काहूर

Submitted by kamalesh Patil on 15 February, 2023 - 04:31

आयुष्यात कधी कधी आपण न केलेल्या चुकांसाठी आपल्याला गृहीत धरलं जातं तेंव्हा मनात एक विचारांचं काहुर माजतं. अवघड असतं असं वाटणं. एकवेळ घणाघाती भांडण करून मोकळं होणं जास्त सोपं.

असंख्य प्रश्नांची उत्तर मिळत नसतात आणी ते प्रश्न आपली पाठही सोडत नाहीत. उगाच कुठेतरी मनाचा एकांत सावरुन आपण आपल्याच आत्म्याला चुचकारत राह्तो. पण विचारांचं घुटमळणं इथेच संपत नाही.

आयुष्यातला एकटेपणा काही संपत नाही.. जिथे मायेनं ममतेनं लोकांना जवळ करावं तिथे नेमकं तीच माणसं काळ्या पाषाणासारखी कभिण्ण वाटायला लागलीत. आपल्याच मोडलेल्या आकांक्षाची उशी करून आपलीच दु:खाची दुलई पांघरुन निशब्द होऊन शांत पडून रहाव वाटतं.

जिवंतपणा मरत चाललाय बहुतेक माझ्यातला. आपण कधी जिवंत होतो का हाच प्रश्न पडायला लागलाय सारखा. माणसांचा सोस असलेला माणूस जेंव्हा एकटा पडायला लागतो तेंव्हा त्या माणसाची घुसमट व्हायला लागते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults