मध्यंतरी मी काही खास स्वयंपाक करणे जवळ जवळ सोडलेच होते. मुले वीकांताला आली की मना सारखे काही ऑर्डर करत. माझ्या रोजच्या जेवणाला मी साधे व्हेज चविष्ट बनवत असे. परवाच्या वीकांताला सहजच सर्व घटक पदार्थ हाताशी होते म्हणून नेहमी पेक्षा अर्ध्या प्रमाणात का होईना चिकन बिर्याणी बनवली. ती मला तितका वेळ इंडक्षन पाशी उभे राहुन एकतर बनवता आली व छान घरगुती फ्लेवरफुल मसाले दार झाली.
ती इतकी आव्डली की रविवारी दोन टाइम खाउन परत डब्यात पण नेली सोमवारी ऑफिसला. ( मुले इथून कॅब करून सोम्वारी सकाळी डिरेक्ट ऑफिसातच जातात) साडे अकराला पोहोचतात व दीड पावणे दोन ला लंच करतात. ऑफिसात मायक्रोवेव्ह अवन आहे. त्यामुळे डबा गरम करता येतो पण तवा नाही. पोळी/ पराठे गरम करता येत नाहीत.
तर प्रश्न असा की रविवारी करता येइल व सोम्वारी डब्यात नेता येइल असे मांसा हारी पदार्थ सुचवा. चिकन फिश मटन काहीही. मी शुक्रवारी सकाळी बिग बास्केट ऑर्डर टाकते. ते शनिवारी येते. डिरेक्ट फ्रीझरला टाकेन सामिष पदार्थ. व रविवारी बनवुन फ्रिज मध्ये ठेवेन.
सोमवारी सकाळी ब्रेफा व हा लंच चा डबा फिनिश करता येइल.
मी व्हेजच जेवते ९० % व्हीगन मील्स . पण डब्यासाठी जमेल तितके व जमेल तितके दिवस चविष्ट बनवायचे मनावर घेतले आहे.
सध्या मला येणा रे पदार्थः
चिकन बिर्याणी
अंडा पुलाव. तेलंगणा अंडा बिर्यानी. ही सोमवारी सकाळी पण एकदा बनवली आहे.
एग करी व रोटी/ प्राठा
साधी चिकन करी कसुरी मेथी घालून बरोबर पोळी.
चिकन सँडविच. चिकन सलाड बनवुन. सलाड व ब्रे ड डब्यात वेगवेगळे देता येइल.
शीग कबाब - हे बिग बास्केट वर झोराबिअन चे रेडीमेड मिळतात. ते परतुन व पोळी
खिमा करी व पाव.
खिमा पराठा - चिकन व मटन चा खिमा दोन्हीचे वेग वेगळे बनतात
खिम्याचे शामी कबाब. व सलाड.
फिशचे काही फार्से येत नाही. प्रॉन करी व राइस येते , पापलेटे/ सुरमई फ्राय करता येतात यु ट्युब बघून. आत्ता गं बया.
कॉलेस्ट्रॉल शरीराला लागते
कॉलेस्ट्रॉल शरीराला लागते गरजेचं आहे ते .
अमा तुम्ही आयुष्य भरभरुन जगता
अमा तुम्ही आयुष्य भरभरुन जगता असे माझे नीरीक्षण आहे. आनंदी स्वभाव, हौशी वृत्ती, सुग्रणपणा. मस्त मस्त गुण आहेत तुमच्यात. नॉट टु मेन्शन परखडपणा>>>>
+१०००
माबोवरचे most influential IDs अशी लिस्ट बनवली तर माझ्यासाठी अमा पहिल्या 3 मध्ये.
>>>>>>>most influential IDs
>>>>>>>most influential IDs
मस्त मस्त!!! माझ्याही लिस्टमध्ये सेम. इन फॅक्ट #१.
Real Thai नावाचा ब्रँड आहे.
Real Thai नावाचा ब्रँड आहे. त्याची पाकीट आणि Kara चे कोकोनट मिल्कचे टेट्रा पॅक घरात कायम ठेवावे. अगदी 10 मिनिटात चिकन/prawns थाई करी किंवा भरपूर भाज्या घालुन veg थाई करी बेस्ट होते. भाज्या रात्री चिरून lock & lock च्या डब्यात भरून ठेवल्या तर सकाळी अजुन कमी वेळ. बरोबर rice दिला की lunch time मधे दोन्ही डबे oven मधे गरम करून टेस्टी lunch होतं.
