ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच!
यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
१) गुळ बनवण्याच्या आधुनिक प्रक्रियेबद्दल माहीती मिळवणे.
२) ज्य लोकांची गुर्हाळे सध्या सुरु आहेत त्यांचेशी कायम संपर्कात राहणे.
३) कोल्हापुर/सातारा भागातील मित्रांकडुन याबद्दल अधिक माहिती मिळवणे.
....चंप्या गुळवाला!
********
आरती यांनी दिलेल्या पत्तावरुन जय किसान ऑरगॅनिक जॅगरी (सेंद्रिय गुळ) उत्पादन केंद्र, केरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापुर येथील श्री मारुती पाटील यांना संपर्क केला. अस्सल कोल्हापुरी टोन मध्ये अध्यात्मिक पिंड असलेला शेतकरी माणुस मिळाला! आरतीला धन्यवाद!
जय किसान ऑरगॅनिक जॅगरी (सेंद्रिय गुळ) उत्पादन केंद्र मध्ये, निवाळ सेंद्रिय खतावर पिकवलेल्या उसावर प्रक्रिया करुन गुळ निर्मीती केली जाते. देशभरात त्याची विक्री होते. परदेशात पाठवायला गुळ च शिल्लक राहत नाही! कुणाला हवा असेल तर त्यांचेशी संपर्क करा! (आधी माझेकडुन नंबर घ्या!)
त्यांचे एक सहकारी श्री बागल सर (जे डी. फार्म. कॉलेजवर प्राध्यापक आहेत) ते देखील सेंद्रीय गुळ, तांदुळ, गहु चे उत्पादन घेतात. त्यांची उत्पादने भारतातील पंचतारांकित हॉटेल अन लंडन येथे विकली जातात. कुणाला हवा असेल तर त्यांचेशी संपर्क करा! (आधी माझेकडुन नंबर घ्या!)
श्री बागल व श्री पाटील अन त्यांचे ६८ शेतकरी मित्र मिळुन वसुंधरा सेंद्रीय शेतकरी संघटना चालवतात. शेतकर्याच्या मालाला योग्य मोबदला मिळावा म्हणुन प्रयत्न करीत असतात. त्यांना अनेक शुभेच्छा
*********
श्री सुनिल परचुरे ह्यांनी लिहिलेल्या कोल्हापुर कि गुळपुर च्या अनुशंगाने दोन व्हिडेओ:
सदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.
१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.
http://www.youtube.com/watch?v=lwnNpceVpmA
२) हा व्हिडेओ पाहण्या अगोदरः इथे बनलेला गुळ हा खाण्यासाठी नसुन, गुजरात, दीव, दमन ला डिस्टीलरी मध्ये लागणारा गुळ आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अस्वच्छता खुप आहे.
http://www.youtube.com/watch?v=fFxM9zgSsNk
३) कोल्हापुर टाईप चे गुर्हाळ मधील काहील. (श्री सुनील परचुरे ह्यांचे कडुन साभार!)
http://www.youtube.com/watch?v=XOCxKzuJKGc
चंंपक, प्रथम तुझे हार्दिक
चंंपक, प्रथम तुझे हार्दिक अभिनंदन..
>>> हे न टाकता शेल्फ लाईफ वाढू शकते कां?? जर शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी हे टाकावे लागत असेल तर हे सेंद्रीय कसे??
अहो लोणच्यात मीठ, तेल हे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठीच पुरेसे घालावे लागते. त्याप्रमाणे गुळात काही आवश्यक द्रव्ये घालावी लागतील. आता ती कुठली असतात, त्याबद्दल जास्त माहिती नाही.
- पिंगू
To increase shelf life,
To increase shelf life, additives and प्रेसर्वेटीव टाकतात्...पण तो एक पर्याय आहे. पारंपारिक पद्धतीमध्ये असे केमिकल- सिण्थेतिक केमिकल - टाकले जात नसत. तीच पद्धत आज ऑर्गॅनिक म्हणुन पुन्हा रुजते आहे.
या व्यतिरिक्त, हवाबंद डवे आणि, वाफे च्या सहाय्याने स्टरलाईसेशन करने - रिटॉर्ट पद्धत - असे अनेक पर्याय आहे.
राम राम मंड्ळी !
राम राम मंड्ळी !
