मुंबई नुसतं नाव ऐकलं तरी गजबजाट, गर्दी, सतत धावणारी माणसं, पळणाऱ्या ट्रेन्स आणि गाड्या असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं, आणि खरोखरच मुंबई अगदी तशीच आहे. सततची गर्दी असलेलं हे ७ बेटांनी बनलेलं शहर, भारताची आर्थिक राजधानी, सिमेंट काँक्रीटचं जंगल आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणारी लोकं हीच मुंबईची ओळख बनली आहे, पण ऐतिहासिक वारसा लाभलेली हीच मुंबई इतकी बघणीय असेल हे ऐकून बऱ्याच लोकांना नवल वाटतं. मुंबईच देखणेपण हे इथल्या गल्ल्या-बोळात फिरल्याशिवाय कळणं तसं अवघड!
काल हेरिटेज वॉक च्या निमित्ताने साहेबाची जुनी मुंबई बघण्याचा बेत जमला. सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून झाली, रेल्वेने आम्ही CST स्टेशनला पोचलो, मुंबईत प्रथम येणाऱ्याला स्टेशनची हि बिल्डिंग भुरळ पाडतेच पण रोज ट्रेनने प्रवास करून येणाऱ्याला सुद्धा ह्या बिल्डिंगबद्दल तितकंच अप्रूप वाटतं.
पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ची हि वास्तू आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये गणली जाते. ब्रिटिश आर्किटेक्ट फ्रेडरिक विलियम स्टीव्हज ह्याने इटालियन-गॉथिक पद्धतीने बांधलेली ही वास्तू अतिशय देखणी आहे. १८८७ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. अप्रतिम स्थापत्याचा नमुना म्हणून ही आजही ओळखली जाते. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे च्या सेंट्रल रेल्वे जाळ्याला जोडणारे मुख्य ठिकाण म्हणजे CST स्टेशन.इथून साधारण १ किमी अंतरावर हेरिटेज वॉकचा आमचा पहिला स्टॉप होता एशियाटिक सोसायटी लायब्ररी.
एशियाटिक सोसायटी लायब्ररी अथवा टाऊन हॉल हे एक राज्य केंद्रीय ग्रंथालय आहे. १८३१ साली बांधून पूर्ण झालेली ही वास्तू, नियोक्लासिकल आर्किटेक्चर शैलीत बांधलेली असून आजच्या घडीला इकडे संस्कृत, मराठी, हिंदी, प्राकृत, पर्शिअन, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी अशा अनेक भाषांमधली पुस्तकं, ग्रंथ, हस्तलिखिते किमान एक लाखांहून अधिक ग्रंथ, १२०० हुन अधिक नकाशे आणि पोथ्या संग्रहित आहेत. एशियाटिक सोसायटी समोरच हॉर्निमन सर्कल किंवा बँक स्ट्रीट परिसर आहे. हॉर्निमन सर्कल गार्डनला त्याच्या वर्तुळाकार आकारावरून नाव देण्यात आलं होतं. गार्डनच्या सभोवती युरोपियन धाटणीच्या बिल्डींग्स आहेत. पूर्वी ह्याचं नाव एल्फिस्टन गार्डन होतं, स्वातंत्र्यानंतर या भागाला पत्रकार बेंजामिन हॉर्निमन ह्यांच्या नावावरून हॉर्निमन गार्डन असं नाव देण्यात आलं.
