
Why pink is not there in rainbows?
विजयलक्ष्मीला (माझ्या 6 वर्षांच्या मुलीला) पडलेला प्रश्न.. आणि मला पडलेला प्रश्न की तिला समजेल असे काय उत्तर द्यावे? पण खात्री होती कि उत्तर मिळणारच.
मग इथेच मायबोलीवर जाणकारांना विचारले
https://www.maayboli.com/node/69520?page=2
अस्मिताने सांगितलं कि
"गुलाबी रंग हा निळा व लाल किंवा जांभळा रंग मिसळून होतो. ते इंद्रधनुष्यात किंवा स्पेक्ट्रमवर एकमेकांपासून लांब आहेत, कुठेतरी त्या रंगांचे तरंग एकमेकांवर आले असते तर गुलाबी रंग तयार झाला असता पण हे एकमेकांपासून दूर आहेत. आपण जो गुलाबी म्हणतो तो लाल आणि पांढरा मिसळूनही होतो. पण पांढरा रंग हा रंग नाहीचये, तो व गुलाबी रंग आपल्या नजरेने तयार केलेल्या छटा आहेत (म्हणे.)!"
अमितव यांनी सुचवले कि
"त्या निमित्ताने तीन बेसिक रंग देऊन मुलीला ते वेगवेगळ्या प्रमणात एकत्र करुन दुसरे रंग तयार करायची जादू एक्सप्लोर करू द्या. मजा येईल तिला."
आणि खरंच आम्ही ते मनावर घेतलं. तिला क्रेयॉन्स घेऊन वेगवेगळे रंग एकावर एक लावून नवे नवे रंग तयार करायला दिलेत. पण तिचं समाधान होईना. डोक्यामध्ये पिंक रंग असणारं रेनबोच फिरत होतं. आणि पिंक रंग रेनबोमधेच हवा होता.
आज दुपारी अभ्यास करता करता तो युरेका मोमेन्ट आला. खिडकीतून ऊन येत होतं आणि तिथे टांगलेल्या क्रिस्टल बॉल मधून इंद्रधनुषी कवडसे तिच्या वहीवर पडत होते.
"आssssई ...!" अशी excitement भरलेली जोरदार हाक आली.
"लवकर ये !"
"बघ बघ किती छोटे छोटे रेनबो आलेत. आता गंमत करू आपण"
आणि असं म्हणून तिने पळत पळत जाऊन आमच्या खोलीच्या खिडकीत टांगलेला दुसरा क्रिस्टल बॉल आणला. आणि आधीच्या कवडस्यांच्या बाजूला नवे कवडसे घालायला सुरवात केली.
बरोबर हवं तसं फिरवून लाल रंगावर निळा रंग येईल असं अड्जस्ट केलं
.
आणि ......
बिंगो S S S S S
.
.
जॅकपॉ SS ट ... कि
इंद्रधनुष्याच्या तळाशी लपलेला विज्ञानाच्या सोन्याचा पॉट
(शीर्षकाचा फोटो म्हणजे या प्रश्नाचं जन्मस्थळ. डिसेंबरच्या सुट्टीत चित्रकोट धबधब्याला भेट दिली असता तिथले रेनबो बघून आम्ही विचारात पडलेलो )
Update: 6feb2023
गेले दोन दिवस प्रचंड पाठपुरावा करून, कवडस्यांचे निरीक्षण करून आम्ही crystal balls च्या जागा फिक्स केल्यात जेणेकरून थोडा वेळ तरी रेनबोमध्ये गुलाबी रंग दिसावा. जरा यश मिळत आहे बरं..
हे बघा
आणि आम्हाला झालेला आनंद
शाळेत teacher ला सगळं सांगून झालं. Moral of the experiment is "pink colour is the baby of rainbow, coz it is made by a mom and dad rainbows"
कसलीच गोड आहे छोटी माऊ....
कसलीच गोड आहे छोटी माऊ.... गॉड ब्लेस
क्या बात है!! छोटीच्या
क्या बात है!! छोटीच्या कल्पनाशक्तीला जोरदार टाळ्या! मस्त! तिची ही पाठपुरावा करण्याची वृत्ती उत्तरोत्तर वाढत जावो!
वावे + १ .
वावे + १ .
mmmmmwwwwaah ! god bless her !!
सिंपली ब्रिलियंट ! थक्क झालो
सिंपली ब्रिलियंट ! थक्क झालो !!
क्या बात है!! छोटीच्या
क्या बात है!! छोटीच्या कल्पनाशक्तीला जोरदार टाळ्या! मस्त! तिची ही पाठपुरावा करण्याची वृत्ती उत्तरोत्तर वाढत जावो!>> +१
वा, फारच छान.
