आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. थोडी हटके.
आमची Fresher's Party होती. Party Games मधे एक लाल रंगाचा रुमाल मागितला.
"लाल रंगाचा रुमाल ? कोण वापरतं ??" आम्ही विचार करतोय तोपर्यंत तिने तो काढूनही दिला आणि बक्षिसपण मिळवले.
नंतर ती कोणाशी तरी बोलताना ऐकलं " अरे , वो party games मे ना ऐसा ही कुछ पुछते है इसलिये मै लाल रुमाल राखति हू |" झालात ना आश्चर्यचकीत . येवढं party च्या जामानिम्यात इतकं सगळं कोण लक्षात ठेवतो ? आणि ते सुद्धा लाल रुमाल?? माझं पण तसच झाल.
कधीही बघा, तिच्याकडे पेन्सिली, erasers, pens, drafter, container, color pens सगळं असायचंच. कधी एखादी गोष्ट विसरलीये वगैरे सवालच नाही. चुकूनसुद्धा चूक नाही. मला नेहमी अचंबा वाटायचा तिचा. माणसांने व्यवस्थित म्हणजे किती असावं? अगदी पु.लं. च्या 'चौकोनी कुटुंबातूनच' निसटुन आलिये जणू.
काही हरवलं / फुटलं/ कोणीतरी ढापलं म्हणून वर्षा काठी शेकडो रुपयांचा भुर्दंड भराव्या लागणऱ्या माझ्यासारखीला तिचं अप्रुप नाही वाटल तरच नवल.
फक्त वस्तुच नाहीत तर इतरहि बाबतीत तीची निराळीच तर्हा !
सगळ्या assignments तिच्या सगळ्यात पहिल्यांदा तयार. मग त्या पूर्ण वर्गात पास on होत.
आम्ही क्लासेस, text books, reference books च्या ओझ्यात मरतोय पण ती मात्र एकदम निवांत. परिक्षेआधिच्या प्रिपरेशन लिव्ह मध्ये एक २५-३० पानांची booklet यायची मोस्ट वॉन्टेड question bank types. ती बऱ्याच पेपर्सना फक्त ते वाचून यायची आणि पास पण व्हायची तेवढ्यावर. एवढंच नाही तर ते पुस्तक वाचायला पण नाही जमलं तर रुमालावर कॉपी लिहून आणायची (दचकलात ना), पण कधीच पकडली पण गेली नाही.
हिला सगळ्या viavas (तोंडी परीक्षा) ना नेहेमी फ़ुल्ल् मार्क्स! म्हणजे college मधील खडुसातली खडुस मिस (जी कमित कमी मार्क्स देण्यासाठी कुप्रसिद्ध होती ) ती हिला मात्र फ़ुल्ल् मार्क्स द्यायचि! आता तिचे ग्रह जास्त बलवान होते , ती धोरणी आणि धूर्त होती की आमची कडक साडेसाती चालली होती, आम्ही अगदीच हे होतो, देव जाणे!
हा काळ पंचवीस एक वर्षा पूर्वीचा. तेव्हा पाऊस फक्त पावसाळ्यातच यायचा. पण एकदा January किंवा February असेल, जोराचा पाऊस आला. मी बॅग डोक्यावर पकडुन भराभर चालत होते. मनात विचार आला आता तरी तिच्यावर आपल्यासारखीच अवेळी आलेल्या पावसात भिजायची वेळ आली असेल. हा!हा! समोर बघितलं तर ती तिच्या लाल छत्रीतून चालली होती. ऑफ कोर्स कशी विसरले मी, ती ऊन लागू नये म्हणून रोज छत्री घेऊन यायची.
आतापर्यंत जवळपास हजार एक लोकांशी तरी संपर्क आला असेल पण तिच्यासारखं अजून तरी कोणी नाही भेटलं, म्हणून हजारों मे अकेली!
तुमच्या सम्पर्कात अशी एखादी हटके व्यक्ति आली असेल तर जरुर लिहा.
आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी
आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. थोडी हटके.>>>>
या ठिकाणी "मुलगी" च्या जागी "मुलगा" केलं तर हे माझ्याबद्दलच लिहीलय असं वाटेल ....
