‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Submitted by अनिंद्य on 1 January, 2023 - 04:35

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही Happy

आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-

- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).

- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.

- जन्म-स्वभाव; मनःस्थिती

- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा

एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?

मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऍडवु!!
>>> ऍडमिन च्या बायकोने प्रेमाने हाक मारल्यासारखे वाटत आहे...

च्रप्स
क्या बात है. और ये रहा सिक्सर!

ऍडवु!!
हा शब्द मराठीत ऍडवुया!!

अ‍ॅ?
चामुंडराय हा अ‍ॅ तुम्ही कसा लिहिता. मी वर्ड मध्ये लिहितो तेव्हा तो बरोबर दिसतो. पण ती फाइल इकडे पेस्ट केली की अ‍ॅ चे अॅॅ अस होते.
मी गुगल वापरतो.सांगा की राव तुमची ट्रिक.

मराठी पुरूषांना भाषिकांना रोमॅन्स जमत नाही. सिनेमात नाही आणि बाहेरही नाही. ते कायम वास्तववादी असतात. Proud ही काडी निरिक्षणातून टाकलेली आहे. उदा. बाहेर जवळच्या मैत्रिणी सोबत रिमझिम पावसात कॉफी पित असताना, परत जाताना आईने सांगितलेली अर्धा किलो तुरीची दाळ आणायचं विसरत नाहीत. त्यासाठी घाई करतील व क्षण घालवतील ही शक्यताही असू शकते. तेच मराठी कादंबऱ्यांत तो उथळ व सवंग होतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व Happy .

टिपटॉप रहात नाहीत, तेच पंजाबी बघा.... असो.

मराठी भाषिकांना दुसऱ्या भाषेत बोलताना कमी हार्ष किंवा सटल ॲक्सेन्ट असतात, हे होईल का व्यवच्छेदक लक्षण?

आपला शुद्धलेखनाचा व व्याकरणाचा आग्रहही जास्त असतो असं मला वाटतं, म्हणजे आपण 'न-ण' करत बसलो आणि गुजराती लोक कुठल्या कुठे गेले. आपल्या कडले अर्धे लोक भाषेबाबत अनास्था असलेले व उरलेले दुराग्रही असं काही तरी असावं. आपण समांतर विश्वात राहिल्यासारखं वागतो. एकंदरीत एकमेकांबद्दल स्विकार कमी वाटतो.

आपण भक्तीभाव व बुद्धी तसेच वैभव व वैराग्य दोन्हीचीही परंपरा एकवटून होणाऱ्या श्रीमहाराष्ट्र देशातले आहोत , त्यामुळे हे गुण व आदर्श आपल्याकडे आहेत, ते इतर भाषिकांच्या मानाने प्रकर्षाने जाणवते. इतर ठिकाणी हे एकत्र दिसत नाही फारसं.

>>> मराठी पुरूषांना भाषिकांना रोमॅन्स जमत नाही. सिनेमात नाही आणि बाहेरही नाही.
अगं वेडाबाई, मराठीत 'रोमान्स'ला प्रतिशब्ददेखील नाही! Lol
('प्रणय' सुचवण्याआधी 'रोमॅन्टिक कॉमेडी'ला मराठीत काय म्हणाल ते सांगा)

प्रियाराधनाचे विनोद.... पण धड विनोदही होत नाही आणि प्रणयही. आमच्या आधीच्या पिढ्यांनी नीट केला असता तर आम्हाला आज माहिती असतं. Hence , proved Lol

लोल अस्मिता.
>> मराठी पुरूषांना भाषिकांना रोमॅन्स जमत नाही. सिनेमात नाही आणि बाहेरही नाही. ते>> असं ते काय करायचं. बाळा गाऊ कशी अंगाई मधला आशा काळेचा रोमान्स बघा बरं Wink

अगं वेडाबाई, मराठीत 'रोमान्स'ला प्रतिशब्ददेखील नाही! >>>
प्रियाराधनाचे विनोद.... पण धड विनोदही होत नाही आणि प्रणयही >>> Lol

मराठीतील रोमान्स. हा रोमान्स होता हे तेथील कॉमेण्ट्स ने सिद्ध झाले नाही तर त्या हीरोच्या अंगावरच्या झालरीने नक्कीच होईल.
https://www.youtube.com/watch?v=8F2G5viZcLU

सर्वच Lol
@व्हिडिओ, अरे हा तर भरतकाम केलेला पॉन्चो आहे Lol , साईनफिल्डचा फ्लफी शर्ट आठवला.
हा पॉन्चो घातलेला मदनाचा पुतळा पुणे - ५२ चा आधारस्तंभ आहे. Wink
लोक मला लिंका व संदर्भ देत आहेत, याचा अर्थ मराठी माणसाचा रोमान्स म्हणजे 'नारूचा रोगी' झालायं.

