“तुम जैसे भी हो, काफी हो..!”
हे छोटसं वाक्य खूप अर्थपूर्ण आहे. मी ऐकलं तेव्हा वाटलं ठीक आहे, एवढं काय आहे ह्यात?!
पण “द ब्रोकन टेबल” ह्या शॉर्ट फिल्म मधलं हे वाक्य विचार करायला लावतं.
आठवणी पुसता येत नाहीत... चांगल्या वाईट सगळ्याच आठवणी खोल आपल्यातच कुठेतरी दडून राहतात.
काही गोष्टी विसरता येत नाही म्हणून आपण दु:ख करत बसतो. पण Alzheimer’s सारखा आजार असणाऱ्या लोकांचं काय? त्यांना कितपत लक्षात राहतं? कसं वाटत असेल त्यांना रोज?
गिरीधर ह्या रिटायर्ड divorce lawyer ना alzheimer’s ची लक्षणं दिसू लागता, त्यांच्या घरचे त्यांच्यासाठी एका caregiver ची नेमणूक करतात. M.A. psychology ची स्टुडेंट असलेली दीप्ती तिच्या पहिल्या “live subject” साठी फारच excited असते. गिरीधरच्या मुलाला व सुनेला लग्नाला जायला उशीर होत असल्याने, “काही झालं तरी बाबांना घरा बाहेर जाऊ देऊ नका” असं सांगून ते निघून जातात, मग पूर्ण दिवस दीप्ती गिरीधर सोबत घालवते.
गिरीधर सारखी दीप्तीची नजर चुकवून ऑफिसला जायला बाहेर निघत असतात. वॉचमन कसाबसा त्यांना अडवून परत घरी आणून सोडत राहतो, आणि हा प्रकार 2 ते 3 वेळा घडतो. अधे मध्ये गिरीधर तिच्या सोबत छान गप्पा सुद्धा मारतात. “नाक टोचलेलं असून सुद्धा नोज रिंग का घातली नाही?” असं गिरीधरनी विचारल्यावर “माझ्या नवऱ्याला आवडत नाही” असं हसून दीप्ती उत्तर देते. ते दिवसभर “प्रभा” ला म्हणजे त्यांच्या पत्नीला शोधत असतात, त्यांना अनेक कॉल्स करतात, पण कॉल लागत नसतो. प्रभाचा फोटो पाहून दीप्ती त्यांच्याबद्दल गिरी ना विचारते. प्रभाबद्दल बोलताना गिरी यांचा चेहरा किती उजळतो, डोळे कसे छान चमकतात, हे दीप्तीच्या बरोबर लक्षात येतं.
एकतर प्रभा दिसत नाही आणि दुसरं घरात कोंडल्यासारखं वाटत असल्याने त्यांची चिडचिड होत असते. दीप्ती घरात सगळीकडे बघते, तिला प्रभा कुठेच दिसत नाहीत. तिच्या डायरी मध्ये ती गिरीधरच्या सगळ्या हालचाली टिपत असते व एकूणच परिस्थिती बघता प्रभा ह्या जगात नाहीत, त्या नसल्यामुळेच गिरीधरची अवस्था अशी झाली आहे व गिरी त्यांना खूप मिस करतात – असा सामान्य बुद्धीला पटण्यासारखा समज करून घेऊन “Prabha – wife is dead” असं डायरी मध्ये लिहिते.
थोड्या वेळाने गिरी दीप्तीला स्वत:ची क्लायंट समजायला लागतात. “तुला divorce का हवाय, काय समस्या आहेत मला मोकळेपणाने सांग” असं विचारतात. दीप्ती काहीशी शॉक होऊन खरंच काही प्रॉब्लेम्स नाहीयेत असं अनेक वेळा त्यांना सांगते. शेवटी थकून गिरीनी परत ऑफिसला जायचा हट्ट करू नये, त्यांचा वेळ जावा, म्हणून ती त्यांची क्लायंट आहे आणि त्यांच्याशी सगळं खरं बोलायला तयार आहे असं गिरीना सांगते.
प्रत्येकालाच काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, फक्त त्या प्रॉब्लेम्सची scale आणि intensity वेगवेगळी असते. दीप्ती आई होऊ शकत नाही, असं तिला तिच्या डॉक्टर कडून समजताच - आता ही गोष्ट नवऱ्याला कशी सांगायची, तो कसं react करेल, ह्या सगळ्या गोष्टींचं टेंशन तिला आलेलं असतं. गिरी सोबत बोलताना भावुक होऊन “माझ्यात एक कमतरता आहे आणि ती नवऱ्याला माहीत नाही, अशा वेळी माझा प्रॅक्टिकल नवरा कसं react करेल हे समजत नाही” असं प्रांजळपणे कबूल करते.
