तर काय आहे उडुपी टु मुंबई?
हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नजीकच्या भूतकाळात जावे लागेल!!! कारण वर्तमान काळाची बीजे भूतकाळातच रोवलेली आढळून येतात.
आमच्या इमारतीला लागूनच एक बिझनेस पार्क आहे. ते ओलांडून बाहेर आले की एक दोन दुकाने, समोर बीएम सीचे कचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यालय व भरपूर झाडे , सावली असलेला निवांत रस्ता!! बारकी एक दोन दुकाने , वेडिन्ग हॉल सोडले की पूर्वी - लॉक डाउन काळात - इथे नुकतेच एक स्टार बझार उघडले होते. संपूर्ण लॉक डाउन त्या दुकानाच्या किराणामालावर निभावला. लाइन लाउन मास्क लाउन लोक बॅगा पिशव्या घेउन उभे राहात .आपला नंबर आला की हात धुवुन आत एसीच्या गारव्यात ट्रॉ लीत भरुन वाहेल इतके सामान घेउन परत लायनीत उभे रा हून पेमेंट करुन बाहेर. आमची इमारत शेजारीच असल्याने व आमची केविलवाणी तोंडे बघून दुकान वाले आम्हाला ट्रॉली घरा परेन्त नेउ देत. ह्याचा पुढे जास्तच रेक होउन बेसमेंट / इथे तिथे ह्या केशरी ट्रॉल्या घरंगळत पडलेल्या दिसत. मग दुकानात कमी पडल्या की दुकान वाले माणूस पाठवून सर्व ट्रॉल्या पकडून परत नेत. पुढे ही सुविधा बंद झाली. लॉक डाउन निघाला व हळू हळू दुकानाची गरज कमी कमी झाली. इतकी की ते बंदच पडले. काळाचा महिमा!! बिग बास्केट चा करिष्मा.
मग चार महिन्यापूर्वी इथे इंटेन्स रिडेवलपमेंट चालू झाली व दोन-तीन आठव्ड्यापूर्वी यु टू एम उघडले. जास्त काही नसून टिपिकल मुंबईतील व्हेज साउ थ इंडि अन / मल्टिकुझीन भोजनालय!!! बरेच दिवस बघत होते ; कधी तरी जायचे डोक्यात होते. पण बरेच दिवस स्वतःच डबा बनवून न्यायचे खूळ डोक्यात होते व कामाची धावपळ त्यामुळे जमले नाही.
मला साउथ इंडिअन व्हेज हाटेले आव्डतात. प्रेडिक्टेबल व सुरक्षित. इडली डोसा बिघडवणे अशक्यच आहे. मुलुंड वेस्टात स्टेशन पाशीच दोन होती. एक बंद पडले व एक बदलून एकदम मॅक डी झाले. ( ते ही आता रिडेवलपमेंट मध्ये जाउन बंद पडले आहे.) माझे जनरल फेवरिट म्हणजे पाच रस्त्यातले कीर्ति महल. माझे नेहमीचे मेडिकल शॉप व डायग्नोस्टिकवाली लॅब पण तिथेच आहे. त्यामुळे आदल्या रात्री जेवुन मग उपाशी पोटी ब्लड टेस्ट करायला सांपल देउन मग कीर्ति महल मध्ये इडली/ वडा / उपमा/ दोशा ब्रेफा करायचा, लंचचे पार्सल घ्यायचे व कामावर जायचे हा ठरलेला प्रोटोकॉल आहे. दुसरे फेवरिट थंबी. हे सोनापुर सिग्नल जवळ आहे. घाटकोपरहून परत येताना इथे थांबून भात रसम थाळी खाउन घरी जायचे म्हणजे निवांत झोपता येता हाही एक ठ प्रो. ही सर्व काँप्रमाइजची प्रेमे आहेत. खरे प्रेम आबिड्स ताजमहाल चे व्हेज सौथ इंडिअन. ते हैद्राबादेतल्या हपीस जवळ होते. गेले ते दिवस. ड्रायवर पाठवून पण मी पार्सल मागवून घेत असे. सर्व नबाबी सवयी इथे येउन गेल्या. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हाच प्रोटो कॉल उरला. तू १३ देक!!
