नमस्कार मंडळी
माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला आणि हैराण झालो. त्याची ही ओळख.
तर चित्रपटाची नायिका लूसी ही एक सामान्य मुलगी आहे आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिचा काही दिवसांपूर्वीच ओळख झालेला बॉयफ्रेंड तिला एक काम सांगतो. तो म्हणतो की त्यांच्याकडची सुटकेस समोरच्या हॉटेलातील काउंटरवर नेऊन दिलीस तर तुला एक हजार डॉलर मिळतील. अर्थात हा काहीतरी झोल असणार असे वाटून ती नकार देते. पण तिचा बॉयफ्रेंड एका बेडीने ती सुटकेस तिच्या हातालाच अडकवतो आणि तिचा नाईलाज होतो. बॉयफ्रेंड बाहेर थांबतो आणि ती हॉटेलात शिरते आणि काउंटरवर जाऊन त्या विशिष्ट माणसाचे (मी. चँग ) नाव सांगते. रिसेप्शनिस्ट मी. चँग ला फोन लावतो आणि २ मिनिटात तद्दन गुंड दिसणारे सुटाबुटातले कोरियन किंवा तत्सम लोक तिथे येतात. आल्या आल्या ते लुसीच्या बॉयफ्रेंडला गोळी घालतात आणि लुसीला ओढत घेऊन जाऊ लागतात. जाताना काउंटरवरच्या माणसाने तोंड बंद ठेवावे म्हणून नोटांचे बंडल त्याच्यासमोर ठेवतात. भयंकर घाबरलेली असहाय लूसी अगतिकपणे त्यांच्यामागून फरफटत जाते. ते लोक तिची भेट आपल्या बॉसशी घालून देतात. हा माणूस नुकताच एका खून करून बाहेर आलाय आणि रक्ताचे डाग अजून त्याच्या चेहऱ्यावर आहेत. तो थंडपणे लुसीला ती सुटकेस उघडायला सांगतो, आणि त्याच्यातून ४ निळ्या रंगाची ड्रग्जची पाकिटे निघतात. मी.चँग ते ड्रग तपासण्यासाठी एका माणसाला ते खायला देतो आणि ताबडतोब तो माणूस भयानक वेड्यासारखा वागू लागतो. ड्रगच्या परिणामकारकतेची खात्री पटलेला चँग त्या माणसाला तिथेच गोळी घालतो आणि ते रक्त लुसीच्या चेहऱ्यावर उडते. एकूण चित्रपट सुरु होताच लूसी काही मिनिटातच एका भयानक चक्रात अडकलेली दिसते.
या सगळ्या प्रकाराने प्रचंड घाबरलेली लूसी पुन्हा पुन्हा त्या माणसांना विनंती करते की मी विद्यार्थी आहे आणि मला हे सगळे करायचे नाही. मला सोडा. पण ते लोक तिला बेशुद्ध करतात. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिला जाणवते की आपल्या पोटावर एका ठिकाणी वेदना होताहेत आणि काहीतरी कट केले आहे. तिला शंका येते की बहुतेक आपली किडनी किंवा दुसरा एखादा अवयव काढला असावा. पण लवकरच एका निष्णात डॉक्टर , जो त्या गुंडाना सामील असतो, तिथे येतो आणि तिला समजावतो की काळजी करू नको. आम्ही फक्त तुझ्या पोटात त्या ड्रग्जची म्हणजे सी पी एच ४ ची एक पिशवी ठेवली आहे. आणि ती तुला आम्ही सांगू तिथे नेऊन द्यायची आहे. तिथे अजून असे ३ जण असतात ज्यांच्यावर हीच कामगिरी आलेली असते. लवकरच त्या ४ जणांना वेगवेगळ्या ठिकाणी कैद करून ठेवले जाते. लूसी कैदेत असताना साखळीने बांधलेल्या अवस्थेत तिथला एकजण तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करू लागतो. पण लूसी त्याला विरोध करते. याचा राग येऊन तो तिला लाथ मारतो आणि ती नेमकी तिच्या पोटावर बसून पोटातील ड्रग्जची पिशवी फुटते. अतिशय परिणामकारक असे ते ड्रग ताबडतोब तिच्या रक्तात मिसळले जाऊ लागते आणि लुसीच्या मेंदूत काहीतरी अमानवी घडू लागते.
