मेडिकल इन्शुरन्स बद्दल माहिती हवी आहे

Submitted by रीया on 20 February, 2023 - 00:46

कॅन्सर सरवायवर. वय वर्षे 54. मेडिकल इन्शुरन्स काढायचा आहे पण cancer कुठेच कव्हर होणार नाही असं कळालं. हे ठीकच आहे पण इतर बाकीचे आत्ता नसलेले पण नंतर झाले तर असे आजार कव्हर होतील अशी कुठली health insunrance सजेस्ट कराल का? एजंट च्या मते एकदा कॅन्सर झाला की कुठलीच मेडिकल पॉलिसी मिळू शकत नाही. मला काही हे बरोबर वाटत नाहीये.

केअर हेल्थ इन्शुरन्स बद्दल ऐकलं आहे का? कसा आहे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Icici ची कॅन्सर पॉलिसी आहे.पण झाल्यावर मिळत नाही बहुतेक.
कंपनी च्या इन्श्युरन्स ला टॉप अप घेऊन थोडे जास्त पैसे देऊन कव्हर होत नाहीये का?
साबांचा झाला होता.

भरतदादा, ही पॉलिसी इन्शुरन्स घेतल्या नंतर कॅन्सर झाला तर त्या संबंधी आहे (LIC मध्ये जाऊन कन्फर्म केलं आहे)

अनू, आधी कोणतीही पॉलिसी नव्हती. आत्ताच पहिल्यांदा काढणार आहे.
पुन्हा झालाच तर कॅन्सर कव्हर नाही झाला तरी चालेल पण इतर सगळं कव्हर होईला हवं. तशी मिळत नाहीये सध्या.
ICICI ची माहिती मिळेल का? कुठे बघू? बँकेत गेले तर माहिती मिळेल का?

रिया,
एकदा आजारी पडून गेल्यानन्तरचे नियम फार कॉम्प्लिकेटेड आहेत. इथे माबोवरच्या डॉक्टर मंडळींना काही माहीत असेल तर.
बाकी आजारात तो आजार परत 4 वर्षे कव्हर करत नाहीत असा सर्वसाधारण नियम.
कॅन्सर बाबत माहीत नाही.

Btw, त्यांचा नोकरीत असताना असेल ना एखादा इन्शुरन्स? सरकारी नोकरीत असतील तर ग्रुप मेडिक्लेम सारखा असेल ना?
काही सरकारी नोकरांना रिटायरमेंट नंतर देखील ठराविक विमा असतो असे ऐकून आहे.
असा काही असेल इन्शुरन्स तर त्यावर top up हा देखील एक option आहे.
अर्थात वय वर्षे 50 नंतर health इन्शुरन्स प्रीमियम जास्त असतो हे लक्षात असू दे.
वार्षिक 50 K एका parent साठी भरणारे ऑफिसात काही लोकं माहीत आहेत.

तुमच्या ऑफिसात ऍड ऑन करून parent ऍड होतात का बघ. तो सोपा उपाय.

https://www.iciciprulife.com/health-insurance-plans/icici-pru-heart-canc...

(डिस्कलेमर: मी icici ची प्रमोटर नाही.इतर कोणी रॅलीगियर, मॅक्स बुपा वगैरे ची अजून चांगली असेल तर बघावे लागेल)
माझ्याकडे icici ची ही आहे.हार्ट 5 लाख कॅन्सर 10 लाख अशी.सध्या तरी सुदैवाने दोन्ही नाहीये.
591 महिना प्रीमियम आहे.

असलेल्या कॅन्सर साठी नवी पॉलिसी बहुतेक कोणतीच भारतीय कंपनी काढू देणार नाही.ते नोकरी च्या कव्हरड डिपेंडंट मध्येच करावं लागेल असं वाटतं.असलेल्या डायबिटीस साठी पॉलिसी नव्या काढता येतात.याबद्दल कोणासाठी तरी चौकशी केली होती.
https://www.policybazaar.com/health-insurance/critical-illness-insurance....

https://joinditto.in

https://joinditto.in

रिया, भारतात आहात का? या वेबसाईटवर जाऊन फ्रि कॉल बुक करा. तुम्ही दिलेल्या वेळेत त्यांचा फोन येतो. सगळ्या शंकांची उत्तरे मिळतात. सल्ला देतात. काहीही विकायचा, गळ्यात मारायचा प्रयत्न करत नाहीत. मला फार चांगला अनुभव आहे.
आपणा सर्वांना वैयक्तिक अनुभव असतात, माहिती पण लिमिटेड असू शकते. शक्यतो असे कोणीतरी असावे की ज्यांना त्या ईंडस्ट्रीमधील सगळ्या प्रोडक्टसची माहिती आहे.

