" "

Submitted by mi manasi on 15 May, 2023 - 23:57

" "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग. क्रौमार्या की कौमार्या?
मुख्य लक्षण वाचल्यावर कुंती आठवली. पण तिला बाकीच्या काही गोष्टी लागू होत नाहीत. महाभारतात अन्य काही स्त्रियांनाही हा चिरकौमार्याचा वर मिळाला होता असं आता वाचलं. त्यात एक नाव द्रौपदीचं आहे. मी कथारूप महाभारत वाचलंय; त्यात द्रौपदीबद्दल ही माहिती वाचल्याचं आठवत नाही. त्यामुळे कोण असेल अशी उत्सुकता आहे.

पुराणात तिचं अस्तित्व महासागरातल्या एका थेंबाएवढं. नगण्य! कुठेतरी चुटपुटता उल्लेख झाला आणि ती पौराणिक झाली एवढंच! >>>>
मला वाटतं ती कुंती किंवा द्रौपदी नसावी. कारण या मुख्य पात्र आहेत. द्रौपदी तर महानायिका. त्यामुळें कोणीतरी unsung वाटतेय.
माद्री?

>>>>पुरातन काळात तर स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ती एक उपभोगाचे साधन यापलीकडे नव्हताच.>>>>>

अजूनही काय आहे...मी समाजाचा उल्लेख मुद्दाम टाळतोय...या समाजात कौमार्य चाचणीची प्रथा अद्याप आहे. मधे हे प्रकरण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं. त्याच समाजाच्या शिकलेल्या मुलामुलींनी त्याला विरोध केला. पुढे काय झालं माहित नाही.

ययातीची मुलगी माधवी>>
हिच्या वर एक लेख इथेच वाचला होता. तेव्हाच तिची ओळख झाली होती.

ती एका महापराक्रमी, धर्मपरायण, कर्तव्य परायण अशा राजाची कन्या होती. ती सौंदर्यवती, रुपवती राजकन्याही होती. तिला चिरक्रौमार्याचं, चिरतारुण्याचं वरदान होतं.
ती अलौकिक होती. तरीही पितृसत्ताक व्यवस्थेत केवळ एक संतान प्राप्तीचे साधन आणि पतीची शय्यासोबत करणारी कामिनी बनून राहिली..
>>>>>>

जर महापराक्रमी तिचे बाबा असतील आणि ती सौंदर्यवती, रुपवती हेच कर्तुत्व म्हणून मिरवत असेल, तर मग पुढच्या वाक्यात तिच्याशी जे झाले त्यात तितके नवल नसावे.

>>> महाभारतात अन्य काही स्त्रियांनाही हा चिरकौमार्याचा वर मिळाला होता असं आता वाचलं. त्यात एक नाव द्रौपदीचं आहे.
द्रौपदीला चिरकौमार्य नव्हे, अक्षतयोनीचा वर व्यासांनी दिला होता असं वाचल्याचं आठवतं. पाचांशी लग्न झाल्यावर त्यांच्यात दिवस वाटले गेले, प्रत्येक पतीशी प्रथम रत होताना तिचा नव्याने योनिभंग झाला.
(हे वाचायला असांसदीय वाटेल, पण येऊन जाऊन सगळी शुचिता स्त्रीच्या योनीत कोंबायची खुळं आहेत ही आपल्या महान संस्कृतीतली! असो.)

तिला विश्वामित्रांना दान केलं होतं पहिल्यांदा. तिथून पुढे प्रत्येक पुरूषाने तिचं शोषण करून पुढे 'पास' केलं.

>>>>> चीड आणणारी गोष्ट आहे Sad Sad Sad

मी ते इथे लिहिताना इंग्रजीतलं शोधून वाचलं होतं. वरच्या लेखात आलेलाच शब्द वापरला.

आता इथेच ती कोण, तिला काय भोगायला लागलं हे सगळं आल्यावर लेखिकेला सगळा सस्पेन्स संपला तर लेखिकेच्या बेतावर पाणी ओतल्यासारखं होईल, म्हणून मी नाव लिहिलं नव्हतं.

ययातीनेच आपल्या मुलाचं तारुण्य घेतलं ना?

अस्मिता, तुम्ही महाभारताची कोणती आवृत्ती वाचली आहे? मी कमला सुब्रमण्यन कृत कथारूप महाभारताचा पाडगावकरांनी केलेला मराठी अनुवाद वाचला. प्रस्तावनेत हे पुस्तक (दोन भाग आहेत) वाचून कोणाला मूळ महाभारत वाचावंसं वाटलं तर माझा उद्देश सफल झाला हे वाचून फसवणूक झाल्यासारखं वाचलं. शिवाय द्रौपदीबद्दलचा हा भाग त्यात वाचल्याचं मला आठवत नाही.

