Submitted by उपाशी बोका on 24 April, 2023 - 13:58
दुसऱ्या धाग्यावर होणारी चर्चा वाचून हा धागा सुरू केला आहे. विविध धर्मांची कर्मकांडे याच्यावर चर्चा होऊ द्या इथे. पटकन सुचलेले उदाहरण म्हणजे हिंदू धर्मातील आरती करणे, मुस्लिम धर्मात नमाज अदा करणे, ख्रिश्चन धर्मात चर्चमध्ये जाणे वगैरे. हा प्रकार कर्मकांड (ritual) या प्रकारात मोडणारा आहे ना? अशी अजून काय कर्मकांडे आहेत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हिंदू धर्मात सत्यनारायाण पूजे
हिंदू धर्मात सत्यनारायाण पूजे सारख्या प्रथांमुळे (कर्मकांड) अपरिमीत नुकसान झाले आहे. केवळ एका घटकाच्या पोटाची ( पिठाची) फार कष्ट न घेता सोय व्हावी म्हणून संपूर्ण धर्माला वेठीस धरले आहे.
राजाने ब्राह्मणाला दान दिले नाही म्हणून त्याचे राज्य गेले, तो भीकेला लागला असल्या हस्यासपद कथा विवेकबुद्धी शाबुत असलेल्या आजच्या पिढीला सांगितल्या तर ते नास्तिक होणे पसंद करतील.
ज्यू आणि मुस्लिम धर्मीय
ज्यू आणि मुस्लिम धर्मीय पाळतात एक अनिष्ट प्रथा, सरकमसिजन (सुंता) करण्याची. >>> सरकमसिजन प्रथेला सध्या तरी थेट अनिष्ट असे लेबल लावता येत नाही. अमेरिकेतील काही राज्यातील आघाडीची (ज्यांची वैद्यकीय सुविधा आणि निष्णात डॉक्टर्सचा ताफा ह्यावरून जगातील अग्रगण्य हॉस्पिटल्स मध्ये गणना होते) ज्यात अगदी अद्ययावत प्रसुतीगृहे आहेत तिथे नवजात बालकांचे सरकमसिजन करण्याचा पर्याय ऊपलब्ध असतो आणि ही सर्जिकल प्रोसीजर नीओनेटल सर्जन करतात. अर्थात ही करून घेणारे बहुसंख्य ज्यू अणि मुस्लिमच असावेत पण सांगायचा मुद्दा हा की अमेरिकन मेडिकल असोसिएशनने ह्यावर अजूनतरी बंदी घातलेली नाही. ही अनावश्यक प्रोसीजर आहे आणि त्यामुळे हॉस्पिटल्सवर ताण पडतो हा मुद्दा जास्त लाऊन धरला जातो पण ही पद्धत अनिष्ट आहे , तिला अजाण बालकांचे बॉडी म्युटिलेशन समजावे असे सरसकट मात्र बहुतांश डॉक्टर्स म्हणत नाही.
ह्याऊलट फीमेल सरकमसिजन विरूद्ध कडक कायदे बर्याच दशकापासून अस्तित्वात आहेत.
सरकमसिजन (सुंता)
सरकमसिजन (सुंता)
>>>
यात नक्की काय करतात आणि का करतात हे कोणी ईथे सांगेल का?
नेहमी हा प्रश्न पडतो पण कधी मुद्दाम गूगल करावेसे कधी वाटले नाही.
कर्मकांडात लोकांच्या भावना
कर्मकांडात लोकांच्या भावना फार गुंतल्या असतात.