कंपनी मध्ये काम करताना ज्या ग्रुप पॉलिसी असतात(, corporate policy)
Hya मध्ये हॉस्पिटल काही चोकशी करत नाही.
तुमची सर्व बिल सहज पास होतात.
पण तुमची individual पॉलिसी असेल आणि अगदी किरकोळ आजार जरी असेल तरी हजार प्रश्न इन्शुरन्स कंपन्या विचारतात.
त्यांचे प्रतिनिधी अनेक चोकशा करतात.
भेट पण देतात .आणि सरळ तीव्र क्लेम फेटाळले जाते.
T and c मध्ये अनेक अटी असतात.
क्लेम फेटाळण्यात काही अडचण येत नाही.
हे सामान्य आजार विषयी आहे
कॅन्सर सारख्या आजारात तर क्लेम मंजूर होणे अशक्य च.
कॉर्पोरेट पॉलिसी नसेल तर

Btw, त्यांचा नोकरीत असताना असेल ना एखादा इन्शुरन्स?
>>
नाहीये.

माझ्या ऑफिस मध्ये नाही करता येणार काही कारणांनी.

असलेल्या कॅन्सर साठी नवी पॉलिसी बहुतेक कोणतीच भारतीय कंपनी काढू देणार नाही.
>>>>
हेच म्हणणं आहे एजंट्स चं पण म्हणूनच मला ठाम माहिती हवी आहे कारण रिटायरमेंट साठी मेडिकल इन्शुरन्स mandetory आहे.

अतरंगी, हो भारतातच आहे. थँक्स असंच काही हवं होतं. बघते.

हेमंत, कॉर्पोरेट पॉलिसी नाही.

माझ्या ऑफिस मध्ये नाही करता येणार काही कारणांनी. >> कारण फारच खाजगी नसेल तर कारण कळू शकेल का?

कंपनीने इतकी काळजी तर नक्कीच घेतली पाहिजे की त्यांचा एक एम्प्लॉयी काही कारणास्तव ग्रुप इन्शुरन्स घेत नाही आहे तर काय कारण आहे आणि त्याकरता काय बदल करणे गरजेचे आहे.

https://joinditto.in
रिया, भारतात आहात का? या वेबसाईटवर जाऊन फ्रि कॉल बुक करा. >> +१
किंवा पॉलिसी बझार मध्ये खरा फोन नंबर टाकुन सगळ्या कंपन्याचे estimate घ्या आणि गप्प बसा. मग पुढचे दो दिवस सगळ्या कंपन्याचा एजंटचे फोनच फोन. त्यात ते सगळ्या शंका दुर करतील. स्वानुभवावरुन सांगतोय.

नरेश, खाजगी कारण असल्याने सांगू शकत नाही.

Joinditto वर उद्याची अपॉइंटमेंट घेतली आहे. इकडे अपडेट करेन.

कॅन्सर चं वाढतं प्रमाण बघता कंपन्यांनी हे इन्शुरन्स सुरू करायला हवेत. भले तुम्ही कॅन्सर कव्हर करू नका पण अजिबात इतर काहीच कव्हर करणार नाही असं करू नये.
भारतात प्रत्येकाने प्लिज मेक शूअर करा केस तुमची मेडिक्लेम पॉलिसी आहे. अनुभवातून तावून सुलखून निघाल्याने मनापासून सांगते आहे. काही कारणांनी तुमची पॉलिसी नसेल तर लगेच घ्या.

पॉलिसी घेणे ,कमी पैसे आणि जास्त फायदे अशी पॉलिसी घेणे..हे वेगळे आहे.
Policy bajar वर ते सर्व ऑप्शन मिळतील.
पण शेवटी ते विकणारे एजंट आहेत.
पण वेळ असल्यावर क्लेम पास करताना दमझक होते.
कॉर्पोरेट पॉलिसी नसेल तर.
हे पण अनुभव मधून च सांगत आहे.
दोन्ही पॉलिसी च अनुभव आहे

विमा हा विमा असतो. काही जबाबदारी निपटण्यासाठी. तशी नसेलच तर विम्याचे हप्ते न भरण्यात जे पैसे वाचतात त्यात खूप काही करता येते.

