना आधी कोणी वापरली नसेल.(के हॉरर किंवा हॉलीवूड मध्ये वापरली असेल तर माहीत नाही.)
छोट्या आणि किशोरवयीन दोन्ही शुभ चा अभिनय सुंदर आहे.रट्टा मारलेले संवाद म्हणतायत असं वाटत नाही.
अनंत मुलगा पण गोड आहे सिझन 2 मधला.
आश्रम मध्ये सतत झाडू मारणाऱ्या आणि लादी पुसणाऱ्या कविता (अनुरिता झा) ला इथे चांगला रोल मिळाला आहे.
शुभ ची आंधळी मैत्रीण आम्हाला सर्वाना उर्मिला कानेटकर वाटली, पण ती एक वेगळी हिंदी अभिनेत्री आहे.
असुर 1 च्या सगळ्या गोष्टी
असुर 1 च्या सगळ्या गोष्टी पटकन आठवत नाहीयेत आता.
पण त्याचा impact जबरदस्त होता. हे असं काहीतरी त्या आधी पाहिलेलं आठवत नव्हतं.
चर्चा होत जाईल तसे तसे मजा येईल.
असुर 1 मध्ये पहिल्याच एपिसोड
असुर 1 मध्ये पहिल्याच एपिसोड मध्ये एक खून होत.
त्यात किलर ने समजा एका बाजूला मोबाईल अथवा कॅमेरा ठेवलाय आणि खून करतोय तर तसे दिसायला हवे फुटेज.
दिसताना मात्र खुन्या सोबत कॅमेरा मागे पुढे वेगळे angle घेताना दिसतोय की. हे अतर्क्य होतं.
शिवाय शुभ कुठेही कसेही खूप सहज हॅक करतो, मग त्याला त्या स्क्रीनमधून सगळं दिसतं हे ही जरा पटलं नाही.
हे असुर 2 मध्ये जास्त जाणवलं.
बाकी असुर मध्ये टिपिकल हिरो व्हिलन आणि पकडापकडी पेक्षा वेगळं जे आहे ते म्हणजे त्याला तुमच्या आतला असुर जागवायचा आहे. त्यासाठी तो provoke करतोय, सिटयूएशन तयार करतोय. तुम्हालाच option देतोय.
बुद्धिबळ जास्त आहे ह्यात.
ही कन्सेप्ट आवडली होती.
अनु, रेड जॉन कन्सेप्ट का वाटली त्याविषयी वाचायला आवडेल मला.
रेड जॉन/असुर मला वाटलेलं
रेड जॉन/असुर मला वाटलेलं साम्य:
1. नक्की कोण रेड जॉन आहे याबद्दल सुरुवातीला संदिग्धता. बऱ्याच लोकांनी मीच रेड जॉन आहे म्हणून काही वाईट काम करून मरणे.
2. मुख्य नायक धनंजय आणि निखिल ने आपले प्रिय फॅमिली मेंबर गमावणे आणि याला जबाबदार शुभ.
3. एकंदर उगीच केलेली व्हिजिबल क्रूरता आणि ब्रूटालिटी(धनंजय च्या बायकोचा ओव्हन मधला खून)
4. शुभ आणि रेड जॉन दोघेही माईंड प्ले चा खेळ खेळतात.
5. शुभ आणि रेड जॉन दोघेही ओम्नी प्रेझेंट आहेत, त्यांना सगळंच माहीत असतं.त्यांचं दुष्ट नेटवर्क मोठं असतं.त्यात बऱ्याच लेयर्स चे/श्रीमंत लोक असतात.
6.शुभ आणि रेड जॉन दोघांना मनापासून प्रेम करणारी डिव्हॉटेड आंधळी मैत्रीण असणं.
असुर 1 मध्ये पहिल्याच एपिसोड
असुर 1 मध्ये पहिल्याच एपिसोड मध्ये एक खून होत.
त्यात किलर ने समजा एका बाजूला मोबाईल अथवा कॅमेरा ठेवलाय आणि खून करतोय तर तसे दिसायला हवे फुटेज.
दिसताना मात्र खुन्या सोबत कॅमेरा मागे पुढे वेगळे angle घेताना दिसतोय की. हे अतर्क्य होतं.
