Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजू ताई खरंच भारी बनवली आहे
अंजू ताई खरंच भारी बनवली आहे अमृताची AV... जमलं तर voot वर बघा ....अमृताच्या किरकिरीशिवाय बरंच काही आहे त्यात..
अच्छा ओके .
अच्छा ओके .
आजची अपूर्वाची hair style आणि
आजची अपूर्वाची hair style आणि साडी अजिबात आवडली नाही यापेक्षा तर weekend चा look चांगला होता तिचा...तिची AV पण बर्यापैकी negative होती.तिचा 'मी' पणा बरोब्बर अधोरेखित केला बिग बॉसने..आरोहची AV किती चांगली बनवली...बापरे बाप....उगाच...अक्षयची AV पण negative च होती....सगळ्यांच्या AVs पाहिल्यावर आता वाटतंय मानेंना देतील ट्रॉफी..बाकी मानेंच काय चाललंय...खरोखर राखीच्या प्रेमात पडला की काय हा माणूस?
धोंगडेला पण देऊ शकतात .
धोंगडेला पण देऊ शकतात .
अक्षयचे कमाल आवडलं मला, त्याचा तो शब्द हायलाईट केला आणि तो चित्रकार आहे बेसिकली तो बेस ठेवला हेही आवडलं मला.
अपूर्वाचे मामा काय म्हणाले ते दाखवलं त्यामुळे ती जास्तच खोटी पडली पण तिलाच जिंकवतील असं वाटतंय एकीकडे. नशीब तिने प्रसादची आठवण काढली .
वोटिंग ग्राह्य धरायचे की नाही, महत्व देतात की नाही, जे समोर येतात खरे ते खोटे काही कळत नाही, सध्या तरी त्यात अक्षय शेवट आहे, मिड वीक जाऊ शकतो.
वुट वर वोटिंग कधिपर्यंत होतं, मिडवीक साठी. आत्ता नाही करू देत. फक्त बेस्ट कॅप्टन निवडीसाठी वोटिंग दिसतंय. परवा कधी होतं तेव्हा मी अक्षयला अकरा दिले होते.
राखी आणि मानेचे खोटं लग्न
राखी आणि मानेचे खोटं लग्न लावणार आहेत. यावेळी बिग बॉसला कोणी लव अँगल नीट दिला नाही आणि बिग बॉससाठी जणू ते महत्वाचं असतं, त्यामुळेच माने आणि राखीला पकडलं, किती तो फालतूपणा, कमी झालेला trp याने वाढणार आहे का, धन्यवाद आहेत.
ते काय शिव वीणा आहेत का.
Btw राखीने पैसे घेऊन अजिबात बाहेर पडू नये, bb ने तिलाच जिंकवायचं, हाच twist सांगायचं.
गंमत म्हणजे यावर्षी म मां ना उलट उत्तरं देणारे सर्व पुढे आलेत. आरोह आणि राखी सोडून कोणीही त्यांचा मान ठेवला नाही, मागच्यावर्षी मीनल काय जरा एकदाच काहीतरी बोलली, लगेच तिला उत्कर्षच्या मागे ठेवली, लायकी असून बिचारी पाचवी आली. आता काय करणार राखी किंवा आरोहला विनर करणार का.
Voot वर Voting करताना ज्या T
Voot वर Voting करताना ज्या T&Cs दिल्या आहेत त्या 'वाचनीय' आहेत....त्यातील 10 वा Clause वाचला तर असं लक्षात येईल की प्रेक्षक तिथे Voting करून खरंच आपला बहुमूल्य वेळ फुकट वाया घालवत आहे.
10. The elimination of the participant and/or the decisions made by, Viacom18 and/or the
Channel shall be final and binding and in no
event shall the viewer(s) dispute the decision
made by the judges of the Program, Viacom18
and/or the Channel.
अंतिम निर्णय जर Viacom18/Channel चाच असणार असेल तर मग सगळं मायबाप प्रेक्षकच ठरवतो असं चित्र निर्माण करणे म्हणजे शुद्ध फसवणुकच नाही का...? प्रेक्षकांच्या Voting च्या नावाखाली जो आपल्याला नको आहे त्या स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवत आले आहेत हे लोक...!
सगळ्यांच्या AV चे दोन दिवस
सगळ्यांच्या AV चे दोन दिवस जरा बोअर झालं. सगळ्यात मस्त राखी ची आणि मग धोंगडे ची जरा मनापासुन बनवलेली वाटली.