सगळं शांतपणे ऐकल्यावर गिरी त्यांचा एक जुना किस्सा सांगतात. प्रभा सारख्या वेल टु डू मुली सोबत लग्न झालं तेव्हा प्रॅक्टिस सुरू करून काही दिवस झालेले व त्यांचं ऑफिस खूपच लहान होतं. प्रभाला ऑफिस दाखवायचं ते मुद्दाम टाळायचे, पण तरी एकदा हट्टाने प्रभा जातेच. स्वत:च्या ऑफिस मधल्या सेकंड हँड टेबलच्या काचेला स्क्रॅच आलेला बघून प्रभा काय म्हणेल असं टेंशन त्यांना आलेलं असतं. पण प्रभा त्या काचेवर सुंदर चित्र काढतात व तो स्क्रॅच दिसेनासा होतो. हे सगळं ऐकून “इतर वेळी नातवाला न ओळखणारे गिरी बायकोच्या सगळ्या जुन्या आठवणी किती सुंदरपणे सांगतात” हे बघून दीप्तीला खूप आनंद होत असतो.
दीप्ती वॉशरूम मध्ये असताना गिरी तिची डायरी वाचतात- “Prabha – wife is dead” असं वाचून त्यांचा संताप संताप होतो. ते सारखं तिला “असं का लिहिलंस त्याचं कारण सांग” असा हट्ट करतात. दीप्ती कशी बशी त्यांना शांत करते व “तुम्हाला सांगून तरी काय उपयोग तुम्ही विसरून जाणार” असं म्हणते.
थोडं शांत झाल्यावर गिरी सांगतात की माझ्या सगळ्या आनंदाचं आणि यशाचं श्रेय प्रभाच्या “Rule no. 1” ला जातं. त्या Rule बद्दल गिरी सांगणार तितक्यात बेल वाजते- त्या घराचीही आणि आपल्या डोक्यातही.
तो rule काय व पुढे काय घडतं- हा सस्पेन्स तुम्ही स्वत:च बघायला हवा. ही संपूर्ण शॉर्ट फिल्म एक अमेझिंग experience आहे. “द ब्रोकन टेबल” ह्या फिल्मचा मेसेज खूप simple आहे – “The first step to loving begins by accepting yourself first and then accepting others as they are.” घाई घाईत conclusions आणि judgements pass करणाऱ्या आजच्या जगात ही फिल्म डोळसपणे विचार करायला, स्वत:वर प्रेम करायला आणि त्याच बरोबर आपल्या जवळच्या माणसांच्या नव्याने प्रेमात पडायला शिकवते.
माझ्यासाठी ह्या फिल्म मधला “चेरी ऑन द केक” मोमेंट म्हणजे शेवटचा सीन होता. “फक्त नवऱ्याला आवडत नाही” म्हणून नोज रिंग काढून ठेवलेली दीप्ती, रात्री निघताना गिरीधरच्या घराबाहेर आल्याबरोबर पर्स मधली नोज रिंग पुन्हा घालते व आत्मविश्वासाने चालू लागते.
Naseeruddin Shah आणि Rasika Duggal या दोघांनी खूप कमाल acting केली आहे. Naseeruddin Shah यांचा स्क्रीन presence खूप impactful आहे.
LargeShortFilms ह्या यूट्यूब चॅनल वर ही शॉर्ट फिल्म बघू शकता (लिंक खाली देतेय). ह्या चॅनल वरच्या इतर शॉर्ट फिल्म्स सुद्धा खूप सुंदर आहेत. नक्की बघा!
खरच खुप छान आहे ही शाॅर्ट
खरच खुप छान आहे ही शाॅर्ट फिल्म. इथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद संजना.
<< ओळख करून दिल्याबद्दल
<< ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद संजना.>>
सहमत..
नक्की बघेन..
इंटरेस्टींग वाटते - दोघेही
इंटरेस्टींग वाटते - दोघेही एकदम सहज वावरणारे आहेत, नक्कि बघेन.