(Real Thai brand ची चव खुप authentic आहे अशी शेफ नातेवाईका कडुन compliment मिळाली होती.)
माबोवरचे most influential IDs
माबोवरचे most influential IDs अशी लिस्ट बनवली तर माझ्यासाठी अमा पहिल्या 3 मध्ये.>>>>> +११११११११११
अमा तुम्ही आयुष्य भरभरुन जगता
अमा तुम्ही आयुष्य भरभरुन जगता असे माझे नीरीक्षण आहे. आनंदी स्वभाव, हौशी वृत्ती, सुग्रणपणा. मस्त मस्त गुण आहेत तुमच्यात. नॉट टु मेन्शन परखडपणा>>>>
+१०००
असे ऐकले की सोलकढी मधे हाय
असे ऐकले की सोलकढी मधे हाय कॉलेस्त्रॉल असते..नारळ दुधामुळे...? म्हणुन आधी फार ओरपून प्यायचे तसे पित नाही हल्ली.
जाणकारांनी प्रकाश टाका. >>
सोलकढी व इतर नारळाचे पदार्थ हाय कॉलेस्ट्रॉलवाले हे खरे आहे. शिवाय जुन्या पद्धतीने खटाटोपही फार असतो. आता ओळखीतल्या बर्याच कुटुंबानी सोलकढी करण्याचे प्रमाण कमी आणले आहे. >>
इथे डॉक्टरांनीच माहिती दिली आहे https://www.maayboli.com/node/64397
अमा, तुमच्याकरता सामिष
अमा, तुमच्याकरता सामिष रेसिपीज तर नाहीत माझ्याकडे प्ण नॉनव्हेज डब्यात नेलं तर ते गरम करताना झाकण काढावं लागतं आणि मग वास पसरेल सगळीकडे. तेव्हा एक पेपर प्लेट ठेवा जवळ म्हणजे ती झाकण म्हणून वापरता येईल.
तेव्हा एक पेपर प्लेट ठेवा जवळ
तेव्हा एक पेपर प्लेट ठेवा जवळ म्हणजे ती झाकण म्हणून वापरता येईल.>> ओके नोटेड. मी थाइ स्वयंपाकाचा कोर्स केला आहे. काजु चिकन व स्टिकी राइस फेवरिट. लाल हिरवे करी पेस्ट व ऑयस्टर सॉस आणावे लागेल. एक जपानी पद्धतीचे मशरूम शेंगदाणॅ चिकन पण येते प्लस राइस.
जंग कुक कसा स्वयंपाक करतो बघितले का? अंडे फोडून हात बरब टून योक काढले व बोल मध्ये घातले. काही काही येत नाही बबल्याला.
आजकाल वर इन्स्टाग्राम वर सोप्प्या चाय नीज रेसीपी रील्स येत आहेत त्यात वाटर फ्रॉम मिसिसिपी रिव्हर असे म्हणतात. गंगेची प्रार्थना आपल्याकडे असते तसे.. ते ही तीन चार सेव्ह केले आहेत. तीन दिवस सुट्टीच आली ना. काही बाही करीन व अपडेट लिहिते. शाहीर साबळे पिक्चर बघायचे घाटते आहे. .
Mutton Sukke and rassa
Mutton Sukke and rassa
(No subject)
(No subject)
वाह मस्त अमा...
वाह मस्त अमा...
Thank you amupari. I always
Thank you amupari. I always love your food photos on wada.
Mutton Sukke and rassa....
Mutton Sukke and rassa.... मस्त दिसतेय. matanachi रेसिपी टाका.
देवकी युट्युब वर सरिताज किचन
देवकी युट्युब वर सरिताज किचन म्हणून एक मराठी बाईचे चॅनेल आहे तिची बघून स्टेप बाय स्टेप केलेली आहे. रेसीपीत टोमॅटो कसुरी मेथी पुदिना आजिबात नाही. अगदीच मराठी रेसीपी आहे. सोपी पण आहे. बिझनेस म्हणून करणार्या बायकांना पण सोपी जाइल अश्या मापाने तिने दिली आहे.