अपुर्वा ला कळलं असेल आपण किती खुनशी दिसतो कधी कधी ते. खरतर अपुर्वा ची गाणी आणि दंगामस्ती खुप कमी दाखवली.
आणि मामा ने अक्षय विरुद्ध विनाकारण भडकावले ते परत परत हाय्लाईट करत आहेत. मामा कशाला आले शो मधे असं वाटेल तिला जर ती या कारणाने हरली तर. आणि ते दाखवुन दाखवुन उलट अक्षय ला सिंपथी जातेय असे वाटले कारण खरतर तिच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं तो काही करत होता असं मला वाटत नाही. माने विकास सोबत जे वागत होते त्याला म्हणतात दगा देणं.
अक्षय च्या AV च्या आधी चित्रकलेचा संदर्भ दिला ते मस्त वाटलं. त्याच्या AV मधे पण अजुन थोडी मस्ती दाखवायला हवी होती आणि अक्षय चे पण पंचेस मस्त असायचे. ते पण नाही दाखवले.अक्षय ला अपुर्वा च्या मामा ची क्लिप दाखवली असती तर आज जरा मसाला मिळाला असता
माने आणि धोंगडे वर बिबॉ चं खास प्रेम आहे असं वाटलं. त्यांची नकारात्मक बाजु खुपच कमी दाखवली.
कोणाला जिंकवावं कळेना झालंय बिबॉ ला असं वाटलं सगळ्या AV बघुन.
ते लोक आणले होते ते जरा विचित्र वाटलं कारण त्या लोकांना काहीही न बोलायच्या सुचना होत्या बहुतेक त्यामुळे इतके सगळे लोक असुनही ते मख्ख वाटत होते आणि या सदस्याना पण कदाचित लोकांशी काही बोलायचं नाही अशा सुचना दिल्या असणार आहेत बहुतेक.
सर्व पब्लिक प्रॉडक्शन
सर्व पब्लिक प्रॉडक्शन हाऊसमधले असतील, सारखे राबत असतात पाठीमागे, कधीतरी त्यांना पुढे यायचा चान्स दिला असेल.
आरोह गेला अशी न्यूज आहे.
आरोह गेला अशी न्यूज आहे.
मी tv म्युट करून बघतेय.
मी tv म्युट करून बघतेय.
आधी मात्र राखी फार छान बोलली, तिने पैशाची बॅग घेऊन बाहेर पडूच नये, ट्रॉफीच घ्यावी.
यावेळी आपटता सिझन
यावेळी आपटता सिझन वाचवण्यासाठी राखीला आणल.पुढचा सिझन पण जर असाच आपटायला लागला तर कोणाला आणणार?
माने आणि राखीचा टीपीचा का होईना पण फालतू लव्ह अँगल दाखवायलाच हवा का?
बिबॉसला करमत नाही का त्याशिवाय
एक असच मनात आल,तेजू ,प्रसाद आणि देशमुख यांनी लव्ह अँगलला नकार दिला असेल म्हणून तर काढल नाही ना.
कारण सोमिवर तेजू- प्रसाद आणि प्रसाद- देशमुख आवडणारे बरेच जण होते.
देशमुख प्रसाद किंवा देशमुख
देशमुख प्रसाद किंवा देशमुख अक्षय सक्सेसफुल झाला असता.
तेजु प्रसादला भाऊ म्हणाली ना, तो ही तुझा स्वभाव ताईसारखा आहे असं म्हणाल्याचं आठवतंय, जेव्हा त्यांना एकत्र बांधलं होतं तेव्हा.
आरोह ह्यावेळीही सहा नं वर गेला बाहेर. फक्त फरक एवढाच की त्यावेळी तो फिनालेच्या दिवशी गेला होता.
पुढचा सिझन येईल कि नाही शंका
पुढचा सिझन येईल कि नाही शंका येतेय हा सिझन डिझॅस्टर झाल्यामुळे.
आधी मराठी सेलेब्रिटिज कमी, बिबॉ मटेरिअल अजुन कमी, इथे इमेजची करणारे त्याहून कमी !
ओटीटी सीझन येतोय म्हणतायेत .
ओटीटी सीझन येतोय म्हणतायेत. मी तर नाही बघणार. फ्रीवाले voot आहे माझ्याकडे.
