ओशिबाना - The Pressed Flower Art

Submitted by मनिम्याऊ on 21 March, 2021 - 11:17
रेसिन पेन्डण्ट- गोकर्ण

ज्याप्रमाणे आपल्याकडे ताजी फुले-पाने वापरून रांगोळीच्या विविध रचना करतात त्याचप्रकारे वाळवलेली फुले, पाने, बिया, काटक्या वापरून विविध आकर्षक कलाकृती बनविण्याच्या कलेला ओशिबाना आर्ट म्हणतात.
या प्रकारात चित्रे, निसर्गदृश्ये, देखावे चितारले जातात. ही एक जपानी कला आहे. तिचा उगम जरी १६व्या शतकातील जपानमध्ये झाला असला तरी आज संपूर्ण जगभरात ओशिबाना कलाकार आहेत.
या प्रकारच्या चित्रांसाठी लागणारे साहित्य अगदी सहज उपलब्ध असते. घराच्या बागेतील फुले, पाने, काटक्या. किंवा बाजारात मिळणारे आकर्षक पुष्पगुच्छ; रंगीबेरंगी हार, वेण्या, गजरे. अगदी जे हवे ते वापरू शकता. मात्र वापरायच्या आधी ही फुले काळजीपूर्वक प्रेस करून घ्यायची

फुले जतन करण्याच्या पद्धती:
फुले वाळवून जतन करताना सर्वप्रथम त्यात अजिबात ओलावा नको. त्यासाठी फुले/पाने तोडल्यानंतर साधारण एक तास सामान्य तापमानाला राहू द्यावीत. त्यामुळे त्यावरील दव /पाणी पूर्णपणे सुकून जाईल.
सर्वात सोपी पद्धत म्हणजे एखादया जाड पुस्तकात फुले ठेवून कमीत कमी ८ दिवस तशीच राहू द्यावीत. ही फुले पूर्णपणे फ्लॅट होतात पण या पद्धतीत फुलांचा रंग बदलून एक त्यांवर करडी झाक येते.

दुसरी पद्धत म्हणजे कपड्यांची इस्त्री वापरून. इस्त्री कमीतकमी तापमानावर सेट करून फुले दोन कागदांच्या मध्ये ठेवून त्यावर इस्त्री फिरवतात. यात वापरला जाणारा पेपर absorbent असावा. वर्तमानपत्रे नको.

मायक्रोव्हेव पद्धत: यात बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर पसरून त्यावर फुले/ पाने ३० सेकंदासाठी फिरवून घेतात. आणखी एका पद्धतीत एखाद्या एअर टाईट डब्यात सिलिका जेल पसरून त्यावर फुले ठेवतात. २-३ दिवसात फुले पूर्णपणे वाळतात अणे रंग देखील बराचसा टिकतो.

फुले निवडताना सर्वात ताजी, न चिमलेली अशी घ्यावीत. झाडावरून तोडून घेत असाल तर उमलल्यावर लगेच खुडल्यास उत्तम. कारण प्रेस झाल्यानंतर रंग जरा बदलतो. त्यामुळे फुले त्यांच्या climax रंगावर असतानाच प्रेस करायला ठेवावीत.
डाग पडलेली किंवा पाकळ्या फाटलेली फुले घेऊ नयेत.
फुले जर फुगीर आकारात असतील तर अर्ध्यात कापून मग ठेवावीत.

यानंतर ओशिबाना बनवताना खूप जुनी काळी पडलेली फुले वापरू नयेत. ठेवल्यापासून साधारण १० दिवस ते महिनाभरात फुले पूर्ण वाळतात आणि रंग पण बऱ्यापैकी टिकून असतो.
अशी (ताजी ?) दिसणारी फुले - पाने वापरून मनपसंत चित्रे बनवा. एन्जॉय ..

मी बनवलेले काही ओशिबाना..

१. हे नवीन वर्षानिमित्त.
यात विद्येचे पान, पपईचे पान, रेन लिली आणि सुपारीचे फुल मुख्यतः: वापरले आहे.
IMG_20201220_233746a.jpg
.
२.हे मायबोली गणेशोत्सव २०२० बुकमार्क स्पर्धेसाठी बनविलेले
यात रेन लिली. कुंदाचे पान आणि गुलाब पाकळी
IMG_20200830_184019_0.JPG
.
३. फ्रेंडशिप डे
विद्येचे पान, जांभळ्या कोरांटीचे फूल, पिवळे घंटीचे फूल, गुलाबाची पाकळी, हॅट साठी मधुमालतीचे फूल, झोक्यासाठी गवताची पाटी आणि काटकी
IMG_20201231_232139a.jpg
.
४. बाबाचा हॅपी बर्थडे
गुलाबाची आणि अबोलीची फुले, शेवंती, ख्रिसमसट्रीची पाने, अम्ब्रेला पामची फुले
IMG_20210307_221732.JPG

५. आज्जीचा हॅपी बर्थडे
चाफा, कर्दळी, कुंदा आणि बोगनवेलीची फुले
IMG_20210318_195519.JPG
.
६.
ख्रिसमस (मिक्स मटेरियल)
गवत फुले, काटक्यांचे घर, रांगोळीचा स्नो व कागदी सांता.
IMG_20201222_234422 (1).JPG
.
हे ओशिबाना नाही तरी इथेच देते. dried pressed flowers वापरून बनविलेले resin पेन्डन्ट्स
रातराणी १
IMG_20210318_195021.JPG
रातराणी २.
IMG_20210318_194936.JPG

बेलपत्र
IMG_20210318_190840.jpg

अबोली
IMG_20210318_190645.jpg

कोथिम्बीर
IMG_20210318_190336.jpg

आणखीही पेन्डन्ट्स आहेत. Lol
.
IMG_20210326_115736.JPG
.
IMG_20210326_115703.JPG
.
गोकर्ण
IMG_20210323_190431.JPG

आवडलं तर नक्की सांगा आणि ओशिबाना जरूर try करा. लहानमोठ्या सर्वांना आवडेल आणि जमेल असा सोप्पा तितकाच मस्त प्रकार आहे हा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख ...

जपानमध्ये याचप्रमाणे निरनिराळे किडे असलेली पेंडंटदेखील विकली जातात...

उदाहरणासाठी म्हणून जपानच्या अमेझॉनची एक लिंक देत आहे

https://www.amazon.co.jp/-/en/exquisite-collection-exhibition-childrens-...

सुट्टीतले उद्योग सुरू झालेत.
आधी विजयालक्ष्मीने (माझ्या मुलीने) केलेल्या काही रचना देते.
हे तिच्या UKG च्या टीचरसाठी birthday card
IMG-20230424-WA0000.jpg

ह्या दोघी पक्क्या मैत्रिणी
IMG-20230418-WA0002.jpg
.
IMG-20230424-WA0002.jpg
३.
IMG-20230424-WA0003.jpg
.
IMG-20230424-WA0004.jpg

काही pendants आणि bracelets
१. बोगनवेल आणि पिवळ्या घाणेरीची फुले
IMG_20230424_161105.jpg
२. लाल फुले Euphorbia succulent
IMG_20230424_161030.jpg
३.
IMG-20230424-WA0009.jpg

Keychains
१.
IMG_20230424_161047.jpg
२ चमकीच्या टिकल्या आणि स्टिकर्स वापरून केलेले
IMG_20230424_161124.jpg
.
IMG-20230424-WA0006.jpg

Pages