"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
लहान तोंडी मोठा घास
लहान तोंडी मोठा घास
सासू बोले सुने लागे
सासू बोले सुने लागे
तोंड काळे करणे
रद्द
ससासूसाठीं रडे सून, बाई
सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून
नाकापेक्षा मोती जड
नाकापेक्षा मोती जड
डोंगर पोखरून उंदीर काढणे
डोंगर पोखरून उंदीर काढणे
नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा
नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा...
हात दाखवून आवलक्षण
हात दाखवून आवलक्षण
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
घरोघरी मातीच्या चुली
घरोघरी मातीच्या चुली
लाथ मारिन तिथे पाणी काढीन
लाथ मारिन तिथे पाणी काढीन
नावडतीचे मीठ अळणी.
नावडतीचे मीठ अळणी.
जजखमेवर मीठ चोळणें
जखमेवर मीठ चोळणें
हा वाक्प्रचार झाला. वरचा
हा वाक्प्रचार झाला. वरचा डोंगर उंदीर सुद्धा.
शक्यतो म्हणी वापरू. म्हण स्वतंत्र वाक्य असते. वाक्प्रचार
बहुतकरून एखाद्या वाक्यात क्रियापदासारखा वापरतात
ण चा न नका पेक्षा मोती जड
ण चा न
नका पेक्षा मोती जड
डोके सलामत तच पगडी पचास
डोकं सलामत तो पगडी पचास
डोळ्यात केर अन कानात फुंकर
डोळ्यात केर अन कानात फुंकर
रात्र थोडी आणि सोंगं फार.
रात्र थोडी आणि सोंगं फार.
रोज मरे त्याला कोण रडे?
रोज मरे त्याला कोण रडे?
डोळ्यात अंजन घालणे
डोळ्यात अंजन घालणे
नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
यज्ञास बळी बोकडाचा.
यज्ञास बळी बोकडाचा.
चोराच्या उलट्या बोंबा
चोराच्या उलट्या बोंबा
च
च
चोरीचा मामला हळू हळू बोंबला
बळी तो कान पिळी
ब - बळी तो कान पिळी
ब बळी तो कान पिळी
.
ळ लेकी बोले सुने लागे
ळ
लेकी बोले सुने लागे
गाढवाला गुळाची चव काय?
गाढवाला गुळाची चव काय?
वर आलीय ना ती ?
वर आलीय ना ती ?
गावात नाही झाड अन म्हणे
गावात नाही झाड अन म्हणे एरंडाला आले पान.
Pages