पुढे आम्ही बँक स्ट्रीट आणि काळा घोडाच्या गल्ल्यांमध्ये इतिहासाच्या खुणा शोधत मुक्त भटकंती केली. ज्यू समाजाचे प्रार्थना स्थळ केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग, आजूबाजूचे लहान लहान कॅफेज आणि युरोपियन धाटणीच्या इमारती पाहून मला गोव्याच्या फौंटनहासची आठवण झाली, तिथल्याच एका कॅफे मध्ये मनसोक्त नाश्ता करून पुढे आमची पावलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे वळली. पूर्वीचे हे म्युझिअम २० व्या शतकात बांधलं गेलंय. ब्रिटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने हिंदू, राजपूत आणि इस्लामी बांधकाम तंत्राचा वापर केलेला दिसतो. प्रत्येक मंगळवारी विद्यार्थी आणि लहान मुलांना इथे मोफत प्रवेश आहे. संग्रहालयात अनेक दालनं आहेत. संपूर्ण संग्रहालय बघण्यासाठी कमीत कमी २-३ तास लागतात. मुळात ऐतिहासिक वास्तू आणि आतल्या ऐतिहासिक गोष्टी बघून आम्ही भारावून गेलो. मुंबईत लहानपण गेलेल्या, मुंबईत शाळेत गेलेल्या , प्रत्येकाला लहानपणी इथे सहलीला आल्याचे नक्कीच आठवत असेल. इकडे फिरताना शाळेतले आम्ही आठवून खूप मजा वाटली. सध्या बरेच आधुनिक बदल बघायला मिळाले. नूतनीकरणामुळे नक्कीच पर्यटकांची गर्दी जास्त होत असेल. काळा घोडा शिल्पापासून संग्रहालय अंदाजे ८०० मीटर वर आहे. चालत अगदी १० मिनिटांच्या अंतरावर. तसेच पुढे चालत गेल्यावर गेट वे ऑफ इंडियाला पोचलो. मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असणारं हे ठिकाण. १९२४ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण बेसॉल्ट खडकात बांधलेली ही इमारत ८५ फूट उंच असून किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी ह्यांच्य्या भेटीची आठवण म्हणून बांधल्याचे ह्यावर असलेल्या शिलालेखांतून स्पष्ट होते. इंडो- सरसेनिक शैलीचे बांधकाम, समोर अथांग अरेबियन समुद्र, काठाला झुलणाऱ्या लहान मोठ्या होड्या बघत आम्ही बराच वेळ तिथे थांबलो.
थोडं पुढे कोलाबा कॉजवे ला मनसोक्त खरेदी करून घेतली. फोर्ट भागात फिरण्याचा कधीही कंटाळा येत नाही, ह्याची प्रचिती प्रत्त्येक वेळी होते तशी आताही झालीच. दिवस ओसरला तसे आम्ही पुन्हा CST स्टेशनला आलो. हेरिटेज वॉक/ टूर संपली. आता परत ही वास्तू डोळ्यात साठवून निघायची वेळ झाली. पळत पळत ट्रेन न पकडता परत आलो असतो तर जणू पाप लागलं असतं त्यामुळे तेही करून झालं.
मुंबईत फिरण्यासाठीच्या बऱ्याच जागा आहेत आणि त्यासाठी असे हेरिटेज वॉक्सही बऱ्याच कंपन्या अरेंज करतात. वाळकेश्वर, बाणगंगा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तारापोरवाला मत्सालय, क्रॉफर्ड मार्केट,भुलेश्वर मार्केट, नेहरू तारांगण, एलिफन्टा लेणी या आणि अशा अनेक जागांना भेट देऊ शकतो. संध्याकाळी मरिन ड्राइव्ह वर मावळता सूर्य बघणे किंवा रात्री खूप उशिरा सुद्धा तिथे नुसतं बसून समुद्र आणि रात्रीची मुंबई बघणे हे अनुभव निव्वळ वर्णन न करता फक्त अनुभवावेच असे आहेत. गजबजाटा सोबत आयुष्य जगायला शिकवणारी मुंबई प्रत्येकाला आपलंसं करतेच आणि खऱ्या अर्थाने भरभरून आयुष्य जागायलाही शिकवते हे नक्कीच! कोणीतरी म्हंटलंच आहे ना,
ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ
ज़रा हट के, ज़रा बच के
ये है Bombay मेरी जाँ...!
1. एशियाटिक सोसायटी लायब्ररी
2. हॉर्निमन सर्कल
१.
२.
3. बँक स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल
4. लहान गल्ल्या, बँक स्ट्रीट
5. केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग
१.
२.
6. बेकहाऊस कॅफे, काळाघोडा
१.
२.
7. काळाघोडा शिल्प
१.
