दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह! उत्तरा बावकर!
एकदम करारी वाटायच्या!
त्यांना श्रद्धांजली.

नीना सिंगल मदर असताना सतीश कौशिकनी त्यांना मागणी घातली असेल तर ती आठवण सांगणं उचित आहे. त्यात सतीश यांचा मोठेपणाचा दिसतो.
Submitted by भरत. on 11 March, 2023 - 13:29

सेम सिच्यूएशन असलेला रोल पॉप कौन या शेवटच्या वेब सिरीजमध्ये सतीशनी केला आहे. अश्विनी कळसेकर वन नाईट स्टँडमुळे गरोदर राहते आणि मग अ‍ॅबॉर्शनकरिता सतीश कौशिकपाशी येते. डॉ. असलेला सतीश तिला प्रपोज करतो. लग्न करुन तिच्या मुलाला स्वतःचे नाव देतो.

उत्तरा बावकर आणि सरफरोशमधील सुलतानची आई - सुरेखा सिक्रि या दोघींमध्ये आधी माझा गोंधळ व्हायचा. दोघीही एकाच वयाच्या आणि दोनेक वर्षांच्या फरकाने दोघींचे निधन झाले.

फारच दुर्दैवी घटना, तो सोहळा संध्याकाळी हवा होता, नाहक बळी गेले, सुन्न व्हायला झालंय. श्रद्धांजली.

परवा पहाटेही एक बस दुर्घटना झाली. पिंपरी चिंचवडमधे ढोलपथक गेलेलं गोरेगांवहून, येताना बस बोरघाटात कोसळली, अनेक जण गेले. एकापाठोपाठ एक असं ऐकून खरंच सुन्न. श्रद्धांजली.

अधिकारी फक्त वरच्या अधिकाऱ्याचा आदेश अमलात आणतात. डोकं चालवलं आणि वाद घातला तर गडचिरोलीत बदली होते.
पुढे दुर्दैवी घटना झाली तरी ते जबाबदार नसतात. वरून आदेश आला हे उत्तर.
निवृत्तीनंतर काही सुरस किस्से लिहून पुस्तक कुणाला तरी अर्पण.

फार वाईट घटना दोन्ही.
इतके लोक तासनतास उन्हात थांबले, हे अधिकारी होते का?यांना घरी जायची/काही काळ सावलीत जायची परवानगी नव्हती का?मंडप घातले नव्हते का?

ते स्वाध्यायी असावेत. आपल्या गुरूंच्या पुरस्कार सोहळ्यासाठी सुमारे २० लाख लोक जमले होते. कार्यक्रम भर दुपारी होता. प्रेक्षक उघड्या मैदानांत होते. ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला त्यांनी ४२ डिग्री एवढा कडक तपमानात तासंतास बसलेल्या प्रेक्षकांचा उल्लेखही आपल्या भाषणात केला.

हकनाक गेलेल्या दुर्दैवी जीवांना श्रद्धांजली.

अजूनही इस्पितळात असलेल्यांना लवकर बरे वाटू दे.

सुमारे २२ लाख लोक पावणेबाराच्या समारंभासाठी ७ः४५-८ पासून बसली होती. मंडप म्हणजे छत नव्हते व पाण्याच्या टाक्या ठेवल्या असल्या तरी एवढ्या गर्दीत वाट काढत जाणे म्हणजे त्रासच. त्यात माननीय मुख्यमंत्री सोडल्यास इतरांनी भाषणाची लांबड लावली असे ऐकिवात आहे. साधारण त्रास व्हायला लागला की गर्दी काढता पाय घेते. परंतु ही शिस्तबद्ध गर्दी असल्याने लोकांना चक्कर येत असतानाही आस्थेने थांबून राहिले व घात झाला.
संयोजकांनी व्यवस्थित छताची सोय करणे, समारंभ उन्हं उतरल्यावर करणे किंवा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बंद सभागृहात समारंभ करणे हे ऑप्शन वापरले पाहिजे होते. ही अक्षम्य चूक आहे. कारवाई व्हायला हवीच.
अशा सभांना परवानगी देणार्यांनीही चोख व्यवस्था आहे की नाही यावर लक्ष ठेवले पाहिजे.
राजकिय नेत्यांनीही जिथे तिथे गर्दीचा व लांबलचक भाषणाचा सोस टाळणे उत्तम.
श्रोत्यांनीही गर्दी, तपमान इ. भान ठेवणे गरजेचे. कितीही श्रद्धेय, महत्वाचा माणूस असला तरी तुमच्या जीवापरीस काहीच मोलाचे नाही.