लव angle मला तेजु अक्षयचा
लव angle मला तेजु अक्षयचा बघायला आवडला असता, एका टास्कमध्ये तेजुला अडवलेले त्याने तेव्हा ती म्हणाली बघ हा अक्षय माझ्या प्रेमात पडशील, तो म्हणाला मला चालेल, तू शाकाहारी आहेस आणि गोरी घारी आहेस. अपूर्वाताई आल्या मध्ये तेजु किती मोठी आहे आणि हा लहान, ती माझ्याएवढी आहे . तसंही तेजु ह्या angle च्या पाठीमागे नव्हती.
मग दोन्ही अमृता आलटून पालटून अक्षयच्या मागे आणि तो त्यांच्या मागे, तिथे रमाला काळजी वाटली, तिने पत्र पाठवल मग अक्षयला सांगावं लागलं रमा त्याची gf आहे ते. धोंगडे पण म्हणाली बाहेर bf आहे . देशमुख प्रसाद अक्षय दोघांशी मैत्री पलीकडे वागत होती. तिने दोघेही चांगले मित्र, प्रसाद जरा जास्त हे सांगितलंही.
बिग बॉसने आठवडाभर एकत्र बांधून अक्षय अमृता दे, प्रसाद तेजु जमवायचा प्रयत्न केला पण अक्षय रमा रमा करत बसला आणि प्रसाद तेजु भाऊ बहीण, मग अपूर्वा विकास हीट ठरले (फनी होतं ते पण अति झालं नंतर) पण विकास मध्ये मध्ये नागपूर करत बसला. त्यामुळे आता बिग बॉस बिचारे माने राखी यावर आले.
अक्षय कलर्स हिंदी फेस असल्याने पाच पर्यंत जाईल असं सुरुवातीला वाटत होतं पण नंतर त्याला बाहेर पाठिंबा नसल्याने खात्री नव्हती.
कालचा टास्क बघितला तर, अक्षय
कालचा टास्क बघितला तर, अक्षय तिसरा असेल बहुतेक, कलर्सचे वीणा, विकास तिसरे होते. अपूर्वा माने पहिले दोन असतील.
कालचा भाग कोणी पूर्ण पाहिला
कालचा भाग कोणी पूर्ण पाहिला का?.मी तो आर जे रुद्रा आला होता तिथपर्यंत कसातरी पाहिला,पण फार म्हणजे फारच बोअर व्हायला लागल मग बंदच केला.
यावेळी प्रेस कॉन्फरन्स नाही का? नसेल तर आश्चर्य आहे,एवढे बोलणारे स्पर्धक आहेत की,राखी आहे.
बाहेर गेलेले पण घरात येणार असतील ना.तेव्हा जरा बघीन.
बोअर होता. सगळे आर जे आलेले .
बोअर होता. सगळे आर जे आलेले . मी सलग बघितला नाही.
घाबरुन बिग बॉसने पत्रकार परीषद ठेवली नाही की काय. आरोह चक्क बाहेर पडल्यावर अक्षयबद्दल चांगलं बोलू लागला आहे आणि अपुर्वा माने विरोधात म्हणजे अक्षयची चांगली बाजु जास्त बाहेर दाखवली जात नसावी. तो कारण अक्षयच्या फार विरोधात असायचा गेल्यापासून.
आता बिग बॉससाठी अपुर्वा आणि माने महत्वाचे आहेत, त्यांना महत्व दिलं जातंय जास्त, टॉप टू तेच असतील मोस्टली. माने तर मस्त, बिग बॉस आणि म मां विरोधात बोलून पुढे .
या सिझनच सगळ्यात मोठ फेल्युअर
या सिझनच सगळ्यात मोठ फेल्युअर म्हणजे घरातले सदस्य एकमेकांशी कनेक्ट झाले नाहीत,जे झाल ते नात खर वाटल नाही,म्हणून प्रेक्षकही कोणाशीही कनेक्ट
होऊ शकले नाहीत.
खरतर याद्रुष्टीने ममांना चावडीवर टिप्स द्यायला हव्या होत्या,म्हणजे तस ममांना सांगायला हव होत.
पण ममां तर यावेळेह चक्क आऊट ऑफ फॉर्म होते.ममांचा चक्क अपमान होत होता,अपूर्वाला मिस.नेमळेकर म्हणाव लागल,
वेगवेगळ्या जोड्या लावण्याचा प्रयत्न केला पण शिव वीणासारखी जोडी जमलीच नाही,या सिझनला निगेटिव्ह दिसत असलेले सदस्य पुढे येत आहेत अस असूनही अक्षयला ममांना सज्जनासारख वागायला लावल,त्याची ट्रॉफी गेली तर त्याला ममांच जबाबदार असतील.
