गुड बाय कसे म्हणु ?

Submitted by नितीनचंद्र on 10 February, 2023 - 03:37

२००९ मधे मायबोलीचा परिचय झाला. काही कथा लिहायची संधी सहजपणे उपलब्ध झाली. घर बदलतोय. कागदावर लिहलेले रद्दीत टाकावे लागले त्या मानाने इथे लिहलेल्या कथा सुरक्षीत आहेत. आपलेच जुने फोटो पहाताना जी गंमत वाटते तीच गंमत या कथा चाळताना, कविता पुन्हा वाचताना येत आहे.

२००९ ला उत्साहात ववी आणि पुढे पिंपरी चिंचवडचे गटग यात अनेक मायबोलीकर्स नव्याने ओळखीचे झाले. काल लिंबु भेटल्यावर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

अधुन मधून गावचा सातबारा तपासून आपली स्थावर मालमत्ता सुरक्षीत आहेना पहाण्याचा मोह पडतो तसाच मायबोलीवर येण्याचा खटाटोप. अनेकदा पासवर्ड विसरतो. मग तो पुन्हा मागवण्याची खटपट केल्यानंतर असे दिसते की ऋन्मेऽऽष अजुनही फुल फार्मात आहे. मामी, आशू ही ओळखीची नावे अजून वाचायचंय मधे दिसतात.

२००९ ते २०११ काळातले बेफिकीर, अकु, विशाल कुलकर्णी,नानबा यांनी काळाच्या ओघात माझ्यासारखी मायबोली सेवानिवृती घेतली असे दिसते. वाद विवादात गंमत होती ती ड्यु यायला लागल्यानंतर संपली.

२००९ ते २०११ काळ छान होता. लेखन करायच. प्रतिसाद तपासायचे. उत्साह वाढला की पुन्हा काहीतरी लिहायचे.

आता लिहावेसे वाटत नाही. मधुघट संपले. संध्या छाया अजून भिती दाखवत नाहीत पण ती वेळ लवकरच येईल.

चिंचवडच्या शाळेतले मित्र, डिप्लोमा कोर्स दरम्यानचे मित्र, अनेक नोकर्या केल्या तिथले सहकारी आणि मायबोलीकर्स मित्र असा परिवार अधून मधून डोळ्यासमोर दिसतो. कालच नोकरी.कॉम वाल्यांना विचारले की माझा बायोडेटा डिलीट करता येईल का ? त्यांचे उत्तर आले की डी अ‍ॅक्टीवेट करता येईल.

मायबोलीचे सदस्यत्व अजून जपावेसे वाटते. कारण यात छान आठवणी दडलेल्या आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

पण गुडबाय म्हणायचा विचार तरी का करताय ?
अजूनही इथे चांगले लेखन/ विचारमंथन होतेय की.
काही धागे नाव वाचूनच ओलांडून जाता येतेय की..

हायला
एकदम रिटायरमेंट स्पीच सुरू केलंत की.
अभी तो आप जवान हो.
ऑल वेल?

लिहायला सुरू करा परत.

झकासराव,

अभी तो आप जवान हो.
ऑल वेल?

~ येस ~ सगळे छान . मराठी टायपिंग विसरतोय .
तुझ्या प्रोत्साहनाने परत जवान झाल्यागत वाटतय.

नमस्कार नितीनचंद्र. माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. गुडबाय म्हणायचं कशाला? केव्हाही यायचं आणि लिहायचं. मायबोली बदलली ही हाकाटी सुरू असतेच पॅरलली. ती होउंद्या. येत जा नियमितपणे.

ऋन्मेऽऽष अजुनही फुल फार्मात आहे हे वाचून फार छान वाटले Happy
पण पुढे का असा निर्वाणीचा का काय म्हणतात तसा सूर लागला..ते नाही आवडले...
फोटोत दिसत आहात तसेच राहा Happy

एक टिप देतो - लेखात अजून वीस पंचवीस मायबोलीकरांची नावे लिहा.. प्रतिसाद वाढतील Wink

>>>>>>>मधुघट संपले. संध्या छाया अजून भिती दाखवत नाहीत
मस्त लिहीलय. सेम हियर! : )

गेलात तरी केव्हाही परत या. भलेभले सोडू-सोडू म्हणुन परत येतातच. तेव्हा आशा करते आपणही याल. काहीतरी ज्योतिषावरचे येउ द्यात.

मायबोलीचं व्यसन सोडायचं म्हटलं तरी सुटत नाही Happy आणि कशाला सोडताय माबो? येत रहा.
लिंबुकाका कसे आहेत? बरेच वर्षांत त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही.

काय झालं?
कोणत्याही सोशल मीडिया साईटवर सुरुवातीला आल्यावर उत्साहात भरपूर लिखाण करणे,सदस्यांशी अगदी कौटुंबिक कनेक्ट वाटणे,आणि नंतर कामाचा व्याप वाढल्यावर हळूहळू लिखाण आणि कनेक्ट दोन्ही कमी होणे, तो अगदीच दोन तीन जणांपुरता राहणे हे साहजिक आणि नैसर्गिक आहे.साईटची लेखनशैली त्यामुळे नवेनवे लेखक येऊन बदलती राहते.
इतकी निरवानिरवीची भाषा का?नौकरी प्रोफाइल का डिलीट करायचंय?