मूळ व्यासकृत महाभारत - भांडारकर संशोधित आवृत्तीचाच आधार घेतला म्हणताना त्यांनी काय काय गाळलं , काय बदललं आणि काय काय भर घातली त्याच जाणेत. काय भर घातली हे प्रस्तावनेत सांगितलंय.

महाभारताची इतकी सारी इंटरप्रिटेशन्स आहेत. (रामायणाच्याही अनेक कथा आहेतच) . हे सगळं वाचणं कठीण आहे. त्यात मूळ किंवा अधिकृत आवृत्तीचा अनुवाद कोणता , तो मिळणं आणि समजणं हे आणखी प्रश्न.

>>> ययातीनेच आपल्या मुलाचं तारुण्य घेतलं ना?
होय.

खुद्द महाभारतासाठी लॉरेन्स मॅन्झोचा महाभारत (याच नावाचा) इंग्रजी पॉडकास्ट मला फार आवडला होता - तो ऐका अशी आवर्जून शिफारस करेन. त्याने त्यात अधिकृत आवृतीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे भागवतातले वगैरे संदर्भ देताना तो तसं नमूद करायला विसरत नाही.
त्याआधी आपली व्यासपर्व, युगान्त इत्यादी त्याबद्दलची पुस्तकं वाचली होती मराठीत.

mi manasi, सॉरी - बरंच अवांतर झालं हे तुमच्या धाग्यावर.
ते 'क्रौमार्य' कुठल्याच अ‍ॅन्गलने पटलं नाही हेही नमूद करायला हवं.

कौरव पांडव आणि त्यांचे पूर्वज - शंतनू भीष्मापासून सोडले तर बाकी पात्रांबद्दल सगळंच सगळ्यांना माहीत असतं असं नाही.

ययातीबद्दल मी लहानपणी वाचलं होतं. बहुतेक एका नाटकाचं नभोनाट्य रूपांतर ऐकलं होतं. पण त्यातही माधवीचा भाग आला होता असं आठवत नाही.

mi manasi, सॉरी - बरंच अवांतर झालं हे तुमच्या धाग्यावर.
+१
पुरे करते. लेखनासाठी शुभेच्छा. Happy

< भांडारकरांचं महाभारत> तुम्ही संस्कृत भांडारकर प्रत वाचली असेल ना? मला काही ते जमणार नाही.

प्रतिक्रियेसाठी सगळ्यांचे मनापासून आभार!

शीर्षक क्रौमार्या आहे. किंवा कौमार्याही होऊ शकलं असतं, पण लेखनात तिच्या चिरक्रौमार्य वरदानावर भर द्यायचा होता, म्हणून मी क्रौमार्या हे शीर्षक- कुमारिका या अर्थाने- निवडलंय.

दत्तात्रय साळुंके..
अजूनही काय आहे>> खरं आहे! दृष्टी बदलल्याशिवाय दृष्टिकोन बदलत नाही.

SharmilaR.. टीजर टराटरा फाडल्याचा आवाज आला मला.. गंमत करतेय. मला माहित आहे इतकी हुशार माणसं आहेत इथे.

सामो.. धन्यवाद! पण खरी परीक्षा पुढेच आहे. माहीत असलेली गोष्ट सांगायचीय..

अवल.. आता रोज एक भाग येईल..

aashu29 .. मुद्दाम केलेली रूपक चूक असावी>> हो शेवटी हा कल्पनाविलास आहे!

ऋन्मेष..
खरं आहे! तिच्या दुरावस्थेला तीच कारण झाली. कारण तिला अलौकिक सौंदर्य आणि वरदान मिळूनही ती परिस्थितीशरण सामान्य स्त्री होती. मी वर लिहिलंय तसं.. ती गुलाम होती तिच्या आंतरिक संबंधातल्या भावभावनांची. ती भावना होती समर्पित प्रेमाची. तिने जे केलं ते नाती निभवण्यासाठी, कर्तव्य भावनेने केलं..

अस्मिता, आबा..
सगळं चीड आणणारं आहे. मान्य!
ते मांडण्याचा एक अल्प प्रयत्न करतेय.
क्रौमार्या हे शीर्षक- कुमारिका या अर्थाने- निवडलंय.

भरत.. तुमचे विशेष आभार!

वाचकांना नम्र निवेदन.. हा कल्पनाविस्तार आहे.

स्वाती, सामो..
काल्पनिक आहे
जसं सौभाग्य- सौभाग्यवती
तसं अखंड क्रौमार्य लाभलेली क्रौमार्या असं..

Pages