नाशिक शहरातून मुंबई आग्रा हायवेकडे एक रस्ता जातो. जसजसं आपण मुंबईकडे जाऊ, तसतशी लोकवस्ती विरळ होत हॉटेल्सचं साम्राज्य चालू होतं.
फाळके स्मारकाजवळ एक १०० हटस नावाची १०० छोटेखानी घरांची कॉलनी आहे. ती कॉलनी सोडल्यावर तुम्हाला एका अतिशय भव्य गोष्टीचं दर्शन घडतं. ती गोष्ट म्हणजे बंगला.
एक एकरावर त्या बंगल्याचा परिसर पसरलेला आहे. भक्कम दगडी वॉल कंपाऊंड, दहा फूट उंच, एक फूट जाड, आणि पंधरा फूट लांब असे दोन अजस्त्र गेट. त्याच्या आत एक डांबरी रस्ता, आजूबाजूला एक लॉन आणि विविध शोभेची झाडे. लॉनवर दोन तीन ठिकाणे पांढरे टेबल आणि मऊ खुर्च्या...
... मात्र तुमची छाती दडपून टाकेल, ती समोर असलेली वास्तू.
चाळीस हजार स्क्वेअर फुटात पसरलेली भव्य वास्तू!
कमीत कमी चाळीस फूट उंच, शुभ्र रंगात रंगवलेली...
' मोनिका '
लोक म्हणतात, ह्या बंगल्यात फक्त दोन लोक राहतात.
त्यापैकी वास्तूच्या बाहेरच लॉनवर एक व्यक्ती येरझाऱ्या मारत होती.
पस्तिशीची, उंचपुरी, गव्हाळ वर्ण, बोटभर दाढी, धिप्पाड. मागे हात बांधून सावकाश पावलं टाकणारी.
रात्रीची वेळ होती, म्हणून त्याने कुडता पायजमा घातला होता. पायात काहीही नव्हतं.
अनवाणी पायांना होणारा गवताचा स्पर्श त्याला एक सुखद अनुभुती देत होता.
तेवढ्यात त्याच्या फोन वाजला.
ट्रकने गुजरात बॉर्डर ओलांडली.
त्याच्या चेहऱ्यावर रुंद हसू पसरलं.
तेवढयात एका स्त्रीने त्याला हाक मारली.
"बेबी..."
तो हसला.
ती त्याच्याकडेच येत होती.
दुधासारखी गोरी, घाऱ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची...
'माय प्राइज्ड पजेशन'
तो पुटपुटला.
"चल ना आत, किती वेळ फिरणार आहेस अजून?"
तो तिच्याकडे बघतच राहिला.
आणि धसमुसळेपणाने तिला जवळ ओढून त्याने चुंबनांचा वर्षाव चालू केला.
गालावर, ओठांवर, सगळीकडे
"अरे घरात तर चल...," तिचा आवाज अंधारात विरून गेला.
*****
"दोनशे ग्राम आहे."
"अण्णा, टेन्शन नको, दहा किलो द्या, पोलिसांना झक कळणार नाही."
"अरे गांजेड्या. हे दोनशे ग्राम जर कुठे गेले ना, तर तुझी आई, तुझा बाप आणि तू... तिघेही विकले तरी पैसे फिटणार नाही. दहा लाख किंमत आहे याची. विकलं तर वीस लाख होईल."
"महिनाभरात दहाचे वीस करतो, तुम्ही द्या."
"बघ बरं..."
"द्या ओ शेट्टीअण्णा. काय नाही होत."
शेट्टीने पुडी त्याच्या हवाली केली.
"वीस टक्के माझं कमिशन. चाललं ना?"
"भे*** आण इकडे, तुझ्या बापाची ठेव आहे का? चार लाख कमिशन?"
"अण्णा, दहा...दहा टक्के. आता नाही म्हणू नका. आणा ती पुडी इकडे."
"पुडी नाही भुऱ्या, तुझं नशीब आहे. त्याला नीट सांभाळ."
भुऱ्याने सलाम केला व तो तिथून निघून गेला.
*****
एका जुनाट कळकट खोलीत चार कॉट होते. बाजूलाच चार मोठी कपाटे होती. खाली मोठमोठ्या बॅग भरून पडलेल्या होत्या.
तो सकाळी सहालाच उठला, आणि तयारीला लागला.
दात घासून, गुळगुळीत दाढी करून, केस विंचरून तो तयार झाला.
खाली स्प्लेंडरवरची धूळ त्याने झटकली. वीस किक मारल्यावर एकदाची स्प्लेंडर चालू झाली.
समोरच एक मुलगी भुर्रकन स्विफ्टवर निघून गेली.
गालातल्या गालात हसत...
तो तिच्याकडे बघतच राहिला.
मानस नागरे. टॉपर...
केमिकल इंजिनिअरिंग...
जेजे जाधव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. नाशिक.
आणि गेल्या सहा महिन्यांपासून तो नोकरीसाठी धक्के खात होता.