२.
8. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय
१.
२.
३.
9. Kalaghoda-lanes resembling Fountainhas, Goa
१.
२.
वा! छान लेख आणि फोटो!
वा! छान लेख आणि फोटो!
असे जायला पाहिजे एकदा हेरीटेज वॉकला!
This part of Mumbai is love !
This part of Mumbai is love !!
Almost दर रविवारी असे पूर्ण वर्ष भटकलो आहे इथे. शहराचा अतिशय सुंदर भाग, हार्ट हार्ट.
सुंदर.
सुंदर.
झकास कल्पना दिली आहे. बघू जमतंय का.
_________
१)रूट मॅप हवा होता.
२) काळा घोडा शिल्पापासून संग्रहालय अंदाजे ८०० मीटर वर आहे. कुठे आहे हा घोडा? कोणता? काळा घोडा जहांगिर आर्ट गॅलरीपाशी होता ना तो आता राणी बागेत नेऊन टाकलाय. त्यावर एक स्वार आहे.
३)बीएनएचएस राहिलं का?
तरी तुम्ही दिवसभर बरेच पाहिलेत.
_____________
फेब्रुवारीपर्यंत एखादी फेरी माबोकरांनी आयोजित करावी.
Kharach ithe firaycha kadhihi
Kharach ithe firaycha kadhihi kantala yet nahi, kayam chan ch watta! Pratisadanbaddal Dhanyawad
@srd route map sapdla tar
@srd route map sapdla tar attach karte.
Kalaghoda chowk ha barach famous ahe mumbaitla, to tithech ahe jahangir art pashi
BNHS la firayla sampurna divas lagel, eka divsat sadharan javal javal chya goshti firun hotat.
Hyat ajun baryach goshti firta yetat
1.matharpacady village he juna mumbai gav, original mumbaichi vasahat, mazgaon areat yeta, te pan baghnyasarkha ahe khup!
W
२. Borivli national park sudha purna divas bhataknti hote.
Mumbait baghnyasathi barach kahi ahe
काळा घोडा जहांगिर आर्ट
काळा घोडा जहांगिर आर्ट गॅलरीपाशी होता ना …..
काला घोडा आहे, जिथे होता तिथेच आहे. म्हणजे रिदम हाउस आणि JAG च्या मधे. मागच्या आठवड्यातच फेरी झालीं जहांगीरला तेव्हां बघितला.
मुंबै मुंबै मुंबई ... बदाम
मुंबै मुंबै मुंबई ... बदाम बदाम बदाम..
त्या गल्ल्या मला प्रचंड आवडतात.
लहानपणी मोठ्या पोरांसोबत दर रविवारी पहाटेच्या अंधारात आझाद मैदानला क्रिकेट खेळायला जायचो. तेव्हा सीजनचा बॉल वगैरे आपल्याला झेपायचे नाही. त्यामुळे खेळायचे मोठी मुलेच. आम्ही लहानपोरं टोळी बनवून या गल्ल्या भटकून काढायचो.
खूप सुंदर लेख, आणि फोटोज्
खूप सुंदर लेख, आणि फोटोज् सुद्धा!
मुंबईला जास्त जाणं होतं नाही, पण तरीही मुंबई खूप जवळची वाटते.
याचा खरचं मॅप किंवा वॉकवे मिळाला तर फार बरं होईल. मनसोक्त फिरता येईल.
सुंदर लेख आणि फोटो !
सुंदर लेख आणि फोटो !
मस्त लेख.
मस्त लेख.
फोर्ट भागात फिरायला जायची इच्छा पुन्हा प्रबळ झाली.
प्रतिसादांसाठी थँक यु
प्रतिसादांसाठी थँक यु
मुंबई जितकं फिरू तितकी नव्याने कळते प्रत्येकच वेळी
पूर्वी खूप फिरायचो इकडे.
पूर्वी खूप फिरायचो इकडे. प्रदर्शन पाहायची आवड होती. पण तेव्हा route tracing करणारे मोबाईल नव्हते. समजा ते map टाकले तर इतरांना उपयोग होईलच.
