कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. ते वाटतात खरे पण रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख अन्यत्र पूर्वप्रकाशित आहे.
-----------------------------------------------------------------
एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर. तू मला अरसिक म्हणणार मला माहीत आहे. कारण तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे कामधाम सोडून, कविता वाचणे, सूर्यास्त अनुभवणे व अन्य .... पण ते सर्व "इम्पल्सिव्ह" अगदी मनस्वी, कलंदरपणे. मलादेखील ते सर्व अनुभवायचे आहे रे पण मी पडले "कन्या रास आणि ६ व्या घरात शुक्र" पडलेली प्रेयसी. फारशी काव्यात जगणारी नाही. 'वहावत जाणं" तर मला माहीतच नाही. मी, आपल्या प्रियतम व्यक्तीच्या "उपयोगी" पडण्याकडे कल असलेली. म्हणजे बघ - कोणी मला २ पर्याय दिले की मी तुझी सर्वात लाडकी प्रेरणा बनू शकेन अथवा तुझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तुझा आधार व तुझी सहचारी बनू शकेन तर २ रा पर्यायच अतिशय आनंदाने निवडणारी.
नवरंग सिनेमातील "जमुना" याच अगदी माझ्याच पठडीतली. नॉनग्लॅमरस पण कर्तव्यदक्ष. घरात सासू-सासर्यांचे करणारी. सतत कामात, व्यापात व्यग्र आहे. इतकी कि ती नवर्याला रिझवण्यातही संकोच करणारी. खरं तर तिच्य मनात अढी आहे कि नवर्याला मोहिनी आवडते. आता हि मोहिनी कोण ते तिला कळणे शक्यच नाही कारण मोहिनी आहे,दिवाकराची, तिच्य नवारयाची प्रेरणा. काल्पनिक प्रेरणा . पण झालय काय त्यामुळे आधीच स्वभावाने संकोची असलेल्या, किंचित रुक्ष पणाकडे झुकणार्या जमुनेला नवर्याशी मानाने एकरूप होताच येत नाही.हा भावनिक अडसर कुठेही चकार शब्दाने बोलून न दाखविता, संध्याने तिच्य विभ्रमातून, त्राग्यातून तो प्रकट केलेला आहे. दिवाकर तर कवीच आहे, सदैव सरस्वतीच्या उपासनेत बुडालेल्या त्याचे जमुनावरती अतिशय प्रेम आहे. पण जमुनाला ते कळत नाही, तिचे जे मत्सरायुक्त दु:ख आहे, ते दिग्दर्शकाने खूप छान रंगविले आहे.ती फणसासारखी आहे. बाहेरुन काटेरी आतुन गोड. रुक्ष भासते पण मनात भावनांचा कोलाहल जपते. तिला नवर्याचे प्रेम हवे आहे पण कसे मिळवायचे ते कळत नाही. खरं तर आपण आपल्या कवी नवर्याला पुरेशी साथ देऊ शकू कि नाही याबद्दल ती साशंक आहे. हा न्यूनगंड, मत्सर,, भावनिक अडसर .... तिचे सगळे सर्व shadow aspects. शेवटी व्ही शांताराम यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकाची कलाकृती आहे ती.
बरेचदा माझं असं वागणं तुला त्रासदायक होतं याचीही मला जाणीव आहे.म्हणजे सकाळी तू लाडात यावं आणि मी तुला आंघोळ, मुखपक्षालनाकरता पिटाळावं हाच आपला नॉर्म (नेहेमीचं). रात्री तुला एखादी गाण्याची अथवा कसेही मैफिल जागवण्याची हुक्की यावी पण माझ्या कर्तव्यदक्षतेमुळे , दुसर्या दिवशीच्या रुटीनच्या विवंचनेमुळे आपण तो बेत रद्द करावा हे अनेकदा घडतं. "यु आर नेव्हर इन द मोमेंट" ही तुझी नेहमीची तक्रार आणि त्यावर माझं उत्तर ठरलेलं - "कामंधामं सोडून कोण रमणार कलेत? चल सोड मला चिक्कार पसारा पडलाय"
"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात,
क्षितीजाच्या पलीकडे ऊभे दिवसाचे दूत"
अशा कर्तव्यपरायणताप्रधान ओळी कुसुमाग्रजांना आमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच सुचल्या असाव्यात.
