पँडेमिक सगळ्यांच्याच आयुष्यात उलथापालथ करून गेला. रिमोट काम करणं नॉर्म झाला. अजूनही ऑफिसमध्ये पूर्णवेळ ५ हि दिवस माझ्या तरी ओळखीत कोणीच जात नाहीये. बहुतेक कंपन्यानी हायब्रीड मॉडेलचा स्वीकार केलाय. अर्थात हे फक्त डेस्कवर्क करणाऱ्यांसाठी. पण या सगळ्याचा समाजमनावर खूप खोलवर परिणाम झालाय. मुळात आपण सगळी धावपळ कशासाठी करतोय, हा प्रश्न बहुतेक लोकांनी गेल्या ३ वर्षांत एकदा तरी स्वतःलाच विचारला असणार आहे. ज्यांना शाळकरी मुलं नाहीत त्यांनी तर या संधीचा फायदा घेत मोठ्या शहरातून गाव गाठले. एकदा का तुम्ही out of state मूव्ह झाला की कंपन्यांनी नेहमीसाठीच रिमोट वर्क करायला परवानगी द्यावीच लागली. याचा फायदा टेक्सस, फ्लोरिडा सारख्या राज्यांना तर झालाच पण Arkansas सारख्या अगदी 'चार्मिंग' नसलेल्या राज्यांमध्येही घरांच्या किमती डबल झाल्या.
नमनाला घडाभर तेल ओतून झालंय तर आता मुद्द्यावर येते
बरेच दिवसांपासून विचार चालू आहे की New Jersey मध्ये राहून आपल्याला काय मिळतंय ज्यासाठी आपण २-३% प्रॉपर्टी टॅक्स, इनकम टॅक्स, स्टेट टॅक्स भरतोय. आम्ही दोघेही रिमोट वर्क करतो आणि बहुतेक कंपनी कायमचं रिमोट देऊ शकते. आतापर्यंत मुलांच्या शाळेसाठी, नोकरीसाठी इथे राहतोय. पण टेक्सस मध्येही चांगल्या शाळा आहेत. दोन-तीन मित्र जे न्यूयॉर्क/न्यूजर्सीहून मूव्ह झाले ते टेक्ससचे गुणगान गात आहेत. घराच्या किमती जवळजवळ ५०% कमी आहेत. टॅक्स नाही. त्यामुळे भरपूर फरक पडतोय, असं त्यांचं मत पडतंय. पण हे खूपच मोठं decision असणार आहे आमच्यासाठी कारण आम्ही इथे नुकतंच २ वर्षांपूर्वी घर घेतलय. पण आता नवऱ्याला हे घर घेतल्याचा पश्चताप होतोय. inflation, वाढलेल्या किमती आणि आमचे न वाढलेले पगार याने यात अजूनच भर पडतेय.
मूव्ह होणं कठीण आहे. फक्त सांगोवांगीच्या बोलण्यावर विश्वास कितपत ठेवायचा, हा प्रश्न आहे. प्रॉपर्टी prices इथे बसून चेक करता येईल पण जे नुआन्सस असतात त्यांची मोजमाप कशी करणार. racism, गन laws, गर्मी हे नेहमीचे टेक्सस विरुद्धचे पॉईंट्स आहेत. पण हे किती सिरीयस आहेत हे समजत नाहीये.
तुमची मतं ऐकायला आवडेल. टेक्सस शिवाय दुसरा ऑपशन सुचवला तरी चालेल. शाळा मेन प्रायोरिटी आहे.
गेल्या २० वर्शात मी कोस्ट टु
गेल्या २० वर्शात मी कोस्ट टु कोस्टच २ मुव्हिन्ग केलेले आहेत, मी अजुनही इस्ट कोस्ट वेदर विकली फॉलो करते त्यामुळे कॅलिफोर्नियाच वेदर इस्ट कोस्ट पेक्षा केव्हाही चान्गलच आहे या मतावर मी ठाम आहे.
उलट कॅलिफोर्नियामधे त्या एक दोन झिपकोड्स मधे सेण्ट्रलाइज्ड आहेत (बे एरिया मधे कुपर्टिनो स्कूल डिस्ट्रिक्ट व इतर एक दोन). त्यामानाने इतर राज्यांत खूप विखुरलेल्या भागात चांगल्या शाळा आहेत. त्यामुळे राहण्याजोगा भागही बराच मोठा आहे.>>> असहमत, मी नॉथेन आणी सर्द्र्न अशा दोन्ही झिपकोडला राहिले आहे त्यामुळे फक्त बे अरियात शाळा चान्गल्या आहेत हे टोटल अमान्य आहे.
