मित्रहो,
कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची
लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का??
मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात.
मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर. मला स्वत:ला खिद्रापुरचे मन्दीर परत पहायच आहे. कारण आता त्याची स्मृती माझ्या मेन्दुतुन जास्तच पुसली गेली आहे. असे अनेक ठिकाण आहेत जे जावीच अशी आहेत.
कालच साप्ताहिक सकाळमधील एक लेख वाचला आणि जाणवल की अरे ह्यात मला माहित असलेल्या अनेक ठिकाणांची माहिती आहे की.
उदाहरणार्थ मसाई पठार. मी पैज लावु शकतो की ह्या विषयी कोणीच फारस ऐकलं नसेल.
हे पठार आणि त्यावर असलेली पांडव लेणी ही काहि वर्षापुर्वी (म्हणजे मी हाफ पॅन्ट घालुन शाळेत जात असताना) वादाच केंद्र झाल होत. त्यावेळीच काय त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ते प्रकरण थंड झाल.
मी ती लेणी पाहिली आहे. माझ्या मावशीच्या गावापासुन फारतर ५-६ किमी चालत गेल की मसाई पठार लागत.
मी कित्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे गेलो आहे.
तर अशा अनेक ठिकाणांची माहिती देणारा हा लेख वाचाच. आणि ह्या ठिकाणाना देखील भेट द्या.
http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html
(ह्या लिन्क वर गेलात की तीर्थक्षेत्र आणि कलानगरी - कोल्हापुर ह्यावर क्लिक करा.)
ह्या लेखात तरी एका किल्ल्याचा उल्लेख राहिला आहे. रांगणा किल्ला. इतिहासाच्या पुस्तकात नकाशात हे नाव पाहिल होत आणी त्यानंतर विसरुनच गेलो होतो ह्या किल्ल्याविषयी. हा फारसा प्रसिद्ध नसलेला किल्ला. ह्याची माहिती लोकसत्ता मध्ये भटकंती सदरात आली होती. गगनगडाच्या आसपास आहे हा.
तसच वरच्या लेखात << कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की लगेचच उजव्या हाताला कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवमंदिर आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे. शिवरात्रीला कणेरी मठावर मोठी यात्रा भरते. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कणेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे>> ही माहिती आहे.
कन्हेरी मठ बघणे हे मस्ट मस्ट आणि मस्टच आहे अस माझ मत झालय.
त्यानी तेथे वसवलेल गाव पाहुन मी अचंबीत झालो. खुप कष्ट घेतल आहे त्यासाठी त्या लोकानी. हे गाव बघण्यासाठी २५ रु तिकिट आहे पण ते खुपच कमी आहे असच वाटेल तुम्हाला. तिथे फोटो काढण्यास बन्दी आहे. पण त्यानी तिथेच एक बाग केली आहे त्याचे मी फोटो काढले आहेत.
त्यातील हे काही.
हे राशी उद्यान आहे. प्रत्येक राशीची माहिती आणि त्याच चिन्ह त्यानी बनवलेल आहे. हे चिन्ह बनवताना तीच पद्धत वापरली आहे जी त्या गावातले पुतळे बनवताना वापरली आहे. खालील फोटोत मेष रास दिसत आहे.
ही त्याच बागेतील बसण्याची व्यवस्था.
अजुन काहि फोटो पहायचे असतील तर ते खालील लिन्क वर आहेत.
http://picasaweb.google.com/zakasrao/KanheriMath?authkey=ZQsGxI7GWbU#
मग येणार ना कोल्हापुरला?? आणि हे सगळ पाहणार ना??
ह्यातील एखाद्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर बिन्धास्त विचारा मी देइनच.
नक्की या
मला
मला कोल्हापुरकरांच्या ग्रुपमध्ये यायचयं.
मला
मला कोल्हापुरकरांच्या ग्रुपमध्ये यायचयं.
@kulu बघताय
@kulu
बघताय काय? सामील व्हा....
कोल्हापुर
कोल्हापुर चा कायापालट करणारा, लोकराजा छत्रपती शाहु महाराज यांची आज जयंती
त्याना मानाचा मुजरा
आता
आता कोल्हापूर मध्ये खुप काही सुधारणा झाल्या आहेत. रंकाळा तलाव तर मस्तच केला आहे. गळ काढल्यामुळे तिथे पोहायला मजा येते. मी मे महिन्यात कोल्हापूरला गेलो होतो. सॉलीड मजा केली. आता हे पाहिल्यावर परत एकदा सर्व आठवणी जाग्या झाल्या.
