"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
हातच्या कंकणाला आरसा कशाला
हातच्या कंकणाला आरसा कशाला
लंकेत सोन्याच्या विटा
लंकेत सोन्याच्या विटा
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
हात दाखवून अवलक्षण
हात दाखवून अवलक्षणहलवायाच्या घरावर तुळशीपत्र
चिंती परा ते येई घरा
चिंती परा ते येई घरा
मन चिंती ते वैरी न चिंती.
मन चिंती ते वैरी न चिंती.
मनात मांडे पदरात धोंडे
मनात मांडे पदरात धोंडे
मनी नाही भाव आणि देवा मला पाव
मनी नाही भाव अन देवा मला पाव.
साखरेचे खाणार त्याला देव
साखरेचे खाणार त्याला देव देणार
खाई त्याला खवखवे
खाई त्याला खवखवे
वासरात लंगडी गाय शहाणी
वासरात लंगडी गाय शहाणी
कसायाला गाय धार्जिणी.
कसायाला गाय धार्जिणी.
नसून खोळंबा असून दाटी
नसून खोळंबा असून दाटी
गरजवंताला अक्कल नसते
गरजवंताला अक्कल नसते
गरज सरो वैद्य मरो.
गरज सरो वैद्य मरो.
राजा उदार झाला हाती भोपळा
राजा उदार झाला हाती भोपळा दिला
आयजीच्या जीवावर बायजी उदार
आयजीच्या जीवावर बायजी उदार
शेळी जाते जिवानिशी खाणारा
शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड
शेळी जाते जीवानीशी, खाणारा
शेळी जाते जीवानीशी, खाणारा म्हणतो वातड.
डोळ्यात केर आणि कानात फुंकर
डोळ्यात केर आणि कानात फुंकर
धागा वर आणण्यासाठी मीच पुन्हा
धागा वर आणण्यासाठी मीच पुन्हा लिहीत आहे! क्षमस्व !
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन
नव्याचे नऊ दिवस
नव्याचे नऊ दिवस
सरड्याची धाव कुंपणापर्यंत
सरड्याची धाव कुंपणापर्यंत
तेरड्याचे रंग तीन दिवस
तेरड्याचे रंग तीन दिवस
तीन तिघाडा काम बिघाडा
तीन तिघाडा काम बिघाडा
दाम करी काम
दाम करी काम
मनी वसे ते स्वप्नी दिसे
मनी वसे ते स्वप्नी दिसे
स्वाप्नातल्या लिंबोळ्या,
स्वाप्नातल्या लिंबोळ्या, अंगणातल्या रांगोळ्या
मूळ पोस्ट मध्ये उदाहरणादाखल
मूळ पोस्ट मध्ये उदाहरणादाखल दिलेली आहे पण प्रतिसादांमध्ये दिसली नाही.
नाचता येईना अंगण वाकडे रांधता येईना ओली लाकडे
इथे ल घ्यायला हवा, न ची म्हण
इथे ल घ्यायला हवा, न ची म्हण का घेतली?
लहान तोंडी मोठा घास.
Pages