"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
नका नका पायलीभर चाखा
नका नका पायलीभर चाखा
खाली मुंडी पाताळ धुंडी.
खाली मुंडी पाताळ धुंडी.
डोळे आणि कान ह्यात चार
डोळे आणि कान ह्यात चार बोटांचं अंतर असतं. (ही म्हण आहे का?)
नाही ही म्हण नाही, पण मलाही ड
नाही ही म्हण नाही, पण मलाही ड वरुन आठवत नाही काही.
डोंगर पोखरुन उंदीर
डोंगर पोखरुन उंदीर
म्हण आहे का वाक्प्रचार?
म्हण असावी.
म्हण असावी.
रात्र थोडी सोंग फार.
हे दोन्ही बाद, उंदीर पहील्या पानावर येऊन गेलाय आणि चर्चा झालीय, हाहाहा.
डोंगर पोखरुन उंदिर वाक्प्रचार
डोंगर पोखरुन उंदिर वाक्प्रचार असावा.
हपांची असेल की म्हण... नसेल तर तयार करायला काहीच हरकत नाही
डोळे, कान यांवरून बर्याच
डोळे, कान यांवरून बर्याच म्हणी असायला हव्यात.
कानामागून आली आणि तिखट झाली.
लेकी बोले सुने लागे
लहान तोंडी मोठा घास
नाव मोठे लक्षण खोटे
नाव मोठे लक्षण खोटे
खोट्याच्या कपाळी गोटा
खोट्याच्या कपाळी गोटा
खोट्याच्या कपाळी गोटा.
खोट्याच्या कपाळी गोटा. चालेल का.
स्वाती यांनी आधीच लिहीली आहे,
स्वाती यांनी आधीच लिहीली आहे, त्यांची गृहीत धरावी.
टांगा पळती घोडे फरार!
टांगा पळती घोडे फरार!
मगाचची माझी चालेल
मगाचची माझी चालेल
रात्र थोडी सोंग फार.
अंगापेक्षा बोंगा नि कुठे जाशी
अंगापेक्षा बोंगा नि कुठे जाशी सोंगा
रिकामा न्हावी भिंतीला तुमड्या
रिकामा न्हावी भिंतीला तुमड्या लावी
वळणाचं पाणी वळणाकडेच जाणार.
वळणाचं पाणी वळणाकडेच जाणार.
रडतराव घोड्यावर
रडतराव घोड्यावर
ओ माझी म्हण मारली का
ओ माझी म्हण मारली का अनुल्लेखानं तुम्ही!
वळणाचं पाणी नाही ते.
वळणाचं पाणी नाही ते.
स्वाती यांनी लिहीलंय त्यावरुन
स्वाती यांनी लिहीलंय त्यावरुन पुढे जाऊया, छान आहे त्यांची म्हण.
वळणाचं पाणी नाही ते. >>> हो
वळणाचं पाणी नाही ते. >>> हो का, मी तशीच ऐकली आहे.
'वळणाचं पाणी वळणावर/कडे' आहे
'वळणाचं पाणी वळणावर/कडे' आहे ना वाक्प्रचार? तुम्ही 'वळचणीचे पाणी आढ्या' समजताय का, भरत?
>>> टांगा पळती घोडे फरार!
टांगा पलटी ना?
अंगापेक्षा बोंगा नि कुठे जाशी
अंगापेक्षा बोंगा नि कुठे जाशी सोंगा >>> इथून जाऊया का पुढे.
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
टांगा पलटी ना? >>> हो मी अशीच ऐकली आहे.
हो हो. पलटी.
हो हो. पलटी.
मी ती म्हण आधी ऐकली नव्हती.
मी ती म्हण आधी ऐकली नव्हती. माहितीत भर पडली.
शेळी जाते जिवानिशी खाणारा
शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड
खाई त्याला खवखवे
खाई त्याला खवखवे
खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी
खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी
Pages