वेल, मायबोली वरचा माझा मागचा धागा... आणि आज अल्मोस्ट झालेला महिना.
खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केलं, मानसिक आधार दिला, त्याची भरपाई नाही करू शकत...
माझी एक मैत्रीण मला कायम म्हणते...
तू खूप अवघड आहेस.
वेल, हे काही अंशी खरं आहे.
मी अवघड आहे, आणि अती महत्वाकांक्षी सुद्धा...
मी प्रयत्न करतो, करतच राहतो... आणि अजिबात प्रयत्न सोडत नाही...
आणि त्या प्रयत्नांनीच बऱ्याचदा घात होतो...
पण एक आहे, घात झाला तरी चालेल, पण प्रयत्न करणं सोडायचं नसतं...
सो...
आज अजून काहीतरी सांगतो...
एक महिना झाला, मी धागा काढून... आणि आज काही बदललं आहे?
तर काहीही नाही... जी स्थिती महिनाभर आधी होती, त्याच परिस्थितीत मी आजही आहेच...
आशा, निराशा, उत्साह, हताशा, वेडेपणा, टोकाचा बालिशपणा, सगळं करून झालं...
टोकाचं adrenaline rush, dopamine rush... सगळं अनुभवलं आहे.
...पण याचं दुःख अजिबात नाही.
उलट यावेळी मला इतका आत्मविश्वास आलाय, की जो कधीही नव्हता.
मागच्या वेळी मी म्हटलो होतो, मी जगेन का नाही, माहिती नाही...
आता मी म्हणतोय, मी मरणार नाही...
...अजिबात नाही...
कारण आता पुढचे पाच महिने, मी आयुष्य बदलायच ठरवलंय.
आजारपणात जे जे काही गमावलं आहे, ते ते सगळं कमवायचं ठरवलं आहे...
किंबहुना मी स्वतःलाच बदलायचं ठरवलं आहे...
आणि ही सुरुवात कालपासून झालीय...
इट्स लाईक, आय एम टेकिंग अ लास्ट चांस ऑन मायसेल्फ...
पाच महिन्यांनी जे होईल, ते अगदी सुंदर असेल,
...नाहीतर काहीही अर्थ नसलेलं...
...आणि हो, मी मायबोलीवर परत ॲक्टिव होतोय.
...आफ्टर ऑल... स्वतःला व्यक्त करण्यासाठी यापेक्षा छान जागा काय असू शकेल?
सो, आय एम बॅक!
And mark the date...
30th October 2023
पाच महिने.
नवी सुरूवात, नवा प्रवास!
Submitted by अज्ञातवासी on 2 June, 2023 - 03:24
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेस्ट ऑफ लक!!! तुम्ही
बेस्ट ऑफ लक!!! तुम्ही नैराश्याला झटकून पुन्हा उभे राहायचा प्रयत्न करताय ना! नक्की यशस्वी व्हाल.
खुप खुप शुभेच्छा!!!
खुप खुप शुभेच्छा!!!
अज्ञा, तारीख लिहून ठेवली आहे
स्वागत आहे, सर.
स्वागत आहे, सर.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
बरं वाटलं वाचुन तुंम्ही नव्या
बरं वाटलं वाचुन तुंम्ही नव्या उमेदीने जगण्याचा विचार करताय.. खुप खुप शुभेच्छा ..
Welcome बॅक
Welcome बॅक
खूप छान वाटले वाचून.शुभेच्छा!
खूप छान वाटले वाचून.शुभेच्छा!
शुभेच्छा अज्ञातवासी..!!
शुभेच्छा अज्ञातवासी..!!
आणि हो, मी मायबोलीवर परत ॲक्टिव होतोय.>> हो, पण त्याआधी स्वतःला पुरेसा वेळ द्या..
कोतबो धागे म्हणजे करमणूक.
कोतबो धागे म्हणजे करमणूक.
स्वागत
स्वागत
धन्यवाद सगळ्यांना...
धन्यवाद सगळ्यांना...
वन बाय वन सांगतो...
वेल, नवी उमेद आता नाहीये... इट्स जस्ट लाईक, lets try this way... पण जे ठरवलं ते पाच महिन्यांनी मिळवलं, तर उमेद काय, आयुष्यच बदलेन
अजूनही एक ट्रान्स आहेच... पण कसोशीने प्रयत्न करतोय. त्यामुळे जास्त active नसलो, तरी अधून मधून चक्कर टाकत जाईन.
आणि हो, कुणाच्या आयुष्याच्या प्रश्नांमुळे करमणूक होत असेल, तर आपण डॉक्टर कडे दाखवलेलं उत्तम असं मला वाटतं. अर्थात सर्वस्वी तुमचा निर्णय...
सो, आय एम बॅक!>>> ज्जे बात!
सो, आय एम बॅक!>>> ज्जे बात!
नवीन प्रवासासाठी शुभेच्छा.
मी पन गेल्या वीक मध्ये
मी पन गेल्या वीक मध्ये भोज्याला शिवुन आले, आत restrictions आहेत आजार किरकोल आहे असे पन symptoms घाबरवनारि (Vertigo). आता नव्याने सुरुवात करायचि.
कुणाच्या आयुष्याच्या
कुणाच्या आयुष्याच्या प्रश्नांमुळे करमणूक होत असेल, तर आपण डॉक्टर कडे दाखवलेलं उत्तम असं मला वाटतं.
