१. डेटा ड्रिव्हन चित्रपट कथा जवळपास भंगार असतात. (लोकांना काय आवडतं याचा विदा गोळा करून तयार केलेल्या कथा)
२. खूप कथा या एखाद्या वनलायनर पासून विस्तार केलेल्या असतात. त्यामुळे त्या अधिकच पसरट, बोअरिंग होत आहेत. उदा. नेटफ्लिक्सकृत जवळपास ९० टक्के चित्रपट भंगार बोअरिंगच आहेत.
३. सुमार अभिरुचीचे चित्रपट सुद्धा मनोरंजक नाहीत. मनोरंजक चित्रपटसुद्धा निखळ आनंद देत नाहीत. चित्रपट गृहांसाठी चांगले विनोदी चित्रपटही बनत नाहीत. उदा. छिछोरे हा चित्रपट चित्रपटगृहात मस्त आनंद देतो, परंतु तोच चित्रपट लहान ग्रुप मध्ये घरी चक्क बोअर करू शकतो.
४. भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे तर दशकातून खूप मोजके अत्यंत दर्जेदार चित्रपट येतात. उदा. शिप ऑफ थिसियस, आंखो देखी इत्यादी आणि उत्तम, मनोरंजक चित्रपट तर वर्षाला दोनसुद्धा निघत नाहीत. अंधाधुन, मूळ दृश्यम, कुंभलंगी नाईट्स इत्यादी. चांगले मसाला चित्रपट सुद्धा खूप कमी उदा पुष्पा. मराठीत तर कुलकर्णीजोड आणि मंजुळे सोडल्यास भंगार चित्रपटांचा रतीबच असतो. तेंडल्या सारखा चांगला चित्रपटसुद्धा त्या रतिबात डावलला जातो. शिवाय ते एकसे एक रद्दड ऐतिहासिक चित्रपट. नाहीतर झी मराठी वाल्यांचा नॉस्टॅल्जिक कारखाना. तो नॉस्टॅलजिया सुद्धा एकदम तुपकट रटाळ. 'घाशीराम कोतवाल' सारख्या नाटकांचे करा की चित्रपटीकरण दम असेल तर.
५. बहुतांश सिरीज सुद्धा एक दोन सीजन नंतर पाहवत नाहीत. सिटकॉम सुद्धा त्याच त्या पहिल्या जातात - उदा. साइनफेल्ड, बिग बँग इत्यादी. सिलेक्शन भरपूर असले तर चॉईस खूप कमी आहे.
६. एकंदरीत सगळीकडे सुमारपणाचा सुकाळ झाला आहे. थंबनेल पाहून व्हिडीओ पाहणारी हुशार जनता आता खूप प्रमाणात आपली आवड निवड कंपन्यांना कळवत आहे. त्यामुळे अजून सुमार कन्टेन्ट येत आहे. गुलाबी चड्ड्या ओवाळून टाकाव्यात अशा एकदम गुळगुळीत के ड्रॅमा प्रसवणाऱ्या दक्षिण कोरिया सारख्या एवढुश्या देशातून पॅरासाईट सारखा इतका जबरदस्त चित्रपट कसा काय निघू शकतो याचे आश्चर्य वाटते. नंतर सुद्धा खूप मस्त चित्रपट येऊन गेले.
७. तुमच्यापैकी कुणाला एकंदरीतच कन्टेन्टचा फटिग आला आहे काय?
अपडेटः
यावर्षी मी मोजून वीस चित्रपट पाहायचे ठरवले आहे. त्यापैकी पाहिलेले दोन चित्रपट :
१. ब्लॅकबेरी : थोडक्यात ब्लॅकबेरी फोन जगातील सर्वात प्रगत फोन कसा झाला आणि नंतर रसातळाला कसा गेला याची सुरस कहाणी. जबरदस्त अभिनय, पेस, एडिटिंग. चित्रपटाचा visual tone अतिशय मस्त. कथा उत्तम फिक्शनलाईज केली आहे. मस्त मस्त.
२. आर यु देअर गॉड ? इट्स मी, मार्गारेट : अहाहा. आपल्या सिनेमांत ९९ टक्के बालकलाकार इतका कृतक अभिनय करतात की बस्स. एकतर ती ओव्हरस्मार्ट नाहीतर डोक्यात जाणारी ओव्हरगोड कार्टी. ठीक आहे आपण जाउं दे न वो म्हणू. त्याचे चऱ्हाट नको. परंतु त्यामुळे जेव्हा बालकलाकार असा जबरी नैसर्गिक वाटणारा अभिनय वठवतात तेव्हा सलाम ठोकावासा वाटतो.