<< दोन्ही पॉलिसी च अनुभव आहे >>
मला वाटतंय की त्यांचा प्रश्न वैयक्तिक पॉलिसी विकत घेण्याबद्दल आहे, कॉर्पोरेट पॉलिसी बद्दल नाही.
आणि क्लेमचा मुद्दा नंतर, आधी पॉलिसी घेता येईल का? हा प्रश्न आहे.

केअर हेल्थ इन्शुरन्स च्या आफ्टर सेल सर्विस बद्दल अनुभव वाईट आहे.
माझ्या काकांना IRDA आणि बिमा लोकपाल कडे खेटे घालावे लागत आहेत.

माझी आणि माझ्या एका जवळच्या मित्राची केअरचीच पॉलिसी आहे. चार वर्षे झाली. सात की आठ क्लेम झाले. अजुनतरी काही प्रॉब्लेम आला नाही.

चांगले वाईट असे अनुभव प्रत्येक इन्शुरन्स प्रोव्हाडरचे येऊ शकतात.

अतरंगी , तुम्ही काय केलंत ज्याने क्लेम प्रोसेस फास्ट झाली ते सांगितलंत तर इतरांना अनुभव मिळेल.
आम्हाला सध्या फक्त केअर हा एकच ऑपशन दिसतोय. स्टार वाले ऍप्लिकेशन रिजेक्ट करत आहेत. आज माझा फोन झाला की आणखी जे डिटेल्स मिळतील ते इथे टाकेन.

माझ्या माहितीप्रमाणे सर्व इन्शुरन्स प्रोव्हाडर्सची क्लेम प्रोसेस सारखीच असते.

१. काही ट्रिटमेंट घ्यायची असेल तर अ‍ॅडमिट व्हायच्या आधी इन्शुरन्स प्रोव्हाडरला कळवणे. रिपोर्ट्स पाठवणे
२. इमर्जन्सी मधे अ‍ॅडमिट करावे लागल्यास अ‍ॅडमिट केल्यावर ( साधारण पणे २४ तासांच्या आत) त्यांना कळवणे.
३. शक्यतो त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटल मधेच अ‍ॅडमिट करणे. तसे न केल्यास डिसचार्ज मिळाल्यावर त्यांना सगळे रिपोर्ट व बिल्स पाठवणे. बिलामधून एक फिक्स्ड पर्सेंटेज डिडक्ट होते.

बाकी जे कॉमन मुद्दे आहेत जसे की रुमचे प्रकार कोणते कव्हर आहेत, अ‍ॅम्बुलन्सचे चार्जेस, मोठ्या आजारातील अ‍ॅडमिट व्हायच्या आधीच्या व नंतरच्या किती दिवसातील कोणते आणि किती खर्च कव्हर होतात वगैरे त्यात वेगवेगळ्या प्रोव्हाडर्सचे वेगवेगळे नियम आहेत. पण त्यात बहुतेक फार काही तफावत नसते. प्रत्येकाचे काही न काही छोटे छोटे प्लस मायनस पॉईंट आहेत.

नो क्लेम बोनस, टॉप अप वगैरे व्यवस्थित पाहून घ्या. त्यात फरक आहेत.

मी पॉलिसी काढून चार वर्षे झाली. डिट्टोची सर्विस लाँच झाल्यावर त्यांना फोन करुन विचारले होते. त्यांनी माझ्या पॉलिसी मधे जे निगेटिव्ह पॉईंट आहेत त्याची कल्पना देऊन, आहे तीच पॉलिसी चालू ठेवायचा सल्ला दिला.

रिया
तुला एक मेसेज केला आहे

कॅन्सर रिकव्हरी झालेल्या पेशंट साठी पण पॉलिसी उपलब्ध आहे

अतरंगी चांगली माहिती.
आम्ही पण दोन मध्ये वेळा क्लेम केला आणि पैसे त्याच दिवशी मिळाले. ( नेटवर्क हॉस्पिटल मध्ये कॅशलेस क्लेम होते) त्यासाठी आणखी काही मुद्दे.