मी बघितली होती काही
मी बघितली होती काही दिवसांपूर्वी, मला आवडली होती. पण ज्या उंचीवर जाईल या अपेक्षेने बघितली त्या उंचीवर गेली नाही. मला नीट माहीत नाही का..! नसिरचं पात्र व्यवस्थित establish केलं आहे, रसिकाचं तितकं नीट उलगडलं नाही. किंवा तिला तोडीसतोड वाव दिलेला नाही. कामं उत्तम आहेत. आणि खूप दिवसांनी काही तरी चांगले बघायचं समाधान मिळाले.
पाहिली होती. छान आहे !
पाहिली होती. छान आहे !
इथे ओळख करून दिल्याबद्दल
इथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद!
प्रतिसादांसाठी धन्यवाद!
त्याच यूट्यूब चॅनल वर “ज्यूस” नावाची शॉर्ट फिल्म आहे शेफाली शाह यांची, ती पण छान आहे नक्की बघा!
(तुम्ही पाहिलेल्या, तुम्हाला आवडलेल्या शॉर्ट फिल्म्स बद्दल please सांगा)
आणि मला एक बालिश डाऊट आहे- आज मेल वर नोटिफिकेशन आलं, त्यात मायबोली कडून मेल होता, धन्यवाद असा मेसेज (notify@maayboli.com असा मेल address आहे. “New guestbook entry at Maayboli” हा सब्जेक्ट आहे.) पण हा मेसेज कोणी पाठवला, कोणत्या मायबोलीकर id ने पाठवला, हे कुठेच दिसत नाही! असं कसं?! मायबोली वर दिसतं का कुठे?
Sorry मी मायबोली वर नवीन आहे त्यामुळे मला idea नाही)
बरी आहे. भावनिक अपील
बरी आहे. भावनिक अपील करावयाच्या नादात बरेच फ्लॉज राहून गेले. अशा भुमिकांमध्ये कोंकणा सेन पर्फेक्ट फिट असते. रसिकाचेही तसे काम चांगले आहे.
ह्या शॉर्ट फिल्मचं शीर्षकच
ह्या शॉर्ट फिल्मचं शीर्षकच खूप सुंदर आहे.
युट्यूबवर आल्या आल्या बघितली होती. सुरुवातीला डीप्रेसिंग वाटणारी, मग हळूहळू एक एक पदर उलगडत शेवटाकडे सकारात्मक होणारी. तोही बेस्ट म्हणावा असा नाहीच, पण परफेक्ट म्हणावा असावा. (And both of them don't want best thing for them, they want perfect thing from them.)
P.S - “New guestbook entry at Maayboli - म्हणजे मायबोली वर तुम्हाला कुणीतरी विचारपूस केली आहे. तुमच्या सदस्य नावावर क्लिक करून विचारपूस मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता.
तुम्हाला केलेली विचारपूस कुठलाही मायबोली आयडी बघू शकतो...
@ मी अश्विनी, कोंकणा सेनचा
@ मी अश्विनी, कोंकणा सेनचा "नयनतारा's नेकलेस" बघा.
@ अज्ञातवासी, सांगितल्याबद्दल
@ अज्ञातवासी, सांगितल्याबद्दल धन्यवाद!
बेस्ट का परफेक्ट माहित नाही, पण “happy endings” मला गरजे पेक्षा जास्ती आवडतात.
(म्हणून Ghajini सारखे movies झेपत नाही)
त्यावरून आठवलं, अंमली चे recent भाग वर वर बघितले, अनूचं लग्न झालंय म्हणे! Not fair!
मानस पेक्षा जास्त वाईट मलाच वाटतंय!
Well, I prefer perfect ending
Well, I prefer perfect ending than best, when its happening in real world setting.
मात्र हाय फॅन्टसी फीक्षन असेल (राजा, राणी, जादूगार, चेटकीण वगैरे) तिथे मला sad ending अजिबात आवडत नाहीतच.
आणि अंमली च म्हणाल, तर त्याच्या विषय इथे नको.
त्यात अजून खूप काही व्हायचंय.
हा धागा फक्त आणि फक्त broken but beautiful sathi ठेवूया...
अवांतर - कधीकधी happy ending म्हणजे काय, ते ठरवणं सुद्धा फार मुश्किल असतं...
कधीकधी happy ending म्हणजे
कधीकधी happy ending म्हणजे काय, ते ठरवणं सुद्धा फार मुश्किल असतं...>>> खरंय!
आणि अंमली च म्हणाल, तर त्याच्या विषय इथे नको.>>> Yes