सगळ्या चित्रपटालाच त्या ११ वर्षीय वयाची ट्रीटमेन्ट आहे. बांधेसूद चित्रपट, कादंबरीला यथोचित न्याय देणारा. कदाचित माझा या वर्षीचा सर्वात आवडता चित्रपट.
जाऊ द्या हो, नाहीतरी लवकरच
जाऊ द्या हो, नाहीतरी लवकरच एलियन्सच्या हल्ल्यात किंवा हल्ल्याच्या कल्पनेने जगबुडी येणार आहे - कोण त्या कन्टेन्टला विचारणार आहे मग!
डीमांड वाढली की दर्जा घसरणारच
डीमांड वाढली की दर्जा घसरणारच... प्रत्येक धंद्याचा नियम आहे. आणि चित्रपट हा आधी व्यवसाय आहे. मग कलेची निर्मिती वगैरे.
जसे क्रिकेट मध्येही आयपीएल सुरू झाल्यापासून काय झालेय. लोकांची क्रिकेट सामन्यातील थराराची गरज शमवली जाते. आणि लोकं त्यातील scripted सामने सुध्दा एन्जॉय करू लागलेत.
स्पेसिफिक, नवीन यंत्रणा
स्पेसिफिक, नवीन यंत्रणा दाखवायची. पण ढाल तलवार हवीच. भंगार आवडी वाढल्या आहेत.
त्यापेक्षा हिस्ट्री चानेलवरची अलेक्झांडर डॉक्युमेंटरी चांगली आहे. ज्या काळात खरोखरच धनुष्य बाण,ढालतलवारीने युद्धं झाली.
बऱ्याच अंशी सहमत आहे रॉय. मला
बऱ्याच अंशी सहमत आहे रॉय. मला आलाय कंटेन्ट फटिग पण रोज अनवाईन्ड होण्यासाठी थोडावेळ तरी टिव्ही बघतेच.
माझ्या मते क्रिएटिव्ह लोकांचा हा बेस्ट टाईम आहे, हे अनेक ओटीटी त्यावर नसलेलं सेन्सर वगैरे पण फार क्वचितच भट्टी जमून येते. ते नवीन गोष्टी करायला घाबरतात शिवाय एखादं हिट झालं तर लगेच नवीन हिट गोष्टींचेही 'कुकी कटर टेम्प्लेट' येते. उदा वासेपूर, मिर्झापूर चालले की रक्तपात सुरू झाला. अतिरंजित करत गेले. आता तर फक्त रक्तंच दाखवतात कुठं कुठं. हिंदी सिनेमा तर नेपो किड्सने गिळंकृत केलाय. सिरिज मी दीडदोन सिझन नंतर बघणं सोडून देते कारण तोचतोचपणा येतो. बिंच वॉच करत नाही. तेवढा वेळ नाही आणि आता अटेन्शन स्पॅन फार कमी झाला आहे. थोडा दोष माझाही असेल.
सिनेमा बाबत मात्र खरोखरच वाईट वाटतं. काही तरी बिनसलं आहे. शिवाय कॅन्सल कल्चर+नेपो किड्स + टू मच पब्लिसिटी/हॅमरिन्ग (उदा पठाण)+ कुठली तरी बाजू घ्यायचा दबाव+ दुसरे पुष्कळ पर्याय उपलब्ध+ वाद निर्माण करणं+ आर्थिक गणित मांडणं . या आणि अशा अनेक कारणांमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्री धोक्यात आली आहे.
ते सिनेमाचे तर आहेच
ते सिनेमाचे तर आहेच
इथे सुध्दा सुमार धाग्यांचा काय कमी कचरा आहे का.
अजिबात नाही!
अजिबात नाही!
नवा स्पायडी, ट्रान्सफॉर्मर, फ्लॅश असे यादीत आहेत. फ्लॅश शुक्रवार ला आला की लगेच उडवू. स्पयडी चे भन्नाट रिव्ह्यू वाचून स्पायडर व्हरसचा परत एकदा गृहपाठ करायला घेतला आहे.
The days टीव्ही शो बघतोय. फुकुशिमा दुर्घटनेवर आहे. टोटल एंगेजिंग!
नेव्हर आय हॅव एव्हर दिसते आहे. अजून दोन तीन मूव्ही चेक मार्क करायला दिसत आहेत.