मस्त
मस्त
(No subject)
Chicken Dum Biryani
Chicken Dum Biryani
सुंदर अतिशय रुचकर दिसते आहे.
सुंदर अतिशय रुचकर दिसते आहे.
Cold cuts salad bowl
Cold cuts salad bowl
Any meat / fish lightly marinated in olive oil, chilli flakes / lemon or tikka masala and GG paste etc. Marinated protein can be left in the fridge for 2/3 days.
Morning - put the meat / fish in the oven / air fryer to grill.
While it is getting grilled, boil pasta or quinoa. In a lunch box, add pasta / quinoa / couscous. Top it up with salad of your choice, dry fruits, nuts, seeds, etc.
place protein on top.
Carry dressing separately and add during lunch time.
Dressing - pesto / guacamole / hummus / tahini / ranch / simple olive oil mixed with sugar, salt, pepper, lemon juice and chilli flakes etc
Sorry for typing in English!
Enjoy healthy meal which is not too heavy.
Additional tip - Boiled pasta / quinoa / couscous can be kept in the fridge for 3/4 days.
रात्री कढाई चिकन बनवून ठेवा.
रात्री कढाई चिकन बनवून ठेवा. याला ग्रेवी नसते. पोळी/फुलक्याशी खाता येईल. पण नान/रोटी वगैरेबरोबर खूप कोरडे होईल.
जर दुसर्या दिवशी सॅंडविच/रॅप/फ्रॅंकी/रोल करणार असाल तर डिनर झाल्यावर उरलेलं चिकन फोर्कने पुल अपार्ट करून घ्या.
जर सॅलड करणार असाल तर चिकन पिसेस तसेच ठेवा.
सॅंडविच/रोल/रॅपसाठी
एका डब्यात - सॅंडविच स्प्रेड/मस्टर्ड/मेयो
एका डब्यात - बीट/कॅरट फिंगर्स, टमॅटो, कुकुंबर स्लाईस/तुमचे आवडीचे सलाड
एका डब्यात - पुल्ड अपार्ट कढाई चिकन
सलाड साठी
एका डब्यात - आवडीचे सलाड
एका डब्यात - चिकन पिसेस
एका डब्यात - ड्रेसिंग ( चिकन स्पाईसी असल्याने नुसतं ऑलिव ऑईल वापरलं तरी चालेल)
ऐनवेळी असेंबल करून खा.
कढाई चिकन रेसिपी-
साहित्य ः बोनलेस चिकन ५०० ग्राम, (नेहमीच्या दीडपट) आलं लसूण पेस्ट, ३ मिडीअम टमेटो, १ टीस्पून धणा पावडर, १ टीस्पून जिरे पावडर, ४ किंवा झेपेल तेवढ्या मिरींची पावडर, पाव टीस्पून गरम मसाला, २ टेस्पून दही
कृतीः चिकनचे दीड बाय दीड इंचाचे तुकडे करून घ्या.
टमेटो जमेल तेवढे बारीक चिरून घ्या. (प्युरी नको.)
कढईत तेल गरम करून तूप घाला.
चिकनचे तुकडे टाकून सगळीकडून पांढरे होईपर्यंत मोठ्या आचेवर परता.
आच मिडीअम करून आता त्यातच आलं लसणाची पेस्ट घालून परता.
आलं लसणाचा कच्चा वास गेला की त्यात तिखट, हळद, धणे जिरे पावडर घालून परता.
मसाले थोडे भाजले गेले की मीठ घालून परता.
आता आच मोठी करून कढईत टमेटो घाला.
टमेटोला पाणी सुटेल, ते पूर्ण आटेपर्यंत चिकनही शिजेल.
तोवर दह्यात मिरी पावडर व गरम मसाला घालून मिक्स करून घ्या.
ग्रेवी आटून चिकन पिसेस ९५% कोरडे झाले की दही घालून तेही आटवून घ्या.
कढाई चिकन तयार आहे.
वि. सु. आच मोठीच ठेवायची आहे. झाकण ठेवायचे नाही.
Pages