राम राम
राम राम दोस्त हो..
मी दोन तीन महिन्या पूर्वी खिद्रापुरला गेल्तो. त्याचे फोटो मला अपलोड करायचेत. पन कसे?
एकदम मस्त आहोत कणोरी मत
एकदम मस्त आहोत कणोरी मत
नमस्कार मंडळि, मि मायबोली चि
नमस्कार मंडळि,
मि मायबोली चि नियमित वाचक. काहि कारणाने माझे खरे नाव सांगु शकत नाहि. मि ३५ वर्षाचि एक घट्स्फोटिता आहे. कोल्हापुर मध्ये अशा स्त्रिया /व्यक्ति साठि एखादि संस्था / संघटना आहे का जिथे मला माझ्या समस्या बोलुन दखवता येतिल? सर्वच गोष्टि घरि पालकांकडे बोलता येत नाहित. मला मैत्रिणि मित्र हि नाहित. त्यमुळे फार मानसिक कुचंबणा होते. एक गोष्ट कि पुनर्विवाहासाठि हा प्रयत्न नाहि. पण माझ्या सारख्या सम दुखि लोकान्शि बोलले तर मन हलके होइल असे वाटते. क्रुपया आपले सहकार्य हवे आहे.
हा मजकुर कुठे टाकायचा न कळल्याने इथे देत आहे. क्षमस्व.
कोल्हापुरात "नारी", "आधार" या
कोल्हापुरात "नारी", "आधार" या संस्था कदाचित तुम्हाला मदत करु शकतील.
नमस्कार कोल्हापुरकर!मी
नमस्कार कोल्हापुरकर!मी सोलापुअरला येताना कोल्हापुरात खड्डेच खड्डे होते. महानगरपालिकेभोवती तर खंदकच खणुन ठेवला होता. रस्ते करायचं काम चाललं होतं. तुमच्यापैकी कोणी मला सांगाल का की आता परिस्थीती कशी आहे.? रस्ते झाले का?
मसाई पठार एक जबरी स्पॉट आहे,
मसाई पठार एक जबरी स्पॉट आहे, बराचसा पाचगणीच्या टेबललँडसारखा पण न माणसाळलेला, एका टोकाला मसाईदेवीचं छोटं मंदिर आणि पार दुसर्या टोकाला बुद्धलेणी,भन्नाट वारा आणी या जगात फक्त आपणच आहोत असं वाटायला लावणारा प्रचंड विस्तार.
पार दुसर्या टोकाला
पार दुसर्या टोकाला बुद्धलेणी>>>>>>>
आता ती लेणी आधीच्या अवस्थेत नसावीत. कारण बर्याच वेळा तिकडे बौद्ध पौर्णिमा गाठुन जो राडा व्हायचा त्याने कंटाळुन त्याची नासधुस केली आहे गावकर्यानी अस मी ऐकल होत.
ती लेणी बौद्धकालीन असावीत का ह्या विषयी मला शंकाच आहे. ते असो.
पण आगावु, तुम्ही तिकडे एक नदीचा उगम म्हणून एक ठिकाण आहे ते पाहिल का?
गावकर्यांच्या मते ती गुप्त नदी आहे. खरे खोटे देव जाणे पण मसाइच्या पठारापासुन पन्हाळ्यापर्यंत जी डोंगररांग पसरली आहे त्यात एका ठिकाणी खाली जमिन पोकळ असावी असा आवाज ऐकलाय मी.
आमचा राजा कुत्रा पळत होता आणि आवाज मात्र घोडा पळाल्यासारखा येत होता.
मला परत सगळ बघायच आहे. हा अनुभव मी शाळेत असतानाचा.
झकासराव तुम्ही म्हणता त्याच
झकासराव तुम्ही म्हणता त्याच रस्त्याने मीही गेलो होतो पण कुठे जमीन पोकळ असल्यासारखे काही वाटले नाही,पण लेण्यांच्या जवळ पाण्याचा एक बारमाही उगम आहे.
आगाऊ नमस्कार ! हे "मसाई पठार
आगाऊ
नमस्कार !
हे "मसाई पठार " कुठे" आहे ? लोकेशन सांगाल प्लीज? मी कोल्हापुर्चा नाही. पण या पठारावर जावेसे वाटते.
कोल्हापुरात खड्डेच खड्डे होते
कोल्हापुरात खड्डेच खड्डे होते >>
कुलु , कोल्हापुरात माझे ही खुप दिवसात जाणे झाले नाही पण आता परिस्थिती अजुनच भयानक आहे असे ऐकतोय..