पण याचा अर्थ असा नाही की मला तुझ्याबरोबर सूर्यास्त अनुभवायचा नाही. मलाही एक कविता तुझ्याबरोबर अनुभवायची आहे, अगदी तुझ्याशी तादात्म्य पावून, त्या कवितेला तुझ्या डोळ्यांतून वाचत. मलाही वाटतं तुझा हात हातात घेऊन,एकदा तरी सूर्यास्त निवांतपणे अनुभवेन. कधीतरी सगळं 'परफेक्ट" असेल, आणि माझ्या लगबगीची जरुरी नसेल. येईल असा दिवस नक्की येईल.
देवकी लेकाचं सेम आहे.
देवकी लेकाचं सेम आहे.
चंद्र हा मोठा ग्रह आणि
चंद्र हा मोठा ग्रह आणि पृथ्वीच्याजवळ. सागरावर फार प्रभाव टाकतो हा दृष्य परिणाम. धावतोही फार. इतर ग्रहांचे अडथळे सहज पार करताना कधी धडपडतो. सर्वच अडथळे पार करतोच असं नाही. कुणाचा हसतो तर कुणाचा रुसतो. कुणाचा बोलतो तर कुणाचा गप्पच.
संत रविदास (/रैदास/रईदास) म्हणतो "मन चंगा तो कठौती में गंगा."
( थोडक्यात मांडलं, समजून घ्या.)( अवांतर अडथळे)
व.दा. नक्की कसं फलवर्णन करतात
व.दा. नक्की कसं फलवर्णन करतात आणि ते बरोबर कसं येतं याचं एक कोडं आहे असं ऐकलं आहे.>>हे असं अजिबात नाहीये हो. हे तेच ना ज्यांचं दुकान खुन्या मुरलीधरपाशी होतं /आहे? ओळखित लोक माहीत आहेत ज्यांना ह्यांनी चुकीचे भविष्य सांगितले आहे.
मला या शास्त्रातलं काही कळत
मला या शास्त्रातलं काही कळत नाही. पण वाचायला छान वाटलं. आवडलं.
बाकी राशींविषयी असं लिहिलं तर आवडेल.
कन्या राशीच्या स्वभावाचे
कन्या राशीच्या स्वभावाचे वर्णन पटलं. लेख छान आहे.
अरिष्ट्नेमी, नँक्स - धन्यवाद.
अरिष्ट्नेमी, नँक्स - धन्यवाद.
सामो,
सामो,
कन्या राशीचा शुक्राचे वर्णनात अगदी १००% सहमत पण सहाव्या स्थानी वृषभेचा शुक्र असेल किंवा तुळेचा शुक्र असेल तर इतका निरस असेल असे वाटत नाही.
कन्या राशीचा हा शुक्र विवाहात अडथळे आणतो. एखादा तरुण कितीही आकर्षक असला तरी स्त्रीच्या ह्रदयात किवा एखादी स्त्री कितीही सुंदर असली तरी पुरुषाच्या जन्मकुंडली मधे कन्या राशीचा शुक्र असेल तर धडधड निर्माण होत नाही.
यामुळे विवाहाला होकार देताना हे तरुण मुले अगर मुली वेळ लावतात.
धन्यवाद नितीनचंद्र. उत्तम
धन्यवाद नितीनचंद्र. उत्तम माहीती. हे माहीत नव्हते.
आता लेखात कन्या रास,सहाव्या
आता लेखात कन्या रास,सहाव्या स्थानात शुक्र आणि ललित लेख या तीन गोष्टी एकत्र आहे. ललितावर भर अधिक आहे ते बरं आहे कारण ज्योतिष म्हणजे भाकित हे जाणून घेणं दाहक(त्रासदायक) असतं. कसं तर अमुक वाईट होणार हे अगोदरच कुणी सांगणं म्हणजे उद्याची चिंता आजच सुरू होते.
कन्या राशीच्याबद्दल बोलायचं तर 'काळजी करणे' हा त्यांचा स्वभाव.