22 लाख मतदारांवर डोळा ठेवून इतका भव्य कार्यक्रम केला असावा का? 14 कोटींचा खर्च केला गेला असे।मीडिया मध्ये वाचनात आले. मग पुरेशा आडोशाची सोय होऊ शकली असती. असो. मृतांना श्रद्धांजली

२२ लाख लोक!!!! पुरस्कार सोहळ्याला इतके लोक येणे हे सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भयानक आहे. इतक्या लोकांची व्यवस्था करणे, त्यांच्यासाठी त्याठिकाणी फिरता दवाखाना, अग्निशमन सुविधा वगैरे असणे आवश्यक आहे. ती नसेल असं नाही, पण इतक्या मोठ्या लोकसंख्यसाठी नक्कीच पुरेशी नसणार. कारण २२ लाख म्हणजे जवळपास एक आख्खं शहर झालं... पुण्यासारख्या शहरात जितक्या अँम्ब्युलन्स आहेत, जितके डॉक्टर, नर्स, पोलीस, अग्निशामक आहेत तितके ह्या सोहळ्याला होते का? शिवाय इतकं रणरणतं ऊन असताना सर्वांना डोक्यावर छप्पर देता येत नसेल तर अश्या ठिकाणी हे कार्यक्रम करायची परवानगीच दिली जाऊ नये. असो, इथे राजकारणावर चर्चा करत नाहीये, पण या दु:खद घटनेने तीव्र संताप येतो आहे.

मृतांना श्रद्धांजली.

<< आपल्या गुरूंच्या पुरस्कार सोहळ्यासाठी... >>
हे २२ लाख मूर्ख लोक मुळात गेलेच कशाला असल्या कार्यक्रमाला, ते पण इतक्या उन्हात आणि उकाड्यात? की पैसे देऊन गोळा केले होते?

श्रद्धांजली!
२२ लाख! बापरे! म्हणजे मुंबई च्या १०% लोक. असं कुठलं मैदान आहे जिकडे २२ लाख लोक मावतील? गर्दी आणि चेंगराचेंगरीच होईल. विश्वास ठेवणं कठिण जातंय मला २२ लाख आकडा वाचुन.

कल्ट लीडर्स व राजकारणी यांचे सिंबायोटिक नाते असते. हे रेडिमेड गर्दी पुरवतात तर ते पुरस्कार वगैरे देतात, महसूल खात्यात 'अडलेली' कामे करून देतात. भारत रत्न सारखा सर्वोच्च पुरस्कारही राष्ट्रपती भवनात नेटक्या कार्यक्रमात दिला जातो. महाराष्ट्र भूषण साठी इतकी गर्दी ( खर्च कुणी केला असेल ?) अनावश्यक होती.

प्रतेक तालुक्यातील ,जिल्ह्यातील,आणि राज्यभर मधील.
अशी श्रद्धा स्थान( देवस्थान किंवा हयात नसलेले लोकप्रिय नेते,गुरू)
ह्यांच्या उस्तावला राजकीय पक्ष खूप पैसे पुरवतात.
लाखो लोक जमा होतात.
काही करोड मध्ये लाखो लोकांपर्यंत ते राजकीय पक्ष पोचतात.
ह्या वर्षी राम नवमी पासून सर्व जयंत्या दणक्यात साजऱ्या झाल्या.
पैसे कोण पुरवत असेल हा प्रश्न पडतोच.
तर हे राजकीय पक्ष.
पुरस्कार देण्याचे पण तेच कारण आहे .
ज्याचे अनुयायी जास्त ते पण अंध अनुयायी.
त्यांना पुरस्कार आणि मोठा सोहळा.
बघायला मिळणार च.
कोणत्या संशोधक, कोणी हुशार डॉक्टर, प्रामाणिक समाज सुधारक जो राजकीय पक्षांशी संबंध च ठेवत नाही.
त्यांना कधी पुरस्कार मिळणार पण नाही आणि त्यांचे सोहळे पण साजरे केले जाणार नाहित.
गणेश उस्तव,शिवजयंती, आंबेडकर जयंती.
म्हणजे ह्या राजकीय पक्षांना सुवर्ण संधी असते.

बापरे..मृतांना श्रद्धांजली.
आम्ही एप्रिल मे मध्ये कधीच भारतात जात नाही पण खरोखर आता गर्मी इतकी झाली आहे का की एप्रिल महिन्याच्या दुपारी काही तास उन्हात काढले तर इतके लोक हॉस्पिटलमध्ये आणि काही लोकांचा तर मृत्यू..

२२ लाख हा फसवा आकडा आहे.
आणि हा अंदाज कसा काढला प्रतेक स्थानिक
प्रभावी व्यक्तीला माणसे जमवायला सांगितले असणार .
म्हणून तर हा आकडा २२ लाखाचा सांगितलं जात आहे.
बीबीसी मराठी सांगत होती ४ लाख पर्यंत च लोक होती.
पण हा आकडा पण खूप मोठा आहे.

Pages