अप्स आणि डाऊनस् येतच असतात. सध्या तरी माझ्यासाठी अजिबात बोरिंग कंटेंट नाही.
दोन सिझन नंतर नाही बघवत तर सोडून द्यायचं. झटकन मूव्ह ऑन करायचं की झालं. मला वाटलं धागा रायटर्स संपावर येऊन काही विचार मंथन करेल तर तो अगदीच सुमार निघाला असं फिलिंग आलं. पण नो वरीज!
यावर एक उपाय आहे.
यावर एक उपाय आहे.
अधून मधून नियमितपणे गुंडा सारखे सिनेमे पहायचे. त्यात हयगय करू नये. नुकताच एक बंदा हा सिनेमा पाहिला. निराश करत नाही. पण म्हणून लगेच आपण निवांत होऊन चालत नाही.
लगेचच लुटेरे उरलेला संपवला. त्यामुळे बऱ्यापैकी सिनेमे उत्तम वाटू लागतात.
तरी जमत नसेल तर मळवट भरला रक्ताने सारखे तेजा देवकरचे कुठलेही सिनेमे बघा. नाक मुरडू नका. बरं व्हायचं असेल तर कडू औषध घ्यावं लागतं.
तुम्ही कॉंग्रेसच्या राजवटीत फ्रस्ट्रेट झाला कि मग दहा वर्षे मोदी साहेबांना द्यायची. मग राहुल गांधी सुद्धा महान नेता वाटू लागतो. अगदी तोच फॉर्म्युला आहे.
सिनेमे वगैरे बघायचा आता
सिनेमे वगैरे बघायचा आता पेशन्सच उरला नाही असे वाटते कधीकधी
तुमच्यापैकी कुणाला एकंदरीतच
तुमच्यापैकी कुणाला एकंदरीतच कन्टेन्टचा फटिग आला आहे काय>>>होय. माबो वरच कुणीतरी हुषार आयडी म्हणुन गेले होते की इतके ठासून कंंटेंट येत आहे की दर्जा खालवणार आहेत आणि घरबसल्या मिळत असून ही काही बघणे म्हणजे नक्की काय बघावे असे होणार आहे.
असे चिकवा धाग्या वर वाचल्याचे आठवते.
सध्या माझ्याकडे प्राईम आहे..काहीच बघायला नसल्याने सिटाडेल बघत आहे. समहाऊ अख्खं जग धोक्यात असताना अगदी न्युक्लेयर वगैरे कोड ब्रेक होत असताना एखादा/दुसरा च असतो ज्याच्या अंगात मिशन पूर्ण करायचं पाणी असतं आणि नाहितर अक्षरश: जग च भस्म होणार असं चित्र असतं बाकी देश वेडगळा सारखे फक्त अमेरिके वर विसंबून असतात
नवा स्पायडर्मॅन फार बोर आहे
नवा स्पायडर्मॅन फार बोर आहे एकतर इतकं पाल्हाळ लावलय..मग शेवट बॅड गाय ला न मारता टु बी कंटीन्युड असा...फसवले गेल्याची फिलींग आली.. अडीच तासाचा मुव्ही आहे
निवडीचे स्वातंत्र्य कधी कधी
निवडीचे स्वातंत्र्य कधी कधी नकोसे वाटू शकते
ताटात फक्त पोळी भाजी चटणी कोशिंबीर आणि सोबत वाटीत आमटी इतकंच असेल तरी पोटभर आनंदाने जेवण होऊ शकते
पण तेच सुकांत किंवा दुर्वांकुर ची थाळी घ्या, इतके भरमसाठ पदार्थ ताटात येऊन आदळत राहतात की हे खाऊ का ते खाऊ होतं आणि कशाला न्याय दिला जात नाही आणि भरगच्च थाळी असूनही जेवण जेवल्याची तृप्ती नाही तर पोटात सारण भरल्याचे फिलिंग येते
हेच इतके सिनेमे कोरियन पासून तमिळ मल्याळम, इतके ओटीटी, त्यांचे भरमसाठ शो, मुवि, सिरीज
सगळ्यांनी मिळून काही बघायचं ठरवलं तर काय बघावं हे ठरवायलाच तासभर जातो
अप्रूप वाटेनासे झाले आहे.
कशाचेही अप्रूप वाटेनासे झाले आहे.
पूर्वी सिनेमात कार्स, आलिशान घरं, क्लब्ज, महागडी हॉटेल, परदेश पाहून डोळे तृप्त व्हायचे.