काला घोडा - हा आताचा वेगळा आहे. खरा मूळचा राणीबागेत नेला.
https://en.m.wikipedia.org/wiki/Kala_Ghoda
इथे पाहा.
पूर्वी सचिवालय म्हणजे आताचे मंत्रालयाकडे मोर्चे येत ते इथे काळ्या घोड्याजवळ अडवत. चौक तोच आहे पण घोडा ( स्वाराशिवायचा) वेगळा आहे. पण नाव कायम राहिले.
https://mumbaimap360.com
https://mumbaimap360.com/mumbai---bombay-walking-map
https://www.alltrails.com/trail/india/maharashtra/fort-heritage-area-of-...
https://khakitours.com/
Map sathichya kahi links share kartey
Hyapaiki khakitours mhanun je ahe tyanche routes sadharan changle ahet pan rates kahicha kahi wattat. Tyancha route baghun apan apla walk plan karu shakto fakta information ji sangtat tyacha aplyala abhyas karun java lagta, apanch aple guide aslyamule. Hope he helpful asel.
Marathi font cha kahi tari gondhal zalyane english marathit type karava lagtay
@srd thank you so much, mala
@srd thank you so much, mala hi mahiti navin, madhe wachlya sarkha watatay pan confirm navhta! Thank you navin mahiti kalali
काला घोडा फेस्टिवल तारखा आणि
काला घोडा फेस्टिवल तारखा आणि कार्यक्रमासाठी फेसबुक पेज लिंक
https://facebook.com/100064694376498/
यांचे बरेच कार्यक्रम असतात.
हेरिटेज वॉक असते/ आहे.
आणखी माहिती
https://www.holidify.com/pages/kala-ghoda-arts-festival-1607.html
या डिजिटल माहितीपेक्षाही त्यांचे कार्यक्रमांचे एक रंगीत पुस्तक तिथे मिळते ते मिळवून त्यातून इथे कुणी माहिती दिल्यास तिथे जाण्याची तारीख आणि वेळ कळेल. लहान मुलांसाठी (५-१२ ) पर्वणीच असते. या वर्षी नक्की जा.
या भागात कामानिमित्त जाणे
छान लेख आणि फोटो.
या भागात कामानिमित्त जाणे व्हायचे. तेव्हा हेरिटेज वॉक इ. प्रकार माहीत नव्हते . त्यामुळे या वास्तूंकडे , रस्त्यांकडे त्या नजरेने पाहिले नाही. अर्थात एशियाटिक सोसायटी अपवाद. ती वास्तुच तशी आहे. तेव्हा तिचे महत्त्व माहीत नव्हते. फोर्ट भागातल्या गल्ल्याही आठवतात. हुतात्मा चौकाच्या पुढच्या लहान लहान गल्ल्या. जुन्या , लाकडी जिने असलेल्या इमारती. एका गल्लीचं नाव बदललेलंही पाहिलं. आता शोधलं तर तो परिसर, त्या इमा रतीही बदलल्यात असं दिसतं. पाहायला जायला हवं.
मंत्रालयाकडे जाणारे मोर्चे आमच्या ऑफिसच्या बरोबर समोर थांबायचे आणि तिथेच सभा व्हायच्या. तिथे काळा घोडा नव्हता, तरीही बातम्यांत तेच म्हटलं जायचं. संध्याकाळी सभा / मोर्चा असेल तर चर्चगेटकडे जाणारा जमशेटजी टाटा मार्ग बंद होई. मग मागे के सी कॉलेजवरून महर्षी कर्वे रोडवरून जावं लागे.
खुप छान माहिती आहे एसआरडी.
खुप छान माहिती आहे एसआरडी.
काला घोडाला कुणी संगीताच्या कार्य्क्रमाला जाणार असेल तर सांगा. वीकांताला असल्यास प्रयत्न करायचा विचार करतेय.
मस्त! फोटोही छानच!
मस्त! फोटोही छानच!
मुंबईत एकदा असं फिरायची इच्छा आहे.