कॅलिफोर्निया पब्लिक स्कुल कधिच बेस्ट स्कुलसाठी प्रसिद्ध नव्हता पण पॉकेटस मधे उत्तम स्कुल डिस्टिक्ट इथेही राज्यभर आहेत .
देसी कम्युनिटी बाबत पुर्णपणे सहमत, आम्ही इस्ट कोस्टला असताना चिक्कार देसी होते आता आहोत तिथे तु म्हणतोयस तसे थोडे फारच देसी आहेत... वी आर हॅपी आबाउट इट, त्यामुळे मुलाच सपुर्ण डायव्हर्स फ्रेन्ड सर्कल तयार झाल आणि माझही.
पॉकेटस मधे उत्तम स्कुल
पॉकेटस मधे उत्तम स्कुल डिस्टिक्ट इथेही राज्यभर आहेत . >>> We are saying the same thing. कॅलिफोर्नियात जेथे आहेत तेथे छोट्या पॉकेट्स मधे आहेत. इतर राज्यांत जास्त मोठ्या एरियात विखुरलेले आहेत. कॅलिफोर्नियात फक्त बे एरियात म्हणायचे नव्हते. ते केवळ एक मला माहीत असलेले उदाहरण म्हणून
३-४ शाळांमधे टोकाची स्पर्धा, अजिबात डायव्हर्सिटी नसणे(*) तर बाकी ठिकाणी दर्जामधे प्रचंड फरक - हे बहुधा कॅलिफोर्नियात जास्त आहे.
(*) इतर अमेरिकेत डायव्हर्सिटी म्हणजे गोर्यांव्यतिरिक्त इतर वंशाचे, धर्माचे ई. लोक असणे. कॅलिफोर्नियात डायव्हर्सिटी म्हणजे देसी व एशियन्स सोडून इतर लोक असणे
(हे ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता - अमेरिकेत एशियन्स म्हणजे चायनीज, कोरियन्स ई. भारतीय त्यात धरत नाहीत. यावर हा एक धमाल व्हिडीओ नुकताच आला होता )
३-४ शाळांमधे टोकाची स्पर्धा,
३-४ शाळांमधे टोकाची स्पर्धा, अजिबात डायव्हर्सिटी नसणे(*) तर बाकी ठिकाणी दर्जामधे प्रचंड फरक - हे बहुधा कॅलिफोर्नियात जास्त आहे.>>> असेल तु म्हणतोयस तसच असेल ,माझा कॅलिफोर्नियाचा अनुभव आणि अभ्यास तुझ्यपेक्षा तुटपुन्जा असु शकेल.
तसही आस्वादला टेक्सासला मुव्ह व्हायच आहे त्यामुळे ह्यावर फार चर्चा करुन धागाकर्तिला काही मदत होणार नाही.
माझाही कॅलिफोर्नियाचा थेट
माझाही कॅलिफोर्नियाचा थेट अनुभव फक्त बे एरियापुरताच आहे. तेथे हे चित्र दिसले आहे. बाकी इतके माहीत नाही. मीही थोडे जनरलाइज केले आहे
अरे काय हे! दोन दोन पावलं
अरे काय हे! दोन दोन पावलं मागे येणं शोभत नाही हो तुम्हा दोघांना!
मला कॅलिफोर्निया, कॅनडा व
मला कॅलिफोर्निया, कॅनडा व टेक्सास मधे रहाण्याचा अनुभव आहे. टेक्सास मधेही उत्तम शाळा आहेत. तुम्ही डॅलसचा विचार करताय तर तिथे देसी बुजबुजाट व चांगल्या शाळा आहेत. तुम्ही वर्षभरासाठी येऊन बघा, नाही पटलं तर परत न्यूजर्सीला जा. एवढंही गरम नाही टेक्सास, आपण भारतातले आहोत नं. हाकानाका. एसी चालू असते दिवसरात्र, आपल्याला कुठं उन्हातान्हात नांगर ओढत शेती करायची आहे.
मला अमेरिकेपेक्षा कॅनडा जास्त आवडते, पण माझे कारण वैयक्तिक आहे. अमेरिका सगळीकडे सारखीच आहे. सगळीकडे बिलंच तर भरायची आहेत, कमी तितकी चांगली.! शिवाय रेसिझम व अंधाधुंद गोळीबार अमेरिकेत कुठेही कधीही होऊ शकतो.