अनिंद्य , तुम्हाला संदर्भ Happy
https://www.maayboli.com/node/82555?page=24

अस्मिता Lol

आता शुद्धलेखन व व्याकरणाच्या व्यवच्छेदक लक्षणाला जागून -

>> मराठी पुरूषांना भाषिकांना भाषकांना Happy

गुजराती पाऊल पडते पुढे

सर्व गुण असून,अंगात धमक पण असून, बुध्दी तेज असून .
उत्तम सामाजिक वातावरण असून .

पण मराठी लोकात न्यूनगंड आहे.
मग सर्व संपन्न मराठी भाषेला कमी समजणे.
आणि गुजराती ,पुढे,बिहारी पुढे असे काहीतरी मनात घेणे.
सर्व महत्वाच्या गोष्टी मराठी लोकांनीच भारतात प्रथम केल्या आहेत.
मराठी लोकांसारखे संस्कारी लोक नाहीत.
आणि महाराष्ट्र सारखे उत्तम सामाजिक वातावरण ,नीतिमत्ता असणारे दुसरे राज्य नाही.
मी मराठी असल्याचा आणि महाराष्ट्र हे माझे राज्य असल्याचा पूर्ण अभिमान आहे.
तिकडे पंजाब उडत आहे.
आणि गुजरात पान पराग मध्ये रंगला आहे.
उत्तर भारत जाती व्यवस्था आणि गरिबी ह्या दलदलीत रुतला आहे.
प्रगती करायची आहे तर महाराष्ट्र त च यावे लागणार .
त्याला पर्याय नाही.

जसे आपल्या शिक्षित लोकांना पश्चिमात्य देशांचाच आधार आहे.
नाही तर ह्यांचे शिक्षण झीरो किमतीचे आहे

धाग्याचा विषय आवडला. प्रतिसाद वाचनीय आहेत. Happy
इथं नवीन असल्याकारणानं सध्या थोडं काठाकाठावरूनच पाणी उडवावं म्हणतो.

"आलोच पाच मिनटांत..!"
हे एक आहे म्हणजे.
ह्यातून संबंधित मराठी मनुष्याचं काळाबद्दलचं सखोल ज्ञान, काळास स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाकवण्याची सदाबहार क्षमता, निष्पाप चेहऱ्यानं हूल देण्याची लगबग, किंवा समजा खात्रीशीर गुंगारा देण्यासंबंधीचा विलक्षण लवचिक इरादा, हे सगळं कसं एका क्षणात दृगोच्चर होतं..! कळतंच एकदम..! या हृदयातून थेट त्या हृदयात..! डायरेक् अभिव्यक्ती..! शंकेबिंकेला काहीही थारा नाही.

परंतु हे फक्त दोन मराठी मनुष्यांतच हस्तांतरित होऊ शकतं. इंग्रजीतनं अवघडे.

"I will be there in five minutes."
ह्याला काय अर्थ है..! अगदीच बिनकामाचं.
संबंधित मराठी मनुष्याच्या मोकळ्याढाकळ्या हवेशीर सांस्कृतिक पैलूंना वरचा अनुवाद बिलकुल न्याय देत नाही.

तरीही काही लोक अशा स्वरूपाचे अनुवाद करून निष्कारण अफवा पसरवतात. ते पाहून माझ्या काळजास भारी डंख होतात..! कारण उद्या समजा हे वाचून एखादा भाबडा इंग्रज मनुष्य चिरंतन काळ वाट बघत बसला, आणि नंतर तिकडंच लालबुंद होत्साता पालथा पडला तर काय करणार??
हे असं बरोबर नाय ना..!
शेवटी असंय की आपल्यावर एक ऐतिहासिक जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे..! काळानंच ती सोपवली आहे.
मग त्या जबाबदारीचं काही भान वगैरे असायला हवं की नको ? व्हय ओ?

उथळ माहिती वर मत नकोत.
२) माझा जन्म १९७२ चा आहे खेडेगावातील आणि मला जसे समजत आहे तसे माझ्या घरात आणि गावात २४, तास वीज होती आणि आज पण आहे.
३), अनेक साखर कारखाने,दूध संघ, सहकारी बँका .
मला जसे कळत आहे तेव्हा पासून आहेत.
ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य काल परवा पर्यंत होते आणि आज पण असावे.
४)
भारत सरकार ला सर्वात जास्त टॅक्स महाराष्ट्र काल पण देत होते आणि आज पण देते.

मुंबई मुळे असे आकलेचे तारे तोडले जातील .
पण पुणे भारत सरकार ला सर्वात जास्त टॅक्स देणारे सहावे शहर आहे.
मुंबई नेहमी प्रमाणे एक नंबर.
कोलकाता,बंगलोर,हैद्राबाद , चेन्नई.
ही शहर आहेत.
गुजरात,राजस्थान, मधील एक पण शहर त्या मध्ये नाही.
गुजरात मुळे भारत सरकार ला काही जास्त टॅक्स मिळत नाही.
त्यांच्या पुढे यूपी आहे.