मी देवधर्म मानत नसल्याने कर्मकांडे भक्तीभावातून करत नाही. मजा येते म्हणून उडी मारून देवळातली घंटी वाजवतो, आवाज दमदार आहे म्हणून आरती म्हणतो, वा आवडीचा असेल तर प्रसादावर तुटून पडतो. पण आवडीचे नसल्यास त्या वाट्याला जात नाही म्हणून माझ्या घरचे माझ्यावर फार नाराज असायचे. फायनली तू नाही तर तुझी मुले करतील. तुझी बायको त्यांना शिकवेल आणि ही कर्मकांडे पुढच्या पिढीत नेईल असा विचार करून त्यांनी माझे असे असणे स्विकारले. पण लोकांना कर्मकांडाचा वारसा जपायलाही आवडते हे यातून समजले.
येशू ला भेटायचे असेल तर उपास
येशू ला भेटायचे असेल तर उपास पकडा.
असे पाद्री नी सांगितले आणि लोकांनी त्या वर विश्वास ठेवला .
आता पर्यंत 60 मृतदेह मिळाले आहेत.
म्हणजे अंध भक्त प्रतेक धर्मात आहेत.
हुर भेटेल म्हणून suside bomber होणारे मुस्लिम धर्मात आहेत .
मी अश्विनी, ह्यात मुलांच्या
मी अश्विनी, ह्यात मुलांच्या परवानगीचा मुद्दा सुध्दा धरावा लागेल. मुलांच्या परवानगीशिवाय अशी प्रोसिजर करणे चुकीचे वाटते.
ही सर्जिकल प्रोसीजर नीओनेटल
<< मुलांच्या परवानगीचा मुद्दा >>
https://www.shutterstock.com/image-vector/male-circumcision-surgical-rem...
ही सर्जिकल प्रोसीजर नीओनेटल सर्जन करतात म्हणजे १ महिन्यापेक्षा लहान बाळ. ते कसे काय परवानगी देणार आणि तसेही सज्ञान होईपर्यंत लहान मुलांच्या मताला विचारतोय कोण?
अभिराम भडकमकरांच्या
अभिराम भडकमकरांच्या इन्शाअल्ला कादंबरीत सुंता 'सोहळ्या'चे वर्णन आहे. मुलासाठी फारच humiliating and traumatic वाटलं ते.
कान टोचून घेताना तरी कुठे
कान टोचून घेताना तरी कुठे परवानगी विचारतात? (हे समर्थन म्हणून नव्हे, पण 'अमुक धर्माबद्दल का बोलत नाही' असं वाटायला नको म्हणून फक्त...)
मुलांचे कान टोचताना किंवा
मुलांचे कान टोचताना किंवा नाकाला भोक पाडताना तरी कोण त्यांची परवानगी घेते. तसेही हे प्रत्येक गोष्टीत मुलांची परवानगी आणि मुलांचे मत हे अतिजागरूक पालक फॅड आहे. ज्या वयात मुलांना एखाद्या गोष्टीचे महत्व आणि फायदे तोटे सांगूनही समजत नसतील तिथे ते काय आपले मत देणार..
बर्र ते कान नाक टोचणारे डॉक्टरही नसतात..
वेगवेगळ्या धर्मातील काही
वेगवेगळ्या धर्मातील काही प्रथा / कर्मकांड कमी होताहेत, पण म्हणुन काळजी नसावी. धर्म बंद पडणार नाहीत. त्यात नविन प्रथा सुरू होताहेत. आणि बदललेला आधुनिक समाज भेदभाव करत नाही. सगळ्या धर्मांनी एकच नविन common प्रथा सुरू केली आहे. सण आला की loudspeaker वर latest आणि त्यातही शक्यतो चीप गाणी लावायची आणि जगाची पर्वा न करता नाचायचं. प्रेरणा - हिंदु सण उत्सवापासून मिळाली (असावी) पण आता बौद्ध, आणि मुस्लिम सुध्दा ही प्रथा पाळताहेत. ख्रिश्चन लोक यात कधी सामील होतात याची वाट पाहु. म्हणजे या एका बाबतीत भारतातील सर्व धर्माचं एकमत होईल.
