Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय धक्कादायक. बोलायला शब्द
अतिशय धक्कादायक. बोलायला शब्द नाहीत अशी स्थिती झाली. मॅक्स आणि किल्लीचे पती दीपक ह्या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
फारच वाईट बातमी. भावपूर्ण
फारच वाईट बातमी. भावपूर्ण श्रध्दांजली..
मॅक्स आणि किल्लीचे पती दीपक
मॅक्स आणि किल्लीचे पती दीपक ह्या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
शॅन्कीना नावाने ओळखत होते
शॅन्कीना नावाने ओळखत होते भावपुर्ण श्रध्दांजली __/\__
किल्ली, सांभाळ स्वतःला दिपक फारच ऋजू व्यक्तित्व होते. काल रात्री हे वाचले पण अजुन विश्वास बसत नाहीये. हे काय जायचे वय आहे? तिच्या मुलीच्या जन्मावेळी भेटलेले दोघांना....मुले फार लहान आहेत. आपण आहोतच तिच्या सोबत! __/\__
खुप धक्कादायक… किल्लि व
खुप धक्कादायक… किल्लि व तिच्या बछड्यांची काळजी वाटतेय. कृपया कोणीतरी जाऊन भेटा.
किल्लीची बातमी ऐकून खूप
किल्लीची बातमी ऐकून खूप इमोशनल वाटते आहे. थोडं रडू वगैरे येतय वगैरे. सोशल मिडियाचा परिणाम नाही म्हटला तरी खूप होतो. म्हणजे अचानक जीवनाची क्षणभंगुरता आणि पुश अराउंड किंवा निव्वळ ब्रुटॅलिटी ...... भयानक आहे. जगात देव अस्तित्वात आहे का आणि असेल तर त्याच्यात काहीही चांगुलपणा आहे का असा प्रश्न पडतो. असो!!!
श्रद्धांजली ! दोन्ही
श्रद्धांजली ! दोन्ही कुटुंबांना सावरायची देव शक्ती देवो!
धक्कादायक ,भावपूर्ण
धक्कादायक ,भावपूर्ण श्रद्धांजली!!
बापरे! हे काय भयंकर चालु आहे.
बापरे! हे काय भयंकर चालु आहे.
खुप रडू येत आहे.
किल्ली, काय लिहु काही समजत नाही.
किती हसरी मुलगी. लहान मुलं.
ईश्वर दुःख सहन करण्याचं बळ देवो.
मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना ही श्रद्धांजली !
किल्ली!! काय वाचतेय त्यावर
किल्ली!! काय वाचतेय त्यावर विश्वास बसत नाहीये, भयंकर आहे सगळं. देव तरी इतका निष्ठूर का होतो?
किल्ली चे पती दिपक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मॅक्स यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
धक्का बसला.. किल्ली यांना या
धक्का बसला.. किल्ली यांना या संकटातून सावरायला देव शक्ति देवो.
मॅक्स आणि श्री दीपक यांना श्रद्धांजली
दोघाना श्रध्दांजली _/\_
दोघाना श्रध्दांजली _/\_
परवा ह्या धाग्यापुढे 65
परवा ह्या धाग्यापुढे 65 मेसेजेस बघूनच धस्स झालं. मी किल्ली यांना वैयक्तिक ओळखत नाही पण इथल्या पोस्ट्स वाचून ओळख असल्यासारखे वाटते. फार वाईट वाटलं. अजूनही सारखी हळहळ वाटतेय. ज्यांची तिच्याशी थोडीफार ओळख असेल त्यांनी तिच्याशी फोनवर संपर्क करा. खरच अशा वेळी दुःखावर फुंकर घातल्यासारखं वाटत, हा स्वानुभव आहे.
दीपक आणि मॅक्स यांना श्रद्धांजली!
फारच धक्कादायक आणि भयानक!
फारच धक्कादायक आणि भयानक! किल्ली यांचे दुःख इमॅजिनही करू शकत नाही
सर्व घरच्यांना सावरायचं बळ मिळुदे . हीच प्रार्थना. _/\_
बापरे. एवढे प्रतिसाद बघून
बापरे. एवढे प्रतिसाद बघून शंका आलीच. किल्लीच्या मिस्टरांची बातमी भयंकर आहे. मुलं किती लहान आहेत आणि किल्लीचं वय पण फार नसेल. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो.