या आता नवलाईच्या गोष्टी राहिल्या नाहीत. त्यामुळे आता चकाचौंध दुनिया दाखवून वेळ मारून नेता येत नाही.
आता त्याही पेक्षा भव्य दिव्य दाखवायचा जमाना आहे. हम आपके है कौन मधले भव्य सोहळे, फॅमिली गेट टूगेदर, बाहूबलीची अतिभव्यता इ.
मागणी तसा पुरवठा. भिकार भंगार
मागणी तसा पुरवठा. भिकार भंगार चित्रपटांना मागणी असेल तर पुरवठा ही त्या प्रमाणेच होणार.
तुम्ही कॉंग्रेसच्या राजवटीत
तुम्ही कॉंग्रेसच्या राजवटीत फ्रस्ट्रेट झाला कि मग दहा वर्षे मोदी साहेबांना द्यायची. मग राहुल गांधी सुद्धा महान नेता वाटू लागतो. अगदी तोच फॉर्म्युला आहे. >>>> ह्हापूवा
कितीही लार्जर than लाईफ दाखवा
कितीही लार्जर than लाईफ दाखवा. जसे की हेलिकॉप्टर मधून एन्ट्री घेणारा हिरो. पण शेवटी तो हेलिकॉप्टर मधून उतरणारा हिरो अर्जुन कपूर आहे की शाहरुख खान यावरच ठरते की ते लोकं किती उचलून घेत आहेत.
बास ना शाखा दळण. उबग आलाय.
बास ना शाखा दळण. उबग आलाय. भंगार चित्रपट धाग्या वर अॅज अ फॅन तरी नको उल्लेख करुस शाखा चा.
शाहरुखचे ही चित्रपट हल्ली
शाहरुखचे ही चित्रपट हल्ली भंगार असतात. तो तर आयडियल केस स्टडी आहे या धाग्यासाठी
माझे मत. आपण आधी ठरवतो की
माझे मत. आपण आधी ठरवतो की आपल्याला अमुक प्रकारचे सिनेमे आवडतात आणि अमुक प्रकारातले आवडत नाहीत. आणि मग तसेच सिनेमे बघून बघून आपणच कंटाळतो.
नवीन नवीन प्रकारचे सिनेमे बघा. युनिक असतील असे सिनेमे बघायचे. काही वेळेस आवडतात काही वेळेस नाही पण वेगळा अनुभव मिळतो.
नवीन Submitted by कॉमी on 13
नवीन Submitted by कॉमी on 13 June, 2023 - 18:04 >> +१
कॉमी +१.
अमित , कॉमी +१.
पैशाबद्दल म्हणतात ना कि If you believe money does not buy happiness, you do not where to shop. तसेच आपण कंटेंट म्हणू शकतो. भरपूर नावीन्यपूर्ण चॉईसेस उपलब्ध आहेत. आपली प्रयोग करून बघण्याची किती तयारी आहे हे मह्त्वाचे. उडदामाजी काळे गोरे होणार तसे, एव्हढ्या फापटपसार्यामधे खटकणारे पण तेव्हढेच निघणार हे साहजिक आहे.
नवीन नवीन प्रकारचे सिनेमे बघा
नवीन नवीन प्रकारचे सिनेमे बघा. युनिक असतील असे सिनेमे बघायचे. काही वेळेस आवडतात काही वेळेस नाही पण वेगळा अनुभव मिळतो.>>> +११
फ्लॉप सिनेमे का फ्लॉप झाले बघायला पण मी बघू शकते..उदा. लायगर,आचार्य,ब्रह्मास्त्र
वगैरे.
कॉमी +१.
कॉमी +१.
असामी +१ प्रयोग करा आणि नाही झेपलं की मूव्ह ऑन चटकन व्हा.
'सिन्स यू वॉच धिस, यु मे लाईक... 'हे सगळ्यात बेक्कार आणि ट्रॅप फीचर सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे.
अजुन एकाही चॅनलच्या क्युरेटरच्या/ कंटेंट फिल्टर अल्गोरिदम सेट करणार्याच्या डोक्यात 'मी एक सिरिअल किलरचा शो बघितला की मला दिवसरात्र सिरिअल किलर बघुन तेच बनायच्या ध्येयाने ग्रासलेलं नसू ही शकतं. त्या नंतर मला रोम कॉम, किंवा चला हवा येऊ द्या बघाविशी वाटून क्लेन्सिंग करावंसं वाटेल हे अद्याप ही डोक्यात कसं येऊ नये... याचं राहुन राहुन आश्चर्य वाटतं.