एकदा निघतो म्हणता आणि परत विचार बदलतात ही करमणूक. सहा महिने वगैरे नको. जसं जमेल तसं लिहीत जा. भावूक होऊन नका. कोणत्या तरी नवीन विषयात रस वाटेल त्यावर लिहाल, वाचाल, चर्चा कराल तर आपल्याच दु:खाचा विसर पडत जातो. डॉक्टर काही सर्वच प्रश्न सोडवून शकत नसतात.
@इंद्रा - तुमच्या प्रवासासाठी
@इंद्रा - तुमच्या प्रवासासाठी all the best!
गेल्या वीक मध्ये भोज्याला
गेल्या वीक मध्ये भोज्याला शिवुन आले. >>> बापरे. हे वाक्य अंगावर काटा आणणारे आहे.
@एकदा निघतो म्हणता आणि परत
@एकदा निघतो म्हणता आणि परत विचार बदलतात ही करमणूक. सहा महिने वगैरे नको. जसं जमेल तसं लिहीत जा. भावूक होऊन नका. कोणत्या तरी नवीन विषयात रस वाटेल त्यावर लिहाल, वाचाल, चर्चा कराल तर आपल्याच दु:खाचा विसर पडत जातो. डॉक्टर काही सर्वच प्रश्न सोडवून शकत नसतात.
- अरे पण कुणी परतण्याचा प्रॉब्लेम काय आहे? स्पष्ट लिहिलं आहे वर, पाच महिने स्वतःला दिले आहेत.
अहो काहीही बदललं नाहीये माझ्या आयुष्यात... जे आहे ते आहे, जे इश्यू आहेत ते आहेतच. किंबहुना आता जरा जास्तच वाढले आहेत.
पण हा प्लॅटफॉर्म मला ओपन अप होण्यासाठी एक मार्ग आहे एवढंच... काही कुठेही न भेटणारे लोक इथे भेटतात. एवढंच... रस मला लिखाणात आहे, ते ते करू देत इथे.
मी स्वतःला emotional fool समजतो. खरच समजतो... आहेसुद्धा, त्यावर वर्क करणारही आहे...
इमोशनल असणं ही माझी सर्वात मोठी विकनेस असल्याचा शोध मला आता आता लागायला लागला आहे. सो त्यावर नक्की वर्क करेन... यासाठी मात्र धन्यवाद!!!
अज्ञातवासी
अज्ञातवासी
जास्त भाव द्यायचा नाही,
@ केशवकुल - भाव वगेरे नाही,
@ केशवकुल - भाव वगेरे नाही, किंबहुना मलासुद्धा ती सारवसारव कळली...
But yes, he got a point in second statement, about emotions.
@ अज्ञातवासी - संगीत ऐका, तसे
@ अज्ञातवासी - संगीत ऐका, तसे पॅसिव्ह दुसरे ऑषध नाही. थेराप्युटिक एकदम.
जगात २ च अमृतमय गोष्टी आहेत - एक प्रेम आणि दुसरे संगीत. नॉट नेसेसरीली इन दॅट ऑर्डर.
@सामो - धन्यवाद...
@सामो - धन्यवाद...
पहिल्या गोष्टीत मला आता पाच महिने तर अजिबात इंटरेस्ट घ्यायचा नाही...
दुसरी गोष्ट मात्र माझं जीव की प्राण आहे... तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद... ते अमृत आता रोज चाखेन म्हणतो.
(No subject)
हे ऐका
हे ऐका
संगीतही प्रेमही साहित्य यांचा तिहेरी संगम!
https://www.youtube.com/watch?v=ASXJV84ufyM&ab_channel=ZeeMusicCompany
केके मस्त गाणे.
केके मस्त गाणे. ऐकले, आवडले.
@अज्ञातवासी
@अज्ञातवासी
प्रयत्न करत रहा, जिद्द सोडू नका. मी सिगरेट सोडताना पण खूप प्रयत्न केले होते. अनेकदा setback आले पण प्रयत्न सोडले नाहीत आणि शेवटी यश मिळाले. Marathon पळताना पण असेच मानसिक बळ असले की आपण अशक्य वाटणारी गोष्टही करू शकतो.
तुम्हाला शुभेच्छा.
बरं.
बरं.
>>>>आणि शेवटी यश मिळाले.
>>>>आणि शेवटी यश मिळाले.
कौतुक आहे. धूम्रपान सोडणे नेक्स्ट टू अशक्य असते असे ऐकून आहे.
माझ्यातही इच्छाशक्तीचा अभाव आहे. लहान लहान टप्प्यांनी वाढवायला हवी. उदा - आज मी ५००० पावले चालणारच वगैरे ठरवुन करायला हवे.
अज्ञातवासी,
अज्ञातवासी,
जिथं शरीराची ताकद कमी पडते तिथं मनाची शक्ती भेगा बुजवते. मनाची उमेद अशीच टिकवून ठेवा, तुम्ही या दुखण्यातून बरे व्हालच. स्वतः साठी जगायला शिका. आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी करत रहा.
तुम्हाला सदिच्छा. /\
-----
उबो, तुम्ही वेगळा धागा काढून हा प्रवास लिहायला हवा. प्रेरणादायी होईल ते.
मी माझा प्रवास इथे आणि इथे
मी माझा प्रवास इथे आणि इथे लिहिला आहे. कुणाला प्रेरणा मिळाली तर आनंदच आहे.
Welcome back Sir. तुमची
Welcome back Sir. तुमची पोस्ट बघून आनंद झाला.खुप खुप शुभेच्छा
Pages