
मस्त हॉटेल आहे हे..विस्तीर्ण पसरलेलं. सर्व सुखसोयींनी युक्त.जिथे आपण बसलोय ते एक दालन आहे जिथे चहा, कॉफीसोबत देखणा निवांतपणा मिळतो.आपली दोघांची कॉफी येईलच इतक्यात. पडद्याच्या पट्ट्यांच्या सावल्या,त्या चुकवून आलेल्या उन्हामुळे उठून दिसताहेत. तिरीप महत्त्वाची की पट्टीची सावली..हरकत नाही या क्षणी हा विचार करत हा क्षण हाती ठेवायला.. मोठा प्रश्न आहे.आयुष्य पण असेच आहे.कधी सुखाच्या पट्ट्यानी अडवलेले कोवळे नव्हे पण भगभगीत सुद्धा नसलेले उन. जसं उन चढेल तसच उतरेल सुद्धा. सारं शांत होईल रात्री..बघा हवं तर थांबा.
चेक आउट कधी, बॅग परत पॅक करायचीय,काही विसरले तर नाही ना याची काळजी,नेमके "क्ष" ठिकाण पहायचे राहिले.... असा कोणताही विषय नाही.
फक्त समोरच्या पट्ट्या सावलीच्या की उन्हाच्या...तुमच्यावर अवलंबून आहे उत्तर. निवांत पहात बसणार असाल तर सावलीचे पट्टे दिसतील.कॉफी घेऊन निघणार असलात उन्हाचा विचार वाफाळेल मनात आधी.
माझं काय असं विचारताय का?तुम्ही हे व्हिडिओ सुरू करायचे बटण दाबणार असाल तर जाईन उठून ..नाहीतर मी,कॉफी आणि बरंच काही..!
मुकुंद इंगळे
छान!!!
छान!!!
वा!
वा!