भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम फांद्याच मोडल्या त्याच्या तारेच्या >> कसले उद्योगी आहेत दोघ.
इन्टरनेट वर कॅट अन्गेस्ट ख्रिसम्स ट्रीचे फनी व्हिडियो आहेत.... एकाने दरवर्शीच्या मोडतोडीला कटाळून हॅन्गिग ट्री लावला तर त्यावरही उड्या मारल्या त्याच्या माजरानी.

हा हा ख्रिसमस ट्री आणि मांजरांचं असंच असतं.
>>इन्टरनेट वर कॅट अन्गेस्ट ख्रिसम्स ट्रीचे फनी व्हिडियो आहेत
हेच म्हणणार होते.

मांजरांनी आमच्याकडेही किस्सा केलाय नुकताच

मी मागे टाकलेलं ना पलिकडच्या बंगल्यात मांजरीने पिल्ले दिली ते, ती आता थोडी मोठी झालीयेत आणि पत्र्यावर, भिंतीवर इकडे तिकडे बागडत असतात. सगळ्यात गंमत आली ते एकदा दुपारी. दोन धाडसी पिल्ले मागच्या अंगणातून खाली उतरून आली आणि खेळायला लागली. पोराला माऊ पण आवडतात मग त्याने ओडीनच्या किंबलच्या बॉक्समधून थोडे थोडे त्यांना खायला टाकले. त्यांना हा नवा खाऊ भलताच आवडला. ओडीन आतल्या खोलीत गाढ झोपला होता त्यामुळे आम्ही निवांत होतो.

पण त्यांचा आवाज का खुडबुड याने त्याला जाग आली. काय सुरुये म्हणून बघायला आला तर एक पिल्लू त्याचा खाऊ खातंय आणि दुसरं त्याचा बॉल घेऊन खेळत होतं. अरे बापरे तो इतका अवाक झाला की दोन मिनिटं त्याला काय करावं हेच सुचेना.

टॉम जेरी कार्टूनमध्ये ते कसे लाल लाल होत जातात आणि कानातून धूर येतो तसा येईल का असं वाटलं

भॉ भॉ करत पिल्लांना पळवून लावलचं पण त्याला आमचाही राग आलेला, आमच्यावरही जोरजोराने भुंकला. असे कसे तुम्ही त्यांना माझा खाऊ दिला???

आणि त्याहूनही गंमत म्हणजे बॉल उचलून घरात घेऊन आला, पण कुठं सुरक्षित राहील हे काही त्याला ठरवता येईना, घरभर फिरला आणि शेवटी जमिनीवर ठेऊन त्यावर मान ठेऊन बसून राहीला.

अशक्य कॉमेडी

ओडिन Lol भारी किस्सा एकदम!!
घरभर फिरला आणि शेवटी जमिनीवर ठेऊन त्यावर मान ठेऊन बसून राहीला.>>> डोळ्यासमोरच आले सगळे! Happy

FA87863A-1ABD-4377-84F2-8C445C5583F2.jpegADD28906-6128-4E57-935E-FD49D5195603.jpeg

यंदाच्या क्रिसमसला सिम्बाने १२०० मैलाचा प्रवास केला अटलांटा ते व्हर्गिनीया आणि परतीचा. सुरुवातीला थोडी धाकधूक होती, कसा बसेल गाडीत, त्याला त्रास होईल का, साथ देईल का वैगरे वैगरे त्यात थंडी मरणाची होती. निघालो त्यादिवशी तापमान -१४ होते, त्यामुळे काळजी अजूनच वाढली परंतु सिम्बा अतिशय छान वागला रेस्ट एरिया मध्ये थांबून २-३ फेरफटके मारले कि परत गाडीत बसायला तयार. शेवटी शेवटी थोडा कंटाळा आला होता त्याला पण व्हर्गिनीयाला पोहचल्यावर एकदम खुश झाला तिथे माझ्या भावाकडे पण जर्मन शेफर्ड (रॉकी) आहे, त्याला पाहून मग बॅकयार्ड मध्ये लगेच दंगा सुरु .

त्यांच्या त्या मस्तीचे काही टिपलेले क्षण !!!

(उजवीकडचा मान थोडी वळवलेला सिम्बा आहे तर डावीकडचा रॉकी)

अरे कसले मस्त! माउई -ऑश्कु सारखीच अजून एक कझिन्स ची जोडी Happy दोघे जुळे भाऊ वाटतायत!! एकाच वयाचे आहेत का ? मज्जा आली असणार दोघांची.

माउई -ऑश्कु सारखीच अजून एक कझिन्स ची जोडी . दोघे जुळे भाऊ वाटतायत!! >>> +१

भारी गोड दिसतायत दोघे. सिंबाने तिरकी मान वाली एकदम टिपिकल पोज दिली आहे. सगळ्या जर्मन शेफर्डची ही लाडकी पोज असावी. आमच्याकडे होता एक खूप पूर्वी. तो पण असा मान तिरकी करून पाहायचा मधूनच.

अरे ये तो राम और शाम है! हाहा मस्तच जोडी आहे की.

ओडीन Lol विनोदी आहेस एकदमच Wink

तुझा हंग्रीवाला विडीओ पण जाम आवडला. कसला चिडलाय. पायाने भांड्यांना लाथ मारतोय.. किधर है मेरा खाना!

