तू लहर..

Submitted by mi manasi on 5 April, 2023 - 15:01

प्रेमगीत !

तू लहर प्रेमाची
वाट वादळाची
लाट प्रकाशाची
चंद्र ताऱ्यातली...

दरवळतेस तू
माझ्यात परंतु
शोधता थकतो
बात तुझ्यातली...

तू हवीशी हवीशी
मोकळी जराशी
मनाची मनाशी
गाठ बंधातली...

मी जसा निजलासा
जागविशी असा
जशी झंकारते
तार वाद्यातली...

तू नाहीस भुलावा
नच काही कावा
जादुई रात्र ती
आत मनातली...

तू ते संगीत माझे
सूर ताल जे ते
मनाने घातली
साद सुरातली...

मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! शिवाय रोचक छंद. ७-६-६-६ हा छंद पहिल्यांदाच पाहिला. पण तुम्ही तो मुद्दामून सगळ्या कडव्यात वापरला आहे. त्यामागची प्रेरणा ऐकायला आवडेल.

संजना 25 , कुमार १..
प्रतिसादासाठी धन्यवाद!

हरचंद पालव.. षडाक्षरीच लिहायची होती. पण पहिल्या कडव्यात एक 'तू' शब्द जास्त आल्याने तसं झालं. मग पुढे सगळ्याच कडव्यात तशी रचना केली. प्रतिसादासाठी धन्यवाद!