नमनाला घडाभर सांबार पिउन आपण आता उटु मुं मध्ये जाउ. प्रशस्त जागा आहे. सुपर मार्केट पण सात-आठ रांगा आइल असलेले होते!! एसी असल्याने दार बंद पन दारवान नाही!! स्वतःच ते हिरवे दार उघडून आत जा!! गेल्यावर सुखद गारवा. जवळ पास रिकामेच होते.
बसल्यावर एक म्यानेजर आरामात आला व ऑर्डर घेतली. मी रवा ऑनिअन साधा डोसा मागवला. हा पदार्थ कधी पार्सल मागवू नये. टेबलाशी बसूनच खावा. कडक क्रिस्प खाता येतो. वाट बघता बघता मेन्यु कार्ड वाचोन काढले. कांचिपुरम इडली सापडली मग ती ही मागवली. हैद्राबाद चा नवा एअर्पोट जेव्हा नवा होता तेव्हा तिथे एक इडलीचे मस्त रेस्टॉरेंट होते व इडली प्लॅटर मिळायची. मी चेन्नाई/ मुंबई सकाळची फ्लाइट असली की ही प्लॅटर खाउन जात असे. त्यात कां इडली असायची. मग आज इथे भेटली!!
वाट बघून पण दोशा येइना इडली बाईच पहिले आली. बरोबर खोबरा चटणी, अजुन एक चटणी व सांबार. सांबाराची चव भारी आहे. गोड नाही किर्ती महलच्या सांबारासारखी. चविष्ट.
इडलीत ड्राय फ्रूट्स... बेदाणे पण!! ते बाजूला काढले. काजू परेन्त ठीक आहे. दोसा साहेब पण आले.
परत च च सां च्या वाट्या.
दोसा मस्त व क्रिस्प.
एक इडली उरली ती डब्यात घालुन लंच म्हणून आणली. आराम व निवांत सर्विस आहे. इतके फॅन्सी बनवले आहे पण पाण्याचे ग्लासेस भरलेले नाहेत. एक प्लास्टिक बाटली भरुन ठेवलेली. ( सील्ड नव्हे!! पण पैसे सील्ड चे चार्ज केले असतील असे उगीचच वाटले.) सील्ड बाटल्या उपलब्ध आहेत बाकी. पण मी शक्यतो रेगुलर वाटरच मागवते. किर्ती महल मध्ये तुम्ही बसे परेन्त दोन स्टील ग्लास नाकासमोर ठेवतात. इथे दिखाउ पॉश मामला दिसतो.
माझ्या समोरच गुजराती/ जैन बाप्यांचा एक समूह आला. - त्यांनी इडली व जैन सांबार मागवले. ये क्या रहता क्याकी.
ह्यांना पण रोज ठेपले ढोकळे खाउन वैताग येत असेल. मग आले इडली वडे ढोसायला.. ते ही हॅपी दिसत होते. बरोबरे. कुठे उर्वशी ढोलकिया कुठे जयाप्रदा!! मग वॉटरमेलन ज्युस व चहा ( साखर सेपरेटली) त्यांना गप्पा व बिझनेस डिस्कशन करायला भरपूर जागा आहे. किर्ती महल त्यामानाने लहान पडते. रोहित व विराट सारखे दिसणारे दोन मराठी क्रिकेटर व त्यांचे सर आले दोन मित्र, तसेच एक जोडपे व त्यांची बारकी आले. हळू हळू जागा भरत आहेत.