इकडे सीन बदलतो. जगाच्या दुसऱ्या टोकाला प्रोफेसर सॅम्युएल एका व्याख्यानात सांगत आहेत की माणूस सहसा आपल्या मेंदूचा चार ते दहा टक्के हिस्साच वापरतो.हा हिस्साच त्याला इतके सगळे संशोधन करायला पुरे होतो.आजवर एकाच माणसाने १३ टक्के मेंदू वापरला होता तो म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन. शिवाय एका प्राणी, डॉल्फिन २० टक्के मेंदू वापरतो आणि त्यामुळे त्याला आश्चर्यकारक संदेशवहन करता येऊ शकते. जर माणसाने २० टक्के मेंदू वापरला तर तो आपल्या पूर्ण शरीराचे नियंत्रण करू शकेल. श्रोत्यांपैकी एकजण विचारतो की जर एखाद्याने १०० टक्के मेंदू वापरला तर काय होईल? त्यावर प्रोफेसर निरुत्तर होतात आणि विचारात पडतात.
सीन बदलून पुन्हा लुसीवर येतो. प्रो.सॅम्युएल ची थियरी वगैरे काहीच माहित नसताना ड्रगच्या प्रभावामुळे आतापर्यंत तिचा मेंदू २० टक्के उघडला आहे. आता ती आधीची लूसी राहिलेली नाही. तिच्या जाणीव रुंदावल्या आहेत. तिला सर्व जगातील सर्व भाषा , चालू असलेले सगळे संवाद, सगळे काही समजते आहे. तिचा मेंदू सुपर एक्टीव्ह झालाय. ती सहजरित्या त्या जेलमधून स्वतःची सुटका करून घेते, आपल्या खांद्यात घुसलेली गोळी स्वतःच खेचून काढते आणि पुढे हॉस्पिटलमध्ये जाऊन सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये घुसून चालू ऑपरेशन बंद करायला सांगून त्याच टेबलावर स्वतः झोपते आणि डॉक्टरला सगळ्या सूचना देऊन भूल न देता आपल्या पोटातील ड्रग्जची पिशवी काढायला सांगते. ऑपरेशन होते. लूसी डॉक्टरला विचारते की काम झाले का? तेव्हा तो म्हणतो की मी पिशवी काढली , पण त्यातले अर्धे ड्रग आधीच तुझ्या शरीरात गेले आहे. तो विचारतो की हे कोणते ड्रग आहे? तिने नाव सांगताच तो हैराण होतो. काही लोक हे ड्रग कृत्रिम रित्या बनवायचा प्रयत्न करत आहेत असे त्याने ऐकले असते. पण हे ड्रग बनले आहे आणि त्याचे अर्धे पाकीट पचवलेली व्यक्ती आपल्यासमोर आहे हे त्याला झेपत नसते. तो लुसीला स्पष्ट सांगतो की तुझे आता काय होईल हे मी खरेच सांगू शकत नाही.