गुजराती पावूल पडते पुढे .
हे साफ चुक आहे

जसे यूपी,बिहारी,गुजराती फोकादरी करत असतात.
आमच्या मुळे मुंबई आहे.
तसे भारतीय फेकत असतात त्यांच्या मुळे अमेरीका श्रीमंत आणि प्रगत आहे.
हास्यास्पद दावे असतात हे.
बाईडन सरकार नी अजून त्यांचा राजदूत पण भारतात नेमला नाही.
असे वाचले आहे.
अमेरिका भारतातला किती किंमत देते ते ह्या वरून समजते.
त्यांचे शिकून आपण पण बाकी राज्यातील लोकांस आपल्या राज्याच्या प्रगती साठी किती किंमत द्यायची जे ठरवा

<<<जसे आपल्या शिक्षित लोकांना पश्चिमात्य देशांचाच आधार आहे.
नाही तर ह्यांचे शिक्षण झीरो किमतीचे आहे>>>
पश्चिमात्य देशांचाच आधार आहे. असे नाही,
भारतातच अनेक संधि उपलब्ध आहेत. इथे येऊन नागरिक झालेले लोक अनेक वर्षे झाली. त्यावेळी भारतात फारच वाईट परिस्थिती होती पण रडत बसण्यापेक्षा त्यांनी मार्ग काढला. आता भारतात भरपूर पैसे आहेत नि उच्च शिक्षित लोक तर सगळ्या जगात जास्त संख्येने आहेत.
मग रडता कशाला? कामाला लागा. दुसर्‍यांना दोष देण्यापेक्षा आपले बघा.

मराठीत काही गोष्टी खूप कमी अचूकता साधून बोलल्या जातात. उदाहरण द्यायचं तर, परवाचीच गोष्ट - आमचा एक राजस्थानी मित्र म्हणाला की तुम्ही मराठी लोक 'परवा' हा शब्द (हिंदीत बोलताना परसों असं भाषांतर करून) अजिबात काळाची पर्वा न करता वापरता. त्याच्या मते परसों म्हणजे बरोब्बर २ दिवस आधी किंवा २ दिवसांनंतर. पण आपली परवाची गोष्ट ही ४ दिवसांपूर्वी, मागच्या आठवड्यात, किंवा कधीकधी त्याहूनही जुनी असू शकते. ते माहीत नसलेल्या मित्रांचा 'परसों' ऐकून फार गोंधळ उडत असे.

आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण आकडे त्यांच्या टोलरन्स वॅल्यूसकटच वापरतो, अचूक आकडा खूप कमी वेळा वापरतो. आपल्या चार-पाच मित्रांना दहा-साडे दहापर्यंत भेटायला बोलावतो, बँकेत एफ्डीचा रेट सात-साडे सात टक्क्यांपर्यंत गेल्याचं सांगतो, खात्री करायला दोन-चार बँकांत चौकशी करतो, इत्यादी. आता हा गुण थोडा फार इतर भारतीयांतही आहे, पण आजकाल मराठीत एक नवा ट्रेंड दिसतो आहे. टोलरन्स वॅल्यू दोन लिमिट्समध्ये न सांगता तीन टप्प्यांत सांगायला लागलेत काही लोक. उदाहरणार्थ, एक माणूस म्हणाला, की एफ्डी ठेवून काय करता? त्यापेक्षा अमुक म्युचुअल फंडात गुंतवलेत पैसे तर तुम्हाला बारा-चौदा-सोळा टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल. हे तीन टप्प्यांचं गणित आजकाल बर्‍याच मराठी युट्युब चॅनलवरील (थिंक बँकसारख्या) चर्चांमध्ये दिसतं आहे. तुम्हालाही असं काही आढळलं का? सुरुवातीला एखादीच व्यक्ती हे करत असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं, तर आता गल्लोगल्ली हे लोण आलेलं दिसतं आहे. काल-परवापर्यंत फक्त दोनच आकडे वापरत असत. परवाचीच गोष्ट, अगदी परवाचीच.

परवा म्हणजे बरोब्बर २ दिवस आधी किंवा २ दिवसांनंतर.

<<परवाचीच गोष्ट, अगदी परवाचीच. >> म्हणजे २ दिवसांपूर्वीची. ४, ८, १५ दिवसांपूर्वीची न्हवे.

आपली परवाची गोष्ट ही ४ दिवसांपूर्वी, मागच्या आठवड्यात, किंवा कधीकधी त्याहूनही जुनी असू शकते. >> खरं तर नाही. (only figuratively, मी तरी व्यक्तिशः तसा वापर केला नाही किंवा ऐकला नाही. काल-परवा म्हणजे काही दिवसांपूर्वी हे ऐकले आहे.) ४ दिवसांपूर्वी, मागच्या आठवड्यात म्हणजे ती गोष्ट मग पूर्वीची होते. काही दिवसांपूर्वीची.

उ बो, अहो पुलंच्या पाळीव प्राणीमध्ये तुम्ही ऐकलं असेलच की. त्या टॉम्याची मालकीण 'पदरचं का सांगते, परवाचीच गोष्ट' असं म्हणून पंधरा-एक परवाच्या गोष्टी सांगतात.

Pages