खादाडी आटोपून गोळ्या घेतल्या
पेमेंट केले. दोन डिशेस चे २९४ रु. तसे महाग आहे. पण एसी!! बडिशेप म्हणून बडिशेपेच्या रंगीत गोळ्या
सो क्युट. मला तर त्या आरामशीर सोफ्यांवर एक डुलकी काढावी असेच वाटले. एकंदरी त डेकॉर तालुक्याच्या जागी शादी खाना असतो त्या प्रकारचा आहे. महाग पण काही व्हिजन नाही. जेनेरिक आहे. अर्थात हे मुलुंड आहे बांद्रा नाही. जुहू तर नाहीच नाही. पण फूड छान आहे. किर्ती महल वाला चहा छान देतो. कॉफी दुधट नेस्काफे व्हिच इज अ मेस्काफे. थंबीवाला ऑथेंटिक फिल्टर कापी देतो. स्टिल भांड्यात. इथे काय प्रकार आहे ते शोधले पाहिजे परत जाउन.
मराठी पदार्थांत कोथिंबीर वडी व थालीपीठ आहे. कधीतरी धाडस करेन. साबुदाणा वडा/ खिचडी व फ्राइज उपवास मेन्यु मध्ये आहेत. व बाकी स्टार्ट्रर्स लंच डिनर मेन्यू . इंडिअन चायनीज पिझा बर्गर ज्युसेस पावभाजी चाट मेक्सिकन चंद्रायन तेच ते जे मुंबईत हजारो रेस्टॉरेंट मध्ये असते तेच. पण निवांत बसून आरामात हादडायची नवी जागा सापडली आहे. अगदी घरातून उडी मारून स्केट बोर्डाने घसरत गेले की पाच मिनिटात उडुप्पी टु मुंबै!!
उडुपी टु मुंबई एक चविष्ट प्रवास आज सुरू झाला आहे. बॉन अपाटीट. ( किंवा जे काय म्हणतात ते!!) कभी आये तो गटग जरूर करेंगे.
जय हिंद . जय महाराष्ट्र
फोटो काढलेत फोन वरुन . टाकते
फोटो काढलेत फोन वरुन . टाकते.
यात्रा आवडली आहे. आणि वर्णनही
यात्रा आवडली आहे. आणि वर्णनही.
अमा मस्तच वर्णन.
अमा मस्तच वर्णन.
मुलुंड वेस्टला आहे? मग मला
मुलुंड वेस्टला आहे? मग मला कसं माहित नाही? माझ्या वाधवा atmosphere पासुन किती दूर आहे? मला या क्षणी map वर मुलुंड मधील U2M दिसत नाही.
मुलुंड वेस्टला आहे? मग मला
मुलुंड वेस्टला आहे? मग मला कसं माहित नाही? माझ्या वाधवा atmosphere पासुन किती दूर आहे? मला या क्षणी map वर मुलुंड मधील U2M दिसत नाही.>> एल बी एस वरुन पुढे यायचे. फायर ब्रिगेडच्या पुढे. अजून पुढे आले की आवि आर बिझनेस पार्क. ह्याच्या पुढे लेफट घ्या. पार्क च्या शेजारीच आहे एक वेडिन्ग हॉल व फॅमिली ट्री रेस्टॉ आहे. त्याच्या शेजारी. ही जागा अजून अप डेट झाले नसेल. गुगल मॅपला.
Ok, पत्ता सांगितल्या प्रमाणे
Ok, पत्ता सांगितल्या प्रमाणे बघते. थँक्यू ! (आता map वर पाहिले तर फॅमिली tree फक्त 2km आहे)
तोपर्यंत 'रत्ना' मधुन व्हरायटी batters आणुन घरीच डोसे करावेत. रत्नाची batters आम्ही पुण्याला पण स्मगल करतो, एवढी आवडतात.