टेक्सास खूप मोठं आहे . माझा अनुभव San Antonio पुरता आहे. हिरवंगार आहे सध्या सॅन ॲन्टोनियो, भरपूर पाऊस पडतो. मला कॅलिफोर्निया प्रचंड महाग व रिप ऑफ वाटते. मी सप्टेंबर मध्ये LA ला गेले होते , तेव्हा तर प्रचंड हीट व्हेवने जीव जायची वेळ आली होती. नुसता रखरखाट झाला आहे. चांगल्या शाळा शोधल्यास कुठेही सापडू शकतात, केवढा मोठा देश आहे. शाळेला प्राधान्य न देता आर्थिक स्थैर्याला द्या. मी असंच केलं असतं. तुम्हाला निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा.
एसी चालू असते दिवसरात्र,
एसी चालू असते दिवसरात्र, आपल्याला कुठं उन्हातान्हात नांगर ओढत शेती करायची आहे. Proud >> उगाच फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम चा ठपका नको म्हणून एसी बंद करून ठेवायचा असेल तर ....
>>उगाच फर्स्ट वर्ल्ड
>>उगाच फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम चा ठपका नको म्हणून एसी बंद करून ठेवायचा असेल तर ....>>
फर्स्ट वर्ल्डला एसीचे बटण बंद
फर्स्ट वर्ल्डला एसीचे बटण बंद करून 'मॅन्युअली' थर्ड वर्ल्ड करायचं की काय, आधी ते The Garden state मधले हिटर बंद करावं लागेल मग..! सध्या आमच्याकडे सकाळी हिवाळा , दुपारी उन्हाळा व विकांताला पावसाळा आहे. पधारो म्हारे 'द लोन स्टार स्टेट'
कॅलिफोर्निया प्रचंड महाग व
कॅलिफोर्निया प्रचंड महाग व रिप ऑफ >>>१००% सहमत
You can check out any time
You can check out any time you like
But you can never leave
सध्या आमच्याकडे सकाळी हिवाळा
सध्या आमच्याकडे सकाळी हिवाळा , दुपारी उन्हाळा व विकांताला पावसाळा आहे. >>>
हायला, हे तर आमच्या ओहायोतले हवामान दिसतंय
टेक्सासची ड्रायव्हिंग टेस्ट
टेक्सासची ड्रायव्हिंग टेस्ट पास करता येईल का पण तुम्हाला? इथे बर्फावरून गाडी चालवायला लावतात. चालवता आली तर फेल करतात.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
कॅलिफोर्निया महाग आहेच. न्यू जर्सी इतकंच. (मी LA जवळचा एरिया बद्दल बोलतेय, बे एरिया अजूनच महाग). बाकी कॅलिफोर्नियावाले लोक अगदी पुलंच्या भाषेत 'जाज्वल्य अभिमान' बाळगून असतात. भाऊ तिथे राहत असल्याने वरचेवर जाणं होतं. साऊथ कॅली तर मला फार रखरखाट वाटतो. हिरवळ नाही, गर्मी बऱ्यापैकी असतेच तिथेही. कूकी कटर घरं. आणि ट्रॅफिक किती! सगळंच लांब लांब आहे असं वाटतं. earthquacks, wildfires सतत काहीतरी असतंच. जर मूव्ह व्हायचंच तर सगळे फॅक्टर्स काउन्ट करावे लागतील ना. ऑप्टिमल टेम्प, natural calamities झोन नसणे हे महत्वाचे मुद्दे वाटतायत मला तरी.
शाळांची रेटिंगस usnews वर पहिले तर K -१२ साठी बेस्ट न्यू जर्सी आणि मॅसाच्युसेट्स आहे. पण इथे तुम्ही म्हटल्याप्रमाणे शाळा शोधल्या तर सगळीकडेच चांगल्या मिळतील.
बाकी एक प्रश्न मनात येतोय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पुढल्या १२-१५ वर्षांत तशीच पाण्याची टंचाई वाढेल. मग जिथे पहिलेच पाण्याची टंचाई आहे (सीव्हिअर नसली तरीही) तिथे मूव्ह होणं समजदारी आहे का? त्यापेक्षा आहे तिथे राहावं असं वाटतय.
ऑप्टिमल टेम्प, natural
ऑप्टिमल टेम्प, natural calamities झोन नसणे हे महत्वाचे मुद्दे वाटतायत मला तरी.>>> हे अमेरिकेच्या नकाशावर कुठे सापडल तर मलाही सान्गा.