शिवाय शुभ कुठेही कसेही खूप सहज हॅक करतो, मग त्याला त्या स्क्रीनमधून सगळं दिसतं हे ही जरा पटलं नाही.
हे असुर 2 मध्ये जास्त जाणवलं.
>>> 100% agree. बरेच प्रसंग डोके बाजूला ठेऊन पाहण्यासारखे आहेत.
त्या निखिल चं बोलणं पण बऱ्याच
त्या निखिल चं बोलणं बऱ्याच वेळा समजत नाही.
रिवाइंड करून करून ऐकावं लागलं.
१-२ दा तरीही नाही समजलं
पोस्टरच इतके भंगार आहे तर
पोस्टरच इतके भंगार आहे तर सिरीज किती असेल.
असुर दुसरा सिझन परवा पाहायला
असुर दुसरा सिझन परवा पाहायला चालू केला , काल रात्री संपवला , रात्री 2 ते सकाळी 6 .
एकदा स्टोरीत इंटरेस्ट आला की पाहणं थांबवणं कठीण जातं .
छान होता तसा , पण पहिल्या सिझनच्या मानाने किंचित कमी वाटला . पहिल्या सिझन मध्ये जास्त भावनिक धक्के होते प्रेक्षकाला , जास्त सस्पेन्स होता . ते काही विशेष वाटलं नाही दुसऱ्या सिझन मध्ये , अर्शद वारसीची आणि नैनाची ऍक्टिंग सरस वाटली , म्हणजे दुःखाचे जे बारकावे तिने दाखवले आहेत ते .. एकदम संयत अभिनयाने .. तशी सगळ्यांचीच ऍक्टिंग छानच आहे पण त्यांच्यातही हे दोघे किंचित अधिक सरस .
टेक्नॉलॉजीचा वापर अति दाखवला आहे , म्हणजे कॉम्प्युटर वर डेटा , कोड वगैरे ऍनॅलिसिस करून व्हिलन पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात ते .... ते कथानकाला धरूनच आहे पण जरा ओव्हर झाल्यासारखं वाटलं .
शेवटी खरं तर व्हिलन जवळजवळ जिंकत आलेला दाखवला आहे आणि लास्ट मोमेंटला हे पोलीस वगैरे कसेबसे जिंकतात , तेही ठीक आहे ... पण त्यात त्यांच्या बुद्धीचातुर्यापेक्षा दिग्दर्शकाने यांना जिंकवायला हवं शेवटी म्हणून जिंकल्यासारखे वाटतात .. तेही जरा खटकलं . ते शेवटी भरभर क्लू मिळणं जरा ओढूनताणून केल्यासारखं वाटलं .
शुभ वेळोवेळी यांना आपल्यापर्यंत पोहोचायचे क्लू नक्की का पुरवतो हे नीट समजलं नाही .
तरी बहुतांश स्टोरी चांगली लिहिली आहे कुणी ती ..
कामिनी हा रोल करणारी अभिनेत्री ओळखीची वाटली , आधी वाटलं मराठी अभिनेत्री आहे की काय पण नंतर चेक केल्यावर आश्रम मध्ये पाहिली होती ते समजलं , साडीत अगदीच वेगळी दिसली होती आणि इकडचं पात्र अगदीच वेगळं आहे , अजिबात ओळखता आली नाही .
हो ना.फारच जेमतेम जिंकतात.
हो ना.फारच जेमतेम जिंकतात.
मला तर दोन्ही सिझन आवडले.
मला तर दोन्ही सिझन आवडले. फक्त एक चिंतेची बाब वाटली कि त्यात ते डेटा चोरताना दाखवलाय, कॅमेरा बंद असताना पण रेकॉर्ड होतंय आपल सर्व पर्सनल.
हे अस शक्य आहे का?
ऍप ना आपण परमिशन देतो कॅमेरा
ऍप ना आपण परमिशन देतो कॅमेरा वापरायची. यात 3 ऑप्शन असतात, व्हाईल युजिंग ऍप, ऑल द टाईम, डू नॉट युज.यातला पहिला वापरला तर ऍप आपली परवानगी घेऊन प्रत्येक वेळी कॅमेरा ऑन करतं.दुसरा असेल तर ऍप बहुधा कायम ऑन ठेवेल किंवा परवानगी न घेता ऑन करेल.