१> आपला इन्शुरन्स प्रोव्हाडर्स चा TPA चा फोन नंबर आपल्या कडे असावा . TPA चे डिटेल्स पॉलिसी वर असतात.
२> मागच्या ४ वर्षा च्या पॉलिसी चे डिटेल्स आपल्या कडे तयार ठेवावेत. पॉलिसी नंबर असलेल्या पानाचा फोटो किंवा pdf आपल्या फोनवर ठेवणे.
३> शक्यतो कॅश लेस हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावेत. पुण्यात दिनानाथ , सह्याद्री मध्ये कॅश लेस क्लेम करु शकतो. आणखी काही हॉस्पिटल्स पण असतिल.
४> हॉस्पिटल ला कॅश लेस क्लेम करणार आहेत याची कल्पना द्यावी.
५> डिसचार्ज च्या ४ तास आधी हॉस्पिटल ला बिल इन्शुरन्स प्रोव्हाडर्स किंवा TPA ला सबमिट करण्यास सांगायचे. कॅश लेस मध्ये TPA ला २ तासात उत्तर देणे बंधन्कारक आहे. त्यामुळे दोन तासानी त्याना फोन करुन काय डॉक्युमेट पाहिजेत त्याची चौकशी करुन लगेच ते डॉक्युमेंट ईमेल करावे. शकयतो मागच्या ४ वर्षा च्या पॉलिसी , आधार विचारतात. इन्शुरन्स प्रोव्हाडर्स TPA बदलत असतात त्यामुळे त्याचा कडे ४ वर्षाचे डिटेल्स कधी कधी नसतात. कायद्याने TPA च्या फोन लाईन्स १२ महिने , २४ तास चालु असायल्या हव्यात.
६> TPA कडुन फोन वर क्लियरन्स आल्यावर हॉस्पिटलच्या मागे लागुन जे उरलेले बिल भरणे. यासाठी १ तास जातो.

काय झालं पुढे? Joinditto कडून कळलं का काही?

<< कॅन्सर रिकव्हरी झालेल्या पेशंट साठी पण पॉलिसी उपलब्ध आहे. >>
इतकी धाडसी कंपनी कुठली आहे? पॉलिसी देणाऱ्या कंपनीची फायनांशियल ताकदपण बघून घ्या आधी. नाहीतर होईल काय की पॉलिसी होल्डरच्या आधी, ती कंपनीच गचकलेली असायची.

@उपाशी बोका
तुमच्या प्रतिसादाला अनुसरून
मलाही हाच प्रश्न पडलेला..
Aggressive, advanced, recurrent, metastatic अशा कर्करोगांना विमासंरक्षण मिळणे अवघड/ दुरापास्त आहे.
कुणी देत असेल तर नक्कीच मेख असणार.
कर्करोगनिदानपश्चात पाच वर्षे जीवित या गृहितकाचा आधार त्या विमादाता कंपनीने घेतलेला असावा.
त्या कंपनीचे नाव न दिल्याने नेमके धुंडाळता आले नाही

काय झालं पुढे? Joinditto कडून कळलं का काही?

<< कॅन्सर रिकव्हरी झालेल्या पेशंट साठी पण पॉलिसी उपलब्ध आहे. >>
इतकी धाडसी कंपनी कुठली आहे?
>>>
Star life insurance .
We got the policy. Will share more details soon

Thanks everyone for help

मी गेल्यावर्षी कुटुंबीयांसाठी ( २+२) icici Lombard ची हेल्थ शिल्ड ३६० नावाची पॉलिसी घेतली . प्रीमियम १२००० तर कवरेज २५ लाख चे होते , पण त्यासाठी icici बँकेत minimum 50 k balance चे अकाऊंट ओपन करावे लागले .
त्या अगोदर याच कंपनी ची ३३ हजार प्रीमियम आणि ५ लाख कवरेज ची पॉलिसी होती. आज पर्यंत क्लेम केलेला नाही पण एक क्लेम मॅनेजर शेजारीच राहायला आहे , त्यानेच सांगितले बिन्धास्त काढा म्हणून काढली .
जाहिरात करण्याचा उद्देश नाही , पण इथे चर्चा व्हावी म्हणून डिटेल्स टाकले आहेत.IMG-20230610-WA0009.jpg

प्रिमियम खुप कमी वाटत आहे. ६० वर्षापर्यन्त एकच प्रिमियम राहाते का ? कारण यात age agnostic प्रिमियम म्हणुन दिले आहे. कॉल केला तर हात धुवुन मागे लागतात म्हणुन एकडेच विचारले.