र्म्द, तिरकी मान - हेड टिल्ट ही सगळ्याच कुत्र्यांची स्टाइल असते Happy आपले बोलणे नीट समजून घ्यायचा प्रयत्न करत असतील तर हमखास हेड टिल्ट येतो, भयंकर क्यूट दिसतात तेव्हा Happy

हेड टिल्ट ही सगळ्याच कुत्र्यांची स्टाइल असते >>> ओह! हे नव्हतं माहिती. पण तेव्हा ते भयंकर क्यूट दिसतात हे मात्र टोटली खरंय Happy

आपले बोलणे नीट समजून घ्यायचा प्रयत्न करत असतील तर हमखास हेड टिल्ट येतो, भयंकर क्यूट दिसतात तेव्हा >>>> अगदी अगदी
अम्ही बाहेर जाताना हॅरीला जेव्हा आम्ही कुठे जातोय, केव्हा येणार अस सांगत असतो तेव्हा तो असाच हेड तील्ट करून ऐकतो.
क्यूट वाटतो तेव्हा

IMG-20230103-WA0000(1).jpg
आमचा कोकोनट, १४ नोव्हेंबरला जन्माला आला, कुठेतरी मेक्सिकोच्या बॉर्डरवर. गोल्डन लॅब/गोल्डाडॉर आहे. आई लॅब व बाबा गोल्डन रिट्रिव्हर (बहुतेक). त्याला तेथूनच रेस्क्यू केले व येथे आणले. आम्ही फक्त बघायला म्हणून गेलो आणि घेऊन आलो. १ जानेवारीला घरी आलायं. सध्या शीशू शिकवण्यात पिट्टा पडतोयं. रंगरूप ओल्या नारळासारखे आहे म्हणून कोकोनट. Happy

अरे वा, अस्मिता, अभिनंदन!! खूपच क्यूट आहे कोकोनट Happy
फार तर १ महिना जरा पेशन्स ठवावा लागेल, लॅब आणि गोल्डन दोन्ही ब्रीड्स चे टेम्परामेन्ट फार गोड आणि प्रेमळ असते. हुषार पण असतात. पटापट शिकेल तो. आता इथे लिहीत जा तुमच्या गमती जमती Happy

अय्यो किती गोड आहे नारळ! इथे येतीलच आता किस्से!

माऊंवर हा सई परांजपेंचा लेख मस्त आहे. यात पण मांजरांच्या डबल पाहुणचाराचा उल्लेख आहे Proud

https://www.loksatta.com/chaturang/soyare-sahchar-animal-lover-people-lo...

सिम्बा आणि रॉकी हे जुळे किंवा जवळचे सुद्धा भाऊ नाहीत. सिम्बा २ महिन्यांनी मोठा आहे परंतु त्यांच्या दिसण्यातील साम्य पाहून आम्हाला पण नवल वाटते.

आता गोड नारळाचे किस्से आणि फोटो येउद्यात Happy

भारी किस्से एकेक.
फोटो विडिओ आणि सगळ्या गमती स्ट्रेसबस्तर धागा आहे.
सिम्बा आणि रॉकी कसले सेम सेम आहेत.
कोकोनट एकदम गोडंबा.
संध्याकाळी जेव्हा walk ला जातो तेव्हा मैदानात एक labrador आणि हस्की कधी कधी असतात, खूप भारी खेळतात ते. त्यांचे मालक वेगळे आहेत.

अरे किती गोंडस आहे हा...खुप खुप क्युट...

माबो माऊ-भुभु फॅमिलीत स्वागत....

आता मंकी-सॅमी, सिंबा, ऑश्कु आणि माव्याप्रमाणे नारळाचे पण किस्से येणार

सहीच

मेक्सिको बॉर्डरवर असतातच का भुभे, माझ्या एक मित्राने पण आणलेले. आणि त्याला एकच हवे होतं, पण त्या माणसाकडे दोनच राहीली होती, तो म्हणाला ही एकत्रच घेऊन जा. त्यामुळे तो आता डबल पालक झालाय.

सिंबा - कसलं भारी, एवढ्या लांबचा प्रवास केला म्हणजे. ते खरेच भाऊ भाऊ वाटतात. हेड टिल्ट कसलं क्युट आहे, पण हे मी जर्मन शेफर्डनाच करताना पाहिलं आहे, ओड्या हेड टिल्ट नाही करत, तो असे कान उंचावून मान पुढे काढतो, क्युरीअस असताना किंवा काही ऐकत असेल तर.

तुझा हंग्रीवाला विडीओ पण जाम आवडला. कसला चिडलाय. पायाने भांड्यांना लाथ मारतोय.. किधर है मेरा खाना!

नाही चिडला नव्हता, तो असाच दाखवतो. हायपर असल्याने, त्याला नुसतं बेल्ट आण म्हणलं तरी अगदी आवेशाने पुढ्यात आणून टाकतो. म्हणलं अरे हळू की, पण नाहीच. सगळं आमच्याकडे दांडगाईने चालतं.

आणि ते भांडे आणि डॉग फुडचे बॉक्स हे वेगळं वेगळं दाखवण्यासाठी माझं लिटरभर रक्त आटवलं आहे त्याने. भांडे कुठे आहे म्हणलं तर कळतं, पण फुड कुठे आहे म्हणलं तरी भांडेच दाखवतो. किंवा मग जे समोर असेल ते. एकदा दोन्ही दाखवायला लागल्यावर मी त्यांची जागा बदलली तर आधी जिथें होतं रिकाम्या भिंतीला पंजा मारुन दाखवला हेच ते डॉग फुड. म्हणलं ते नाहीये.

गणितात ढ मुले कशी नव्वे नव्वे विचारलं की २५, नाही म्हणलं की मग २९, नाही मग २१ असं अंदाजपंचे ठोकून देतात तसे करतो. हे नाही, मग हे तरी असेल, निदान हे तरी. ३-४ गोष्टीतून एखादं तरी बरोबर असेल अशा प्रकारे त्याचं चालतं.

नव्वे नव्वे >> Lol भारीये हे! आणि डॉग फूडचा किस्सा पण मस्त. चॅम्प, तुझी लिहिण्याची स्टाईल छान आहे.

Pages