Submitted by रंगिला on 17 May, 2023 - 08:30
मायबोली वर येऊन मला २ वर्षे पाच महिने झालेले आहेत. माझी व्यथा https://www.maayboli.com/node/77277 या धाग्यावर मांडून काही खास सल्ला मिळाला असे झाले नाही. काही टुकार सल्ले मिळाले, खिल्ली उडवली गेली पण माझी व्यथा संपली नाही.
कामातुराणं न भय न लज्जा या प्रमाणे माझे प्रयत्न सुरु आहेत. अजुनही मी एखादी रोमेंटीक जोडीदार मिळेल या आशेवर आहे.
अनेकांना मी मायबोलीवर हा उद्योग काही अंतस्थ हेतू ठेऊन करतो आहे अशी शंका आहे. म्हणून मी डेटिंग अॅपने अशी स्त्री भेटेल का यावर विचार करतो आहे.
मायबोली वर असा अनुभव कोणी खाली प्रतिसादात लिहणार नाही माझी खात्री आहे.
पण संपर्कावर एखादा अनुभव दिलात, मार्ग दाखवलात तर, धोके सांगीतले तर बरे होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी ऑर्कुटला डेटिंग ॲपसारखेच
मी ऑर्कुटला डेटिंग ॲपसारखेच वापरायचो.. बॅचलर असताना
सरळमार्गी मध्यमवर्गीय ईमेजला जपणाऱ्या मराठमोळ्या भाबड्या पोरांना हेच सोयीचे पडते.
फायदा मात्र खूप झाला. डेटिंग ॲप झक मारतील ईतका झाला..
कामातुराणं न भय न लज्जा या
कामातुराणं न भय न लज्जा या प्रमाणे माझे प्रयत्न सुरु आहेत. >>>> जबरदस्त.....
आपणास यश मिळो
सरांनी पहिला प्रतिसाद नोंदवुन
सरांनी पहिला प्रतिसाद नोंदवुन सलामी दिली आहे. आता दुसऱ्या सरांचे आगमन झाले की धागा कारणी लागेल