लूसी तिथून बाहेर पडते. तिला आता भय,चिंता, शोक अशा कुठल्याही मानवी संवेदना जाणवत नाहीत. तिला आपण आईच्या पोटात असताना काय केले हे आठवते,तिला झाडांची मुळे पाणी कसे शोषतात हे दिसते, पृथ्वीचे फिरणे जाणवते थोडक्यात ती विश्वाशी एकरूप झाली आहे. ती पुन्हा मी. चँगकडे वळते. बाकीची ड्रगची पाकिटे कुठे पाठवली आहेत हे तिला जाणून घ्यायचे आहे. अर्थातच तो तिला काहीही सांगायला नकार देतो. पण सगळ्या पलीकडे गेलेली लूसी त्याच्या दोन्ही पंजात चालू खुपसून त्याला असहाय करते आणि आपल्या बोटानी त्याच्या कपाळाला स्पर्श करून सगळी माहिती जणू वाचते. आता तिला एक पाकीट बर्लिन, एक रोम आणि एक पॅरिसला गेल्याचे समजते. लूसी घरी येते आणि इंटरनेटवरून प्रो. सॅम्युएल च्या संशोधनाविषयी सगळे वाचुन काढते. लगेच ती त्यांना फोन करते आणि मला तुम्हाला भेटायचे आहे असे सांगते. तिने त्यांचे सगळे संशोधन वाचले आहे हेही सांगते. त्यावर प्रो. सॅम्युएल पहिले हसतात आणि चेष्टेवारी नेतात. पण जेव्हा लूसी त्यांचा टी व्ही, मोबाईल आणि इतर गोष्टी कंट्रोल करून त्यांना थक्क करते तेव्हा मात्र त्यांना हे मान्य करावेच लागते. पुढे ती हेही सांगते माझा मेंदू आतापावेतो ३० टक्के उघडला आहे आणि मी जगातील सगळी इलेक्ट्रो मॅग्नेटिक उपकरणे कंट्रोल करू शकते.मला कोणत्याही मानवी भावना जाणवत नाहीत आणि मला काय होत आहे हे मला समजत नाही. सी पी एच ४ ड्रग पोटात गेल्याने असे होत आहे. मी १२ तासात तुम्हाला भेटते.
लूसी आता प्रो. सॅम्युएल कडे जायला निघते आणि वाटेत ट्रान्झिट एअरपोर्टवर एका मुख्य पोलीस अधिकाऱ्याला फोन करून ह्या ड्रग रॅकेट ची सगळी माहिती देते. अर्थातच तो प्रथम तिची मस्करी करतो. पण तिने सांगितलेले बारकावे जसे की "तुझ्या उजव्या हाताला लाल रंगाचे पेन आहे ते उचल आणि लिही" किंवा" मी तुझ्या स्क्रीनवर पाठवलेले फोटो प्रिंट कर" , हे त्याला विश्वास ठेवायला भाग पाडतात. आणि लवकरच ते ३ लोक इअरपोर्टवर पकडले जातात. लूसी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते.पण तिच्या पोटातले ड्रग आता वेगाने काम करू लागले आहे आणि विमानात तिला जाणवते की आपली त्वचा विरघळत आहे.कदाचित तिचे शरीर लवकरच नाहीसे होऊ घातले आहे की काय असे वाटून ती टॉयलेटमध्ये जाऊन उरलेली अर्धे पाकीटही घेते. शुद्धीवर आल्यावर तिला समजते की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. तिने ज्या इन्स्पेक्टरला सगळी माहिती दिलेली असते त्यानेच तिला इथे आणले असते. त्याला वाटत असते की लूसी गुन्हेगार आहे. त्यामुळे ती बाहेर आल्यावर सगळे तिच्यावर पिस्तूल रोखतात. पण शुद्धीवर आलेली लूसी त्यांची सगळी शस्त्रे केवळ नजरेने निष्प्रभ करते आणि इन्स्पेक्टरला आपल्या बरोबर घेऊन त्या ३ पेडलर्सकडे निघते. आयुष्यात पहिल्यांदाच गाडी चालविणारी लूसी ज्या सफाईदार पद्धतीने गाडी चालवते ते बघताना इन्स्पेक्टर भांबावतो.