लवकरच येतोय !
गुळापासुन बनवल्या जाणार्या
गुळापासुन बनवल्या जाणार्या विविध पदार्थांच्या पाककृति हव्या आहेत. ( पाककृती विभागात नविन धागा उघडता येत नाहिये :()
उद. चिक्कि, ब्र्फी. लाडु. गुलाबजामुन, कुकिज. चॉकोलेट्स. इत्यादि.
धन्यवाद!
चंपक,
चंपक,
फेसबुक वर अंगत पंगत ग्रूप आहे त्याचे सभासद्त्व घेउन तिथे विचारले तर लगेच माहिती मिळेल. बी तिथे मेंबर आहे. त्याला मेसेज टाक. इथे माहिती हवी आहे मध्ये धागा निघेल बहु दा.
जाहिर निमंत्रणः
जाहिर निमंत्रणः
दररोज एक टन नैसर्गिक गूळ निर्माण करणार्या आमच्या गुर्हाळाला अवश्य भेट द्या.
पत्ता: नेवासा फाटा. नगर - संभाजीनगर महामार्गावर, नगर पासुन पुढे ५५ किमी.
फिलगुड गूळ !
२२ ला पाडव्याच्या दिवशी
२२ ला पाडव्याच्या दिवशी कुलदेवांच्या दर्शनासाठी आम्ही नगरला आलो होतो. आधी माहिती असती तर तुमच्या गुर्हाळाला भेट देण्याचा प्रयत्न नक्की केला असता. आता आमची नगरवारी डायरेक्ट पुढील गुढीपाडव्याला. २०१० चा धागा आहे आणि आता २०२३.. तुमच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतला सलाम.
आणि तुम्हाला खूप सा-या शुभेच्छा.
चंपक, अभिनंदन व शुभेच्छा!
चंपक, अभिनंदन व शुभेच्छा!
@निल्सनः पुढच्या वर्षी लवकर
@निल्सनः पुढच्या वर्षी लवकर या !
धन्यवाद !! पी. एच. डी. केलेल्यांना एवढी चिकाटी तर असणार च ना
चंपक तुमचं अभिनंदन आणि
चंपक तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
2006 ला श्रीरामपूर सोडल्यावर तिथे जाणं झालंच नाही परत, कधी त्या भागात जाणं झालं तर जरूर भेट द्यायला आवडेल.
गुळ विकत घ्यायचा असेल तर कुठे
गुळ विकत घ्यायचा असेल तर कुठे मिळेल व कसा ऑर्डर करायचा?
अभिनंदन चंपक !! नेवासे येथे
अभिनंदन चंपक !! नेवासे येथे मोहीनीराज दर्शनाला येऊन गेलो . नगर रोड हून आत वळतो तोच नेवासा फाटा का ? परत आले तर नक्की भेट देईन . आत्ता गुऱ्हाळ किती दिवस चालू आहे ? पुण्यात हवे असेल तर कसे मिळेल ?
गुळ विकत घ्यायचा असेल तर कुठे
गुळ विकत घ्यायचा असेल तर कुठे मिळेल व कसा ऑर्डर करायचा >>>>>>>> आपले लोकेशन कळववे. जवळपास रिटेलर्स असतील तर सांगतो.
१० किलो पॅक सर्व महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट ने पाठवतो.
ई कॉमर्स साईट वर नोंदणी अजुन सुरु आहे.
नगर रोड हून आत वळतो तोच
नगर रोड हून आत वळतो तोच नेवासा फाटा का ? >>> होय!
गुऱ्हाळ किती दिवस चालू आहे ? >>>
जुन शेवटा पर्यंन्त सुरु असेल. पाऊस सुरु झाला कि काम थांबवावे लागते.
नगर रोड हून आत वळतो तोच
नगर रोड हून आत वळतो तोच नेवासा फाटा का ? >>> होय!
गुऱ्हाळ किती दिवस चालू आहे ? >>>
जुन शेवटा पर्यंन्त सुरु असेल. पाऊस सुरु झाला कि काम थांबवावे लागते.
या वर्षी ५० टनी गुर्हाळ सुरु
या वर्षी ५० टनी गुर्हाळ सुरु केलेले आहे.
नवीन उत्पादनांसह लवकरच भेटु !
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन.
Pages