रस्ते बांधकामावर न्यायालयाने स्टे आणला आहे.. आधिच खड्डे त्यात अर्धवट उकरलेले रस्ते त्यात अवेळी पडणारा पाउस... पार बुक्का पडलाय
यशवंत, आधी पन्हाळ्याला
यशवंत, आधी पन्हाळ्याला जा;पुसाटि बुरुजाकडे जाण्यार्या रस्त्याला लागा तिथून एक अगदी साधा ट्रेक करून म्हणजे पन्हाळ्याच्या पश्चीम दिशेने (याच रस्त्याने महाराज विशाळगडाकडे गेले असे म्हणतात) गड उतरुन परत मसाई पठारावर चढा, पूर्ण रस्त्यात लहान वस्त्या आहेत आणि लोकही मदतीला एकदम तयार! अगदी निवांत गेलात तरी तासाभरात पठारावर जाल. तिथे जायला गाडीरस्ता आहे पण त्यात चालत जायची मजा नाही.
कोल्हापुरात खड्डेच खड्डे होते
कोल्हापुरात खड्डेच खड्डे होते >>>>>
मी लेटेस्ट ह्या दिवाळीत गेलो होतो.
पार वाइट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट आहेत रस्ते.
माझ्या आजवरच्या आयुष्यातील मी पहिल्यांदाच पाहिलेत कोल्हापुरातले इतके वाइइट्ट रस्ते.
त्यात एक मेन रस्ता कॉन्क्रीटचा करण्याच काम सुरु आहे.
अरे कोल्हापुरच्या गप्पांच वेगळ पान आहे. तिथे बोलुया की.
अरे केदार स्टे ऑर्डर काढुन
अरे केदार स्टे ऑर्डर काढुन टाकली पण त्याबदल्यात ५००० वृक्षरोपण करायला सांगितले. काम परत सुरु झालेय पण रस्त्यांआधी ड्रेनेज नीट करण्यासाठी सङळे रस्ते उ़हडलेत. महानगरपालिका तर पाण्यात पोहतेय. गंगावेशेतल्या रस्त्यांचं रुंदीकरण करणार आहेत. आणि झकासराव तुम्ही शिवाजिइ विद्यापीठाकडे गेला नाहीत का? छान चौपदरी रस्ता केलाय तिथे वुईथ फूट्पाथ. सर्वच रस्ते चौपदरी करणार आहेत . रंकाळा मात्र नादखुळा केला. संध्याकाळी तर इअतका देखणा दिसतो तिथुन निघु नयेस वाटतं अर्थात ही सगळी माहिती दोन महिन्यांपुर्वीची. आता काय झालय कुणास ठाऊक?
आता काय झालय कुणास
आता काय झालय कुणास ठाऊक?
>>
कुलु, तू सकाळ मधली ताजी बातमी वाचली नाहेस काय ? मुख्यमंत्र्यांनीच खुद्द सांगितलेले आहे.. याला विलंब होइल... कंपनीच्या contract चा परत काहीतरी लोचा झालाय मी काल-परवाच वाचलेय
तरी रेल्वे फाटक (टेंबलाई जवळचे) तिथे उड्डाण पुल होतोय म्हणे.. चांगले आहे
आजच कोल्हापुरातून परतले. अरे
आजच कोल्हापुरातून परतले. अरे काय आख्खं कोल्हापूर नवीन बांधतायत असं वाटतंय.. एक तर आम्हाला केवळ जुजबी रस्ते माहीत आणि कुठूनही कुठे जाताना माहीत असलेल्या रस्त्यात मधेच डायव्हर्जन!! जाम फिरलो...
>>आख्खं कोल्हापूर नवीन
>>आख्खं कोल्हापूर नवीन बांधतायत
हो का? चांगलं आहे. रंकाळा साफ केला वाटतं. जाणारच आहे पुढच्या महिन्यात तेव्हा कळेल.
छे आम्ही रंकाळ्यापर्यंत
छे आम्ही रंकाळ्यापर्यंत पोचलोच नाही. एकतर ठरलेली कामं झाल्यावर वालावलकर कापड दुकान ट्रस्ट आणि देवीचं देऊळ या ठिकाणी पोचतानाच संपलो आम्ही. रंकाळ्याचा रस्ता तर सोडून दे दिशा पण माहीत नाही आम्हाला. त्यात कोल्हापुरातले लोकच सध्या नवीन असल्यासारखे रस्त्याचा विचार करतायत विचारलं की इतकं सगळीकडे खणलंय...
