सर्व आसने आरक्षित झाली!
मराठी चित्रपटासाठी 'सर्व आसने आरक्षित झाली! सोपे करून सांगायचे झाले तर 'हाऊसफुल्ल'. हो! अशी पाटी चित्रपटगृहाबाहेर झळकणे किंवा वर्तमानपत्रात बातमी होणे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण प्रत्येक चित्रपटाला हे भाग्य लाभत नाही. अगदी अभिनेते, संवाद ,गीत , कथा, पटकथा, तांत्रिक बाजू अशा गोष्टी जमेला असून देखील. मग असे चित्रपट पाहायचे राहून जातात. पण कुणा रसिक प्रेक्षकाने केलेल्या कौतुकामुळे, राहून गेलेले चित्रपट अनेकदा आवर्जून पाहिले जातात .
याच्या उलटही होतं. कुणी एखाद्या चित्रपटाची चक्क चीरफाड करतो आणि ' हा चित्रपट आपल्यासाठी नाही हे लक्षात येऊन मनस्ताप वाचवतो.
मायबोलीवर चित्रप टांचा आस्वाद घेणारे असे दोन्ही प्रकारचे लेख सातत्याने लिहिले जातात. पण ते बहुतांशी हिंदी चित्रपटांबद्दल.
मराठी भाषा गौरव दिन २०२३ अंतर्गत 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' या उपक्रमात आपण आवडलेल्या किंवा अजिबात न आवडलेल्याही मराठी चित्रपटाबद्दल लिहायचे आहे.
तर चला, मायबयलीवरील चित्रपटप्रेमींनो, या उपक्रमात सहभागी होऊन मराठी चित्रपटांचे रसग्रहण किंवा रसभंगानुभव लिहायला आणि वाचायला आपापली आसने आरक्षित करा. त्वरा करा!
उपक्रम नाव- लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
नियम-
१. आपण स्वतः पाहिलेल्या मराठी चित्रपटाचे रसग्रहण लिहिणे अपेक्षित आहे.
२ लिखाण स्वतः केलेले असावे व पूर्वप्रकाशित नसावे.
३. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 'मराठी भाषा गौरव दिवस २०२३' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे .
४. शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - " मराठी भाषा गौरव दिन - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - तुमचे नाव /सदस्यनाम - चित्रपटाचे नाव"
५. लेखनाचा धागा सार्वजनिक करावा.
६. लेखन २५ फेब्रुवारी २०२३ ते १ मार्च २०२३ या पाच दिवसांत सादर करावे.६७. स्पर्धा नसून उपक्रम असल्याने शब्दमर्यादा नाही
७ एक सदस्य एकापेक्षा जास्त चित्रपटांबद्दल , अर्थात वेगवेगळे लेखनाचे धागे काढून लिहू शकतो.
उत्तम उपक्रम!
उत्तम उपक्रम!
चांगला विचार आहे. मराठी
चांगला विचार आहे. मराठी चित्रपटांची शक्ती स्थळं आणि त्रुटी यावर यातून प्रकाश पडेल.
मस्त लिहा सर्वांनी छान छान
मस्त
लिहा सर्वांनी छान छान
ड्राफ्ट तयार आहे.
ड्राफ्ट तयार आहे.