कारण एकच...
त्याला बोलताच येत नव्हतं...
म्हणजे तो मुका वगैरे नव्हता, पण एकाच वेळी डोक्यात हजार विचार चालल्याने त्याच्या तोंडातून शब्द फुटत नसत.
... साध्या बेसिक गोष्टी सांगताना त्याचा लोचा व्हायचा.
...आणि तिथेच तो रिजेक्ट व्हायचा.
कितीदा त्याला सांगितलं, की सरळ उत्तरे देत जा.
मात्र विलक्षण बुद्धिमत्तेला नोकरीच्या बाजारात काहीही किंमत नसते.
...आजही तो कमीत कमी साठ उमेदवारांच्या रांगेत उभा होता.
ज्युनियर प्रोडक्शन इंजिनीयर. पगार, पंधरा हजार...
त्याचं नाव पुकारलं गेलं. तो आत गेला.
...आणि पुन्हा एकदा रीजेक्ट होऊन बाहेर पडला.
शेवटची आशा, आता काहीही मार्ग दिसत नव्हता.
बापानेही त्याच्यापुढे हात टेकले होते. दीड एकर कोरडवाहूत हा इंजिनीयर झाला, हीच विलक्षण गोष्ट होती.
...अशावेळी जग थुंकतं तोंडावर. बापाचा पैसा उधळला म्हणतं.
पण त्याने पैसा उधळला नव्हता... नियतीने फासे उलटे टाकले होते.
विषण्ण अवस्थेत जेव्हा आई जवळ नसते ना, तेव्हा गोदावरीच आई असते...
तिच्याच किनारी तो बसलेला होता.
शेवटचे अठ्ठावीस रुपये खिशात...
रूमवर पायी जावं लागणार. या महिन्यात रूम सोडावी लागणार...
...तो विचार करतच उठला...
...आणि कुणीतरी धाडकन त्याच्यावर येऊन आदळला...
"भेन***" त्याने शिवी हासडली, आणि त्याला सपकन चाकू खुपसला.
तो पोट दाबतच जमिनीवर पडला.
त्याला दूरवर पोलीस गाडीचा सायरन ऐकू आला.
...त्याच्या समोरच काहीतरी पडलं होतं, पांढरट, भुकटीसारखं.
...आणि त्या चांदण्या प्रकाशात गोदावरीच्या किनारी पडलेली एक पांढरी पावडरची पुडी त्याने उचलली.
...मोठ्या कष्टाने...
नेहमी त्याच्या डोक्यात शंभर विचार चालत, पण आज त्याच्या मेंदूने, मनाने, हृदयाने एकच कौल दिला होता...
...पुडी उचल...
समोरचं गोदावरी संथ वाहत होती.
गोदावरीने त्याला वरदान दिलं होतं, की अभिशाप?
हे त्याचं त्यालाही माहिती नव्हतं.
पण ते काहीही असू देत, गुलशनाबादमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला होता.
क्रमशः
mast chalali aahe katha
mast chalali aahe katha
mi tumchya junya sarve katha vachalya aahet
i am big fan of you after BEFIKIR
अरे व्वा.. मूळ कादंबरीला जोड
अरे व्वा.. मूळ कादंबरीला जोड देणारी अजून एक उत्कंठावर्धक कथा !!
तुमच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे "लिहीत रहा" !!
>>>>"भेन***" त्याने शिवी
>>>>"भेन***" त्याने शिवी हासडली, आणि त्याला सपकन चाकू खुपसला.>>>>
कोणी कोणाला मारले कळत नाही....मला वाटतं पुडी मानसला मिळाली म्हणजे तो सुरक्षित आहे पग पुडी विकणाराने स्वत:ला मारलं का?
@मन्या कोकरे - dhanywad. It's
@मन्या कोकरे - dhanywad. It's means a lot
@धनवन्ती - dhanyawad. He adnyatwasich extension aahe
@दत्तात्रय साळुंके - dhanyawad. To chaku manasla khupasala.
अरे वा, नवीन कथा! सुरवात
अरे वा, नवीन कथा! सुरवात चांगली झालीय..
पूर्ण झाल्यावर सलग वाचेन मी.
@गौरी - धन्यवाद!
@गौरी - धन्यवाद!
ही लवकर पूर्ण होईल, कारण हीचा शेवट आपल्याला अज्ञातवासी सीजन ३ कडे नेईल!
ही लवकर पूर्ण होईल, कारण हीचा
ही लवकर पूर्ण होईल, कारण हीचा शेवट आपल्याला अज्ञातवासी सीजन ३ कडे नेईल!>>
जॅकपाॅट.......!!!!!
नवीन भाग टाकलेला आहे.
नवीन भाग टाकलेला आहे.
आज वाचायला सुरवात केली आहे...
आज वाचायला सुरवात केली आहे....मस्त आहे
@लावण्या - मनापासून धन्यवाद!
@लावण्या - मनापासून धन्यवाद!