नी, जवळच होता कि रंकाळा
नी, जवळच होता कि रंकाळा देवीपासुन . सांगितल असत अगोदर जाणार म्हणुन तर घरचा address तरी दिला असता.
जवळच होता कि रंकाळा देवीपासुन
जवळच होता कि रंकाळा देवीपासुन .<<
म्हणलं ना.. रस्ता काय दिशा पण माहीत नव्हती... आणि जेमतेम दिड दिवसात ठरलेल्या कामांच्यातून इतका कमी वेळ उरला... त्यातला बराचसा खणलेल्या रस्त्याला पर्यायी रस्ता शोधण्यात..
आता परत जाईन तेव्हा कळवीन हो...
>>रस्ता काय दिशा पण माहीत
>>रस्ता काय दिशा पण माहीत नव्हती...
पश्चिमेकडच्या दरवाज्याने, [जिथे नगारा वाजवतात, जिथून सरळ महाद्वार रोड येतो] तिथून सरळ १५ मि. चालत गेले की रंकाळा....
ह्म्म्म विचारलं असतं तर
ह्म्म्म विचारलं असतं तर तेव्हाही कळलं असतंच की..
पण वेळ नव्हता आणि रस्त्याची खणाखणी बघून धीर खचला एवढाच सांगायचा मुद्दा.
हं खरय... सगळीकडे रस्त्याची
हं खरय... सगळीकडे रस्त्याची कामेच कामे चालली आहेत... आणि रस्ते पण फार छोटे आहेत..
नी,
पुढच्या वेळेस गेलीस की कोल्हापुरातील भेळ्,वडा नी मिसळ खा... आताही खाल्ला असशील म्हणा...
रस्ते छोटे असायची आपल्याला तर
रस्ते छोटे असायची आपल्याला तर सवय आहे.. सदाशिव पेठी ना मी!!
पण यावेळेला भेळ, वडा आणि मिसळ सगळं राहून गेलं.
पण मला भेळ, वडा, मिसळीच्या योग्य त्या जागा सांगून ठेवा. पुढच्या वेळेला सोडणार नाही..
एकतर प्रवासातच माझ्या स्लिप डिस्कने उचल खाल्ली त्यामुळे स्टिफ बॅकने माझा अर्धा दिवस खाल्ला. आणि मग दुसर्या दिवशी काही महत्वाच्या मिटींग्ज झाल्यावर फारसा वेळच उरला नाही.
फक्त ओपलमधे जेवलो दुपारी. ती ट्रीट नवर्यासाठी जास्त. पण शाकाहारी जेवण पण महान असतं तिथलं असं लक्षात आलं. आणि गेल्यावर कुठेही भाकरी म्हणल्यावर बाय डिफॉल्ट ज्वारीचीच असायची हे इतकं मस्त वाटलं. सध्या सारखं कोकणात फिरल्यामुळे भाकरी म्हणल्यावर मी ऑन गार्डस असायचे... न जाणो पानात चिकट चिकट तांदळाची भाकरी येणार की काय म्हणून...
मला एकुणातच कोल्हापूर जाम
मला एकुणातच कोल्हापूर जाम आवडतं पण. मस्त वाटतं. आणि बोलण्याच्या लहेजात जाम प्रेमळपणा असतो तो पण...
एक कोप ची आठवण.. आम्ही प्रयोगाला गेलो होतो. बहुतेक केशवराव ला प्रयोग होता. प्रयोगाच्या आधी नाश्ता मागवला होता. पोहे आले होते. प्रयोगात सुस्ती नको म्हणून आम्ही सुरूवातीला हात राखून खाल्ले पोहे. तर तो आणणारा म्हणजे डबा आणणारा माणूस इतक्या आग्रहाने आणि प्रेमाने 'घ्या हो' म्हणत होता की प्रत्येकाने भरपूर खाल्ले. मग डबल चहा.. सुस्ती नको म्हणून.
आजही त्या माणसाचा 'घ्या हो!' डोक्यात बसलेला आहे. फार फार गोड!!
इथे पहा वडा: रंकाळ्यावरचा
इथे पहा
वडा:
रंकाळ्यावरचा प्रियदर्शनीचा
शिवाजीपुतळ्याचा प्रकाशचा, तिथेच मनपा जवळ तुकाराम
अर्धा शिवाजीपुतळ्याचा चारू चा
भेळः
राजाभाऊ - गुरुमहाराज वाड्याजवळ आहे - मंदिरापासून ५ मि
रंकाळ्यावर कुठेही
मिसळः
फडतरे, आहार किंवा चोरगे
Pages