Max यांनाही श्रद्धांजली.
घरातलं तरुण माणूस असं तडकाफडकी जाणं यासारखं दुःख नाही.
किल्ली शी प्रत्यक्ष ओळख नाही
किल्ली शी प्रत्यक्ष ओळख नाही पण आयडी माहिती आहे, फार दु:खद बातमी.
किल्ली शी प्रत्यक्ष ओळख नाही
किल्ली शी प्रत्यक्ष ओळख नाही पण आयडी माहिती आहे, फार दु:खद बातमी. > +१
मॅक्स व किल्लीचे पती यांना श्रद्धांजली!
अतिशय धक्कादायक आणि दुःखद
अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातम्या...
किल्ली आणि कुटूंबिय तसेच मॅक्स यांच्या कुटूंबियांना या दुःखातून सावरण्यास बळ मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना.
वि वि करमरकर ह्यांचे निधन
वि वि करमरकर ह्यांचे निधन
क्रीडापत्रककारितेचे अध्वर्यू असणाऱ्या करमरकरांच्या निधनाचे वृत्त फारसे कुठे पहिले नाही. खुद्द महाराष्ट्र टाइम्स ने पाट्या टाकल्यासारखी बातमी दिली आहे https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/senior-journali...
लोकसत्ताने त्या मानाने मनापासून विशेष संपादकीय लिहिले आहे
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/veteran-sports-reporter-v-...
महाराष्ट्र टाईम्सने ना अग्रलेख , ना इतर काही लेख, मान्यवरांच्या प्रतिक्रिया वगैरे काही छापले नाही. पालक प्रकाशन Times of India मध्ये बातमी सुद्धा नाही. संपूर्ण आयुष्य तळमळीने ध्येयवादी पत्रकारिता करणाऱ्या, लोकप्रिय पत्रकाराबद्दल इतकी उदासीनता पाहून वाईट वाटले. एकदा वसंत व्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यांच्या बोलण्यात तळमळ आणि व्यक्तिमत्त्वात उत्साह भरलेला होता. म टा चे खेळाचे पान, ऑलिम्पिक, एशियाड सारख्या क्रीडास्पर्धा, खेळांवरचे लेख, क्रीडाकार्यकर्त्यांची दखल अशा अनेक अंगांनी महाराष्ट्रात क्रीडासंस्कृती रुजवण्याचा कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. विनम्र श्रद्धांजली.
वि वि करमरकर बातमी काल
वि वि करमरकर बातमी काल एबीपीवर खालून गेली. आमच्या लहानपणी आम्हाला हेच नांव परीचित होतं जास्त, फार उमदं व्यक्तीमत्व. श्रद्धांजली.
म टा च घरात येत असल्याने त्यांचे लेखही वाचलेत लहानपणी. टीव्हीवर पण बरेचदा असायचे.
मी म. टा. कधी वाचला नाही.
मी म. टा. कधी वाचला नाही. त्यामुळे वि विं च्या तिथल्या कामाबद्दल आणि मराठीत क्रीडा पत्रकारितेला स्थान मिळवून देण्यातील त्यांच्या योगदानाबद्दल काही माहीत नव्हतं. लोकसत्तेत पहिल्या पानावर दिलीप वेंगसरकरांचा लेख, शेवटच्या पानावर सविस्तर बातमी, काही खेळाडूंचे मनोगत आणि विशेष संपादकीय एवढं सगळं आहे.
कोणे एके काळी मुंबईत होणार्या कसोटी सामन्यांचं धावतं समालोचन मुंबई ब वाहिनीवरून प्रक्षेपित होई. त्यात वि वि क आणि बाळ ज पंडित हे दोघे समालोचक असत. त्यांचा मृदु आवाज व बोलणं लक्षात राहिलं. आकाशवाणीवरची विशेष क्रीडावृत्त, टीव्हीवर चर्चा , अलीकडे लोकसत्तेतील काही लेख यांतून ते भेटत राहिले. आवाजासोबत चेहराही परिचयाचा झाला.
