Submitted by ढंपस टंपू on 23 May, 2023 - 00:52
एलन मास्क यांनी रोबोट स्त्री शी लग्न केले अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. दैनिक सकाळ मधे एक बातमी आली आहे. खरं खोटं माहिती नाही.
https://www.esakal.com/sci-tech/pictures-of-elon-musk-kissing-his-robot-...
पण चि. एलन मस्क आणि चि. सौ. कां रोबोट यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
यावरून रोबोट पत्नी कशी मिळेल असे तरूण व विवाहित पुरूष सुद्धा विचारणा करत आहेत.
विज्ञानाची ही प्रगती पुरूषांसाठी वरदान आहे का?
रोबोट वाईफ चे फायदे व तोटे काय आहेत?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली गोष्ट आहे. फक्त Goods
चांगली गोष्ट आहे. फक्त Goods tested and Inspected शिक्का असलेले नकोत.
फायदे तर बरेच दिसतात.
फायदे तर बरेच दिसतात.
पण काही शंका आहेत..
दोनच दिवसांपूर्वी दोन साड्या आणलेल्या असतानाही चिंकीच्या वाढदिवसाला माझ्या कडे एकही साडी नाही म्हणून रोबोट बायको अडून बसेल का?
(बाकीच्या शंका नंतर)
Ai जनरेटेड फोटो आहे तो खरा
Ai जनरेटेड फोटो आहे तो खरा नाही. काहीही वाट्टेल त्या बातम्या देतात.
बाकी, सदर विषयावर दोन उत्तम कलाकृती -
१. ब्लॅक मिरर एपिसोड - Be right back
एका अपघातात एका तरुणाचा मृत्यू होतो. त्याची पत्नी एका AI चा आधार घेते, ज्याने तिच्या पतीच्या सोशल मीडिया वावरावरून एक व्यक्तिमत्त्व बनवले असते. ह्या नातेसंबंधावर एपिसोड आहे. विषय संवेदनशीलतेने हाताळला आहे.
२. एक्स माकीना (सिनेमा)
एका सॉफ्टवेअर कामगाराला त्याच्या बॉसने एका AI ची TURING TEST करायला बोलावले असते. ही टेस्ट AI स्वतः नवीन विचार करू शकते का हे तपासण्यासाठी असते. AI एका स्त्री रोबो शरीरामध्ये बसवले असते. पुढे काय होते हे स्पॉयलर होईल. अतिशय रोचक आणि विचारप्रवर्तक सिनेमा.
ब्लॅक मिरर>> एकदम भारी
ब्लॅक मिरर>> एकदम भारी इनोव्हेटिव्ह सिरिज आहे.
+१.
+१.
खऱ्या आयुष्याशी रिलेट करता येईल असे सायन्स फिक्षन क्वचितच पाहायला किंवा वाचायला मिळते. ब्लॅक मिरर त्यातले सर्वात भारी.
AI आहे हे त्या बातमीत म्हटले
AI आहे हे त्या बातमीत म्हटले आहे. पण माणसाने आशावाद सोडू नये. विज्ञानाने अशक्य असे काहीही शिल्लक ठेवले नाही.
आज्ञाधारक, बचत करणारी, अल्पसंतुष्ट, आनंदी, हॉटेलिंगची गरज नसलेली, पाच मिनिटे म्हणजे पाच मिनिटात तयार होणारी, टीव्ही वरच्या मालिका न पाहणारी......
थोडक्यात आखूडशिंगी बहुगुणी बायको कुणाला नकोशी असेल?
घरातील सर्व काम .
घरातील सर्व काम .
स्त्री ज्या तत्परतेने करते.तशी रोबोट स्त्री करत असेल तर खूप फायदा आहे.
१) सर्व घरकाम चुपचाप करेल.
२) शारीरिक गरज हवी तेव्हा भगवेल.
३) घरातील प्रौढ माणसाची सेवा करेल.
खूप खूप फायदे आहेत.
पण तिची किंमत करोडो असेल तर आपण फक्त .
स्क्रीन वर च बातम्या बघुन समाधान मानायचे
अशा बाबतीत किंमतीचा विचार करू
अशा बाबतीत किंमतीचा विचार करू नये.
सुलभ हप्त्यांवर घेऊन जा सुंदर सुलक्षणी बायको अशा जाहिराती सुद्धा पहायला मिळतील.
ताक : धाग्याचे सेटींग फक्त पीडित पुरूषांकरिता असे करता येईल का?
तिचे डोके कधीच दुखणार नाही
तिचे डोके कधीच दुखणार नाही
सामो
सामो
बाई दवे
फिलींग्स मॅटर.. मी विचारही करू शकत नाही रोबो बाईला माझी गर्लफ्रेंड बनवायचा.
रोबो बायकोच्या मूड्स ची
रोबो बायकोच्या मूड्स ची सेटिंग जर नवर्याच्या हातात असेल मग काय मजा !!
अचानक मूड्स स्विंग मध्ये तर खरी मजा असते राव !
>>तिचे डोके कधीच दुखणार नाही<
>>तिचे डोके कधीच दुखणार नाही<<
पण कॅटनेला मधे मकॅनिकल फॉल्ट होउ शकतो. सरतेशेवटि ती ह्युमनॉय्ड (प्रोजेक्ट आप्टिमस) आहे...
अचानक मूड्स स्विंग मध्ये तर
अचानक मूड्स स्विंग मध्ये तर खरी मजा असते राव !
>>>>
लग्नानंतरच्या पहिले काही वर्षे लागू आहे हे.. नंतर सुकूनमध्ये मजा असते.
सर्वात जास्त (दुहेरी) फायदा
सर्वात जास्त (दुहेरी) फायदा ऑर्फन होम्सच्या मुलांना होईल ज्याना मिलिनीयर पिता आणि सुपरमॉम मिळेल.
अडोप्शन नंतर सर्वात जास्त खप डेयरी फार्म्सचा वाढेल.
पुढे हळूहळू आता जसे लग्नाला मुली नाही मिळत तसे अडोप्शनसाठी शिशु सुद्धा मुबलक राहणार नाहीत आणि मग तेसुद्धा AI निर्णीत/निर्मित घडले की सुडोमि.
हीच संकल्पना बार्बी गर्ल
हीच संकल्पना बार्बी गर्ल गाण्यात आहे ना?
विषयांतर करून: स्त्रियांना रोबो पती आवडेल का?
स्त्रियांना रोबो पती आवडेल का
स्त्रियांना रोबो पती आवडेल का? >> याचे उत्तर खऱ्या स्त्री कडून अपेक्षित आहे कि AI?
आमचा वेधशाळेचा अंदाज सांगतो कि रोबो पती लॉयल असण्याची शक्यता आहे. त्याचं शेजारच्या घरातल्या रोबो पत्नीशी अफेअर होणार नाही,. तो घरात पसारा करणार नाही. उलट चहा आणून देईल. स्वयंपाक करेल. भांडी घासेल. कपडे धुवून, वाळवून इस्त्री करुन ठेवेल. डोकं, हात, पाय, गळा दाबून देईल.
फक्त त्याचं प्रोग्रॅमिंग पीडीत पतीने केलेले असू नये. Vice versa.
>>>मकॅनिकल फॉल्ट होउ शकतो
>>>मकॅनिकल फॉल्ट होउ शकतो
अॅट लिस्ट ती डोकेदुखी जेन्युइन म्हणता येइल. टाळाटाळ नाही.