अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.
थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही
आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-
- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.
- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).
- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.
- जन्म-स्वभाव; मनःस्थिती
- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा
एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?
मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !
कोल्हापूर भागात तरी लोकांना
कोल्हापूर भागात तरी लोकांना परवा म्हणजे साधारण 3 महिन्याच्या रेंज मध्ये घडलेली कोणत्याही तारखेची गोष्ट अश्या अर्थाने म्हणताना ऐकलं आहे(ही भागावर टीका नाही, माझा सुरुवातीला त्या परवा ने बराच गोंधळ उडाला होता.म्हणजे 'परवा अमक्याने असं म्हटलं' ऐकल्यावर 'तो तर हैदराबाद ला आहे ना गेला एक महिना, मग परवा कुठे भेटला' वगैरे संवाद.)
हे फक्त मराठीच माणसं करतात
हे फक्त मराठीच माणसं करतात का?
नाही.
अरे हैद्राबादका परसों तर
अरे हैद्राबादका परसों तर एकदम फेमस आहे. सगळेच बोलतात असे. त्यात खास मराठी काही नाही. कोण तो राजस्थानी माणूस त्याच्या दाल की बाटी करुन टाकू.
कालपरवाच तर हा एव्हढासा होता
कालपरवाच तर हा एव्हढासा होता आणि आता किती उंच झालाय वगैरे
कोण तो राजस्थानी माणूस
कोण तो राजस्थानी माणूस त्याच्या दाल की बाटी करुन टाकू >>
परवाचीच गोष्ट, .... पटली.
परवाचीच गोष्ट, .... पटली.
पण फक्त मराठी पब्लिक नसावं.
आमच्या गोतावळ्यात,
आमच्या गोतावळ्यात, मित्रमंडळीत परवा हा शब्द 'काही दिवसांपूर्वी' अशा अर्थाने बरेच वेळा वापरतात. कधी कधी नेमका अर्थ पोहोचवायचा असेल तर 'लिटरली परवा' असे ठासून मराठीत सांगतात
हरचंद पालव, tolerance value बद्दल जे लिहीले आहे ते एकदम पटलेच. (पण तीन आकडे वापरण्याचे नवीन दिसते) नशीब असे आपण सगळीकडे करत नाही. नाहीतर नानासाहेबांना पानिपतच्या पराभवाची बातमी देणारे ते फेमस पत्र आले होते त्यात "दोनचार मोत्ये गळाली, पंचवीस-तीस मोहरा हरपल्या, रुपये खुर्दा किती गेला गणतीच नाही" असे लिहीले असते तर पत्र लिहिणाऱ्याचाच नानासाहेबांनी खुर्दा केला असता.
(No subject)
(No subject)
- आमचा एक राजस्थानी मित्र
- आमचा एक राजस्थानी मित्र म्हणाला की तुम्ही मराठी लोक 'परवा' हा शब्द (हिंदीत बोलताना पर
Mr पालव.
मराठी भाषेत काल (before day) उद्या,(next day) आणि परवा असे शब्द आहेत.
हिंदी भाषेत काल आणि उद्या ह्या साठी एकच शब्द आहे.
तुमच्या त्या राजस्थानी मित्राला vichara
तुमची भाषा कोणत्या लिपी मध्ये lihali जाते.
ज्या राजस्थान ल स्वतःची लिपी नाही .
त्यांनी गप्पच बसावे.
मराठी ही भारतातील ग्रेट भाषा आहे.
तमिळ,बंगाली, तेलगू, भाषा सारखी.
हिंदी भाषिक लोकांनी .
त्यांच्या भाषेचा पण गर्व करू नये
हिंदी ही भाषा उर्दू चे पिल्लू आहे.
Mr पालव असे कडक शब्दात त्या राजस्थानी मित्राला तुम्ही समज दिली का..राजस्थान हे भारतातील bimaru राज्य आहे
हिंदी मध्ये परसो हा शब्द आहे
हिंदी मध्ये परसो हा शब्द आहे
मराठी बृहद्कोश
मराठी बृहद्कोश
परवा हा शब्द दिसत नाही.
मराठीत कालच्या आधीचा आणि
मराठीत कालच्या आधीचा आणि उद्याच्या नंतरचा या दोन्हीसाठी परवा हा एकच शब्द आहे.
मराठीत आत्या आणि मावशी यांच्या नवऱ्यांसाठी शब्द आहे का?
आतोबा आणि मावसा
आतोबा आणि मावसा
त्यांना हाक कशी मारतात?
त्यांना हाक कशी मारतात?
मराठीत आत्या आणि मावशी
मराठीत आत्या आणि मावशी यांच्या नवऱ्यांसाठी शब्द आहे का?>>>> आमच्याकडे आत्येंजी आणि मावशेंजी म्हणतात.
त्यांना हाक कशी मारतात?>>>
त्यांना हाक कशी मारतात?>>>
हे हाका मारण्यासाठी नाहीत.
म्हणजे ज्याने त्याने आपल्या सोयीनुसार हाक मारावी. उदा. केशवराव, केशवकाका. केश्या इत्यादी.
बाप, वडील, आतेभाऊ, मावसभाऊ, बहिण, सावत्रभाऊ, ह्यांना कशी हाक मारायची?
थोडक्यात सांगायचे झाले तर
मला माहित नाही!
त्यांना हाक कशी मारतात? >> ओ
त्यांना हाक कशी मारतात? >> ओ काका
नातेवाईक वेगळे .
नातेवाईक वेगळे .