बाकी सहावे स्थान शत्रू आणि नोकर यांचे. तिथे एखादा ग्रह असला किंवा एखादी रास असली किंवा त्या राशीचा स्वामी जिथे असेल त्यात 'न्यून' येते.
(यात फार खोलात जाऊ नये. जाणून घ्यायची खटपट करून नये. त्रास होतो.)
धन्यवाद शरदजी.
धन्यवाद शरदजी.
<< कसं तर अमुक वाईट होणार हे
<< कसं तर अमुक वाईट होणार हे अगोदरच कुणी सांगणं म्हणजे उद्याची चिंता आजच सुरू होते. >>
गंमत अशी आहे की हे जे भाकीत केले आहे ती निव्वळ थापेबाजी आहे आणि ते तसे होईलच याची काहीही खात्री नाही, हे त्या मूर्खाना कळतच नाही.
<< कन्या राशीचा हा शुक्र विवाहात अडथळे आणतो. >>
भारताबाहेर असंख्य जोडपी पत्रिका न बघताही सुखाने संसार करत आहेत आणि खुद्द भारतात, पत्रिका जुळवून लग्न करणाऱ्यांचे पण घटस्फोट होत आहेत.
कन्येचा स्वभाव विविधांगी असतो
कन्येचा स्वभाव विविधांगी असतो. ऑब्सेशन असावं तशी संशयग्रस्तता. कच्ची भाजी( कोशिंबीर वगैरे) धुतल्याशिवाय खाऊ नये हे ठीक पण तीनदा धुवूनही समाधान होत नाही आणि शेवटी साबणानेही धुवायला निघू शकतात. कर्तव्याची जाणीव जास्त, प्रेम कमी. साकल्याने ( in totality) विचार करीत नाहीत. छोटासा फायदा दिसतो पण भले मोठे नुकसान दिसत नाही. मन स्थिर नसते. आपल्यावर अन्याय होतोय अशी भावना सतत बाळगतात. पण कार्यक्षमता, कार्यतत्परता, चटपटीतपणा असतो. बुध हा बुद्धीचा ग्रह मानतात पण गुरू शनीसारखी सखोल आणि सूक्ष्म प्रज्ञा बुधाजवळ नसते. चतुर, चटपटीत चार्मिंग हे कन्या राशीचे वर्णन ठरू शकते. पण अर्थात राशी, भाव, इतर ग्रहांचे सान्निध्य, ग्रहदशा, युती, दृष्टी, विंशोत्तरी/ अष्टोत्तरी आणि नवमांश हे सर्व स्थिर बुद्धीने बघून अत्यंत शुद्ध , निर्मळ जाणिवेत जे स्फुरेल ते साधारणतः: जुळते.
आयुष्यपट मांडणे हे सोपे नाही. कारण कालसापेक्षता लक्षात घेतली जात नाही. पत्रिकेत पहिलेच वाक्य ' स्थलकालानुसारेण ' हे असते. सत्तर वर्षांपूर्वी जन्मकाली वर्तवलेले भविष्य सत्तर वर्षांनंतर बदललेल्या स्थलकालाच्या परिप्रेक्ष्यात interprete करावे लागते.
डिस्क्लेमर : हे सर्व अनुमान असते. तंतोतंत सत्याची अपेक्षा धरू नये.. सर्वस्वी अवलंबून राहू नये.
ऑब्सेशन असावं तशी
ऑब्सेशन असावं तशी संशयग्रस्तता. कच्ची भाजी( कोशिंबीर वगैरे) धुतल्याशिवाय खाऊ नये हे ठीक पण तीनदा धुवूनही समाधान होत नाही आणि शेवटी साबणानेही धुवायला निघू शकतात. >>>>
कन्या राशीचा हा अनुभव अगदी जवळून घेतलाय. मला चंद्र किंवा इतर गोष्टी काळात नाहीत फारशा. पण "राशिभविष्य" मात्र २-३ वेळेला बघीतलेला आणि गंमत म्हणून राशींची लक्षण आणि त्यांचे स्वभाव त्या त्या माणसांच्या वागण्यात दिसतायत का ते बघण्याचा छंद जडलेला काही काळ.