प्रसाद चावडीवर बोलत नसेल तर त्याला बोलत करण हे मांच काम होत,जर हा त्याचा गेम असेल तर तो एक्स्पोजही करता आला असता ममांना,ममांनी गेल्या सिझन्समध्ये अशा अनेकांचे गेम प्लँन ओपन केले आहेत,मग प्रसादला बोलत करण हे ममांच कर्तव्य होत ,पण ममां फेल ठरले.
उर्मट सदस्यांना कंट्रोलमध्येही ममांना ठेवता आल नाही.चावडीही पूर्ण फ्लॉप ठरली.
क्रिएटिव्ह टीम तर संपूर्णपणे झोपलीच होती.
पुढचा सिझन जर चालवायचा असेल तर मेकर्सना आतापासून च कंबर कसावी लागेल.
काहीतरी थीम वगैरे आणावी लागेल.नाहीतर काही खर नाही.
अक्षयला ममांना सज्जनासारख
अक्षयला ममांना सज्जनासारख वागायला लावल,त्याची ट्रॉफी गेली तर त्याला ममांच जबाबदार असतील. >>> अगदी अगदी. तो ढेपाळलाच आणि अपुर्वा बदलल्यानंतर अतिच . तो टॉप 2 पण नसेल आता. व्हिलन राहिला असता तर दोन नंबर तरी मिळाला असता. जयसारखं करायचं होतं, म मां समोर गुडी गुडी आणि मागे हवं तसं.
आज शेफ वरुण इनामदार आलेले (मी ओळखत नव्हते पण मोठे शेफ आहेत, घरचे पण माझ्यासारखेच, कोणीच ओळखत नव्हतं त्यांना) . वेज बिर्याणी का पुलाव केला आणि इंडिया गेट बासमती राईसची अॅड केली. टी आर पी खाली आलाय तरी sponcerer मिळतायेत.
नंतर कॉमेडी prgm मधला कोणी बंडू आलेला, बोअर केलं त्याने आणि सर्वांनी. धोंगडेवर केलेले जोकस आवडले.
माने एक नंबर बोल बच्चन , शीघ्र कवि , कधी कधी जाम बोअर.
एकंदरीत बोअर आहे आठवडा.
आत्ता भूषण कडू आलाय, पहिल्या सीझनमध्ये होता ना, याची बायको आवडलेली फार मला पण दुर्दैवाने ती या जगात नाही आता असं वाचलं होतं मागे.
काल चार आर जे आलेले त्यातला
काल चार आर जे आलेले त्यातला फक्त रुद्र आवडला. आजही भूषण फक्त सुसह्य होता. भोजने मला कधी याआधी कलर्सवर दिसला नाही. भूषण मध्ये मध्ये काय बोलत होता कळत नव्हते. जातानाही कोणाची नक्कल करत होता काही कळले नाही. तळे राखी तो पाणी चाखी ही म्हण राखीला कळलीच नाही. तिला तसे बरेच काही कळत नव्हते. अपूर्वा शेवंतापेक्षा बारीक वाटते आहे आणि सुरुवातीला आली होती त्यापेक्षाही आता कमी जाडी वाटते. विशाल निकम खरेच धोंगडेचा बॉयफ्रेंड आहे का कारण भूषण तिला म्हणाला की तुझे मन खूप विशाल आहे. राखीला बहुतेक हे सगळे मराठी कलाकार माहीतच नाहीत. जो पाहुणा येईल त्याला राखी वोट द्या म्हणून सांगत असते ते फार क्युट वाटते. तिलाच दिली पाहिजे ट्रॉफी. तुम्ही जिंकलात तर दोन नंबर वर कोणाला बघायला आवडेल यावर राखी म्हणाली कोणीच डिसर्व करत नाही दोन नंबर, जे वर सगळ्यांनी आधीच लिहिले आहे.
राखीचे एक दोन व्हिडीओ बघून मला ती वेडी आहे का अशी शंका आली होती पण इथे तिला बघून मत पूर्ण बदलले आहे. अखंड मनोरंजन करणारी, कधी वेडपट पण त्यातूनही मनोरंजन करणारी प्रोफेशनल आहे.
माने विनर अशा न्युज येतायेत,
माने विनर अशा न्युज येतायेत, खरं खोटं माहीती नाही.
कोणालाही उचलून देतील ट्रॉफी
कोणालाही उचलून देतील ट्रॉफी असा हा सिझन झाला आहे.