त्यापेक्षा आहे तिथे राहावं असं वाटतय.>>> बेस्ट ! नाहितरी कुठेही जा बसायच सगळ्याना भपक बोटितच.
कॅलिफोर्नियावाले लोक अगदी
कॅलिफोर्नियावाले लोक अगदी पुलंच्या भाषेत 'जाज्वल्य अभिमान' बाळगून असतात. >>>
इकडचे मराठी लोकं बे एरियाला 'सदाशिव पेठ' म्हणतात.
७-८ वर्षात बघितलं त्यावरून एव्हढं म्हणेन (पुलंच्या भाषेत ) मुंबई सारखाच जागेचा प्रश्न माता पित्यानी सोडवला असेल (aaditional व्हिसा प्रश्न नसेल) तर "बे एरिया " राहायला उत्तम !
>>हे ज्यांना माहीत नाही
>>हे ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता - अमेरिकेत एशियन्स म्हणजे चायनीज, कोरियन्स ई. भारतीय त्यात धरत नाहीत.<<
डूड, सिरियस्ली? वरची क्लिप बघुन हा समज करुन घेतला असेल तर, सॅडलि यु डिडंट गेट इट. इट वाज पार्ट ऑफ द रोस्ट...
डूड, सिरीयसली? माझ्या
डूड, सिरीयसली? माझ्या पोस्टवरून हा समज करून घेतला असेल तर you need to understand "whatever it is that you have to understand"
https://www.youtube.com/watch?v=Njsp3NyM7Fo&t=311s
>>डूड, सिरीयसली? माझ्या
>>डूड, सिरीयसली? माझ्या पोस्टवरून हा समज करून घेतला असेल तर you need to understand "whatever it is that you have to understand" Wink<<
समज? अरे तुम्हि लिहिलंय तसं वर छातीठोकपणे - हे ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता - अमेरिकेत एशियन्स म्हणजे चायनीज, कोरियन्स ई. भारतीय त्यात धरत नाहीत ; त्यात अजुन वेगळा समज कसला करुन घ्यायचा, डोंबल्याचा...
मग ते खरेच आहे की. बहुतांश
मग ते खरेच आहे की. बहुतांश ठिकाणी एशियन्स म्हणले की चायनीज ई. संदर्भानेच असते की. भारतीय कोठे असतात त्यात.
त्या लिन्कचा संदर्भ तोच आहे. ही जी काय इंटरप्रिटेशन्स आहेत त्यावरूनच ते रोस्टिंग आहे.
>>मग ते खरेच आहे की. बहुतांश
>>मग ते खरेच आहे की. बहुतांश ठिकाणी एशियन्स म्हणले की चायनीज ई. संदर्भानेच असते की. भारतीय कोठे असतात त्यात.<<
काय बोलणार यावर. थांबतो...
फा बरोबर आहेत. एशिअन्स म्हणजे
फा बरोबर आहेत. एशिअन्स म्हणजे चायनिज, कोरिअन असाच समज असतो. आपण साउथ अॅशिअन आहोत हे खिजगणतीत नसते
बरोबर आहे. आपण साऊथ एशियन्स.
बरोबर आहे. आपण साऊथ एशियन्स.
तुम्हाला बर्याचश्या भारतीय
तुम्हाला बर्याचश्या भारतीय लोकांसारखे फक्त भारतीय रेस्टॉरंट्स, भारतीय सिनेमे, भारतीय लोक यांच्यातच रहायचे असेल तर न्यू जर्सीला या.
गुजराती शिका.
मग एडिसन म्हणजे अहमदाबाद नि पारसिप्पनि म्हणजे वडोदरा!
एकाहि अ-भारतीय माणसाशी न बोलता जीवन जगू शकाल. कारण कित्येक दुकाने हि भारतीयच चालवतात. मोठमोठ्या दुकानात सुद्धा भारतीयच लोक नोकरीला असतात.
इथल्या मराठी विश्वात इतके महाराष्ट्रीय आहेत की गर्दी फार होते म्हणून बरेचसे वयस्क लोक कार्यक्रमांनाहि जात नाहीत.
भारतीय नाटक सिनेमा, गाणे बजावणे अगदी भारतातल्यासारखे सुरु असते.
नद्याजी.. हल्ली लोक न्यूजर्सी
नद्याजी.. हल्ली लोक न्यूजर्सी मधून टेक्सासला जातात, गर्दी खूप म्हणुन.. आणि तिकडे उन्हाळा असतो म्हणुन..
Pages