तोपर्यंत 'रत्ना' मधुन
तोपर्यंत 'रत्ना' मधुन व्हरायटी batters आणुन घरीच डोसे करावेत. रत्नाची batters आम्ही पुण्याला पण स्मगल करतो, एवढी आवडतात.>> रत्ना मिनि साउथ इंडिया आहे. मी एक दोन दा गेले आहे तिथे. थोडे महाग स्नॅक्स मिळतात तिथे. डोसा बॅटर मी अजून परेन्त घरीच बनवते त्यामुळे कुठले आणले नाही नागरीक स्टोअर किंवा सत्कार नम कीन इस्टा तले विकतात पण मला ते बरोबर आंबलेले वाटत नाही.
इडली डोसा बॅटर वाटायचे व सकाळी उठून चहाच्या आधी ते नीट फुगले आहे का ते बघायचे, मग त्याचा हलकेच आंबूस वास घ्यायचा हे ठरलेले प्रोटो कॉल आहे. आज सुरती कोलम ऑर्डर केला आहे. उद्या आला की दोशाचे भिजिवते. तीन दिवस सुट्टीच आली मेली.
सुरती कोलम ऑर्डर केला आहे.
सुरती कोलम ऑर्डर केला आहे. उद्या आला की दोशाचे भिजिवते.
डोश्यांसाठी सुरती कोलमचा बळी द्यावा लागत नाही. रेशनच्या तांदुळाचेही अगदी मैसुर सिल्क होतात. ( बिझनेस फंडा - कमी कॉस्ट, अधिक नफा)
रवा डोसा पाहुन तोपासु, माझी
रवा डोसा पाहुन तोपासु, माझी पण रेस्टॉरंट्ला गेल्यावर रवा मसाला ही फेवरेट डिश असते. १९८० ते काही वर्षापर्यन्त मुंबईत भरपुर उडपी रेस्तॉरंट होते आता काही बंद होऊन त्या ठिकाणी मॅकडी येत आहे.
अॅबियन्स बघुन २९४ रुपये वसुल आहेत. सायन स्टेशन जवळ रामदेव मध्ये २०० रुपये तरी झाले असते ते ही दाटीवाटीने बसुन.
सगळेच गुजराथी थेपला / ढोकळा खात नाहीत.
उडपी हॉटेलांपेक्षा तमिळ
उडपी हॉटेलांपेक्षा तमिळ हॉटेलांतले डोसा,वडा,सांबार फार चांगले असतात. पण तमिळ हॉटेलेच कमी आहेत.
छान.
छान.
बडिशेपेच्या गोळ्या म्हणून फोटो चुकलाय का अशा व्हिटॅमिन गोळ्या देतात?
>> बंद होऊन त्या ठिकाणी मॅकडी येत आहे>> वाचुन सिमसन आठवला.
Hi these are my medicines . I
Hi these are my medicines . I will take a pic of the badishep in next visit. It is really cute. Kirti Mahal gives only khadi sakhar and badishep.
गोळ्या घ्याव्या लागू नयेत ही
गोळ्या घ्याव्या लागू नयेत ही इच्छा. फोटो छान.
दोन डिशेस चे २९४ रु
दोन डिशेस चे २९४ रु
भारत सोडून बरच काळ झाल्याने असेल कदाचित पण हे वाचून धक्का बसला.
वर्णन, फोटू आवडले. तब्येतीची
वर्णन, फोटू आवडले. तब्येतीची काळजी घ्या अमा!
फोटो छान अमा.
फोटो छान अमा.
रवा मसाला नवऱ्याला फार आवडतो.
प्रेडिक्टेबल व सुरक्षित. इडली
प्रेडिक्टेबल व सुरक्षित. इडली डोसा बिघडवणे अशक्यच आहे >>>> हे शक्य करून दाखवणारे नमुने भेटलेत मला
वर्णन भारी केलंय!!
काय भारी वर्णन केलंय .. अगदी
काय भारी वर्णन केलंय .. अगदी खुसखुशीत.
मला तर त्या आरामशीर सोफ्यांवर एक डुलकी काढावी असेच वाटले. >>>