Star life insurance चांगली आहे, क्लेम पण लवकर मिळतो. फक्त प्रत्येक आजाराला वेगळे लिमिट आहे जे एकुण लिमिट पेक्षा खुप कमी आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करुन घेणे.

माझ्याकडे बजाज अलायन्स चा हेल्थ इन्सुअरन्स आहे. पण आमच्या क्लिनिक मध्ये इतर सर्व पाच सहा हेल्थ इन्सुरन्स एंबेडेड आहेत. पण तिढा असा की आता तिथे इन्सुअरन्स अप्लाय केले तर मिळ णार नाही. इथली बिले बजाज इन्सुअरन्स मधून कशी पास करुन घ्यावीत? औषधां ची बिले हेल्थ इन्सुअरन्स मध्ये पास करुन पैसे घेता येतात का? मला अनुभव नाही.

पुरोगामी खूपच कमी प्रिमियम वाटतोय.

अमा, बजाज alianz चे app आहे, caringly yours
त्यावरच क्लेम रजिस्टर करणे, डॉक्युमेंट अपलोड करणे करायचे. जरा बोरिंग आहे, कारण एकतर्फी संवाद वाटतो तो प्रकार. खूपच त्यातलं किचकट कळालं नाही की पेशन्स ठेवून customer care ला फोन करावा लागतो. हल्ली हे जॉब कमी केलेत वाटते. फोन तिथवर पोहचायला वेळच लागतो हल्ली.

अमा, बजाज alianz चे app आहे, caringly yours>> हो हे आजच केले आहे. पुढची प्रोसेस करते.

icici Lombard ची हेल्थ शिल्ड ३६० नावाची पॉलिसी बेस्ट आहे. आमच्या ऑफिस मध्ये जवळपास सर्वांनीच प्रेफर केली आहे.

माफ करा मंडळी हा धागा विसरून गेलो होतो Happy
तर.....
>>>>>Icici Lombard ची हेल्थ शिल्ड ३६० नावाची पॉलिसी बेस्ट आहे. आमच्या ऑफिस मध्ये जवळपास सर्वांनीच प्रेफर केली आहे.>>>>>>>>>>
मी देखील माझ्या बऱ्याच नातेवाईकांना काढायला लावली

>>>>>>प्रिमियम खुप कमी वाटत आहे. ६० वर्षापर्यन्त एकच प्रिमियम राहाते का ? कारण यात age agnostic प्रिमियम म्हणुन दिले आहे. कॉल केला तर हात धुवुन मागे लागतात म्हणुन एकडेच विचारले.>>>>>>
मला वाटतंय २५ लाखाच्या कवरेज ला एकच प्रीमियम कोणतीही कंपनी ठेवणार नाही .
पण नो क्लेम बोनस धरून आणि फारतर वार्षिक १०/१५ टक्के जरी पॉलिसी प्रिमियम वाढला तरी परवडतय की !
कारण मी पूर्वी पाच लाखाच्या कव्रेज साठी २८ हजार चा प्रिमियम भरलेला ,नंतर पुढच्या वर्षी त्यांनी ३३ हजार भरायला सांगितले .
शेजारी राहणाऱ्या त्याच कंपनीच्या क्लेम मॅनेजर ने सांगितले ३६५ पॉलिसी घ्या , फारतर बँकेत ५० हजार अडकून पडतील , पण शेवटी ते पन्नास तुमचेच आहेत ना !
ICICI बँकेला मुख्य म्हणजे त्यांचे कस्टमर वाढवायचे आहेत , इतर नवीन कस्टमरला सेविंग अकाउंटसाठी कमीतकमी वीस हजार ची अट असते तर हि ३६५ ची पॉलिसी घेणाऱ्यांना कमीकमी ५० हजार balance ची अट आहे .
पण तरीही परवडते !
कारण भविष्यात या पेक्षा चांगली पॉलिसी मिळाली तर बँकेतले अकाउंट बंद करून ५० हजार काढून घ्या !
पण तो पर्यंत १२ हजार मध्ये २+२ साठी २५ लाखाचे कावरेज म्हणजे जबरदस्त .....