(सिख लोक सिनेमातील गाणी नाहीत, पण वर्षातून एकदा कर्कश आवाजात भजन आणि ढोलकी वाजवत, पूर्ण जथा सोसायटीत फिरतो. एकच दिवस पहाटे हा आवाज ऐकायला त्रास होत नाही. खरं तर खड्या आवाजातील भजन यात्रा छान वाटते. ट्रॅफिक जॅम करत नाहीत, म्हणून अजुनच जास्त)
खरं तर खड्या आवाजातील भजन
खरं तर खड्या आवाजातील भजन यात्रा छान वाटते. ट्रॅफिक जॅम करत नाहीत, म्हणून अजुनच जास्त)>> आमच्या इथे ही भजन यात्रा फार मोठी आहे व हजारो लोक्स बायका असतात. ट्रॅफिक जॅम पण होतोच . मी एकदा अडकले आहे. विनोद म्हणजे यात्रा अवॉइड करायला दुसर्या रस्त्याने गेलो तर यात्रा पुढच्या टर्निन्ग ला लेफ्ट मारून आमच्याच आतल्या रस्त्याने परत. मग रिक्षा सोडून पायी पायी घरापरेन्त. ह्यात सुद्धा क्लास डिव्हाइड दिसली. निळ्या ड्रेसातले तलवार घेतलेले लोक्स मस्त आजूबाजूला फिरत होते. हे फार फोटो जेनिक असतात पण तलवारी मुळे फोटो घ्यायची किंवा विचारायची पण भीती वाटली. यात्रेच्या मागे त्या मानाने साध्या कपड्यातल्या व गरीब दिस णार्या बायकांचे पथक रस्ता झाडायचे निदान खराटे घेउन अॅक्टिन्ग करत होते. त्यांना हा कचरा बॅगेत पण भरा असे बारीक आवाजात साम्गायची पण भीती वाटली. इतके दणकट बाप्ये आजूबाजूस उभे होते. मला एक झापड मारली असती तरी पडले असते. गोर्या, सोहणी पंजाबण बायका पुढे ट्रक मध्ये बसून भजने गात होत्या. अवोइडेबल प्रकार टोटली.
मुलांच्या शरीरात भोके पाडणे
मुलांच्या शरीरात भोके पाडणे किंवा कातडी कापणे हे उत्तम पालकत्व आहे काय ?
बर कान टोचणे हे कानात आभूषणे घालायला केले असते. अर्थात ते सुध्दा वाईट आहेच, पण किमान काही उपयोग किंवा हेतू तरी आहे. पण सुंता कशाला ? बायबल किंवा कुराण मध्ये दिले आहे इतक्याच कारणासाठी शिश्र्नावरची कातडी कापायची?!
<<<तसेही हे प्रत्येक गोष्टीत मुलांची परवानगी आणि मुलांचे मत हे अतिजागरूक पालक फॅड आहे. ज्या वयात मुलांना एखाद्या गोष्टीचे महत्व आणि फायदे तोटे सांगूनही समजत नसतील तिथे ते काय आपले मत देणार..>>>
म्हणून आपले विश्वास मुलांवर थोपवायचे ? काहीही कमेंट आहे ही. प्रत्येक गोष्टीत परवानगी हा strawman सुध्दा आहे. मी असे कधीही म्हणले नाही की प्रत्येक गोष्टीत परवानगी हवी.
(Moreover मला हे सुध्दा माहिती आहे की मुलांची परवानगी हा एक myth आहे. पालक त्यांना हवा तसा narrative विणून मुलांकडून हवे ते वदवून घेऊ शकतात. Best case scenario हा आहे की मुलांना त्यांचे पालक पूर्ण context सह सुंता काय असते हे समजावून सांगतील, आणि हे करण्याची गरज नाही असे सुद्धा सांगतील. पण असे क्वचित होते.)