नेफ्लिने हल्ली गूगलच्या आयेम फीलिंग लकी टाईप फीचर आणलंय. पण ते एकतर टोटल रॅंडम नंबर जनरेटर आहे किंवा काही व्हेस्टेड इंटरेस्ट आहे अशी मला शंका येते आणि मग ते वापरत नाही असं होतं.
'सिन्स यू वॉच धिस, यु मे लाईक
'सिन्स यू वॉच धिस, यु मे लाईक... 'हे सगळ्यात बेक्कार आणि ट्रॅप फीचर सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे. >>> +१
या सर्व स्ट्रीमिंग सर्विसेस मधे न्यूट्रल/फॅक्टरी डिफॉल्ट मोड पाहिजे.
हे पाहिलंत ना, आता भोगा
हे पाहिलंत ना, आता भोगा आपल्या कर्माची फळं असं नाव पाहिजे त्या मेसेज चं.
°°'सिन्स यू वॉच धिस, यु मे
°°'सिन्स यू वॉच धिस, यु मे लाईक... 'हे सगळ्यात बेक्कार आणि ट्रॅप फीचर सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे>> हो.
आणि आपण शोधत असलेले कंटेंट (टंकुन शोधताना) गेस करून ते उपलब्ध नसले तर "तुम्ही अमुक शोधताय का? ते आमच्याकडे नाही. त्या ऎवजी हे बघाल का:" या नव्या फिचरचा दोनेक वेळा अनुभव घेतला नेटफिक्सवर.
त्यात त्यांनी गेस केलेला चित्रपट आणि तो नाही म्हणुन सुचवलेले कंटेट्स "बादरायण संबंध म्हणजे काय?" असे मुलांनी विचारले तर त्यांना समजवताना उदाहरण म्हणुन देता आले असते.
<हे पाहिलंत ना, आता भोगा
<हे पाहिलंत ना, आता भोगा आपल्या कर्माची फळं >
खरंय की
खरंय की
सिरीयल किलर अथवा crime शो बघून तर अल्गोरिदम ला वाटत असेल की हाही काही प्लान करतोय की काय मग अजून जरा परफेक्ट कर म्हणत हे घे अजून बघ ह्या सेरीज / चित्रपट वै भडिमार
सिन्स यू वॉच धिस, यु मे लाईक.
सिन्स यू वॉच धिस, यु मे लाईक... 'हे सगळ्यात बेक्कार आणि ट्रॅप फीचर सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे
>>>>>
पुढचा मुद्दा बरोबर असला तरी प्रॅक्टीकल हेच आहे.
जर कोणी A जॉनर चा चित्रपट पाहिला तर त्याला त्यावर चेंज किंवा उतारा म्हणून B C D E ते Z कुठल्या जॉनर चा चित्रपट बघायला आवडेल हे कोणी कसे ठरवणार. त्यापेक्षा जे बघितलेत त्याला सिमिलरच सुचवणार ना.. नाही वापरायची ती फॅसिलिटी कोणाला तर ते नाही वापरणार. स्क्रोल करून पुढे जातील. इट्स ओके . जर कोणाला एखादा थ्रिलर संपवल्यावर कॉमेडी किंवा रोमान्स किंवा फॅमिली ड्रामा बघावासा वाटत असेल तर ते जो तो आपल्या आवडीने शोधेल.
दर वेळी जॉनर ने नसते रे ते.
दर वेळी जॉनर ने नसते रे ते.
A जॉनर चा चित्रपट पाहिला तर
A जॉनर चा चित्रपट पाहिला तर त्याला त्यावर चेंज किंवा उतारा म्हणून B C D E ते Z कुठल्या जॉनर चा चित्रपट बघायला आवडेल हे कोणी कसे ठरवणार. >> म्हणूनच तो सोडवायला कठिण प्रश्न आहे. त्याचं उत्तर माझ्या लास्ट व्हुइंग हिस्ट्रीत नाही सापडणार. माझी सर्च हिस्ट्री, कन्झम्शन स्प्रीड, एकुणच बिहेविअर पॅटर्न, आवड, मला कशाचा फोमो आत्ता येऊ शकेल ती लिस्ट, सध्या हाताशी किती वेळ आहे, बरोबर पार्टनर आहे, ज्येना आहेत का पोरं आहेत... इ. इ. अनेक पिसेसचं भेंडोळं सोडवून करायला लागेल. त्यांच्या एआयला माझं तितकं प्रेडिक्टिव्ह मॉडेल कदापि न मिळो की झालं.
Pages