कोणालाही उचलून देतील ट्रॉफी
कोणालाही उचलून देतील ट्रॉफी असा हा सिझन झाला आहे.>>>आणि कोणालाही द्या...काही फरक पडणार नाही असाही (कारण सगळेच non desering आहेत)
...म्हणूनच तर पत्रकार परिषद घ्यायला पण makers घाबरले...ईतर seasons दिवसेंदिवस interesting झाले तर हा season दिवसेंदिवस फ्लॉप ठरला...काल परवा तर बळेच timepass होता...
.इतके दिवस सहन करतोच आहोत...अजून एक दिवस करू सहन
रुचिराने insta वर पोस्ट केली आहे की 'राखी जिंकावी कारण फक्त तिच real आहे.बाकी makers ठरवतीलच...'
माने विनर अशा न्युज येतायेत>>>विनर झाला तरी ही व्यक्ती माणूस म्हणून माझ्या नजरेत तरी कधीच looser ठरली आहे...किती दुटप्पीपणा,स्वार्थीपणा ,आगलावे वृत्ती
आणि सध्या राखीसोबत चाललेले चाळे म्हणजे तर कळस....आणि अपूर्वाला ticket to finale मिळालंय तर स्वर्ग दोन बोटे उरलाय...ती जिंकली तर ढगातच जातील बाईसाहेब....राहीले धोंगडे आणि अक्षय...त्या दोघांना तर नाहीच जिंकवणार...मग काय जिंकवा कोणाला पण...
अक्षय माने यांच्यापेक्षा कमीच
अक्षय माने यांच्यापेक्षा कमीच वाईट वागलाय, अपूर्वा आणि धोंगडेपेक्षाही तरी त्याला पब्लिक सपोर्ट नाही.
एनिवे तो यंग आहे आणि करियर पुढे चांगलं आहे त्याचं, हिंदी दोन सिरियल लिड रोल केलेत त्याने त्यामुळे, तो तिथे उंचीवर जाईल.
'राखी जिंकावी कारण फक्त तिच real आहे. >>> so true
माने खरंच जिंकले तर राखीचा खूप मोठा वाटा असेल कारण त्यांनी फ्लर्ट किती केलं तिच्याबरोबर आणि सतत झोतात राहिले, कधी कधी फार चिप लेवल गाठली. बाकी बिग बॉस आणि मांजरेकर यांना नावं ठेवली तरी विनर होता येतं हा संदेश जाईल आता, हाहाहा.
अर्थात माने यांना वोटिंग तूफान होतंय हे ही खरं त्यामुळे प्रेक्षकांना विसरता येणार नाही.
एनिवे सुरू झाला शो. म मांनी ब्लॅक शर्ट पॅन्टवर शेवाळी कोट का घातलाय.
मला वोटिंगचे समजत नाही, जे
मला वोटिंगचे समजत नाही, जे रिझल्टस बाहेर येतात ते voot चे नसतात, सोशल मीडियाचे असतात म्हणे. हे कुठे होतं वोटिंग. मी तर पहिल्या सीझनपासून voot वर करते. दुसरीकडे कुठेही नाही.
यावेळी मी अक्षयला केलं voting. फार नाही, पन्नास वगैरे असेल, हात दुखतात. ते voot app वरच केलं.
सो मि वोटिंग मध्ये माने अपूर्वा टॉप 2 आहेत.
अन्जू...वूट वोटिंग म्हणजे
अन्जू...वूट वोटिंग म्हणजे ज्यात मेकर्स,चँनेल आणि कदाचित स्पॉन्सर्स यांनी हस्तक्षेप करून त्यांना हवा तसा लावलेला क्रम जो आपल्यासमोर कधीच येत नाही.
राखी ने पैसे घेणं,रडणं,आई ने
राखी ने पैसे घेणं,रडणं,आई ने स्वप्नात येऊन सांगितलं म्हणे,सगळं सगळं किती किती खोट्ट..
रोहित, रुचिरा तर आलेच नाहीत..
रोहित, रुचिरा तर आलेच नाहीत..चांगलंच फाटलंय दोघांच..
राखी ने पैसे घेणं,रडणं,आई ने
राखी ने पैसे घेणं,रडणं,आई ने स्वप्नात येऊन सांगितलं म्हणे,सगळं सगळं किती किती खोट्ट..+++++++अगदी.राखी हिंदीमध्ये पण अशीच मनीबँग घेऊन बाहेर पडली होती.
Pages