मारवाडी लोक घरातील कर्त्या स्त्री ल बई म्हणतात.
.आपण घरकाम करणाऱ्या स्त्रियांना बाई म्हणतो.
हिंदी भाषिक राज्यांचे काही कौतुक सांगू नका.
बनारस की कुठे स्मशान भूमी मध्ये ऑर्केस्ट्रा चालू असतो.
मराठी ची तुलना फक्त दक्षिण भारत आणि बंगाल,पंजाब शिच होवू शकतो.
बाकी राज्यांशी नाही.
बनारस की कुठे स्मशान भूमी
बनारस की कुठे स्मशान भूमी मध्ये ऑर्केस्ट्रा चालू असतो.>>
छान माहितीत भर पडत आहे.
मी तर असे ऐकले आहे कि त्यावेळी केक कापतात.
मराठी बाणा काही कामाचा नाही
मराठी बाणा काही कामाचा नाही हे मला माहीत आहे.
महाराष्ट्र राज्य खूप महान आहे.
देशातील सर्व मोठे उद्योगपती इथे येवून च मोठे झाले आहेत.
पण मराठी लोक चा स्वभाव अयोग्य आहे
कोणताच व्यवसाय मध्ये आज तरी मराठी लोक अग्रेसर नाहीत.,
आणि महाराष्ट्र हे देशाचे व्यवसाय, ,उद्योग ह्याचे इंजिन आहे.
केवढा विरोधाभास आहे.
इतके अनुकूल वातावरण असून पण उद्योगपती, मोठमोठे व्यावसायिक जे महाराष्ट्रात मोठे झाले त्या मध्ये मराठी कमी आहेत
दोन रुपये असतील तरी मराठी लोकांना गर्भ श्रीमंत असल्या सारखे वाटते
आणि ते त्याच भ्रमात असतात..
ह्याला च म्हणतात दैव देते आणि कर्म नेते.
अतिशय मागास राज्यातील लोक इथे येवून खूप मोठे श्रीमंत झाले..
काही लोकांची तर आशिया मधील सर्वात श्रीमंत लोकात गणना होते.
पण ते मराठी नाहीत.
मुंबई सारखे ,पुणे सारखे शहर महाराष्ट्रात असून मराठी लोक त्याचा फायदा नाही घेवू शकले
आपण घरकाम करणाऱ्या
आपण घरकाम करणाऱ्या स्त्रियांना बाई म्हणतो.>>
आम्ही शाळेत शिकवणारीला बाई म्हणतो.
अनिंद्य, धागा हाताबाहेर चालला आहे.
पण मराठी लोक नालायक आहेत.
पण मराठी लोक नालायक आहेत.
कोणताच व्यवसाय चालविण्यास लायक नहित.>>> व्हा ट कूलेड हि द ड्रिंक्स!!! भयंकरच चुकीचे विधान आहे.
सॉरी अनिंद्य
.
@ हरचंद पालव,
@ हरचंद पालव,
मराठी भाषिक की मराठी भाषक ? हे सांगा मला. नेहेमी माझी गडबड होते.
बाकी कल आणि कल - उद्या आणि काल साठी हिंदीत एकच शब्द असणे हे गायपट्ट्यात time is eternal, no need to hurry या प्रवृत्तीचे दृष्यलक्षण आहे
राजस्थानीत मात्र काले (काल) आणि सुंवारे (उद्या) असे सुस्पष्ट शब्द आहेत हे तुमच्या मित्राने सांगितले असेलच.
भाषिक हा शब्द सर्रास वापरला
भाषिक हा शब्द सर्रास वापरला जातो. पण भाषक हा शब्द योग्य आहे. इथे इक प्रत्यय लागत नाही. भाषीय हासुद्धा चालेल.
काले सुंवारे - रोचक. कधी बोलण्यात आलं नाही.
tolerance value
tolerance value
हा हा. ज़बरदस्त निरीक्षण. पण हे सर्वच करतात, मराठी, अमराठी.
….तर पत्र लिहिणाऱ्याचाच नानासाहेबांनी खुर्दा केला असता…,
अशक्य कोटीतली कल्पना. हसू नये पण खूप हसलो
काले अने आवती काले. गुजराती
काले अने आवती काले. गुजराती. बरेच वेळा गयी कालेसुद्धा.
बरोबर हीरा . तो व्यापारी समाज
बरोबर हीरा . तो Predominantly व्यापारी समाज आहे. Time is money वाला. व्यापारी समाजाला कल-कल करुन नाही चालणार
माझे पण दोनचार दगड.
माझे पण दोनचार दगड.
मराठीत आतेच्या आणि मावशीच्या नवर्याला वेगळं संबोधन नाही. आईचे आईवडील आणि वडिलांचे आईवडील दोघांनाही आजीआजोबा म्हणतो. हिंदीत दादादादी , नानानानी, पोता पोती , नवासा नवासी.
तेच इंग्रजीत काकामामामावश्याआत्या सगळे अंकल आणि आँट. मामेमावसचुलत आते सगळी भावंडं कझिन्स.
इंग्रजी लोक नात्यांच्या गुंत्यांत अडकत नाहीत. हिंदीभाषक अडकतात. मराठी लोक या दोघांच्या मध्ये. त्यामुळे प्रगतीच्या बाबतही आपण या दोघांच्या मध्ये.
-------
आपल्याकडे नेमकं काय आहे आणि काय नाही याचं चर्वितचर्वण मराठी लोकांइतकं दुसरं कोणी करतं का? स्वतःची इतरांशी तुलना?
Pages