मग लिंडा गुडमन च्या sun signs त्या प्रमाणे आढळणारे स्वभाव. हेही सर्व' करून झाले कॉलेजमध्ये.
हा लेख वाचताना जुने सारे आठवले .
लेख वाचायला आवडला.
हीरा, छंदीफंदी धन्यवाद.
हीरा, छंदीफंदी धन्यवाद.
ऑब्सेशन असावं तशी
ऑब्सेशन असावं तशी संशयग्रस्तता. कच्ची भाजी( कोशिंबीर वगैरे) धुतल्याशिवाय खाऊ नये हे ठीक पण तीनदा धुवूनही समाधान होत नाही आणि शेवटी साबणानेही धुवायला निघू शकतात. कर्तव्याची जाणीव जास्त, प्रेम कमी. साकल्याने ( in totality) विचार करीत नाहीत. छोटासा फायदा दिसतो पण भले मोठे नुकसान दिसत नाही. मन स्थिर नसते. आपल्यावर अन्याय होतोय अशी भावना सतत बाळगतात. पण कार्यक्षमता, कार्यतत्परता, चटपटीतपणा असतो.>>>>
खूप relate झालं. अगदी जवळच्या नातेवाईक आहेत कन्या राशीचा. Same to same स्वभाव
मुळात राशीनुसार स्वभावाचे
मुळात राशीनुसार स्वभावाचे भाकीत करणे हे मला प्रचंड मोठे generalization वाटते. बाळ ठाकरेंची रास कन्या होती. वर दिलेली लक्षणे त्यांच्या बाबतीत किती लागू होतात ह्या बद्दल शंका आहेत. बरं लग्न आणि चंद्र रास दोन्ही कन्या. .
generalisation तर असतेच. ही
generalisation तर असतेच. ही ढोबळ भाकिते असतात.
वरच्या कुंडलीवरून खोलात न जाता काही स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतात. पंचम स्थान हे पहिल्या प्रतीचे शुभ स्थान असते. ह्या कुंडलीत त्यावरून उत्तम तडफदार वक्तृत्व आणि अंगी कला असणे सांगता येते. मातृपितृ पत्नी स्थाने बिघडलेली आहेत. अष्टमातला स्वराशीचा मंगळ लक्ष वेधून घेतो. तसाच षष्ठातला शनीच्या राशीतला गुरू, सहाव्या घरात पडलेला शनी मंगळाच्या राशीत आणि खुद्द मंगळ आठव्या घरात मृत्यु स्थानी हे योग बोलके आहेत. नवमाचा मालकनआणि लग्नाचा मालक पाचव्या स्थानात एकत्र आहेत जरी शनीच्या राशीत असले तरी. असो. फार लिहिणे योग्य नाही.
पंचम स्थान क्रिएटिव्हिटी
पंचम स्थान क्रिएटिव्हिटी दर्शविते. लहान मूल कसे उस्फूर्त अविष्काराने 'स्व' साजरा करत असते तशा प्रकारची निखळ क्रिएटिव्हिटी. ते स्ट्रॉन्ग वाटतय शिवाय लग्नेश , पंचमात म्हणजे पंचमाकडून ही सर्व निर्मितीक्षमता, उधाण घेउन ते पहील्याला बहाल करणार. फार मोठी निर्मितीक्षमता - असे म्हणता यावे.
पण मी काही जाणकार नाही.
मलाही वाटतं तुझा हात हातात
मलाही वाटतं तुझा हात हातात घेऊन,एकदा तरी सूर्यास्त निवांतपणे अनुभवेन. कधीतरी सगळं 'परफेक्ट" असेल, आणि माझ्या लगबगीची जरुरी नसेल. येईल असा दिवस नक्की येईल.>> अरे वा किती छान. अगदी मनातले लिहिलेत. मला पण ग्रीस च्या सातोरिनी बेटावरचा सूर्यास्त कोणा
बरोबर तरी अनुभवायचा आहे. पण ते कोण काय माहिती. शुक्र कोणत्या घरात आहे काय माहिती. बघितली पाहिजे पत्रिका.
छान लेख. मी अगदी च कन्या रास. सन साइन सॅजिटेरिअस.
अमा जरुर!!
अमा जरुर!!
Pages