बाजार उठवी

Submitted by नितीनचंद्र on 14 February, 2023 - 05:27

मायबोली वर अनेक जण पुर्वी नवनविन शब्द निर्माण करायचे. ववी काय गटग काय दरवेळेला एक नविन शब्द कानावर यायचा. एका मराठी सिनेमाने मोठे वादळ निर्माण केले. धर्मवीर हा तो सिनेमा ज्यात प्रसाद ओक यांची मध्यवर्ती भुमीका आहे. या सिनेमाची पटकथा प्रविण तरडे या जबरदस्त माणसाने लिहली आहे.

बाजार बसवी हा शब्द मराठी माणसांना चांगलाच माहित आहे. यावर विस्ताराने लिहणे नको. या सिनेमातील एका प्रसंगात छेड काढणार्या लोकांना चपलेने बडवणारी धर्मवीर आनंद दिघे यांची मानलेली बहिण सिनेमात आनंद दिघे यांना म्हणते तुम्ही नको म्हणला म्हणुन मी याचा बाजार उठवला असता अर्थात जीवनातुन उठवला असता.

युटयुब वर एका महिलेने हाच शब्द मध्यवर्ती ठेऊन एक युट्यब short video तयार केली आहे. च्यायला नविन एक फंडा आला की राव

राहूल गांधींचा अमेठीतला बाजार स्मृती इराणी ने उठवला.
उर्फी चा बाजार उठवायचा प्रयत्न चित्रा वाघ यांनी केला. उठला नाही तो भाग वेगळा

मग अश्या बाजार उठवणार्या स्त्रीला बाजार उठवी म्हणायचे का ? असा एक मनात विचार आला. अश्या शुर स्त्रीला बाजार उठवी म्हणायला लागेल का ?

तुम्हाला कुणी कुणाचा बाजार उठवला या संकल्पनेत काही घटना , व्यक्ती असे सांगता येईल का ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हल्ली सर्रास चुकीचे शब्द प्रयोग होताना दिसतात . पत्रकार तर यातले शिरोमणी त्यानंतर राजकारणी आणी हेच समाजाचे आदर्श.

आता नाही म्हणाला तरी बाजार बसवी शब्दाचा अर्थ सांगावा लागतोय कारण याच्या उलट बाजार उठवी.
वेश्या बाजार बसवते म्हणजे त्या बाजारात बसून देह विक्री करते.
मग बाजार उठवी म्हणजे कुणाला तरी वाटतं ते वाईट आहे म्हणून ते उधळून लावतात असा मतितार्थ निघतो.
समाज्यस्वास्थ टिकवायला वेश्या हातभार लावतात. मला त्या वाईट असतात असं म्हणवत नाही.
बाजार उठवणं विघातक ही असू शकतं. ही सर्वसम्मत व्याख्या होत नाही.
एखादा डाव उधळून लावणे असा अर्थ होऊ शकतो.
म्हणून बाजार उठवी पटत नाही.

'बाजार बसवी'चा अर्थ किंचित वेगळा आहे.
बसवी म्हणजे बसवणारी.
कुणालाही, अख्ख्या बाजाराला आपल्या देहाचा लैंगिक वापर करू देणारी, देहविक्रय करून घेणारी स्त्री असा अर्थ आहे