काही ऍप परवानगी'व्हाईल युजिंग ऍप' ची घेऊन एखाद्या सॉफ्टवेअर बग मुळे जास्त वेळ कॅमेरा चालू ठेवतील(एक उदाहरण: एखादी अनपेक्षित चूक प्रोग्रॅम रन करताना ऍप मध्ये झाली, आणि या चुकीसाठी प्रोग्रॅम चा जो भाग रन होईल त्यात 'रिलीज कॅमेरा' चा कोड लिहिलेलाच नसला तर?किंवा लिहिलाय, पण 'रिलीज कॅमेरा' करताना कोड मध्ये एरर येऊन त्याने पुढे काहीच केले नाही आणि कॅमेरा ऑन राहिला तर?) या केसेस अँड्रॉइड लँग्वेजेस मध्ये बहुधा हाताळलेल्या असतात, पण काही हाताळल्या नसल्या तर?
गुगल असिस्टंट कायम ऑन ठेवतात लोक.या असिस्टंट ने घरातली खाजगी संभाषणे ऐकून त्यांना आज्ञा समजून भलत्या गोष्टी सर्च करायला घेतल्याची उदाहरणे आहेत.
अनु,
अनु,
रेड जॉन vs शुभ
पटले सगळेच पॉईंट.
फक्त त्या रेड जॉन च्या मैत्रिणीच्या एपिसोड ला मी पोहचलो नाही.
कॅमेरा, स्टोरेज परमिशन असेल तर रेकॉर्ड होत राहील हे बरोबर आहे.
आबा, निखिल ह्यावेळी प्रयत्न करतोय पण आपल्या पर्यंत पोहचत नाहीये त्याला जे एक्सप्रेस करायचं आहे ते असे वाटले मला.
नयना बेस्ट एकदम ह्याबाबत.
जेमतेम जिंकतात मध्ये काही योगायोग देखील वाटले मला.
असुर १ खुप आवडलेली. २ पण मस्त
असुर १ खुप आवडलेली. २ पण मस्त आहे... डार्क आहे खुप. अनु म्हणते त्या प्रमाणे रेड जॉन आणि मला Dexter मधल्या केसेस ची आठवण आली. ही बहुधा पहिलीच सिरिझ असेल एकदम तोडिस तोड आहे बाहेरच्या सिरिझ ला.
मी असुर १ पण काही
मी असुर १ पण काही दिवसापूर्वीच बघितली, इथल्या चर्चे मुळे. मला नाही आवडली. खूपच लूप होल्स वाटले. लॉजिक चे झोल.
१. सीबिआयला एन आय सी चा डेटबेस बघण्यासाठी हॅकिंग कशाला पाहिजे? ( निखिल च्या बायकोला काम हवे म्हणून?) इतक्या महत्त्वाच्या केस साठी ते सरळ सरकारी परवानगीने डेटाबेस अॅक्सेस का नाही करणार?
२. त्या अमूक नक्षत्रावरचे लक्षावधी लोक असतील देशात, इन्क्लुडिंग इन्फ्लुएन्शियल लोक. मग इतक्या सहज त्या आदित्य ला " हाच नेक्स्ट टार्गेट असेल" असे कसे आयडेन्टिफाय करतो अर्शन वारसी?
३. त्याचा पार्टीतला खून तर महा येडपटपणा आहे सगळा. आधी आदित्य ने थ्रेट सिरिस्यसली न घेणे, मग तो टॉय ट्रक मधला बाँब फ्रीझर मधे फुटल्यावर नॉर्मल केस मधे काय होईल? पार्टीत पांगापांग होईल? थ्रेट पोकळ नव्हती हे कळून पोलिस, सीबिआय सर्व लोकांना, आदित्य ला सुरक्षित ठिकाणी हलवतील? पार्टी आधी बंद करतील? आदित्य पण आता धमकी सिरियसली घेऊन को ऑपरेट करेल? की चला झाला फुटला बाँब आता काही चिंता नाही म्हणत पार्टी मागच्या मानावरून पुढे चालू राहिल? का ही ही!
यामुळे दुसरा सीझन तर मी पाहिलाच नाही.