वा, फारच छान.
वा मनिमाऊ! तुझ्या गोड माऊ चं
वा मनिमाऊ! तुझ्या गोड माऊ चं कौतुक आणि तू तिला दिलेल्या प्रोत्साहनासाठी तुझं पण कौतुक
हे भलतंच भारी आहे. लेकीनं
हे भलतंच भारी आहे. लेकीनं कुतुहल जागृत ठेऊन त्यावरचं उत्तर शोधून काढलं त्याबद्दल तिला शाब्बासकी. आणि उत्तर शोधायला अस्मितानं केलेली मदत खूप महत्त्वाची.
असे मिसळून अजून कुठले कुठले
असे मिसळून अजून कुठले कुठले रंग तयार करता येतील ते बघायला हवं. मुलांना यातून अनेक नवीन गोष्टी मजेमजेत दाखवता येतील. कल्पना लढवल्या पाहिजेत आपणही.
क्या बात है!! छोटीच्या
क्या बात है!! छोटीच्या कल्पनाशक्तीला जोरदार टाळ्या! मस्त! तिची ही पाठपुरावा करण्याची वृत्ती उत्तरोत्तर वाढत जावो! >> +111 वावे
हे मस्त आहे! आवडलंच.
हे मस्त आहे! आवडलंच.
कित्ती गोड ! मला (तेव्हा ५ वय
कित्ती गोड ! मला (तेव्हा ५ वय ) मुलाकडून आलेला प्रश्न "Why does the sky never end?" . फार दमछाक होते अशा प्रश्नांना उत्तरं द्यायला.
अगं किती मस्त झाला हा प्रयोग.
अगं किती मस्त झाला हा प्रयोग. मजा आली वाचताना. छोटा वैज्ञानिक तर फारच गोड. तिला विज्ञानाचे घबाड मिळू दे.
मामी
, तिचा प्रश्नंच इतका छान होता की मलाही कुतूहल निर्माण झाले.
ट्यूलिप, छोट्यांच्या प्रश्नांचा वेगळा धागा हवा. त्यातून
आपण मोठेही शिकू असं वाटतंय.
फारच छान !!
फारच छान !!
भारीच आहे छोटुकली माऊ... !!
भारीच आहे छोटुकली माऊ... !!
तुम्ही या सगळ्याची मांडणी पण छान केलीय लेखात.. आवडलं लेखन!
हे भारीय एकदम.
हे भारीय एकदम.
कौतुक वाटलं फार.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
सगळया प्रतिसादकांचे आभार.
सगळया प्रतिसादकांचे आभार. तुम्ही सर्वांनी अतिशय प्रोत्साहन दिले. त्यामूळे लेकीला व मला फार छान वाटले.
वावे, मामी, अस्मिता, ऋन्मेष आणि सगळेच.....
पाठपुरावा करुन crystal balls
पाठपुरावा करुन crystal balls च्या जागा बदलून बघून अनेक वेगवेगळे पॅटर्न करून बघितले या विकांताला.

एक दोन खूप छान जमलेत.
(No subject)
लेख update केला आहे.
लेख update केला आहे.
लेक अगदी मनिम्याऊ दिसतेय
लेक अगदी मनिम्याऊ दिसतेय
लेक अगदी मनिम्याऊ दिसतेय
लेक अगदी मनिम्याऊ दिसतेय
वा. मस्त. गोड.
वा. मस्त. गोड.
काय मस्त लेख आहे डोळ्यांत
काय मस्त लेख आहे डोळ्यांत बदाम ..
छोटूली पण अगदी क्युट!
मनिमाऊ तुझ्या गोड माऊ चं
मनिमाऊ तुझ्या गोड माऊ चं कौतुक करावं तेवढे कमी. लिखाण आवडले .
माऊ ला भरपूर आशीर्वाद
वा खुपचं छान प्रयोग आणि सुंदर
वा खुपचं छान प्रयोग आणि सुंदर परीणाम व छायाचित्रे
क्या बात है!! छोटीच्या
क्या बात है!! छोटीच्या कल्पनाशक्तीला जोरदार टाळ्या! मस्त! तिची ही पाठपुरावा करण्याची वृत्ती उत्तरोत्तर वाढत जावो!>> +१
तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनासाठी पण कौतुक!
आहाहा, कित्ती क्युट. माऊला
आहाहा, कित्ती क्युट. माऊला शाबासकी.
खूपच क्यूट! माऊ शाबासकी तुला!
खूपच क्यूट! माऊ शाबासकी तुला!
Pages