Submitted by deepak_pawar on 5 January, 2023 - 11:33
पाहुनी हसताच तू काय होते अंतरी
बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी.
चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.
चाहुलीनं या तुझ्या
बघ पान पान बहरतं
दव भिजले गवत
तव पावलानं बिलगतं
गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.
येताच माझिया जीवनी
दुःखाचे मेघ ही विरले
थेंब थेंब आनंदाचे
माझिया जीवनी झरले
प्रीतिची तू ज्योत घे, अन ये सखे माझ्या घरी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांदण्यांचे तेज गाली
चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.
हे सगळ्यात आवडले.
केशवकूल मनःपूर्वक धन्यवाद.
केशवकूल मनःपूर्वक धन्यवाद.
पण हे थोडे खटकते आहे. का बर?---- कृपया काही चुकत असल्यास सांगावे.
छान.
छान.
सामो आपले मनःपूर्वक धन्यवाद.
सामो आपले मनःपूर्वक धन्यवाद.
छान कविता नेहमीप्रमाणे...!!
छान कविता नेहमीप्रमाणे...!!
रूपाली मनःपूर्वक धन्यवाद
रूपाली मनःपूर्वक धन्यवाद