पुण्यात एकदा शनिवारवाडा हेरिटेज वॉकला गेले होते. प्र. के. घाणेकर यांच्याबरोबर हा वॉक होता. शनिवारवाड्यात त्याआधी किती तरी वेळा जाऊनही आपल्याला किती तरी गोष्टी माहिती नव्हत्या असं लक्षात आलं होतं
>>>>>>मुंबई जितकं फिरू तितकी
>>>>>>मुंबई जितकं फिरू तितकी नव्याने कळते प्रत्येकच वेळी Happy
मुंबईची सर जगातील कोणत्याच शहराला नाही. अविट, नित्य नूतन अशी 'सिटी दॅट नेव्हस स्लीप्स. मुंबई महानगरी.
.
नॉस्टॅल्जिक!!!
वा छान.
वा छान.
@ samo, agdi khara, job ani
@ samo, agdi khara, job ani ata lagna nimittane mumbai sutli, pan jevha jate tevha potbhar mumbai manat sathvun ghete, pan kadhich man bharat nahi!
@wave, kharay rojchya kiva
@wave, kharay rojchya kiva khup wela pahilelya goshti navyane kaltat asha walks cha nimittane
Maja yete kadhitari aplach shahar tourist banun firayla
मुंबईची सर जगातील कोणत्याच
मुंबईची सर जगातील कोणत्याच शहराला नाही. अविट, नित्य नूतन अशी 'सिटी दॅट नेव्हस स्लीप्स. मुंबई महानगरी.>>>हे जरा जास्त होतय. Each city has his uniqueness, advantages and disadvantages. We should enjoy each city in that perspective without comparing.
छान माहितीपूर्ण लेख. आवडला.
छान माहितीपूर्ण लेख. आवडला. असं पुण्यात फिरायला पाहिजे कधीतरी.
<< हे जरा जास्त होतय. >>
<< हे जरा जास्त होतय. >>
म्हणू द्या ओ. आता जर कुणाला बकाल शहरे आवडत असतील अगदी मनापासून, तर आपण कशाला त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा.
ही एकदम बेसिक टाउन ट्रिप आहे
ही एकदम बेसिक टाउन ट्रिप आहे. मस्त लिहिले आहे. रिदम हाउस जहांगीर आर्ट ग्यालरी राहिले आर्मि नेवी बिलिडिन्ग. म्युझीअमच्या मागे कुमार स्वामी हॉल आहे तिथे मस्त प्रदर्शने असतात. मी जाते.
तै, रिदम हाउस आणि स्ट्रँड बुक
तै, रिदम हाउस आणि स्ट्रँड बुक स्टॉल बंद पडले आता. एक पर्व संपले.
Ho baryach goshti rahilyat
Ho baryach goshti rahilyat khara, kharatar fort areat kahihi baghitla tari heritage ch watta. Divas kami padla
Ho baryach goshti rahilyat
Ho baryach goshti rahilyat khara, kharatar fort areat kahihi baghitla tari heritage ch watta. Divas kami padla
मस्त फोटो आणि वर्णन! करायला
मस्त फोटो आणि वर्णन! करायला पाहिजे हा वॉक एकदा. रस्ते इतके रिकामे कसे काय?
मला लहानपणीपासून मुंबईचे व त्यातही तेथील रेल्वेचे प्रचंड आकर्षण होते. मग एकदा दीड दोन महिने फोर्ट मधेच काम होते. तेव्हा रीगलजवळच्या हॉटेल मधे राहात होतो. तेव्हा मनसोक्त फिरून घेतले होते बहुतांश फोर्ट भागात व लोकल्सचा पास काढून त्यातून फिरलो होतो. फाउण्टन की चर्चगेटवरून दादर पर्यंत जाणार्या डबल डेकर मधे बसून ती चक्करही मारली होती.
मला ते मुंबईत इंग्रजांनी बांधलेल्या इमारतींना आपल्या इतिहासातील लोकांची नावे दिलेले मात्र आवडले नाही. ती ज्यांची कर्तबगारी आहे त्यांनी दिलेली नावेच तेथे चपखल वाटतात.
Pages