इकडे बाकीचे ३ पेडलर्स दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असतात आणि पोलीस त्यांच्याकडचे ड्रग मिळवायचा प्रयत्न करत असतात. मी. चँगचे हस्तकही ती पाकिटे मिळवण्यासाठी तिकडे येऊन पोचलेले असतात.आतापावेतो लूसीचा मेंदू ६० टक्के उघडलेला आहे आणि ती दुसऱ्या माणसाला कंट्रोल करू शकते. लूसी हॉस्पिटलात जाते आणि आपल्या केवळ नजरेने गुंडाना बांधून ठेवते आणि ड्रग्जची पाकिटे मिळवून प्रो. सॅम्युएल कडे जाते. तिथे प्रो. ने अजून काही डॉक्टरांना हा प्रयोग बघण्यासाठी बोलावले आहे. त्यापैकी एक डॉक्टरांचा अविश्वास दूर करायला लूसी त्यांच्या मुलीच्या मृत्यूची कथा जशीच्या तशी सांगते, जणू ती त्यावेळी तिकडे होतीच. यानंतर प्रो. चा विश्वास बसावा म्हणून लूसी तिला समजणाऱ्या अनेक गोष्टी सांगत राहते. चित्रपटात हा सगळा संवाद फार इंटरेस्टिंग आहे.ती प्रो. ना हेही विचारते की मला खूप गोष्टी माहित झाल्या आहेत.या सगळ्या ज्ञानाचे मी आता काय करू? त्यावर प्रो. तिला म्हणतात की "जे एकादि पेशी करते तेच, म्हणजे ते ज्ञान टिकवण्यासाठी पुढच्या पेशीला देते. पण आता तुझ्याकडे तेव्हढाही वेळ नाही."-
दरम्यान मी. चँग आपल्या गुंडांसकट ड्रग मिळवायला तिथे येऊन पोचतात. इन्स्पेक्टर आत येऊन सांगतो की घाई करा. ते लोक इथे पोचले आहेत आणि पोलीस त्यांना फार वेळ अडवू शकणार नाहीत. आता मात्र काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली असते.नाहीतरी लूसी फारकाळ राहणार नसतेच. जणू तिचे शरीर मेंदूत बदलत चालले आहे. तिकडे मी. चँग ची टोळी आणि पोलिसात घमासान सुरु होते. शेवटी मी. चँग सगळ्यावर मात करून लूसी जिथे असते तिथे पोचतो. पुढे काय होते? चँग च्या हाती ड्रग लागते का?लुसीचे काय होते?तिचे ज्ञान पुढच्या पिढीसाठी टिकून राहते का आणि कसे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर चित्रपट नक्की बघा.(समाप्त)
हा मस्त सिनेमा आहे नक्की बघा
हा मस्त सिनेमा आहे नक्की बघा . स्कार्लेट जो. व कोरिअन व्हिलेन आहे.
हा पिक्चर मिस झाला होता.
हा पिक्चर मिस झाला होता. नक्की बघणार.
इंटरेस्टिंग.
इंटरेस्टिंग.
मस्तच !
मस्तच !
हा सगळीकडे रेंटवर आहे मुवि.
हा सगळीकडे रेंटवर आहे मुवि. नेफ्ली आमच्याकडे नाहीये, त्यावर आहे मात्र प्राईम आहे तर त्यावर रेंटवर आहे. युट्युबवरही रेंट वर. त्यात खूप मागे नेफ्ली एक महिना फ्री घेतलेलं, तेव्हा नवऱ्याचा बघून झालाय त्यामुळे एकटीसाठी रेंटवर घ्यावं असं वाटत नाही.
बघितलाय..मस्त आहे.
बघितलाय..
मस्त आहे.
अर्धाच लेख वाचला..
अर्धाच लेख वाचला..
पिक्चरचे सीन बाय सीन सर्वच वर्णन केलेय त्यामुळे थांबलो. बघायलाच मजा. लेखाला तसा स्पॉईलर टाकता येईल का....
पण भन्नाट आहे कल्पना.. केशवकूल यांची एखादी कथा वाचावी तसा फिल आला.
अतिशय भारी सिनेमा, मी कैक
अतिशय भारी सिनेमा, मी कैक वेळा बघितला आहे. कहाणी अतर्क्य आहे पण कन्विन्सिंग वाटते.
स्पेशली असहाय्य लुसी आणि हरणाची शिकार करायला आलेले दोन चित्ते हे इतक्या भारी पद्धतीने घेतलंय ना त्याल तोड नाही. नंतरही तिच्यात होत जाणारे बदल पण खल्लास.