आमच्या इथे ही भजन यात्रा फार
आमच्या इथे ही भजन यात्रा फार मोठी आहे व हजारो लोक्स बायका असतात. ट्रॅफिक जॅम पण होतोच . >>>>> चला काळजी मिटली. भारतीयांच्या नविन धर्म प्रथेत सामील व्हायला सिख सुध्दा eligible आहेत तर. एकजुट हवीच.
संपूर्ण धर्माला वेठीस धरले
संपूर्ण धर्माला वेठीस धरले आहे<<< कैच्याकै
ते नास्तिक होणे पसंद करतील << नास्तिक नाही होत तर त्यांचि श्र्द्धा स्थाने, निमित्त बदलते, एकत्र येण्याचे कारण बदलते, काल्पनिक देवतांच्य ऐवजी प्रासंगिक श्र्द्धा स्थाने जवळ करतील
कान टोचणे हे कानात आभूषणे
कान टोचणे हे कानात आभूषणे घालायला केले असते. >>>>> पण हे देखील मुल स्वतःच ठरवेल ना. (बहुतांश) मुलींना लहानपणापासुन आवड असते, पण किती मुलं कानात आभूषण घालतात? येथील किती पुरुषांनी कानात rings घातले आहेत? पण बहुतेक सगळ्यांचे कान टोचले असतील. (acupuncture वगैरे मला पटत नाही, कारण किती जण त्याबद्दल जाणुन उमजुन कान टोचतात )
आम्ही मुलाचे कान टोचले नाहीत. त्याला स्वतःला फॅशन म्हणून टोचायचे असतील तर तो टोचेल. जसं टॅटू आपले आपण मोठे झाल्यावर करून घेतात)
मी १००% सहमत आहे.
मी १००% सहमत आहे.
<<<<आम्ही मुलाचे कान टोचले नाहीत. त्याला स्वतःला फॅशन म्हणून टोचायचे असतील तर तो टोचेल.>>>
Exactly !
ही शीख लोकांची यात्रा कधी
ही शीख लोकांची यात्रा कधी पाहिली नाही.
पण मुंबईला आमच्या दारातून मुस्लिम धर्मीयांचा जुलूस जातो. तो बघाल तर काय डेंजर.. जोरजोराने छाती बडवत. ब्लेडच्या साखळीने स्वताच्याच पाठीवर फटके मारत, अगदी लहान मुलेही लहूलौहान दिसायची. रस्त्याने जाणे सोडा लहानपणी साधे रस्ता क्रॉस करायची हिंमत नाही व्हायची. तरी आता ते प्रकार दिसत नाहीत हल्ली त्या जुलूसमध्ये. कायद्याने बंद केले का कल्पना नाही. पण मोठमोठाले तीन मजली झेंडे पाचसहा माणसे मिळून कसेबसे सांभाळत न्यायचे, तो डोक्यावर पडला तर कपाळाचे दोन तुकडे ते एक वेगळेच टेंशन असायचे. जुलूस सोबत ॲम्बुलन्स पोलिसगाड्या एक वेगळाच माहौल असायचा. बहुधा ते छाती पिटताना हजरत हुसैन बोलायचे. त्याचा अपभ्रंश कानावर पडल्याने आम्ही त्या जुलूसला हश्शम हुश्शम बोलायचो.
काही किस्से आणि आठवणी आहेत त्या जुलूसच्या...पुन्हा कधीतरी
हा वर उल्लेख केलेला जुलूस
हा वर उल्लेख केलेला जुलूस म्हणजे मुहर्रम.....(नक्की आठवत नाही) पण एका कलिगने सांगितलं होतं की 'हुसेन'च्या कुरबानीचा शोक करण्यासाठी मुस्लिम अनुयायी स्वतःला इजा करून घेतात. जसं Good Friday ला wish करत नाहीत, तसच मुहर्रम देखील दुःखी दिवस असल्यामुळे wish करायचं नसतं. (Happy Good Friday wish करणाऱ्यांना फटके मिळतात
)
मुंबईमधील शेजारी, जे इराणी मुस्लिम होते, त्यांचा MNC मधे Ops manager असणारा तरुण मुलगा देखील मुहर्रमच्या जुलूस मधे स्वतःला खिळ्याच्या बेल्टने जखमी करून घ्यायचा. त्याला दोन तीन वेळेस stiches घ्यावे लागले, दर वर्षी एवढ्या खोल जखमा होतात.