गुडबाय कसा म्हणू ऐवजी गुडबाय कशाला म्हणू असं म्हणा पाहू.
मायबोलीचा पासवर्ड सापडला ना, आता सगळ्यांचा पासवर्ड सापडेल बघताबघता. बरं वाटलं तुम्हाला इथे बघून. येत जा आता रेग्युलर.

अहो कसला गुडबाय वगैरे? Proud

मस्त लिहा की अजून?

'काल लिंबू भेटला' म्हणजे लिंबूटिम्बु हा आय डी का? तेही नाहीत का आता इथे?

=====

आणि मी निवृत्त वगैरे नाही झालो हो! लिहायला वेळ मिळत नाही. काही धागे वाचत मात्र असतो. डॉ कुमार यांचे धागे, रुन्मेषचे काही धागे, भाजप मनोरंजन, काही कविता, काही इतर राजकीय / सामाजिक विषयांवरील धागे, हे नक्की वाचतो दिवसातून!

=====

चांगले दणदणीत पुनरागमन करा Proud

येत रहा. सुचलं नाही तर गप्पांच्या धाग्यांवर येत जा. अगदी काहीच सुचलं नाही तर असंबद्ध गप्पा हा धागा आहे. Happy सगळ्यांना मिळूनच मायबोली कुरकुरीत रहाते.

बेफिकीर, तुम्हीही फक्त वाचनमात्र राहू नका. मी सक्रिय झाले तसे बरेच चांगले आयडी वाचनमात्र झाले. त्यापैकी तुम्ही एक. तुमच्याशी कधी संवादच साधता आला नाही. हाय रे कर्मा !!

गुड बाय नका हो म्हणु. पुन्हा आगमन कराच!
माबो ला आता अधनं मधनं काय त्या फारेंड, अस्मिता, मी अनु ह्यांच्या कॉमेंट्स आणि थोडं फार लेखन ह्यांच्या वर दिवस काढत आहोत.

ऋन्मेष, नितिनचंद्र ह्यांना तुझ्या टिपांची गरज नाही Happy

कोणत्याही सोशल मीडिया साईटवर सुरुवातीला आल्यावर उत्साहात भरपूर लिखाण करणे,सदस्यांशी अगदी कौटुंबिक कनेक्ट वाटणे,आणि नंतर कामाचा व्याप वाढल्यावर हळूहळू लिखाण आणि कनेक्ट दोन्ही कमी होणे, तो अगदीच दोन तीन जणांपुरता राहणे हे साहजिक आणि नैसर्गिक आहे. >>> अगदी अगदी.

@ नितीनचंद्र >>> गुड बायला मारो गोली; नवीन कथा/लेखाचा श्रीगणेशा करा.

रच्याकने, बेफिकीर, अरुंधती कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, नानबा, नंदिनी देसाई, दीप्स, दाद, पूनम, नीधप (त्या जरी मायबोलीवर अधून मधून येत असल्या तरी कित्येक वर्षांत त्यांच्या नवीन कथा वाचल्या नाहीत), शाली (हरिहर), व दिनेशदादा ह्यांच्यासह कितीतरी लेखकांच्या मी कथा/लेख मिस करतोय. कारण त्यांच्यामुळेच मी मायबोलीचे सदस्यत्व घेतले होते.

नितीनचंद्रजी
मी मायबोलीवर खूप उशीरा आले. ओघाओघात असे लक्षात आले की मी येण्यापूर्वीचे बरेच चांगले लिहीणारे लोक मायबोली सोडून गेले आहेत. तेव्हा आपण हे सर्व मिस केले हे जाणवले. आत्तासुद्धा जर आपल्यासारखे जुने लोक मायबोलीला गुडबाय म्हणायचा विचार करत आहेत तर आम्ही नवीन लोकांनी काय वाचायचे ? तेव्हा गुड बायचा विचार सोडून द्या.

वरील नावांमध्ये "दाद" अ‍ॅड करा

आबा मला हे मायबोली नाव आठवत नव्हत. मी तिचे सगळे लेख आता शोधून परत वाचतो.

@ssj

नितीनचंद्रजी
मी मायबोलीवर खूप उशीरा आले. ओघाओघात असे लक्षात आले की ....................................गुड बायचा विचार सोडून द्या.

सोडला सोडला. लिहायला जमेल की नाही माहित नाही पण वाचायला, प्रोत्साहन द्यायला ( पुलेशु........ ) नक्की जमेल.

नि3 तुला मी आठवत नसेन कदाचित पण मी ही माबो नाही सोडलेलं बर्का...
2009 च्या गटग ला तुझी आणि बर्‍याच माबोकरांशी प्रत्यक्ष भेट झालेली . खूपच छान वाटलं होतं. खूप खूप मित्रमंडळी अजून ही संपर्कात आहेत. मायबोली ची ही गिफ्ट अनमोल आहे माझ्यासाठी..

>>>>>सोडला सोडला. लिहायला जमेल की नाही माहित नाही पण वाचायला, प्रोत्साहन द्यायला ( पुलेशु........ ) नक्की जमेल.
उत्तम निर्णय. १००% स्तुत्य निर्णय.