अर्थात त्या पोलिसाला का घेतलं मध्ये, मध्येच अंधातरी का सोडून दिलं, इतकी पॉवर असतानाही तिला बाकी लोकांची गरज का लागते वगैरे प्रश्न विचारायचे नाहीत.....
सरांना अनुमोदन, फ्रेम बाय फ्रेम वर्णन लिहीलं आहे परिक्षण म्हणून, ते बदलता येईल का, त्यातलं तुम्हाला काय भावलं ते लिहा वाटल्यास
असुदे फ्रेम टू फ्रेम, बघू न
असुदे फ्रेम टू फ्रेम, बघू न शकणाऱ्या लोकांसाठी चित्रदर्शी.
तो फिल येणार नाही हो, आणि
तो फिल येणार नाही हो, आणि ज्यांना बघायचा आहे त्यांचा विरस मात्र होईल.
पूर्ण वाचले. शक्यतो अशा
पूर्ण वाचले. शक्यतो अशा पद्धतीने संपूर्ण कथानक देऊ नये ( उत्तम चित्रपटांच्या बाबतीत).
काही प्रश्न आहेत. मेंदूच्या वापराची शक्यता हे गृहीत धरले तरी सुद्धा सुपरपॉवर्स कशा येतील ? कल्पनाचमत्कृती हाच जॉनर असेल तर हरकत नाही.
वरतीच स्पॉयलर अलर्ट लिहिलं तर
वरतीच स्पॉयलर अलर्ट लिहिलं त्यांनी तर बरं होईल.
@ अन्जू
@ अन्जू
Lucy in the Sky With Diamonds.
हा पिक्चर बघायचा असेल तर विपु पहा.
वाचली विपु, धन्यवाद केशवसुत.
वाचली विपु, धन्यवाद केशवसुत.
एक लुसी इन द स्काय प्राईमवर आहे, नासा वगैरे आहे त्यात. तो दिसतोय आमच्याकडे.
ती ल्युसी निराळी आहे.
हे बीटल्सचे मला आवडणारे गाणे आहे. सहज आठवले ते लिहिले.
अच्छा, असं आहे का.
अच्छा, असं आहे का.
Prime वर rent वर आहे हा
Prime वर rent वर आहे हा
जाऊदे किती ठिकाणी पैसे घालवणार
Prime वर without रेट आला की बघेन
अरे विदाऊट रेंट येईल की नाही
अरे विदाऊट रेंट येईल की नाही शंका वाटते मला, तसा नवा नाहीये हा मग का रेंटवर ते समजत नाही.
प्राईम फसवणूक आहे, एकतर १४९९
प्राईम फसवणूक आहे, एकतर १४९९ घेतात आण बरेचसे सिनेमे रेंटवर
गॉन विथ द विंड पण रेंटवर आहे
मी नवऱ्याला सांगते काही घेऊ
मी नवऱ्याला सांगते काही घेऊ नकोस प्राईम पण ऐकत नाही तो, भावाकडेही दिलंय आम्ही account शेअर करून म्हणून ठीक.
मस्त चित्रपट. इथले वाचुन
मस्त चित्रपट. इथले वाचुन पाहिला.
माणुस जास्तीचा मेंदु वापरायला लागल्यावर त्याच्या भावना संपायला लागतात हे बघितल्यावर अतीहुशार माणसे बिक्षिप्त का असतात ते जरासे कळल्यासारखे वाटले.
मेंदूच्या वापराची शक्यता हे गृहीत धरले तरी सुद्धा सुपरपॉवर्स कशा येतील>>>>
आइनस्टाइनला रिलेटिविटीचा शोध लागला ही देखिल सुपर पॉवरच की. अचाट शारिरीक हालचाली करता येणे हीच सुपर पॉवर असे थोडेच आहे. तरी आइन्स्टाईन फक्त १३ टक्केच वापरु शकला.
ल्युसीला स्वत:चा वेळ वाढवायला डृग हवे होते आणि ते ज्याम्च्याकडे होते त्या वेगवेगळ्या देशातील लोकांना पकडुन आणायला पोलिस मदत लागली असे असेल.