देखील मुहर्रमच्या जुलूस मधे
देखील मुहर्रमच्या जुलूस मधे स्वतःला खिळ्याच्या बेल्टने जखमी करून घ्यायचा. त्याला दोन तीन वेळेस stiches घ्यावे लागले, दर वर्षी एवढ्या खोल जखमा होतात.>>>>> बाप रे!
मोहरम्मच्या दिवशी हसन,हुसेन या नातवंडांच्या (की मुलांच्या)कुर्बानीच्या स्मरणार्थ शोक आणि आत्मक्लेश करुन घेतात.ते पाण्यावाचून तडफडत होते म्हणून मोहरमच्या काळात पाण्याचे डेरे भरुन ठेवलेले असतात.
आमच्याईथे सरबताचे स्टॉल
आमच्याईथे सरबताचे स्टॉल लागलेले असायचे. पिंप पिंप भरून सरबत. फ्री वाटप केले जायचे. लहानपणी एकदा मी एका मित्रासोबत तिथले सरबत प्यायला गेलेलो. प्रत्येकी तीनचार ग्लास रिचवले. मग घरी आल्यावर आम्हाला फार फटके पडले. ते बहुधा फुकट खाण्यापेक्षा मुस्लिम धर्मीयांचे फुकट खाल्ले म्हणून असावेत. तेव्हा हिंदू मुस्लिम फार टेंशन असायचे आमच्याकडे. आता चित्र बदलले आहे. आता ईदच्या पोसलेल्या चरबीयुक्त बोकडावर तुटून पडतो आम्ही. साध्या मटणात ती मजा नाही.
महिनाभर चिकन समोसे. कबाब. प्लेट प्लेट भर हलवा आणि टोप टोप भर शेवयांची खीर खुराक फुकटात कोणी ना कोणी देत राहते.
असली खाण्यापिण्याची कर्मकांडे असावीत आणि सगळ्यांनी मिळून करावीत.
ज्यांच्या प्रेरणेने हा धागा
ज्यांच्या प्रेरणेने हा धागा सुरू केला त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नसावा. ते देखील ह्यात उडी घेणार म्हणाले होते
आजकाल कर्म कमी, कांड जास्त
आजकाल कर्म कमी, कांड जास्त होतात
dj, मोठ्या मिरवणुका, हल्लाड
dj, मोठ्या मिरवणुका, हल्लाड बाजी हा जसा समान धागा सर्व धर्मात आहे .
त्या प्रमाणे काही हजार वर्षापूर्वी लीहाले ल्य कथा किंवा सत्य इतिहास .
काही ही समजा..त्या कथेतील पात्रांचे आदेश अजून पण पाळले जातात.
काही हजार वर्ष पूर्वी माणूस जास्त हुशार की आज जास्त हुशार आहे .नक्कीच आजचा माणूस जास्त हुशार आहे
हेमंत ३३ +१
हेमंत ३३ +१
नक्कीच आजचा माणूस जास्त हुशार
नक्कीच आजचा माणूस जास्त हुशार आहे
>>>>
हे कसे ठरवले?
हेमंत ३३ +१ = हेमंत ३४
हेमंत ३३ +१ = हेमंत ३४
ह्या गणितावरून लक्षात येते की
ह्या गणितावरून लक्षात येते की नक्कीच आजचा माणूस जास्त हुशार आहे
पण मूळ संख्या ३३३ आहे याकडे
पण मूळ संख्या ३३३ आहे याकडे कोणी लक्ष नाही दिले.
आजचा माणुस वेंधळा आहे.
(No subject)
Pages