या ठिकाणी "मुलगी" च्या जागी
या ठिकाणी "मुलगी" च्या जागी "मुलगा" केलं तर हे माझ्याबद्दलच लिहीलय असं वाटेल ....
नवीन Submitted by संजय पाटिल on 19 May, 2023 - 01:42 >>>>>तुम्ही लाल छत्री वापरायचे ??????
मस्त लेख मला आव्डली ही
मस्त लेख मला आव्डली ही मुलगी. हटके व्यक्तिमत्व मी स्वतःच. किदरभी फिट नै होते हम. बेगमे बंजारा हिल्स.
माझी एक मैत्रिण आहे . खूप
माझी एक कन्नडीगा मैत्रिण आहे . खूप आवडायची मला. ती आय आय टी (मुं) मग आय आया एम(बें) आणि आता सिलिकॉन व्हॅलीत, आय बी एम (पार्टनर) ..... बाप रे एकदम हटके होती ती. मला फार आवडायची. हुषार, वेल मॅनर्ड आणि ग्राउंड टू अर्थ. कॉलेजात कशी आपल्यात प्रगल्भता नसते म्हणजे आपण असे 'पुट टुगेदर' नसतो. पण ही होती. त्याचा मला हेवा वाटे मात्र. आता मॅरॅथॉन पळते, आशा फाउंडेशनकरता निधी गोळा करते. एकंदर प्रथितयश. तिच्यात काहीतरी मॅग्नेटिझम होते.
ती लाल छत्री मला फार आवडली
ती लाल छत्री मला फार आवडली आहे. किती सुंदर दिसतेय.
सामो, तुमची मैत्रिण खरंच हटके
सामो, तुमची मैत्रिण खरंच हटके दिसतेय. ऐकूनच एकदम इम्प्रेस्ड!
हटके व्यक्तिमत्व मी स्वतःच. किदरभी फिट नै होते हम>>> टाळ्या टाळ्या.. आवडलं
अमा, धन्यवाद!
या ठिकाणी "मुलगी" च्या जागी
या ठिकाणी "मुलगी" च्या जागी "मुलगा" केलं तर हे माझ्याबद्दलच लिहीलय असं वाटेल>>
Oh wow!
अस हटके म्हटलं तर मला एकच
अस हटके म्हटलं तर मला एकच गोष्ट आठवतेय..
माझ्या मित्राचा चुलत भाऊ.. मेकॅनिकलला आम्हाला १ वर्षाने ज्युनिअर
वर्ल्डकप मधील भारत पाकिस्तान मॅच होती, झाडून सगळे मिळेल त्या कॅन्टीन मध्ये मॅच पाहत होते आणि हा पठ्ठ्या लायब्ररीत अभ्यास करत होता.
छान लेख छान विषय !
छान लेख छान विषय !
मेरे को तो लगता है सब मे कुछ ना कुछ हटके होता है
फक्त ते हटकेपण न लाजता जपता यायला हवे..
छान लेख छान विषय !
छान लेख छान विषय !
मेरे को तो लगता है सब मे कुछ ना कुछ हटके होता है
फक्त ते हटकेपण न लाजता जपता यायला हवे..
आबा., ऋन्मेऽऽष वाचून दिलेल्या
आबा., ऋन्मेऽऽष वाचून दिलेल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद!
अरे , वो party games मे ना
अरे , वो party games मे ना ऐसा ही कुछ पुछते है इसलिये मै लाल रुमाल राखति हू |" झालात ना आश्चर्यचकीत <<<
आमच्याकडे एक बाई होत्या , त्या पार्टीच्या MC ला चिरीमिरी देऊन रंग वगैरे आधीच विचारून घ्यायच्या, आणि मग त्या रंगाचे कपडे घालून बक्षिस ढापायच्या.
विचारून घ्यायच्या, आणि मग
विचारून घ्यायच्या, आणि मग त्या रंगाचे कपडे घालून बक्षिस ढापायच्या.>>> :हाहा
(No subject)