वि वि क ना श्रद्धांजली.
वीवेकेंचे श्रद्धांजली!
वीवेकेंचे श्रद्धांजली!
पूर्वी मटाच घरी यायचा आणि वि. वि. करमरकरांच्या बातम्या/ लेख इ. कायम वाचलेलं आहे. परवा हा एक लेख नजरेस पडला. फार छान लिहिलं आहे त्यांच्या बद्दल https://www.bbc.com/marathi/india-64859534?fbclid=IwAR2YSiT1KHkvdfo0QkfC...
लोकसत्तातील लेख शोधून वाचतो. ऑनलाईन लोकसत्ता मुद्दामुन सवंग (फ्लॅशी) करण्याच्या नादात हल्ली चांगल्या बातम्या खणल्याशिवाय दिसतच नाहीत.
खेळांसाठी आयुष्य वेचणारा
बीबीसीचा लेख छान आहे.
खेळांसाठी आयुष्य वेचणारा अवलिया - दिलीप वेंगसरकर
बातमी आणि खेळाडूंच्या प्रतिक्रिया
वि.वि. करमरकरांना श्रद्धांजली
वि.वि. करमरकरांना श्रद्धांजली. वर दिलेले लेख वाचते.
सतिश कौशिक
सतिश कौशिक
हा धागा आज उघडला तेव्हा मॅक्स
हा धागा आज उघडला तेव्हा मॅक्स आणि किल्लीचे पती दीपक हयांच्याविषयीची दुःखद बातमी समजली. मॅक्स हा आयडी माहीत नव्हता. त्यांना श्रद्धांजली.
किल्ली ह्या त्यांच्या लिखाणामुळे माहीत झाल्या. दोन लहान मुले आहेत हेही माहीत झाले होते. दीपक ह्यांचे निधन हा फारच मोठा धक्का आहे त्यांना. दीपक ह्यांना श्रद्धांजली. किल्ली ह्यांना दोन मुलांना घेऊन पुढील प्रवास करायचा आहे. त्यासाठी त्यांना बळ मिळो आणि पुढचा प्रवास खडतर न राहो.
सतीश कौशिक यांना श्रद्धांजली.
सतीश कौशिक यांना श्रद्धांजली.
सतीश कौशिक हे मिस्टर इंडिया
सतीश कौशिक हे मिस्टर इंडिया मधले 'कॅलेंडर' म्हणून कायमच स्मरणात राहील.
मात्र ह्याशिवाय कुणाचा वाढदिवस किंवा पुण्यतिथी किंवा दुःखद निधनाची बातमी असेल तर वृत्तपत्रे निलाजरेपणा व असंवेदनशीलतेचा कळसच गाठतात. जसे,
सतीश कौशिक: तब्बल ३ दशके बॉलीवूडमध्ये काम केलेल्या सतीश कौशिक यांनी एकूण किती संपत्ती कमावली? (संदर्भ: लोकमत वृत्तपत्र)
https://www.lokmat.com/celebrity/satish-kaushik-how-much-wealth-did-sati...
सतीश कौशिक ह्यांना
सतीश कौशिक ह्यांना श्रद्धांजलि मला पण ते मेरा नाम है कॅलेंडर हेच आठवले.
त्यांना श्रद्धाजली मेसेज वाहताना पण नीना गुप्ताने त्यांनी लग्नाची मागणी घातली होती हे लिहि ले आहे. ह्या बाईंना समजायला पाहिजे की इट इज अबाउट हिम. नॉट अबाउट हर मेजर अचीवमेंट इन लाइफ. प्रतेक ठिकाणी ती टिमकी वाजवायलाच कशाला हवी.
श्रद्धांजली. होळीचे फोटो आहेत
श्रद्धांजली. होळीचे फोटो आहेत सगळीकडे, त्यामुळे जाण्यापूर्वी आनंदात असावे अशी आशा.कॅलेंडर म्हणून ओळखते.पण आता इतर बातम्या वाचून एक चांगले गृहस्थ असावे असे वाटते.ओम शांती.
Pages